Sunday, March 17, 2024

"पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील तहानलेल्या लोकांना मिळणार हक्काचे पाणी; नवीन जलवाहिनीच्या कामाचे पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; आंबेगाव पठार परिसरातील लोकांना जुलै अखेरपर्यंत मिळणार हक्काचे पाणी - आमदार संजय जगताप"


पुणे,दि.१७ : पुणे शहरातील दक्षिण उपनगरांमधील, आंबेगाव पठार परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहे. पुरंदर - हवेलीचे  आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आंबेगाव पठार येथे पिण्याच्या पाण्याच्या  चार इंच व सहा इंच व्यासाच्या नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन, मान्यवरांच्या उपस्थितीत व आंबेगाव पठार येथील नागरिकांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडले.



पुणे महानगरपालिकेत 2017 ला नव्याने समाविष्ट झालेल्या आंबेगाव पठार या परिसरात अनेक वर्षे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न  यासाठी संघर्ष करावा लागत होता.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

बारामतीचे लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे व पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आंबेगाव पठार परिसरामध्ये विविध विकास कामांना मागील काही वर्षात गती आलेली पाहायला मिळत आहे.



पुणे शहरातील आंबेगाव पठार येथील सर्व्हे नंबर 15 व 16 येथील नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

खासदार सुप्रिया सुळे  व  आमदार संजय जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आंबेगाव पठार परिसरासाठी नवीन जलवाहिनीच्या कामाची पुणे महानगरपालिकेकडून मंजुरी आल्यानंतर गुरुवारी या नवीन जलवाहिनीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत व या भागातील नागरिकांच्या उपस्थितीत, आंबेगाव पठार येथील सर्वे नंबर 16 मधील, वरदविनायक चौकात आनंददायी वातावरणात पार पाडला.


आंबेगाव पठार येथील नवीन जलवाहिनीच्या भूमिपूजन कार्यक्रमामुळे येथील नागरिकांना आता आपल्या हक्काचे मुबलक पाणी लवकरच मिळेल अशा भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या.


"आंबेगाव पठार परिसरातील  नागरिकांना या नवीन जलवाहिनीच्या माध्यमातून जुलै अखेरपर्यंत आपल्या हक्काचे पिण्याचे पाणी मिळेल. आंबेगाव पठार परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष लक्ष देऊ." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


आंबेगाव पठार परिसरामध्ये झालेले नवीन सिमेंट - काँक्रीटचे रस्ते, सांडपाण्याच्या  वाहिन्यांचे काम व या नवीन जलवाहिनीच्या कामाच्या भूमिपूजनामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


आंबेगाव पठार येथील नवीन जलवाहिनीच्या भूमिपूजन कार्यक्रमात  पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप, मा. नगरसेवक किशोर उर्फ बाळाभाऊ धनकवडे,  चेतन मांगडे, दिपक बेलदरे, तानाजी  दांगट, नंदा दांगट, बाप्पु निवंगुणे, भरत बाबर, भुषण रानभरे, बाळासो पासलकर, बापू जगताप,सतीश जगताप,सचिन शेवते, मयूर कोंढरे, शिंदे, विविध क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.


आंबेगाव पठार परिसरातील या नवीन जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन, लोकांना लवकरात लवकर पाणी मिळावे अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment