पुरंदर, सासवड,दि.२४ : संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पुरंदर - हवेलीच्या चुरशीच्या, तिरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांचा 24 हजार 188 मतांनी पराभव केला.
ऐतिहासिक पुरंदरच्या सासवड येथे लोकनेते शरद पवार यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी घेतलेली सभा जशी गाजली तशीच मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली सभा देखील चांगलीच गाजली. पुरंदर - हवेलीच्या जनतेने विजय शिवतारे यांना तिसऱ्यांदा संधी देऊन आमदार बनवले आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
राज्यात महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढती ज्या गाजल्या त्यात पुरंदर - हवेलीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या पुरंदर - हवेलीमधील उमेदवारीमुळे विजय शिवतारे यांचा विजय सुकर झाल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
राज्यातील हायव्होल्टेज आणि पुणे जिल्ह्यामधील चर्चेत राहिलेल्या पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत झाली. शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी २४१८८ मतांनी विजय मिळवत पुरंदरवर शिवसेनेचा भगवा फडकवला. विजय शिवतारेंना 1,25,819 मते मिळाली. काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांना 1,01,651 मते मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी झेंडे यांना 47,196 मते मिळाली आहेत.
पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघात झालेल्या या चुरशीच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना 47 हजार 196 मते मिळाल्यामुळे या मतविभाजनाचा सरळसरळ फायदा विजय शिवतारे यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरलेला दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित दोन सभा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे पुरंदर - हवेलीमधील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.
"काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांचा मतविभाजनाच्या माध्यमातून पराभव करण्यासाठीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये संभाजी झेंडे यांना उमेदवारी देऊन,एक वेगळी राजकीय खेळी खेळल्याची जोरदार चर्चा पुरंदर - हवेलीच्या मतदारसंघांमध्ये सुरू झाली आहे."
महाराष्ट्रात गाजलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सासवड येथील गाजलेली सभा, मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांची दहा वर्षातील विकास कामे, शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रभावशाली प्रचार, महायुतीतील घटक पक्षांची प्रचार यंत्रणा, संभाजी झेंडे यांच्या उमेदवारीने झालेले मतविभाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्या कामावर दाखवलेले विश्वास या कारणांमुळेच विजय शिवतारे यांचा विजय सुकर झाल्याचे दिसून येत आहे.
विजय शिवतारे हे खासदारकीसाठी इच्छुक होते पण त्यांना विधानसभेला उमेदवारी देण्यात आली. पुरंदर विधानसभा निवडणुकीमध्ये २००९ आणि २०१४ मध्ये विजय शिवतारे यांनी विजय मिळवला होता. मात्र २०१९ ला संजय जगताप यांनी विजय मिळवत विजय शिवतारेंचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा विजय शिवतारे यांनी पुरंदरमध्ये आमदारकी मिळवली आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांची पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड होती. तालुक्यात काँग्रेसचे तरुणांचे संघटन खूप मजबूत आहे. संजय जगताप यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे प्रचारामध्ये त्यांनी खूप मोठी आघाडी घेतली होती.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सासवड येथे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमुळे काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
या सभेमुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी वातावरण निर्मिती तालुक्यामध्ये निर्माण झाली होती. परंतु शेवटच्या दोन दिवसात शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेने जोरदार प्रचार केला व संपूर्ण तालुक्यात वातावरण फिरले आणि शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी या निवडणुकीत बाजी मारली.
पुरंदरचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या उमेदवारीमुळे या पुरंदर - हवेलीच्या विधानसभा निवडणुकीत खरी चुरस निर्माण झालेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांनीही तालुक्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रचार केला. संभाजी झेंडे यांची प्रचार यंत्रणाही भक्कम होती. माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी पुरंदर - हवेलीच्या जनतेला दिलेल्या परिवर्तनाच्या हाकेला निवडणुकीच्या निकालातून जनतेने साथ दिलेली दिसत नाही.
पुरंदर - हवेलीची निवडणूक गुंजवणीचे पाणी, विमानतळ या प्रमुख मुद्द्यांवरून मागील काही निवडणुकांमध्ये आणि याही निवडणुकीत खूप गाजलेली आहे. पुरंदरचा शेतकरीराजा गुंजवणीच्या पाण्याची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहे. पुरंदर तालुक्याचा दुष्काळ संपण्यासाठी गुंजवणी प्रकल्प लवकरात लवकर यशस्वीपणे पूर्ण होऊन, पुरंदरच्या शेतकऱ्याच्या बांधावर लवकरात लवकर पाणी येणे खूप गरजेचे आहे. याही निवडणुकीत गुंजवणीच्या पाण्याचा विषय खूप गाजला.
शनिवारी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदान मोजणीला सुरुवात झाली. टपाली मतदानातच काँग्रेसचे संजय जगताप यांना १६१ मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर ईव्हीएम मतदान मोजणीत विजय शिवतारे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेण्यास जी सुरुवात केली. ती शेवटपर्यंत आघाडी त्यांनी ठेवली.
