Sunday, March 17, 2024

"पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील तहानलेल्या लोकांना मिळणार हक्काचे पाणी; नवीन जलवाहिनीच्या कामाचे पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; आंबेगाव पठार परिसरातील लोकांना जुलै अखेरपर्यंत मिळणार हक्काचे पाणी - आमदार संजय जगताप"


पुणे,दि.१७ : पुणे शहरातील दक्षिण उपनगरांमधील, आंबेगाव पठार परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहे. पुरंदर - हवेलीचे  आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आंबेगाव पठार येथे पिण्याच्या पाण्याच्या  चार इंच व सहा इंच व्यासाच्या नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन, मान्यवरांच्या उपस्थितीत व आंबेगाव पठार येथील नागरिकांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडले.



पुणे महानगरपालिकेत 2017 ला नव्याने समाविष्ट झालेल्या आंबेगाव पठार या परिसरात अनेक वर्षे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न  यासाठी संघर्ष करावा लागत होता.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

बारामतीचे लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे व पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आंबेगाव पठार परिसरामध्ये विविध विकास कामांना मागील काही वर्षात गती आलेली पाहायला मिळत आहे.



पुणे शहरातील आंबेगाव पठार येथील सर्व्हे नंबर 15 व 16 येथील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

खासदार सुप्रिया सुळे  व  आमदार संजय जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आंबेगाव पठार परिसरासाठी नवीन जलवाहिनीच्या कामाची पुणे महानगरपालिकेकडून मंजुरी आल्यानंतर गुरुवारी या नवीन जलवाहिनीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत व या भागातील नागरिकांच्या उपस्थितीत, आंबेगाव पठार येथील सर्वे नंबर 16 मधील, वरदविनायक चौकात आनंददायी वातावरणात पार पाडला.


आंबेगाव पठार येथील नवीन जलवाहिनीच्या भूमिपूजन कार्यक्रमामुळे येथील नागरिकांना आता आपल्या हक्काचे मुबलक पाणी लवकरच मिळेल अशा भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या.


"आंबेगाव पठार परिसरातील  नागरिकांना या नवीन जलवाहिनीच्या माध्यमातून जुलै अखेरपर्यंत आपल्या हक्काचे पिण्याचे पाणी मिळेल. आंबेगाव पठार परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष लक्ष देऊ." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


आंबेगाव पठार परिसरामध्ये झालेले नवीन सिमेंट - काँक्रीटचे रस्ते, सांडपाण्याच्या  वाहिन्यांचे काम व या नवीन जलवाहिनीच्या कामाच्या भूमिपूजनामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


आंबेगाव पठार येथील नवीन जलवाहिनीच्या भूमिपूजन कार्यक्रमात  पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप, मा. नगरसेवक किशोर उर्फ बाळाभाऊ धनकवडे,  चेतन मांगडे, दिपक बेलदरे, तानाजी  दांगट, नंदा दांगट, बाप्पु निवंगुणे, भरत बाबर, भुषण रानभरे, बाळासो पासलकर, बापू जगताप,सतीश जगताप,सचिन शेवते, मयूर कोंढरे, शिंदे, विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.


आंबेगाव पठार परिसरातील या नवीन जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन, लोकांना लवकरात लवकर पाणी मिळावे अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या.

Tuesday, March 5, 2024

"श्री क्षेत्र वीर नगरीत लाखो भाविक भक्तांचा जनसागर, भक्तीच्या रंगात रंगले श्रीनाथ म्हस्कोबा महाराज; महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची लाल रंगाचे शिंपण करून; भक्तिमय वातावरणात, पारंपारिक मारामारी सोहळ्याने सांगता"

 

पुरंदर,वीर, दि. ५ :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील,  पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक  मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपारिक पद्धतीने, सवाई सर्जाचं चांगभलंच्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात, मानकरी, सालकरी,दागिनदार, लाखो भाविकांच्या उपस्थितीत शाही परंपरा जोपासत, भक्तीच्या रंगात मंत्रमुग्ध होऊन, उत्साहात पार पडला. मारामारीच्या  पारंपरिक सोहळ्याने 11 दिवस चालणाऱ्या वीरच्या यात्रेची सांगता झाली.


आज मंगळवार पारंपारिक मारामारीचा( रंगाचे शिंपण)  उत्सव काळातील महत्त्वाचा दिवस. आज पहाटे पाच वाजता देवाची पुजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक केल्यानंतर साडेदहा वाजता देवाला दहीभाताची पुजा बांधण्यात आली.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आज दुपारी १२ वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडीच्या श्रीनाथ म्हस्कोबांच्या पालख्या व सर्व काठ्या देऊळवाड्यात आल्या. देवाची आरती होऊन छबिन्याला सुरुवात झाली. छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर भाविकांनी "श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं" असा गजर केला आणि गुलाल, खोबरे उधळले.  मंदिराला दोन प्रदक्षिणा होऊन श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची अमृतवाणी(भाकनुक) झाली.



तिसऱ्या प्रदिक्षिणेवेळी जमदाडे मंडळीकडून दुपारी दीड वाजता रंगाचे शिंपण करण्यात आले. अशा पद्धतीने पारंपारिक मारामारी (रंगाचे शिंपण) सोहळ्याने  वीर यात्रेची, पारंपारिक उत्सवाची सांगता झाली.



या पारंपारिक सोहळ्यात लाखो लोकांनी "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात मंत्रमुग्ध होऊन, आपल्या अंगावर रंग पडण्यासाठी गर्दी केली.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

या पारंपारिक सोहळ्यात दुपारी दीड वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीवर रंगाचे शिंपण करण्यात आले. 



त्यानंतर मानाच्या काठीवर रंगाचे शिंपण झाले आणि नंतर भाविकांच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आले. रंगाचे शिंपण होऊन, पारंपारीक मारामारी उत्सवाने ऐतिहासिक वीर यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.


"महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला, भक्तीची ओढ लावणारा, भक्तिमय वातावरणात ऊर्जा देणारा  महाउत्सव असतो."


या पारंपरिक यात्रा सोहळ्यासाठी पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, मा.जिल्हाधिकारी पुणे, मा. तहसीलदार पुरंदर, सासवड पोलीस प्रशासन, पुरंदर पंचायत समिती, सासवड प्राथमिक आरोग्य केंद्र, विद्युत वितरण कंपनी, वीर देवस्थान ट्रस्ट,वीर ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, ग्रामस्थ,भाविक,  मानकरी, स्वयंसेवक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांच्या सामूहिक नियोजनातून यात्रा उत्सव व्यवस्थित पार पडला.


या पारंपारिक यात्रा उत्सव काळात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.


"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा पारंपरिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले." अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी  दिली.


"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वीर येथे  लाखो भक्तांचा जनसागर मारामारी( रंगाचे शिंपण) सोहळ्यासाठी उपस्थित होता. भाविक भक्ताच्या अंगावरती पडलेला मारामारी ( रंगाचे शिंपण) सोहळ्याचा रंग वर्षभर या भक्तीची ऊर्जा देतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना ऊर्जा देणारा व भक्तीची ओढ लावणारा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करून टाकतो." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.


श्री क्षेत्र वीर गावची ऐतिहासिक यात्रा सर्व भक्तांच्या मनात वर्षभर भक्ती - शक्तीच्या सुंदर आठवणी साठवून ठेवते.


ऐतिहासिक वीर यात्रेची मारामारी (रंगांचे शिंपण) सोहळ्याने सांगता झाली तरी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे भक्त वर्षभर यात्रा सोहळ्याची मनापासून वाट पाहत असतात.

Sunday, March 3, 2024

"वीरची जत्रा एक आनंदयात्रा... श्रीनाथ - जोगेश्वरी वीर यात्रा विशेषांक लोकार्पण सोहळा श्रीक्षेत्र वीर येथे भक्तिमय वातावरणात, उत्साहात संपन्न; वीर यात्रा विशेषांकाचे हजारो भाविकांना मोफत वाटप"...

पुरंदर, वीर, दि.३ : पुरंदर तालुक्यातील निर्भीड, अभ्यासू पत्रकार, महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे संपादक शिवदास शितोळे यांच्या संकल्पनेतून दर्जेदार निर्मिती झालेल्या व महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजने प्रकाशित केलेल्या "वीरची जत्रा एक आनंदयात्रा"... या श्रीनाथ -  जोगेश्वरी यात्रा विशेषांकाचा लोकार्पण सोहळा श्री क्षेत्र वीर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.


पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा अकरा दिवसांची असून, महाराष्ट्रातील ही मोठी यात्रा असून, राज्यातून लाखो भाविक भक्तांची उपस्थिती या उत्सवासाठी होत असते.


महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे संपादक शिवदास शितोळे यांनी ऐतिहासिक वीर यात्रा या विषया वरील पहिल्या विशेषांकामध्ये श्री क्षेत्र वीर येथील  श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे महात्म्य, श्री क्षेत्र घोडेउड्डाण महात्म्य व वीर गावातील ऐतिहासिक लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला होता.


रविवारी "वीरची जत्रा एक आनंद यात्रा" हा यात्रा विशेषांक संपादक शिवदास शितोळे यांनी श्रीक्षेत्र वीर येथील घोडेउड्डाण येथील श्रीनाथांच्या मूळ ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या  चरणी  अर्पण केला. यावेळी महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक व या वीर यात्रा विशेषांकाचे संपादकीय सल्लागार अजित जगताप व भाविक भक्त उपस्थित होते.


सोमवारी श्री क्षेत्र वीर येथील मुख्य मंदिरा मधील गाभाऱ्यात, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या चरणावरती हा वीर यात्रा विशेषांक अर्पण केल्यानंतर, याच मंदिरात वीरची जत्रा एक आनंदयात्रा... या वीर यात्रा विशेषांकाचा  लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित व भाविक भक्तांच्या उपस्थितीत, भक्तिमय वातावरणात, उत्साहात पार पडला.


यावेळी वीर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष बापू धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ, विश्वस्त सचिव अभिजीत धुमाळ, सल्लागार शंकर  धुमाळ, विश्वस्त राजेंद्र कुरपड, विश्वस्त बाबू काका धुमाळ, विश्वस्त संजय कापरे, विश्वस्त दत्तात्रय समगीर, माजी विश्वस्त दिलीपदादा धुमाळ, सल्लागार विशाल धुमाळ,  उद्योजक अमोल धुमाळ , वीरचे माजी सरपंच माऊली वचकल, अशोक धुमाळ तसेच सर्व विश्वस्त, सर्व सल्लागार मंडळ, मानकरी, दागीनदार, गुरव ,घडशी ,पुजारी व भाविक भक्त उपस्थित होते.


वीरची जत्रा एक आनंदयात्रा हा यात्रा विशेषांक सर्व भाविकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती संपादक शिवदास शितोळे यांनी दिली.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील पूर्ण गंगेकाटी वसलेले श्री क्षेत्र वीरगाव आणि आणि याच वीर गावाचे वैभव म्हणजे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र सहित इतर राज्यातूनही भाविक भक्त येत असतात. चमत्कारा शिवाय नमस्कार नसतो अगदी याप्रमाणे श्रीक्षेत्र वीर येथे आलेल्या भाविक भक्तांना श्रीनाथ महाराज आपल्या शक्तीची प्रचिती देतात आणि त्या भक्ताचे संकट दूर करतात. ज्याचा जसा भाव तसा त्याला श्रीनाथांचा ठाव. अशा उक्तीप्रमाणे अनेक भाविक भक्त श्रीनाथांचे अखंड नामस्मरण करीत असतात. या कलियुगामध्ये नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होऊन मनुष्य जन्माचे सार्थक होत असते. देव हा भक्तीचा भुकेला असतो. आणि श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांना भोळी भक्ती अतिशय प्रिय आहे अनेक भाविक भक्त संकटामध्ये श्रीनाथांचा धावा करत असतात आणि त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे श्रीनाथ ही त्यांच्या हाकेला धावून जातात असे अनेक भाविक भक्तांचे अनुभव या यात्रा विशेष अंकात आपणास अनुभवता येतील. अशी माहिती संपादक शिवदास शितोळे यांनी दिली" 


"गतवर्षीच्या विशेषांका मध्ये श्रीक्षेत्र वीर देवाचे महात्म्य श्रीक्षेत्र घोडेउड्डाण महात्म्य याविषयी ऊहापोह केला होता. परंतु या वर्षीच्या विशेषअंकामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांनी अनेक भक्तांना त्यांच्या शक्तीची दिलेली प्रचिती याविषयी भाविक भक्तांचे अनुभव त्यांच्याच बोली भाषेत आपण अनुभवणार आहोत. असे श्रद्धा ज्याचे उरी त्याशी दिसे श्रीनाथ जोगेश्वरी. अगदी याप्रमाणे मनामध्ये श्रद्धा असेल तर श्रीनाथांचा धावा केल्यानंतर श्रीनाथ भक्ताला त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती देतात. अध्यात्माचा हात हातात घेऊन विज्ञानाची कास धरणारा ही नाथ भक्त आपणास पहावयास मिळतात. मन नाही निर्मळ काय करील साबण याप्रमाणे निर्मळ मनाने श्रीनाथांचे नामस्मरण केल्यानंतर नाथ महाराज ही त्या भाविक भक्ताच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. म्हणून सर्वांनी श्रीनाथांचे अखंड नामस्मरण करावे व आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा आणि श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांनीही सर्व भाविक भक्तांवरती सदैव कृपादृष्टी ठेवावी हीच नाथ चरणी प्रार्थना." अशी प्रतिक्रिया संपादक शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"वीरची जत्रा एक आनंदयात्रा" या वीर यात्रा विशेषांकाचे मुखपृष्ठ तसेच या विशेषांकातील विविध मान्यवरांचे, भक्तांचे लेख भाविक भक्तांच्या पसंतीस उतरले असून, श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या भाविक भक्तांनी हा यात्रा विशेषांक आवडल्यामुळे तोंडभरून कौतुक केले.

"आजच्या डिजिटल मीडियाच्या काळात यात्रा विशेषांक छापून प्रसिद्ध करून, हजारो भाविक भक्तांना मोफत वाटप करणे हे खूपच आव्हानात्मक काम आहे. महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे संपादक शिवदास शितोळे यांनी हे  शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची केलेली प्रामाणिक भक्ती व कृपा आशीर्वाद पाठीशी असल्यावर कुठलेही काम अशक्य नाही. या भक्तीच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमास मनापासून खूप खूप शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.


वीर देवस्थान ट्रस्ट, वीरगावचे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मानकरी, सालकरी, दागिनदार, पुजारी तसेच भाविक भक्तांनी संपादक शिवदास शितोळे यांच्या या अध्यात्मिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.