Wednesday, June 3, 2026

"महाराष्ट्रात लोकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे काम करणारे आदर्श अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली "सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र मोहीमे अंतर्गत राज्यभरात कोट्यावधींचा भेसळयुक्त साठा जप्त; १०२ जणांना बेड्या, राज्यात "इतक्या" ठिकाणी धाडी, "एवढे" भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त; लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले, "या" टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन"

पुणे,दि.03 : राज्यातील जनतेला शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, या भूमिकेतून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात बेकायदेशीर, प्रतिबंधित आणि भेसळयुक्त पदार्थांविरोधात युद्धपातळीवर धडक मोहीम सुरू केली आहे. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त, धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनानुसार आणि ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ (सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे, सुरक्षित महाराष्ट्र) या संकल्पनेअंतर्गत संपूर्ण राज्यात एकाच वेळी ही कारवाई राबवण्यात आली.

२५ मे ते ३१ मे २०२६ या अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत प्रशासनाने संपूर्ण महाराष्ट्रात छापेमारी करत तब्बल १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या मोहिमेमुळे राज्यातील भेसळदार आणि अवैध व्यावसायिक यांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यव्यापी मोहिमेचा ताळेबंद: १०२ जणांना बेड्या :

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीला एक वेगळी गती आणि शिस्त आली आहे. त्यांच्या आदेशानुसार राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीविरुद्ध विशेष मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.

"या सात दिवसांच्या धडक मोहिमेदरम्यान एकूण १३० आस्थापनांवर थेट छापे टाकण्यात आले. संपूर्ण कारवाईचा आढावा घेतल्यास, नियमभंग करणाऱ्या आणि अस्वच्छतेत अन्न उत्पादन करणाऱ्या २०३ आस्थापनांवर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यातील गंभीर त्रुटी आढळलेल्या ८६ आस्थापना तात्काळ सील करण्यात आल्या आहेत. तसेच, मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या १०२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे."

 "नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन व विक्री आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही." असे तुकाराम मुंढे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन) यांनी सांगितले.

 पुणे विभागात ३७ लाख रुपयांची जप्ती; १४ जणांवर गुन्हे :

राज्यव्यापी मोहिमेच्या धर्तीवर पुणे विभागातही अन्न व औषध प्रशासनाने १ आणि २ जून २०२६ रोजी धडक कारवाईचे सत्र सुरूच ठेवले. पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये भेसळीच्या संशयावरून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

या दोन दिवसांत विभागात एकूण ३१ लाख ७३ हजार रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करण्यात आले, तर ५ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी १४ दोषींवर भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

"राज्यातील प्रतिबंधित पान मसाला,गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सात दिवस धडक मोहीम राबवत २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत  एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त केला असून १०२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे."

एकूण २०३ आस्थापनांवर कारवाई केली. तसेच ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याविरोधात कारवाई :

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत १३० आस्थापनांवर छापे टाकण्यात आले.

कोकण विभाग – ४७ कारवाया, ४६ व्यक्तींना अटक

बृहन्मुंबई – २२ कारवाया, २३ व्यक्तींना अटक

पुणे विभाग – १४ कारवाया, १३ व्यक्तींना अटक

नाशिक विभाग – ५ कारवाया, ५ व्यक्तींना अटक

छत्रपती संभाजीनगर विभाग – ८ कारवाया, ८ व्यक्तींना अटक

अमरावती विभाग – ५ कारवाया, ५ व्यक्तींना अटक

नागपूर विभाग – २ कारवाया, २ व्यक्तींना अटक

यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम २६, २७, ३०(२)(अ) आणि ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांवरही कारवाई :

अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड, नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, जळगाव, रायगड, धुळे आदी जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तपासण्या केल्या.

"या मोहिमेत ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले, शेंगदाणा चिक्की तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा समावेश होता. या कारवाईत १ कोटी २४ लाख २३ हजार ६२९ रुपये किमतीचा आणि सुमारे ९०,६३९ किलो वजनाचा संशयित निकृष्ट व असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला."


संबंधित अन्न नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
तक्रारीं देण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन.

"नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन व विक्री आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी अॅप विकसित करण्यात आले आहे."

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचा जिल्हावार कारवाईचा सविस्तर तपशील :

पुणे विभागातील सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकांनी खालीलप्रमाणे मोठी कारवाई केली:

१. सातारा जिल्हा : ज्यूस आणि हेल्थ ड्रिंकचा मोठा साठा जप्त

सातारा येथील गोडोली भागात असलेल्या 'मेसर्स धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्स प्रा.लि.' या आस्थापनेवर १ जून रोजी छापा टाकण्यात आला. या ठिकाणी आरोग्यासाठी घातक किंवा संशयास्पद वाटणारे प्रोटिरिच-डब्ल्यू हर्बल हेल्थ ड्रिंक, चॉकलेट कंपाऊंड आणि सी बकथॉर्न ज्यूस असा एकूण २१ लाख ४० हजार ९४६ रुपयांचा अवाढव्य साठा प्रशासनाने जप्त केला. तसेच सातारा शहरातील 'बुवा पान शॉप' (सदर बाजार) येथून ३० हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.

२. पुणे जिल्हा : तेल, चीज आणि डेअरी उत्पादनांवर टाच

मार्केट यार्ड : २ जून रोजी मार्केट यार्डातील 'मेसर्स प्राज ट्रेडर्स' येथून भेसळीच्या संशयावरून ५ लाख ३४ हजार २५२ रुपयांचे रिफाईन्ड सोयाबीन ऑईल आणि आर.बी.डी. पामोलीन ऑईल जप्त करण्यात आले.

चिंचवड : काळेवाडी रोडवरील 'मे. महाराष्ट्र मिल्क डेअरी' येथून २७ हजार ६०० रुपयांचे बनावट ‘चीज ॲनालॉग’ जप्त करण्यात आले.

वडगाव शेरी : मते नगर येथील 'मे. विठूमाऊली डेअरी'वर छापा टाकून भेसळयुक्त गाईचे तूप आणि पनीर असा सुमारे १५ हजार रुपयांचा साठा हस्तगत केला.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

खराडी : सुप्रिया बिल्डिंगमधील 'मे. शिवदत्त डेअरी'मधून तब्बल १ लाख ७३ हजार रुपयांचे संशयास्पद पनीर जप्त करण्यात आले.

आयटी हब (बाणेर-हिंजवडी) : आयटी पार्कमधील पान टपऱ्यांवर मोठे छापे टाकण्यात आले. बाणेरमधील शंभो आणि जय मल्हार पान शॉपमधून ७,५०० रुपयांचा, तर हिंजवडी फेज-१ मधील विनोद, रायरेश्वर, आयटी स्मोक झोन, सिद्धेश्वर आणि लक्ष्मी पान शॉप अशा ५ दुकानांमधून २५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

इंदापूर : इंदापूर तालुक्यात १ लाख ७ हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि तो वाहून नेणारी १ लाख ५० हजारांची गाडी जप्त करण्यात आली.

३. कोल्हापूर जिल्हा : खाद्यतेल मिलवर कारवाई

कोल्हापूर शहरातील बाजारगेट येथील 'मे. बनछोडे ब्रदर्स ऑईल मिल'मधून ९२ हजार रुपयांचे रिफाईन्ड कॉटनसीड ऑईल आणि फिल्टर्ड ग्राऊंडनट ऑईल जप्त केले. 

इचलकरंजी येथील 'मे. रामगोपाल भवरलाल सोनी' यांच्याकडून ९७ हजार ६०० रुपयांचे सोयाबीन तेल जप्त झाले. शिरोळ तालुक्यातील धरणगुट्टी येथील 'मे. हिदांश इंडस्ट्रीज'मधून लेबलदोष आणि मिथ्याछाप (Misbranded) असलेली ८,८८० रुपयांची ॲनालॉग सुपारी जप्त करण्यात आली.

४. सोलापूर आणि सांगली जिल्हा : गुटखा बनवण्याचे यंत्र जप्त

सोलापूरच्या अकलूज येथील 'बाबा पान शॉप'वर छापा टाकून १ लाख १६ हजार रुपयांचा गुटखा आणि ७५ रुपयांचे गुटखा बनवण्याचे यंत्र जप्त करण्यात आले. बार्शीतील 'त्रिमूर्ती पान शॉप'मधून १३ हजार रुपयांचा साठा जप्त झाला.

 सांगलीतील 'मे. ए के पान शॉप' आणि विटा येथील 'मे. बालाजी पान शॉप'मधून २८ हजार रुपयांचा प्रतिबंधित माल पकडला गेला.

 कारवाईचा संक्षिप्त गोषवारा :

सातारा (गोडोली) : हर्बल हेल्थ ड्रिंक, ज्यूस, चॉकलेट | २१,४०,९४६ | धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्सवर कारवाई 

पुणे (मार्केट यार्ड) : रिफाईन्ड सोयाबीन व पामोलीन तेल | ५,३४,२५२ | भेसळीच्या संशयावरून जप्ती 

पुणे (खराडी) : संशयास्पद पनीर | १,७३,०००+ | शिवदत्त डेअरीवर धाड 

सोलापूर (अकलूज) : प्रतिबंधित गुटखा व यंत्र | १,१६,०७५ | गुटखा बनवण्याचे यंत्र जप्त 

कोल्हापूर : कॉटनसीड व सोयाबीन तेल | १,८९,६०० | बनछोडे ब्रदर्स व सोनी ट्रेडर्स 

पुणे (चिंचवड/वडगाव शेरी) :  चीज ॲनालॉग, गाईचे तूप, पनीर | ४२,६०० | डेअरी उत्पादनांमध्ये भेसळ 


आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कार्याचा प्रभाव आणि पुढील दिशा : 

अन्न व औषध प्रशासन विभागाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भ्रष्टाचाराला आणि हलगर्जीपणाला चाप लावला आहे. त्यांच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणामुळे संपूर्ण विभागाची यंत्रणा सक्रिय झाली आहे. केवळ कागदोपत्री कारवाई न करता थेट कारखाने, गोदामांवर धाडी टाकून मूळ पुरवठादारांना जेरबंद करण्यावर त्यांचा भर आहे. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, सणासुदीच्या काळात किंवा सामान्य दिवसांतही दूध, तूप, तेल आणि मावा यांसारख्या दैनंदिन अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी.

 नागरिकांसाठी तक्रार नोंदणी आवाहन :

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत अथवा सुरक्षिततेबाबत नागरिकांच्या मनात काहीही शंका असल्यास त्यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी प्रशासनाने एक स्वतंत्र तक्रार नोंदणी ॲप देखील विकसित केले आहे.

 टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५

 ई-मेल आयडी:  jc-foodhq@nic.in

जेवणात किंवा अन्नात भेसळ असल्यास तक्रार कशी करावी?

नागरिकांनी तक्रार करताना स्वतःचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक यासह संबंधित संशयास्पद आस्थापनेचा (दुकान/कारखाना) अचूक पत्ता आणि कोणत्या अन्नपदार्थात भेसळ होत आहे, याची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.

आरोग्यदायी आणि सुरक्षित महाराष्ट्रासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन सह आयुक्त दि. वा. भोगावडे यांनी केले आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

देशभरात अनेक सनदी अधिकारी विविध विभागांमध्ये कार्यरत असतात परंतु तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक, अभ्यासू, समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारा कार्यक्षम अधिकारी देशाच्या प्रत्येक विभागात असणे गरजेचे आहे.

"आपल्या महाराष्ट्रातील तरुण पिढीने, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, शालेय जीवनामध्ये विविध उपक्रमामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रसिद्ध सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन, आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य केले पाहिजे."

महाराष्ट्रात शेकडो अधिकारी लोकांची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्य करत असतात परंतु फार ठराविक अधिकारी भ्रष्टाचाराविरुद्ध लढून, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करत असतात.

No comments:

Post a Comment