Monday, August 31, 2020

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय - जिल्हाबंदी उठवली; ई पास रद्द, हॉटेल,लॉज 100% चालू.. अनलॉक ४ नियमावली जाहीर..वाचा सविस्तर खास बातमी...


मुंबई,दिनांक ३१ : कोरोना महामारी काळात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन काळात अनेक कडक निर्बंध लादले होते. पण महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केली त्यामध्ये मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठवलेली आहे. महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर आज राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. येत्या 2 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी केली जाणार आहे.महाराष्ट्र सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिलेल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.


महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगिन अगेन नियमावलीनुसार, मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. हॉटेल आणि लॉज व्यावसायिकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल आणि लॉज यांना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवासासाठी खासगी बस, मिनी बस तसेच इतर वाहनांना ही परवानगी दिलेली आहे. यासंबंधीची सर्व नियमावली परिवहन आयुक्तांमार्फत जारी केली जाईल.



अनलॉक 3 प्रमाणेच या नवीन नियमावलीत मेट्रो, सिनेमा गृह हे बंदच राहणार आहेत. शिक्षण क्षेत्र - शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत. स्विमिंग पूल, करमणूक केंद्र, सिनेमा हॉल, नाट्य गृह, (मॉलमधील सिनेमाहॉलसह) बार परमीट रूमही बंदच राहतील.


Sunday, August 30, 2020

महाराष्ट्रातील धडाकेबाज, जिगरबाज सहा खेळाडुंना अर्जुन पुरस्कार प्रदान ; राज्याला एकूण १४ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार...



नवी दिल्ली, दि. २९ : घोडेस्वार सुभेदार अजय सावंतनौकानयनपटू दत्तू भोकनाळकुस्तीपटू राहूल आवारे, पॅरा स्वीमर सुयश जाधव, खोखोपटू सारिका काळे आणि टेबलटेनिसपटू मधुरिका पाटकर यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले.


महाराष्ट्रातील 14 व्यक्ती व संस्थाना आज वर्ष 2020 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात सहा अर्जुन पुरस्कार, तीन ध्यानचंद पुरस्कार, एक द्रोणाचार्य पुरस्कार, एक तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी  पुरस्कार आणि तीन संस्थाना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.


केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्यप्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार- 2020’ चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रपती भवनातून राष्ट्रपती तर विज्ञान भवनातून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. यावेळी देशाच्या विविध भागातून सहभागी क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक आणि संस्थाना गौरविण्यात आले महाराष्ट्रातील 14 व्यक्ती व संस्थाना यावेळी गौरविण्यात आले.


राज्यातील सहा खेळाडुंचा अर्जुन पुरस्काराने सन्मान

सुभेदार अजय अनंत सावंत यांना घोडेस्वारीतील योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुभेदार सावंत यांनी 2016 मध्ये इजिप्त येथे आयोजित टेंट पिगींग, सोर्ड पिगींग आणि लान्स टेंट पिंगींग या घोडेस्वारी प्रकारात भारत देशाला सुवर्ण पद‍क मिळवून दिले. तसेच, अबुधाबी येथे 2018 मध्ये आयोजित विश्व चषक स्पर्धेत टेंट पिगींगमध्ये रजत पदक पटकावून त्यांनी देशाचा गौरव वाढविला आहे .




नौकानयनपटू दत्तू बबन भोकनाळ यांना उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. 2016 मध्ये आयोजित रियो ऑलम्पिक स्पर्धेत एकल नौकानयन प्रकारात त्यांनी 13 वे स्थान प्राप्त केले होते, हा कीर्तीमान करणारे श्री. भोकनाळ हे पहिले भारतीय ठरले. एशियन गेम 2018 आणि एशियन चँम्पियनशिप 2015 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.




कुस्तीपटू राहुल आवारे यांना कुस्तीतील उल्लेखनीय योगदानासाठी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील उत्कृष्ट पहेलवानांमध्ये समावेश असलेल्या राहुल आवारे यांनी 2018 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकाविले.  2019 मध्ये आयोजित जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक, सिनियर एशियन चँम्पियनशिप 2019 आणि 2020 मध्ये कास्य पदक मिळवून देशाचा बहुमान वाढविला आहे.




पॅरा स्वीमर सुयश नारायाण जाधव यांना जलतरणातील उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये आयोजित एशियन पॅरा क्रीडा स्पर्धेत बटर फ्लाय (50 मीटर) प्रकारात सुवर्ण पदक, फ्रिस्टाईल (50 मीटर) प्रकारात कांस्य पदक आणि इंडिव्हिज्वल मेडले (200 मीटर) प्रकारात कांस्य पदक पटकाविले.




खोखोपटू सारिका काळे यांना उल्लेखनीय योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.  2016 मध्ये आयोजित दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि 2018 मध्ये इंग्लड येथे आयोजित जागतिक खोखो स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. 52 व्या सिनियर नॅशनल चँम्पियनशिप स्पर्धेमध्येही त्यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे.




टेबलटेनिसपटू मधुरिका सुहास पाटकर यांना उत्कृष्ट योगदानासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळात सुवर्ण पदक. 2019 मध्ये आयोजित राष्ट्रकुल चँम्पियनशिप स्पर्धेत सांघिक खेळात सुवर्ण पदक आणि एकल स्पर्धेत रजत पदक पटकावून भारत देशाला बहुमान मिळवून दिला आहे.





प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे आणि सत्यप्रकाश तिवारी यांचा ध्यानचंद पुरस्काराने गौरव

प्रदीप गंधे यांना उल्लेखनीय योगदानासाठी ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले. 1982 मध्ये आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरी आणि एकेरी स्पर्धेत कांस्य पदक पटकाविली. ऑस्ट्रेलियन ओपन आणि जागतिक  बॅडमिंटन चँम्पियनशिप तसेच नॅशन बॅडमिंटन चँम्पियनशिप मध्येही जेतेपदाचा मान मिळविला आहे. बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतल्यानंतर श्री. गंधे यांनी अनेक बॅडमिंटनपटूंना प्रशिक्षण दिले आहे.



तृप्ती  मुरगुंडे यांना उत्कृष्ट कार्यासाठी ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2006 मध्ये आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. 2002 आणि 2006 तसेच 2010 मध्ये आयोजित सॅप गेममध्ये त्यांनी एकूण 5 सुवर्ण पदकांवर नाव कोरले.  2018 मध्ये आयोजित थॉमस उबेर चषकमध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी देशाला मिळवून दिलेला गौरव आणि बॅडमिंटन खेळाच्या प्रसारासातील योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रसिध्द पॅरा बॅडमिंटनपटू सत्यप्रकाश तिवारी यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले. पॅसिफीक गेम, विश्व चषक बॅडमिंटन स्पर्धा, आयडब्ल्युएएस जागतिक स्पर्धा आणि आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी पदक मिळविली आहेत. निवृत्तीनंतर श्री तिवारी हे युवा खेळाडुंना प्रशिक्षण देत आहेत.

विजय बी मुनिश्वर यांना द्रोणाचार्य पुरस्कार

पॅरा पावर लिफ्टींग प्रशिक्षक विजय मुनिश्वर यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री मुनिश्वर यांनी अनेक पॅरा खेडाळूंना प्रशिक्षीत केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडुंनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला गौरव मिळवून दिला.त्यांच्या शिष्यांमध्ये राजेंद्रसिंह रहेलु, फर्मान बाशा , सचिन चौधरी आदींचा समावेश आहे. नागपूर येथील श्री मुनिश्वर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि दादोजी कोंडदेव पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

गिर्यारोहक केवल कक्काला भूसाहसासाठी तेनसिंग नॉर्गे पुरस्कार  

 जगातील सर्वात उंच असे एव्हरेस्ट आणि लाओत्से शिखर केवळ सहा दिवसात सर करण्याची किमया करत हा बहुमान मिळविणारा पहिला भारतीय ठरण्याचा बहुमान मिळविणाऱ्या मुंबई येथील गिर्यारोहक केवल हिरेन कक्का याला भूसाहस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तेनसिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 राज्यातील तीन संस्थाना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

पुणे येथील आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूटला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला, कर्नल राकेश यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिशन ऑलम्पिक कार्यक्रमांतर्गत 2001 मध्ये स्थापन झालेली ही  संस्था  देशात आपल्या क्षेत्रातील नामांकित संस्था आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या अनेक खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. यात तरूणदीप राय (धनुर्विद्या)  आणि ॲथलेटिक्समध्ये नीरज चोपडा, अरोक्य राजीव, जीनसन जॉन्सन यांचा समावेश आहे.

पुणे येथीलच लक्ष्य इन्स्टिट्यूटला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आाला, संस्थेचे अध्यक्ष विशाल चौरडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लक्ष्य इन्स्टिट्यूचे खेळांच्या संरक्षण आणि संवर्धनात मोलाचे योगदान राहिले आहे. या संस्थेने पुणे येथील ‘गन फॉर ग्लोरी’ या शुटींग अकादमी आणि भिवानी येथील हवासिंग बॉक्सिंग अकादमीच्या स्थापनेसाठी आरंभिक आर्थिक मदतीसह वेळोवेळी  मदत केली आहे. या उभय संस्थांतील खेळाडुंनी ऑलम्पिक स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. राही सरनोबत, अश्विनी पुनप्पा, ज्वाला गुट्टा, री दि ज्यू या खेळाडूंचा यात समावेश आहे.

