Tuesday, February 13, 2024

"निर्भय बनोचे शिलेदार डॉ.विश्वंभर चौधरी, डॉ.असीम सरोदे, जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या पुण्यातील निर्भय बनोच्या सभेतील लोकांच्या मनातील "या" भावनेने जिंकली "ही" लोकशाहीची लढाई"


पुणे,दि.१३ : निर्भय बनोच्या सभांना संपूर्ण महाराष्ट्रात जनसामान्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, प्रसिद्ध कायदेतज्ञ डॉ. असीम सरोदे व ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या सभांना हजारो लोकांच्या उपस्थितीत,उत्तम प्रतिसाद मिळत आहे .


पुण्यात शुक्रवारी, नऊ तारखेला निर्भय बनोच्या  सभेसाठी पुणेकरांनी सायंकाळी साडेचार वाजल्या पासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती. सिंहगड रोडच्या, दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दलाच्या, निळू फुले सभागृहाच्या परिसरात पुणे पोलिसांचा कडेकोठ पोलीस बंदोबस्त होता. या सभेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केल्यानंतरच त्याला सभागृहामध्ये  प्रवेश दिला जात होता.


निळू फुले सभागृहामध्ये पहिल्या काही रांगांमध्ये पुणेकर येऊन बसले होते. हळूहळू सभागृहामधील गर्दी वाढायला लागली तसेच या सभागृहाच्या मुख्य गेटच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा जोर जोरात निषेधांच्या घोषणांचा आवाज येऊ लागला. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते जोरजोरात घोषणा देत होते.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुणे पोलिसांची तुकडी या भाजपच्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होती. निळू फुले सभागृहाच्या मुख्य गेटच्या आतील बाजूस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, रिपब्लिकन युवा मोर्चा व समविचारी पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते  देखील निर्भय बनो, कार्यक्रमाच्या समर्थनार्थ घोषणा देत होते.



निळू फुले सभागृह लोकांनी गच्च भरले होते.  ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ कायदेतज्ञ डॉ. असीम सरोदे यांची पुणेकर सभागृहात वाट पाहत होते. पुणे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्भय बनोची ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिल्यामुळे सभागृहातील लोकांच्या मनात एकच शंका होती की ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे या सभेला संबोधित करणार की नाही?



निखिल वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या विषयी आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे पुणे भाजपचे नेते धीरज घाटे, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते चिडलेले होते. सभागृहाबाहेरील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाच्या घोषणाचा आवाज जसा वाढत होता तशीच सभागृहातील लोकांच्या मनातील धाकधूकही वाढत होती. या सभागृहात या कार्यक्रमाचे काही मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते परंतु सभागृहातील  लोक निर्भय बनोच्या शिलेदारांची वाट पाहत होते.


"निळू फुले सभागृहातील उपस्थित गर्दी मधील प्रत्येक व्यक्तीला निर्भय बनोच्या शिलेदारांचा संविधानाचा, लोकशाहीचा, आवाज ऐकायचा होता आणि त्यासाठीच प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. ही त्यांची प्रामाणिक भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत होती."



निर्भय बनोच्या सभेला सहा वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला काही मान्यवर वक्त्यांची भाषणे झाली. परंतु सर्व लोक निर्भय बनोच्या तीन मुख्य शिलेदारांची वाट पाहत होते. काही वेळाने या कार्यक्रमाच्या आयोजकांनी निखिल वागळे यांना फोन लावून त्यांचं बोलणं सभागृहातील लोकांना ऐकवलं. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


निखिल वागळे यांचा या सभेमध्ये येऊन भाषण करण्याचा निर्धार पक्का होता. आणि त्यांचे फोनवरील निर्धाराचे शब्द ऐकल्यानंतर सभागृहाला खात्री झाली आता कितीही अडचण आली,  कितीही संकटे आली तरी निर्भय बनोचे सर्व शिलेदार सभागृहामध्ये येणारच.

या कार्यक्रमांमध्ये शिल्पा बल्लाळ, रेश्मा रामचंद्र, अश्विनी सातव डोके, या मान्यवरांची उत्तम भाषणे झाली. सभागृहात विविध पक्षांचे नेतेमंडळी व त्यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, लढेंगे जितेंगे या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये खाली जमिनीवर बसलेले होते.



"या सभागृहातील लोकांच्या मनातील संविधानाविषयीचे प्रेम, आपुलकी तसेच लोकशाही मजबूत करण्याची, समृद्ध करण्याचा निर्धार करणारी  प्रामाणिक भावना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्याला भक्कम पाठिंबा देणारी जनभावना सर्वांच्याच मनाचा ठाव घेणार होती."



या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील आयोजकांच्या चेहऱ्यावरील तणाव लोकांना दिसत होता. जसजसा हा तणाव  वाढत होता. तसतसा लोकांच्या काळजाचा ठोका चुकायला सुरुवात झाली होती. पुणे शहरातील तणावग्रस्त परिस्थितीमध्ये काहीतरी गंभीर घडतय याची चुणूक सभागृहातील लोकांना लागायला सुरुवात झाली.



"रात्रीचे दहा वाजले तरी चालेल आम्ही निर्भय बनोच्या शिलेदारांचे भाषण ऐकल्याशिवाय इथून हलणार नाही. मुक्काम करावा लागला तरी चालेल." अशी भावना सभागृहातील लोकशाही प्रेमी लोकांनी व्यक्त केली.



"या सभागृहातील उपस्थित जनसामान्यांच्या मनातील लोकशाहीचा आवाज निर्भय बनोच्या शिलेदारांची वाट पाहत होता. "

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सभागृहामध्ये लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, फुले शाहू आंबेडकरांच्या घोषणांनी संपूर्ण सभागृहात दणाणून गेले आणि तीन साडेतीन तास ज्या लोकशाहीच्या शिलेदारांची सभागृह वाट पाहत होतो ते डॉ. विश्वंभर चौधरी, डॉ. असीम सरोदे, जेष्ठ पत्रकार निखिल वागळे हे निर्भय बनोचे सर्व  शिलेदार व्यासपीठावरती पोहोचले होते. 


ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यासपीठावरती पोहोचताच लोकांना हात उंचावत केलेला नमस्कार, लोकांना मनापासून घातलेली साद पुणेकरांची मने जिंकून गेली. निर्भय बनोच्या सर्वच शिलेदारांची वज्रमुठ व निर्धार व्यासपीठावरती दिसून आला.


निळू फुले सभागृहात फुले, शाहू, आंबेडकरांच्या घोषणा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष तसेच लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, लढेंगे.. जितेंगे... या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेला.


निर्भय बनोचे सर्व शिलेदार व्यासपीठावरील आसनावर बसले. कुमार नागे यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवरती झालेल्या भ्याड हल्ल्याची   बातमी सभागृहातील लोकांना दिली. डॉ. विश्वंभर चौधरी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा सर्व इति वृत्तांत सांगितला. यावेळी सभागृहातील लोकांच्या काळजाचा ठोका चुकला.


व्यासपीठावरील डॉ. असीम सरोदे, निखिल वागळे, डॉ. विश्वंभर चौधरी हे या भ्याड हल्ल्याच्या धक्क्यातून अजून सावरले नव्हते. या हल्ल्यात गाडीच्या काचा या सर्वांच्या शर्टात व बुटात गेलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता, त्रास, वेदना संपूर्ण सभागृहाला दिसत होती.

या  भ्याड हल्ल्यामुळे निर्भय बनोच्या,लोकशाहीच्या शिलेदारांना झालेल्या  वेदना या सभागृहातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीच्या मनाला देखील झालेल्या पाहायला मिळाल्या. एवढा जीवघेणा हल्ला होऊन देखील व्यासपीठावरती ज्या प्रकारे हे निर्भय बनोचे शिलेदार सभागृहाला सामोरे गेले आणि आपल्या निर्धार सभा यशस्वीपणे केल्या हा खरा लोकशाहीचा विजय आहे.


डॉ. असीम सरोदे यांनी या जीवघेण्या हल्ल्याविषयी जो प्रसंग सांगितला तो ऐकून सभागृहातील सर्वच लोकांच्या अंगावरती शहारे आले. या भ्याड हल्ल्यात मृत्यू डोळ्यासमोर बघितल्यानंतर काय अवस्था होते? आणि यातून वाचल्यानंतर लोकशाहीच्या लढ्याला कसे बळ मिळते? हा हृदयस्पर्शी अनुभव त्यांनी सांगितला. 

चित्रपट व मालिका निर्माते नितीन वैद्य यांचे ललित कला केंद्र हल्ला प्रकरण व ललित कला केंद्राची महती  सांगणारे भाषणही सभागृहाला भिडले.


ज्या भाषणाची  सभागृहातील हजारो लोक वाट पाहत होते ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे भाषण. या भाषणाने सभागृहातील हजारो लोकांची व महाराष्ट्रातील लाखो लोकांची मने जिंकली. 



निखिल वागळे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीचा लढा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फॅसिस्टवाद, भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला भ्याड हल्ला, ललित कला केंद्र हल्ला प्रकरण, हुकूमशाही, मोदी - शहा, भाजपचे राजकारण या विषयांचा आक्रमक शैलीत खरपूस समाचार घेतला.


"निर्भीडपणे व प्रामाणिकपणे 45 वर्ष पत्रकारिता करणारे जेष्ठ पत्रकार, निर्भय बनोचे शिलेदार निखिल वागळे जीवघेणा हल्ला होऊन देखील सभागृहातील हजारो लोकांसमोर धीरोदात्तपणे सामोरे जाऊन लोकशाहीचा लढा आत्मविश्वासाने पुढे घेऊन जात होते. ही लोकशाही समृद्ध करणारी भावना हजारो पुणेकरांचे मन जिंकून गेली."



निर्भय बनोच्या सर्व शिलेदारांना या सभागृहात सुरक्षित घेऊन येणारे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते व त्यांच्या पक्षाच्या महिला रणरागिणी यांचे देखील लोकांनी मनापासून कौतुक केले.


काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे व त्यांचे कार्यकर्ते तसेच रिपाई युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे व त्यांचे कार्यकर्ते तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट व समविचारी संघटना, पक्ष यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment