"सिमेंट - वाळूच्या दुकानात काम करणारा तरुण ते गरीब,सर्वसामान्य लोकांची करोडो रुपयांची हॉस्पिटलची बिले माफ करून देणारा ध्येयवादी रुग्णसेवक ते गरीब रुग्णांची वेदना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणारा देवमाणूस ते गरीब भाजीवाल्या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांना देखील दखल घ्यायला भाग पाडणारा संघर्षसेनेचा, ध्येयवादी संघर्षयोद्धा, प्रेरणादायी शिलेदार संतोष साठे"....
समाजाच्या वेगवेगळ्या घटकातील तरुणाई आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत असते. समाजातील गंभीर प्रश्नांसाठी तसेच जनतेच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे काम करणारी फार कमी लोकं आपल्याला समाजात बघायला मिळतात.
पुणे शहरातील धनकवडीमध्ये एका गरीब व सामान्य कुटुंबामध्ये संतोष साठे यांचा जन्म झाला. आई वडील व दोन बहिणी यांच्यासह संतोष साठे धनकवडीतल्या आपल्या छोट्या घरामध्ये सर्वसामान्य व हलाखीच्या परिस्थितीत राहत होते.
"घरची परिस्थिती हालाखीची व गरीब असल्यामुळे संतोष साठे यांनी इयत्ता नववी मधूनच शाळा सोडून घरच्यांना हातभार लागावा म्हणून एका कप बनवणाऱ्या कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली. या दरम्यानच्या काळात तालमीची व व्यायामाची आवड असल्यामुळे गावाकडे काही दिवस तालमीतील व्यायामाचा सराव केला. कुस्तीचा सराव केला परंतु आजारी पडल्यामुळे पुन्हा संतोष साठे यांना पुण्यात यावे लागले."
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
कप बनवणाऱ्या कंपनीमध्ये संतोष साठे यांची बोटे थोडी चिरल्यामुळे, बोटांना गंभीर दुखापत झाल्यामुळे ते कंपनीचे काम त्यांनी सोडले. यानंतर त्यांनी काही महिने सिमेंट व वाळूच्या दुकानांमध्ये एक सामान्य कामगार म्हणून काम केले. वाळूच्या गाड्या भरून देणे. सिमेंटची पोती उचलून गाडीत टाकणे ही सारे कष्टाची कामे करत असताना संतोष साठे यांची घरची गरीब व हलाखीची परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोरून जात होती.
सामान्य कुटुंबातील तसेच गरीब कुटुंबातील मुलांना जो संघर्ष करावा लागतो त्याच संघर्षातून संतोष साठे यांचा प्रवास चालू होता. कमी वयातील या कष्टांच्या कामामुळेच संतोष साठे यांना कामगारांचे व मजुरांचे दाहक वास्तव समजायला मदत झाली.
यानंतर काही दिवसांनी संतोष साठे यांच्या वडिलांनी कर्ज काढून एक छोटासा टेम्पो संतोष साठे यांना घेऊन दिला. टेम्पो चालक म्हणून दोन वर्ष काम करत असताना संतोष साठे यांना समाजातील वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध केले.
या दरम्यानच्या काळामध्येच संतोष साठे यांचा मित्रपरिवार पुणे शहरातील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्यामुळे संतोष साठे यांची वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची वाटचाल सुरू झाली. पुण्यातील गणेश उत्सव मंडळाच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात संतोष साठे व मित्रपरिवार सामाजिक बांधिलकीने सहभाग घेत होते.
या दरम्यानच्या काळातच फायनान्स कंपन्यांसाठी रिकव्हरी विभागासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून देखील संतोष साठे कार्यरत होते. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या कामांचा, कष्ठाचे वेगवेगळे अनुभव आल्यामुळे त्यांना आयुष्याचे गांभीर्य समजायला सोपं गेलं.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
तरुण वयातच भारतीय मातंग संघटनेमध्ये पुणे शहराचे पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तिथेही संतोष साठे यांनी प्रामाणिकपणे काम केले. संतोष साठे यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्राचे आदर्श नेते,माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रहार संघटना.
"बच्चू कडू यांचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीचे व दिव्यांग बांधवांसाठींचे कार्य पाहून त्यांच्या प्रेरणेने संतोष साठे यांनी आपल्या मित्रांसह 2014 मध्ये प्रहार जनशक्ती या पक्षामध्ये आपल्या राजकीय, सामाजिक वाटचालीस सुरुवात केली."
समाजातील गरीब घटकातील, दुर्बल घटकातील व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या सरकारी दवाखान्यात, एखाद्या खाजगी दवाखान्यात गंभीर आजारासाठी ऍडमिट होतो त्यावेळेस त्याचा आर्थिक संघर्ष हा खूप वेदनादायी संघर्ष असतो. प्रहार जनशक्ती पक्षातून संतोष साठे यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्याला सुरुवात केल्यानंतर रुग्णसेवेवरती खूप जास्त भर दिला. उमेश महाडिक या रुग्णसेवक मित्राच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेतील संतोष साठे यांची जडणघडण खूप चांगल्या प्रकारे झाली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही मराठवाडा, विदर्भ असो, कोकण असो , की पश्चिम महाराष्ट्र असो कुठूनही सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील रुग्णाचा फोन आल्यानंतर सर्वांना 24 तास रुग्ण सेवेसाठी संतोष साठे उपलब्ध असतात. गरीब कुटुंबातील, सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांचे खाजगी हॉस्पिटल मधील मोठी बिले कमी करून देण्यासाठीची मदत असो की वेगवेगळ्या सरकारी योजनेच्या माध्यमातून ऑपरेशन साठी आर्थिक मदतीची योजना असो की वैद्यकीय संकट असलेल्या रुग्णसेवासाठी संतोष साठे निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे काम करतात.
कोरोनाच्या काळात संतोष साठे व त्यांच्या मित्र परिवारानी रुग्णसेवेचे खूप मोठे कार्य केलेले आहे. कोरोना काळात संतोष साठे व त्यांच्या मित्रपरिवाराने केलेले पुणे शहरातील वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये औषध फवारणीचे काम असो की, पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील रुग्णांना कोरोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटल मिळवून देणे असो की, ऑक्सिजन बेड मिळवून देणे असो, तसेच ॲम्बुलन्स मिळवुन देणे असो या सर्व रुग्णसेवेसाठी अहोरात्र मेहनत केली.
कोरोना काळात पुणे शहरामध्ये सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडलेले होते. लॉकडाऊन मुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता तसेच उपासमारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा भयंकर परिस्थितीत देखील संतोष साठे व मित्र परिवाराने पुणे शहरातील आंबेगाव पठार येथील साई सिद्धी प्रतिष्ठानच्या मार्फत तसेच त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या मदतीने तसेच दानशूर लोकांच्या मदतीने रोज पाचशे लोकांना जेवण देण्याचा अन्नदान उपक्रम यशस्वीपणे राबविला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
कोरोना काळातील या अन्नदान उपक्रमामुळे पुणे शहरातील अनेक सर्वसामान्य, गरीब घटकातील लोकांना याचा फायदा झाला. या अन्नदान उपक्रमासाठी पुणे शहरातील पोलीस प्रशासनाने खूप चांगले सहकार्य केले. या उपक्रमासाठी संतोष साठे यांचे मित्रपरिवाराने तसेच समाजातील सर्वच दानशूर लोकांनी खूप चांगले सहकार्य केले.
पुणे पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त या अन्नदान उपक्रमास मदत करून त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला.
संतोष साठे आणि त्यांच्या मित्र परिवारांनी तसेच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात पुणे शहरातील अलका चौकात प्रहार पक्षाच्या माध्यमातून कोरोना झालेल्या गंभीर परिस्थितीतील रुग्णाला व्हेंटिलेटर बेड मिळावा म्हणून केलेले आंदोलन संपूर्ण पुणे शहर तसेच महाराष्ट्रामध्ये गाजले. कोरोना काळात संतोष साठे यांनी गंभीर परिस्थितीतील शेकडो, हजारो रुग्णांना प्रामाणिकपणे मदत केली.
"संतोष साठे यांनी मागील दहा वर्षात हजारो लोकांची खाजगी हॉस्पिटल मधील, लाखो रुपयांची बिले आंदोलन करून तसेच वेळे प्रसंगी उपोषण करून कमी करून दिले. मागील दहा वर्षात महाराष्ट्रातील हजारो लोकांची कमीत कमी 100 - 150 कोटींची खाजगी हॉस्पिटलची बिले संतोष साठे यांनी त्यांच्या रुग्णसेवेच्या माध्यमातून कमी करून दिल्याचं त्यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले."
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील सामान्य कुटुंबातील, गरीब कुटुंबातील रुग्णांना मदत करत असताना अनेक वेगवेगळे हृदयस्पर्शी अनुभव संतोष साठे यांना आले. त्यातीलच एका हर्षल नावाच्या तरुणाचा प्रसंग सागताना अक्षरशः ते खूप भावुक झाले.
हर्षलची आई पायाला गाठ झाल्यामुळे, गंभीर दुखापत झाल्यामुळे पुणे शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले असताना हर्षलला खूप मोठी आर्थिक अडचण होती. हर्षलला वडील नसल्यामुळे तसेच कुणाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली नसल्यामुळे तो खूप चिंतेत असतानाच त्याने रुग्णसेवक संतोष साठे यांना फोन केल्यानंतर पुढची संपूर्ण मदत संतोष साठे यांनी प्रामाणिकपणे केली.
हर्षलच्या आईच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी लागणारे पाच लाख रुपये संतोष साठे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ करून, सर्व सामाजिक संस्थांना, दानशूर व्यक्तींना मदतीचा आव्हान केले आणि त्यानंतर हर्षलच्या आईच्या पायाच्या गंभीर आजाराच्या उपचारांसाठी लोकांकडून आर्थिक मदत मिळाली.
हा हृदयस्पर्शी प्रसंग सांगताना संतोष साठे म्हणाले की "पुणे शहरातील अनेक खाजगी हॉस्पिटल ज्यांना चॅरिटेबल विभागाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळत असते परंतु अनेक गरीब, गरजू रुग्णांना त्यांच्या माध्यमातून मदत मिळत नाही. अनेक हॉस्पिटलमध्ये सरकारी योजनेच्या माध्यमातून ही रुग्णांना मदत मिळत नाही, खूप संघर्षाला सामोरे जावे लागते त्यावेळेस आम्हा रुग्णसेवकांना हॉस्पिटल प्रशासनाशी संघर्ष करावा लागतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच आरोग्यमंत्र्यांनी चॅरिटेबल हॉस्पिटल मधील रुग्णांच्या या गंभीर प्रश्नांकडे विशेष लक्ष घालून रुग्णांना न्याय मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत." अशी प्रतिक्रिया संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुणे शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एका गरीब कुटुंबातील रुग्णाचे बिल कमी करण्यासाठी संतोष साठे गेलेला असतानाच त्या हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजा बाहेर एक 70 वर्षांच्या आजी अत्यंत दुःखी अवस्थेत दिसल्या.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"त्या आजींचे पती त्या खाजगी दवाखान्यामध्ये ऍडमिट होते आणि 35 हजार रुपये भरायला नसल्यामुळे त्यांच्या पतीला ते हॉस्पिटल प्रशासन सोडत नव्हते हे संतोष साठे यांना कळल्यानंतर त्यांनी त्या आजीच्या पतीचे हॉस्पिटलचे बिल सरकारी योजनेत माफ करून घेऊन त्यांना मदत केली. त्या हृदयस्पर्शी प्रसंगा वेळी त्या आजींनी रुग्णसेवक संतोष साठे व त्यांच्या मित्रांचे पाय धरले आणि तुमच्या रूपात आम्हाला देवमाणूस भेटल्याची भावना व्यक्त केली."
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील, अठरापगड जातीतील गरीब रुग्णांचे असे शेकडो हृदयस्पर्शी प्रसंग आहेत ज्यामध्ये रुग्णसेवक संतोष साठे यांनी निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे मदत केलेली आहे.
"महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर देखील रुग्णसेवक संतोष साठे यांनी पुणे शहरातील चॅरिटेबल ट्रस्टची मदत मिळणाऱ्या खाजगी दवाखान्यामध्ये सर्वसामान्य, गरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नसल्याची,अनेक अडचणींचा व संघर्षाचा सामना करावा लागणाऱ्या गरीब रुग्णांची वेदना रुग्णसेवक संतोष साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या गरीब रुग्णांच्या गंभीर विषया बाबतीत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले."
"पुणे महानगरपालिकेच्या 292 सफाई कर्मचाऱ्यांच्या पीएफ, ईएसआय व कमी वेतन या गंभीर प्रश्नासाठी देखील संतोष साठे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून शनिवार वाडा ते पुणे महानगरपालिका मोठे आंदोलन केले. या 292 सफाई कामगारांना पीएफ, ईएसआय मिळत नव्हता तसेच त्यांच्या वेतनामध्येही भ्रष्टाचार होत होता असे आरोप आक्रमकपणे संतोष साठे यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनावरती करून या 292 कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष साठे यांनी मोठे आंदोलन केले."
कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल संपूर्ण भारताने तसेच जगाने देखील घेतली. समाजातील या दुर्लक्षित घटकाच्या न्याय हक्कांसाठी संतोष साठे यांनी प्रामाणिकपणे व आक्रमकपणे लढा दिला.
या कामगारांच्या न्याय हक्कांसाठी पहिले आंदोलन केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली व योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यापुढे काहीच कारवाई झाली नसल्यामुळे संतोष साठे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून पुन्हा दुसरे आंदोलन धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारती वरती शोले आंदोलन केले. या आंदोलनामुळे संतोष साठे यांच्यावरती पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले.
यादरम्यानच्या काळातच रुग्णसेवक संतोष साठे यांना या कामगारांच्या आंदोलनामुळे काही धमक्यांचे देखील फोन आले परंतु ते डगमगले नाहीत. पुणे महानगरपालिकेकडून कामगारांच्या प्रश्नांच्या बाबतीत विशेष कार्यवाही होत नसल्याचे दिसल्यामुळे संतोष साठे यांनी पुणे महानगरपालिकेत आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला.
या आत्मदहन आंदोलनाच्या इशारामुळे संतोष साठे यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. एक रात्र भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कोठडीत घालवली. "कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत असताना या आत्मदहन आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अटक होऊन पोलीस स्टेशनच्या चौकीत संपूर्ण रात्र घालवायला लागेल व एवढ्या वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं." अशी भावना संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना व्यक्त केली.
यानंतरच्या काळात देखील संतोष साठे यांनी कामगारांच्या न्याय - हक्कांसाठी पुन्हा तिसरे आंदोलन केले. धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारती वरती कॉन्ट्रॅक्टरचा पुतळा जाळण्याचे आंदोलन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान संतोष साठे यांच्या सहकाऱ्यांचा कॅमेरा व साऊंड सिस्टिम पोलिसांकडून जप्त करण्यात आली.
तो कॅमेरा आणि साऊंड सिस्टिम सोडवण्यासाठी संतोष साठे यांना आर्थिक त्रास सहन करावा लागला. परंतु या तिसऱ्या आंदोलनाचा फार मोठा परिणाम झाला. कामगारांच्या या गंभीर विषयात ज्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले होते. त्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीला पुणे महानगरपालिकेने 30 लाखाचा दंड केला व या दंडाची पावती संतोष साठे यांना पुणे महानगरपालिकेने पोस्टाने त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पाठवली.
कामगारांच्या न्याय - हक्कांसाठी केलेल्या या तीनही आंदोलनामुळे एक चांगले यश मिळाल्याची भावना संतोष साठे यांनी व्यक्त केली. या आंदोलनात संतोष साठे यांना त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, लोकप्रिय नेते,मा.राज्यमंत्री बच्चू कडू तसेच पुणे महापालिका प्रशासन यांनी देखील सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. संतोष साठे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून खूप चांगले कार्य केलेले आहे.
"महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते बच्चू कडू यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य संतोष साठे यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीत मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात."
प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये आठ वर्ष काम केल्यानंतर सामाजिक क्षेत्रात कुठेतरी आता एक वेगळं आणि नवीन पाऊल टाकलं पाहिजे या विचारानेच आणि संतोष साठे यांच्या मित्र परिवारांच्या सल्ल्याने व सहकार्याने संतोष साठे यांनी संघर्ष सेना या सामाजिक संघटनेची स्थापना केली.
रुग्णसेवक संतोष साठे यांनी संघर्ष सेनेची स्थापना केल्यानंतर पुणे शहरातील जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठीच्या तसेच महत्त्वाच्या समस्यांसाठी आंदोलने करायला सुरुवात केली.
पुणे महानगरपालिकेच्या इमारतीच्या मागील मुठा नदीतील प्रदूषणाच्या गंभीर समस्या वरती संतोष साठे यांनी संघर्ष सेनेच्या माध्यमातून मोठे आंदोलन केले. "पुणे शहरातील गटाराचे पाणी, हॉस्पिटलची घाण, दूषित पाणी या मुठा नदीत सोडलेले असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
हेच पाणी पुढे उजनी धरणात जाऊन तिथले पाणी देखील दूषित करते. त्याच प्रदूषित पाण्यातले लोक मासे खातात. या घाणीमुळेच, दूषित पाण्यामुळेच कॅन्सरचे देखील प्रमाण वाढायला लागले आहे. यामुळेच आम्ही संघर्ष सेनेच्या माध्यमातून या गंभीर विषयावरती आक्रमकपणे आंदोलन केले. अशी भावना रुग्णसेवक संतोष साठे यांनी व्यक्त केली.
