पुरंदर, वीर, दि.३ : पुरंदर तालुक्यातील निर्भीड, अभ्यासू पत्रकार, महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे संपादक शिवदास शितोळे यांच्या संकल्पनेतून दर्जेदार निर्मिती झालेल्या व महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजने प्रकाशित केलेल्या "वीरची जत्रा एक आनंदयात्रा"... या श्रीनाथ - जोगेश्वरी यात्रा विशेषांकाचा लोकार्पण सोहळा श्री क्षेत्र वीर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.
पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा अकरा दिवसांची असून, महाराष्ट्रातील ही मोठी यात्रा असून, राज्यातून लाखो भाविक भक्तांची उपस्थिती या उत्सवासाठी होत असते.
महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे संपादक शिवदास शितोळे यांनी ऐतिहासिक वीर यात्रा या विषया वरील पहिल्या विशेषांकामध्ये श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे महात्म्य, श्री क्षेत्र घोडेउड्डाण महात्म्य व वीर गावातील ऐतिहासिक लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला होता.
रविवारी "वीरची जत्रा एक आनंद यात्रा" हा यात्रा विशेषांक संपादक शिवदास शितोळे यांनी श्रीक्षेत्र वीर येथील घोडेउड्डाण येथील श्रीनाथांच्या मूळ ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या चरणी अर्पण केला. यावेळी महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक व या वीर यात्रा विशेषांकाचे संपादकीय सल्लागार अजित जगताप व भाविक भक्त उपस्थित होते.
सोमवारी श्री क्षेत्र वीर येथील मुख्य मंदिरा मधील गाभाऱ्यात, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या चरणावरती हा वीर यात्रा विशेषांक अर्पण केल्यानंतर, याच मंदिरात वीरची जत्रा एक आनंदयात्रा... या वीर यात्रा विशेषांकाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित व भाविक भक्तांच्या उपस्थितीत, भक्तिमय वातावरणात, उत्साहात पार पडला.
यावेळी वीर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष बापू धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ, विश्वस्त सचिव अभिजीत धुमाळ, सल्लागार शंकर धुमाळ, विश्वस्त राजेंद्र कुरपड, विश्वस्त बाबू काका धुमाळ, विश्वस्त संजय कापरे, विश्वस्त दत्तात्रय समगीर, माजी विश्वस्त दिलीपदादा धुमाळ, सल्लागार विशाल धुमाळ, उद्योजक अमोल धुमाळ , वीरचे माजी सरपंच माऊली वचकल, अशोक धुमाळ तसेच सर्व विश्वस्त, सर्व सल्लागार मंडळ, मानकरी, दागीनदार, गुरव ,घडशी ,पुजारी व भाविक भक्त उपस्थित होते.
वीरची जत्रा एक आनंदयात्रा हा यात्रा विशेषांक सर्व भाविकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती संपादक शिवदास शितोळे यांनी दिली.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील पूर्ण गंगेकाटी वसलेले श्री क्षेत्र वीरगाव आणि आणि याच वीर गावाचे वैभव म्हणजे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र सहित इतर राज्यातूनही भाविक भक्त येत असतात. चमत्कारा शिवाय नमस्कार नसतो अगदी याप्रमाणे श्रीक्षेत्र वीर येथे आलेल्या भाविक भक्तांना श्रीनाथ महाराज आपल्या शक्तीची प्रचिती देतात आणि त्या भक्ताचे संकट दूर करतात. ज्याचा जसा भाव तसा त्याला श्रीनाथांचा ठाव. अशा उक्तीप्रमाणे अनेक भाविक भक्त श्रीनाथांचे अखंड नामस्मरण करीत असतात. या कलियुगामध्ये नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होऊन मनुष्य जन्माचे सार्थक होत असते. देव हा भक्तीचा भुकेला असतो. आणि श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांना भोळी भक्ती अतिशय प्रिय आहे अनेक भाविक भक्त संकटामध्ये श्रीनाथांचा धावा करत असतात आणि त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे श्रीनाथ ही त्यांच्या हाकेला धावून जातात असे अनेक भाविक भक्तांचे अनुभव या यात्रा विशेष अंकात आपणास अनुभवता येतील. अशी माहिती संपादक शिवदास शितोळे यांनी दिली"
"गतवर्षीच्या विशेषांका मध्ये श्रीक्षेत्र वीर देवाचे महात्म्य श्रीक्षेत्र घोडेउड्डाण महात्म्य याविषयी ऊहापोह केला होता. परंतु या वर्षीच्या विशेषअंकामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांनी अनेक भक्तांना त्यांच्या शक्तीची दिलेली प्रचिती याविषयी भाविक भक्तांचे अनुभव त्यांच्याच बोली भाषेत आपण अनुभवणार आहोत. असे श्रद्धा ज्याचे उरी त्याशी दिसे श्रीनाथ जोगेश्वरी. अगदी याप्रमाणे मनामध्ये श्रद्धा असेल तर श्रीनाथांचा धावा केल्यानंतर श्रीनाथ भक्ताला त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती देतात. अध्यात्माचा हात हातात घेऊन विज्ञानाची कास धरणारा ही नाथ भक्त आपणास पहावयास मिळतात. मन नाही निर्मळ काय करील साबण याप्रमाणे निर्मळ मनाने श्रीनाथांचे नामस्मरण केल्यानंतर नाथ महाराज ही त्या भाविक भक्ताच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. म्हणून सर्वांनी श्रीनाथांचे अखंड नामस्मरण करावे व आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा आणि श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांनीही सर्व भाविक भक्तांवरती सदैव कृपादृष्टी ठेवावी हीच नाथ चरणी प्रार्थना." अशी प्रतिक्रिया संपादक शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"वीरची जत्रा एक आनंदयात्रा" या वीर यात्रा विशेषांकाचे मुखपृष्ठ तसेच या विशेषांकातील विविध मान्यवरांचे, भक्तांचे लेख भाविक भक्तांच्या पसंतीस उतरले असून, श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या भाविक भक्तांनी हा यात्रा विशेषांक आवडल्यामुळे तोंडभरून कौतुक केले.
"आजच्या डिजिटल मीडियाच्या काळात यात्रा विशेषांक छापून प्रसिद्ध करून, हजारो भाविक भक्तांना मोफत वाटप करणे हे खूपच आव्हानात्मक काम आहे. महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे संपादक शिवदास शितोळे यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची केलेली प्रामाणिक भक्ती व कृपा आशीर्वाद पाठीशी असल्यावर कुठलेही काम अशक्य नाही. या भक्तीच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमास मनापासून खूप खूप शुभेच्छा." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
वीर देवस्थान ट्रस्ट, वीरगावचे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मानकरी, सालकरी, दागिनदार, पुजारी तसेच भाविक भक्तांनी संपादक शिवदास शितोळे यांच्या या अध्यात्मिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
No comments:
Post a Comment