पुरंदर विधानसभा निवडणुकीत यावर्षी विक्रमी 61.02 टक्के मतदान झाले होते. 16 उमेदवार आपले आमदारकीचे नशीब आजमावत असले तरी, महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महायुतीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यातच खरी चुरशीची लढत होताना दिसून आली.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी 2 लाख 40 हजार 538 पुरुष मतदार, 2 लाख 23 हजार 446 महिला मतदार तर 33 अन्य असे एकुण 4 लाख 62 हजार 17 मतदारांची नोंद होती. त्यापैकी 1 लाख 49 हजार 071 पुरुषांनी, 1 लाख 33 हजार 299 महिला, तर 6 अन्य असे एकुण 2 लाख 82 हजार 376 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे विक्रमी 61.02 टक्के मतदान झाले होते.
मतमोजणीच्या दहाव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 44 हजार 624 मते,संजय जगताप यांना 28 हजार 117 मते, तर संभाजी झेंडे यांना 15 हजार 074 मते मिळाली. विजय शिवतारे यांनी दहाव्या फेरीत 16 हजार 507 मतांनी आघाडी घेतली.
विसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 86 हजार 465 मते,संजय जगताप यांना 63 हजार 701 मते, तर संभाजी झेंडे यांना 33 हजार 253 मते मिळाली. विजय शिवतारे यांनी विसाव्या फेरीत 22 हजार 764 मतांनी आघाडी घेतली.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पंचवीसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 1लाख 05 हजार 819 मते, संजय जगताप यांना 83 हजार 584 मते, तर संभाजी झेंडे यांना 39 हजार 899 मते मिळाली. विजय शिवतारे यांनी पंचविसाव्या फेरीत 22 हजार 235 मतांनी आघाडी घेतली.
तिसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 1 लाख 25 हजार 819 मते, संजय जगताप यांना 1 लाख, 1 हजार 651 मते, संभाजी झेंडे यांना 47 हजार 196 मते मिळाली.
शेवटच्या तिसाव्या फेरीत विजय शिवतारे यांनी या निवडणूक लढतीत 24 हजार 188 मतांनी विजय मिळवत पुरंदरवर शिवसेनेचा भगवा फडकवला. पुरंदर - हवेलीतील शिवसैनिकांनी या दमदार विजयामुळे खूप मोठा जल्लोष केला.
"पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघात माझ्या कारकिर्दीत दहा वर्षात केलेली विकास कामे, कार्यकर्त्यांची एकजूट व मेहनत, महायुतीची प्रचार यंत्रणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या कामावर दाखवलेला विश्वास व त्यांची गाजलेली सभा, पुरंदर हवेलीच्या जनतेने ही निवडणूक हातात घेऊन पुन्हा दाखवलेला मोठा विश्वास यामुळेच या निवडणुकीत आम्हाला हा मोठा विजय मिळवता आला. येणाऱ्या दीड वर्षात गुंजवणीचा प्रकल्प पूर्ण होऊन माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती गुंजवणीचे पाणी पोहोचेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच विमानतळाचा प्रकल्प पूर्ण होईल. आयटी पार्क, अत्याधुनिक महिला रुग्णालय यासारखी विविध विकास कामे येणाऱ्या काही वर्षात लवकरच पूर्ण होतील. हवेलीतील आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव पठारचा पाणी प्रश्न येणाऱ्या पाच - सहा महिन्यांमध्ये प्राधान्यक्रमाने सोडवू." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघातील आंबेगाव पठार हा परिसर नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे व विकासापासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळे या भागाकडे लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"पुरंदर - हवेली मतदारसंघाकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते कारण येथून तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे कोण बाजी मारणार? याच्याच चर्चा चालल्या होत्या. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप, महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे तर महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे या तिन्ही तुल्यबळ उमेदवारांचा पुरंदर - हवेलीतील जनतेशी कमी जास्त प्रमाणात संपर्क असल्यामुळे तीनही उमेदवारांची धाकधूक वाढली होती. परंतु या अटीतटीच्या लढतीमध्ये शिवसेनेचे विजयबापू शिवतारे यांनी बाजी मारली आहे. आणि बहुमताने विजयी झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात गुंजवणीचा प्रश्न, विमानतळाचा प्रश्न, राष्ट्रीय बाजार समिती, एमआयडीसीचे विस्तारीकरण असे अनेक विषय विजय शिवतारे यांना लवकर मार्गी लावावे लागणार आहेत. तसेच पुरंदर - हवेलीतील सर्वसामान्य नागरिकांशी मोठया प्रमाणावर संपर्क वाढवावा लागणार आहे. कुठल्याही नेत्यांच्या भोवताली असणारी चांडाळ चौकडी आणि मलिदा गँग यांचे मनसुबे ओळखून त्यांना चार हात दूर ठेवून, पुरंदर - हवेलीच्या कोणत्याही नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यतत्पर राहिले पाहिजे, मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली पाहिजेत तरच दीर्घकाळ राजकारण करून जनतेची मोठ्या प्रमाणावर सेवा करता येईल." अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार, पुढारीचे निर्भीड पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुरंदर - हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी, राज्यातील एक आदर्श मतदारसंघ निर्माण होण्यासाठी, पुरंदर - हवेलीचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे प्रचंड मेहनत घेतील. अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment