पुणे,दि.२३ : पुणे शहरातील, दक्षिण उपनगरातील, भारती विद्यापीठ परिसरातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्ट यांनी गणेश जयंती निमित्त दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप करून व नवरत्न ओल्ड एज होम या वृद्धश्रमास देखील व्हीलचेअर व शिधा वाटप करून या आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमामुळे पुणेकरांची मने जिंकली.
भारती विद्यापीठ येशील "धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजीत "श्री गणेश जयंती सोहळा - २०२४" यावर्षी खूप आनंदात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
या वर्षी या सोहळ्यामध्ये गणेश जयंती अगोदर तीन दिवसीय भक्तीसंगीताच्या सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
"श्री गणेशजयंती दिनी" गणेश याग आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
यावेळी हजारो भाविकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा आनंद घेतला.
"धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्ट वर्षभर विविध सामाजीक उपक्रम राबवत असतात. ह्या गणेश जयंतीचे औचित्य साधून भारती विद्यापीठ परिसरातील आणि धाराशीव येथील गरजूंना, दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप करण्यात आले."
या गणपती ट्रस्टतर्फे "नवरत्न ओल्ड एज होम "वडगाव पुणे येथील वृद्धाश्रमास व्हीलचेअर आणि शिधा वाटप करण्यात आला. यावेळी धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर कोंढरे, आधारस्तंभ राकेश खोपडे आणि प्रमुख कार्यकर्ते आशिष देशमुख, निलेश मोरे, तुषार कोरडे, पराग शीळीमकर, प्रसिद्ध रुग्णसेवक उमेश महाडिक उपस्थित होते.
पुण्यातील, दक्षिण उपनगरातील प्रसिद्ध धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्ट नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी भारती विद्यापीठ परिसरातील तसेच पुणेकरांचे मन जिंकत असते.
"धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्ट हे गणेशोत्सव मंडळ पुणे शहरात प्रत्येक वर्षीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. विविध चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमांनी गणेश भक्तांचे मन हे गणेशोत्सव मंडळ नेहमीच जिंकते." अशी प्रतिक्रिया पुणे शहरातील प्रसिद्ध रुग्णसेवक उमेश महाडिक यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुणे शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे.
No comments:
Post a Comment