संघर्ष सेनेच्या माध्यमातून संतोष साठे यांनी गोरगरीब सामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पुणे शहरातील धनकवडी येथील एका सर्वसामान्य गरीब भाजी विक्रेत्याच्या गाडीवरती, पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर त्या सर्वसामान्य भाजीविक्रेत्या तरुणाच्या मदतीसाठी संतोष साठे धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात गेले. त्या गरीब भाजीविक्रेत्याची गाडी सोडण्याचे त्यांनी विनंती केली. परंतु तेथील अधिकारी दात देत नसल्यामुळे त्यांनी लोकप्रिय नेते बच्चू कडू यांना फोन करून अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले.
"भाजी विक्रेत्या सर्वसामान्य तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी संतोष साठे यांनी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना फोन करून सविस्तर विषय समजून सांगितला. यानंतर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत थेट धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात त्या गरीब भाजीवाल्या तरुणाची समस्या जाणून घेण्यासाठी व सोडवण्यासाठी आले."
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर तानाजी सावंत यांनी त्या गरीब भाजी विक्रेत्याचा दंड स्वतः भरून त्या भाजीवाल्या तरुणाची गाडी सोडूवुन दिली. कुठल्याही सर्वसामान्य भाजीविक्रेत्यावरती अन्याय होणार नाही याची सर्व अधिकार्यांनी व कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. अशा सूचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महापालिकेच्या सर्व अधिकार्यांना दिल्या. व या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे ही आदेश दिले.
संतोष साठे यांचे प्रामाणिक सामाजिक कार्य व जनतेच्या गंभीर प्रश्नांसंदर्भातली त्यांची तळमळ, आस्था यामुळेच महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या गंभीर विषयाची दखल घेतली.
संतोष साठे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांच्या घरच्यांचा विरोध होता. परंतु जसे जसे संतोष साठे यांची जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठीची आंदोलने, उपोषणे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजायला लागली व लोकांचे प्रेम मिळायला लागले त्यानंतर संतोष साठे यांच्या आई - वडिलांनाही त्यांच्या सामाजिक कार्याचा अभिमान वाटायला लागला. संतोष साठे यांच्या पत्नीचीही त्यांना मोलाची साथ मिळाली.
संतोष साठे हे स्वतःचा वाढदिवस प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करत असतात. संतोष साठे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी आतापर्यंत एकूण 200 व्हीलचेअर वाटप, सायकल वाटप केले होते. त्या वाढदिवसाच्या सोहळ्यात संतोष साठे यांच्या वडिलांनी त्या सोहळ्याचे, संतोष साठे यांचे काढलेले फोटो तो प्रसंग खूप हृदयस्पर्शी होता अशा भावना संतोष साठे यांनी व्यक्त केल्यात.
आपल्या आई-वडिलांची कौतुकाची थाप आपल्या जगण्याला तसेच आपल्या संपूर्ण जीवन कार्याला खूप मोठी प्रेरणा देत असतात.
"संघर्ष सेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काही वर्षात संतोष साठे यांनी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 1000 कार्यक्षम रुग्णसेवक तयार करायचं ध्येय ठेवलेले आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील, वेगवेगळ्या तालुक्यातील सरकारी दवाखान्यांची असलेली दुरावस्था, खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची होणारी बिलांच्या बाबतीत लुटमार तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभ हॉस्पिटलमध्ये गोरगरीब, सामान्य रुग्णांना मिळत नसल्यामुळे रुग्णसेवा हा महत्त्वाचा विषय घेऊनच संपूर्ण महाराष्ट्रभर संघर्ष सेना या संघटनेचे कार्य वाढवणार असल्याची भावना संतोष साठे यांनी व्यक्त केली."
संतोष साठे यांचे पुणे शहरातील भेसळयुक्त तुपाच्या गाड्या पकडण्याचे आंदोलन ही खूप गाजले होते. तसेच पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील, कचरा डेपोतील गाड्यांचे डिझेल चोरीच्या प्रकरणावरती त्यांनी आक्रमकपणे आवाज उठवला होता.
संतोष साठे यांचे प्रामाणिक सामाजिक कार्य व त्यांची वेगवेगळी गाजलेली आंदोलने त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातल्या विविध पक्षातील, मोठया नेत्यांकडून त्यांच्या पक्षांमध्ये येण्यासाठी अनेक प्रस्ताव येत असतात. परंतु त्यांचे संघर्ष सेनेच्या ध्येयधोरणावरती व कार्यावरती जास्त लक्ष आहे.
रुग्णसेवक संतोष साठे यांनी संघर्ष सेनेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या, क्षेत्रीय कार्यालयाच्या कामावर असणाऱ्या अधिकाऱ्याला दारूच्या नशेत पकडून त्याचा व्हिडिओ शूट करून, त्याच्यावर कारवाईसाठी सुद्धा जोरदार प्रयत्न केले. संघर्ष सेना पर्यावरण या विषयावरती ही गांभीर्याने काम करताना दिसत आहे. पुणे शहरात कुठेही बेकायदेशीर झाडांची कत्तल होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा संघर्ष सेना आंदोलन करून संबंधित व्यक्तींवरती कारवाई करण्यासाठी प्रयत्न करते.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"संतोष साठे यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो रुग्णांना, गोरगरीब लोकांना मदत केल्यानंतर त्यांना जे समाधान मिळतं त्यातूनच त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. गोरगरीब, सामान्य कुटुंबातील रुग्णांची लाखो रुपयांचे हॉस्पिटलचे बिलं कमी करून दिल्यानंतर त्या रुग्णांचा साधा चहाही न पिता पुन्हा पुढील रुग्णसेवेसाठी ते तत्पर असतात."
"संतोष साठे यांनी प्रामाणिकपणे केलेल्या रुग्णसेवेचे राजकीय जीवनासाठी, तथाकथित प्रसिद्धीचे मार्केटिंग न करता निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे हजारो लोकांच्या सेवेसाठी आहोरात्र उपलब्ध राहतच त्यांना आनंद मिळतो. यामुळेच महाराष्ट्रातले हजारो गोरगरीब रुग्ण संतोष साठे यांना आपल्या अडचणीच्या, संकटांच्या काळात मदत करणारा "देवमाणूस" म्हणून ओळखतात."
"सुशिक्षित तरुण पिढीने राजकारणात आलं पाहिजे. लोकांनी ही निवडणुकीच्या वेळेस जातपात, धर्म, पैसा न पाहता निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. आणि आपल्या मतदारसंघातील प्रश्नांची जाण असणाऱ्या व मतदार संघाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला लोकांनी निवडून दिले पाहिजे." असे मत संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष साठे आजच्या राजकारणाविषयी बोलताना व्यक्त करतात.
"आजच्या तरुण पिढीने गुन्हेगारी क्षेत्रात न जाता सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं कार्य केलं पाहिजे. आज समाजाला चांगले कार्य करणाऱ्या तरुणांची खूप आवश्यकता आहे." असा संदेश रुग्णसेवक संतोष साठे तरुण पिढीला देतात.
"रुग्णसेवक म्हणून काम करत असताना आम्ही केलेली वेगवेगळी आंदोलने, उपोषणे, आम्ही राबवलेले वेगवेगळे सामाजिक उपक्रम यांना मीडियाने खूप चांगली प्रसिद्धी दिली. अनेक पत्रकार बांधवांनी देखील खूप चांगले मार्गदर्शन केले. महाराष्ट्र गर्जना न्यूजने नेहमीच आमच्या आंदोलनाला, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी दिली यामुळेच आमचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. अशी भावना संघर्ष सेनेचे संस्थापक, अध्यक्ष, रुग्णसेवक संतोष साठे यांनी व्यक्त केली.
एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आई-वडिलांच्या प्रेरणेने, मित्रपरिवार, संघटना, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने जनतेचे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी किती चांगलं कार्य करू शकतो?
महाराष्ट्रातील हजारो गरीब रुग्णांची, लाखो रुपयांचे हॉस्पिटलची बिले माफ करून देऊन, किती चांगली सेवा करू शकतो. हे उदाहरण महाराष्ट्रातील संपूर्ण तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे. रुग्णसेवक, प्रेरणादायी शिलेदार संतोष साठे यांना प्रामाणिक सामाजिक कार्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा...
लेखक : - अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.
प्रेरणादायी प्रवास 👏 छान लेख 👍🏻
ReplyDelete