नवी मुंबई,दि.२७ : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी ते मुंबई ही ऐतिहासिक पदयात्रा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीत वाशी येथे पोहोचल्यानंतर सरकारने गांभीर्याने दखल घेतली. या ऐतिहासिक पदयात्रेत लाखो मराठा बांधवांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे मराठा समाजाची एकजूट संपूर्ण महाराष्ट्राला पाहता आली. मराठा आरक्षणाच्या महत्वपूर्ण लढाईत सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची अधिसूचना शासनाने काढल्यामुळे मराठा समाजाने आनंद उत्सव साजरा केला.
मराठा समाजाच्या एकजुटीने हा ऐतिहासिक लढा जिंकलेला आहे अशी भावना व्यक्त करत विजयी गुलाल उधळून शनिवारी परतीच्या प्रवासाला सर्व मराठा आंदोलक निघाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता झालेल्या ऐतिहासिक विजयी सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस पित आपलं उपोषण मागे घेतले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंदी आणि सगेसोयरे या बाबतची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे. राज्य सरकारनं सगेसोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल यासंदर्भातील राजपत्र प्रकाशित केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारनं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावीत, अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस घेतला आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी भाजपकडून गिरीश महाजनही उपस्थित होते.
जालन्यातील आंतरवाली सराटी येथून २० जानेवारीपासून ऐतिहासिक मोर्चा काढला होता. मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबईतील वाशीत दाखल होताच राज्य सरकारनं त्यांची मागणी मान्य केली. राज्य सरकारनं यासंदर्भात एक राजपत्र प्रकाशित केलं आहे. राजपत्रातून जारी केलेला मसुदा १६ फेब्रुवारी २०२४ पासून विचारात घेण्यात येईल असं म्हटलं आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई असा ऐतिहासिक मोर्चा काढणारे मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थित मराठा समाजाला संबोधित केलं.
कुणबी नोंदींच्या आधारे सगेसोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील राजपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दिले. यावेळी मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्या केल्या.
न्या. शिंदे समितीला देखील मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्या आधारे कुणबीप्रमाणपत्र देण्यात यावीत. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या कुटुंबीयांना जात प्रमाणपत्र द्यावं, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांना जातप्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी केली होती. माझ्या मराठ्यांनी या आरक्षणासाठी संघर्ष केला, ३०० पेक्षा अधिक मराठा मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक घरांमधील कर्ता पुरुष गेलेला आहे." असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. या कुटुंबीयांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठा समाजावर आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोंदी मिळालेल्यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं सुरु केली. ज्याची नोंद मिळालेली आहे त्या मराठा बांधवांच्या सग्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र दिली जावीत, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्र आणि अध्यादेश काढला याबाबत धन्यवाद असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"महाराष्ट्राच्या वतीनं एकच विनंती आहे की, मी जीवाची पर्वा न करता उपोषण केलेलं आहे. ज्यांची नोंद मिळालेली आहे त्यांची गृहचौकशी न करता जात प्रमाणपत्र वाटप करावीत. आंतरवाली सराटीतील गुन्हे मागे घेतले जावेत. न्या. शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ दिली जावी. ओबीसी समाजाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतलाय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले."
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नये. मराठा समाजातील शेवटच्या व्यक्तीला आरक्षण मिळेपर्यंत माझा लढा चालूच असेल." असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. हैदराबादचं १८८४ चं गॅझेट लागू करावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंदी आणि सगेसोयरे या बाबतची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे. राज्य सरकारनं सगेसोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल यासंदर्भातील राजपत्र प्रकाशित केलं आहे.
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारनं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावीत, अशी मागणी केली होती.
जालन्यातील आंतरवाली सराटी येथून २० जानेवारीपासून ऐतिहासिक मोर्चा काढला होता. मनोज जरांगे यांचा मोर्चा नवी मुंबईतील वाशीत दाखल होताच राज्य सरकारनं त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारनं यासंदर्भात एक राजपत्र प्रकाशित केलं आहे. राजपत्रातून जारी केलेला मसुदा १६ फेब्रुवारी २०२४ पासून विचार घेण्यात येईल असं म्हटलं आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं काढलेल्या राजपत्रातील नियमांचा मसुदा : -
१. या नियमांस, महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२४ असे म्हणावे. (१) भाग चार-ब-४९-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी २६, २०२४/ माघ ६, शके १९४५
२. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ याच्या नियम २ व्याख्या मधील उप-नियम (१) मधील खंड (ज) नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल :-
(ज) (क) सगेसोयरे : सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.
नियम क्र. ५ मधील उप-नियम (६) मध्ये क्रमशः पुढीलप्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे :
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.
कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.
ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील. ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.
सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
नियम क्रमांक १६ अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये :-
(ज) उपलब्ध असल्यास, पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि/किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र.
"मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केल्यानंतर याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे त्यानंतरच खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय मिळेल."
मराठा समाजातील ज्या लोकांच्या जुन्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी राज्य सरकारने व प्रशासनाने जलद गतीने योग्य पावले टाकली पाहिजेत.
No comments:
Post a Comment