मुंबई येथील इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्पोर्ट मॅनेजमेंट (आयआयएसएम)ला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराने गौरविण्यात आले, संस्थेचे संस्थापक  संचालक निलेश कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. क्रीडा क्षेत्रात संशोधन करणारी ही देशातील पहीली व्यावसायिक व्यवस्थापन संस्था आहे. या संस्थेने 1500 हून अधिक व्यावसायिक लोकांना प्रशिक्षत  केले असून ते देशाच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका वठवित आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने ही संस्था पदवी आणि पदवीका शिक्षणही देत आहे. या कार्यक्रमास दिल्ली, मुंबई,पुणे, बेंग्लुरू, कोलकोत्ता, चंदिगढ, सोनिपत, इटानगर, भोपाल, लखनऊ आणि हैद्राबाद येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे  क्रीडापटू , क्रीडा प्रशिक्षक आणि संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


Monday, August 24, 2020

महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णसंख्येने ओलांडला पाच लाखांचा टप्पा – आरोग्यमंत्री राजेश टोपे; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले ७२.४७%, राज्यातील जिल्हानिहाय कोरोना बाधित ॲक्टीव्ह रुग्णांची चिंताजनक आकडेवारी.. वाचा या खास बातमीत...

 

मुंबई, दि.२४: राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १४ हजार २१९ रुग्ण बरे झाले तर ११ हजार १५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.४७ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ०२ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६८  हजार १२६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.


आज निदान झालेले ११,०१५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २१२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७४३ (२०), ठाणे- ११५ (५), ठाणे मनपा-१३२ (६), नवी मुंबई मनपा-३२९ (१), कल्याण डोंबिवली मनपा-१९२ (१), उल्हासनगर मनपा-१५ (१६), भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-७४ (४), पालघर-४६, वसई-विरार मनपा-१२० (२), रायगड-१३८ (५), पनवेल मनपा-१३८, नाशिक-१७५ (२), नाशिक मनपा-६९९ (४), मालेगाव मनपा-४० (१), अहमदनगर-२७० (७),अहमदनगर मनपा-१२८ (२), धुळे-२२२ (४), धुळे मनपा-११४ (२), जळगाव-५३९ (१५), जळगाव मनपा-११० (३), नंदूरबार-११८, पुणे- ३८२ (४), पुणे मनपा-११०७ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-८१५ (४), सोलापूर-३१० (९), सोलापूर मनपा-५७ (१), सातारा-४४६ (१०), कोल्हापूर-४२६ (७), कोल्हापूर मनपा-२४३, सांगली-१५२ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७२ (३), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-९६ (२), औरंगाबाद-१६३ (४),औरंगाबाद मनपा-१७८ (२), जालना-३३ (१), हिंगोली-५, परभणी-२० (१), परभणी मनपा-३०, लातूर-५६ (४), लातूर मनपा-२८ (३), उस्मानाबाद-२०२ (१),बीड-१३८ (७), नांदेड-९४ (२), नांदेड मनपा-७३ (२), अकोला-३९, अकोला मनपा-८, अमरावती-४४, अमरावती मनपा-९४, यवतमाळ-६२, बुलढाणा-६२, वाशिम-५३ (१), नागपूर-१७८ (३), नागपूर मनपा-४७८ (१५), वर्धा-५, भंडारा-१६ (१), गोंदिया-४० (२), चंद्रपूर-१६, चंद्रपूर मनपा-३१ (१), गडचिरोली-५, इतर राज्य २४ (२).

 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ नमुन्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.


राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील      

 

मुंबई: बाधित रुग्ण- (१,३७,०९६) बरे झालेले रुग्ण- (१,११,०८२), मृत्यू- (७४४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,२६७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२३,४९९), बरे झालेले रुग्ण- (१,००,५७०), मृत्यू (३५९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,३३५)

पालघर: बाधित रुग्ण- (२३,६५९), बरे झालेले रुग्ण- (१६,४५५), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६४८)

रायगड: बाधित रुग्ण- (२६,८१२), बरे झालेले रुग्ण-(२१,०३१), मृत्यू- (६८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०९१)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३४७८), बरे झालेले रुग्ण- (१८५३), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५००)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (९३६), बरे झालेले रुग्ण- (५१९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०१)

पुणे: बाधित रुग्ण- (१,५२,५११), बरे झालेले रुग्ण- (१,०५,६८१), मृत्यू- (३७६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३,०६५)

सातारा: बाधित रुग्ण- (१०,००१), बरे झालेले रुग्ण- (६०२१), मृत्यू- (३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६७८)

सांगली: बाधित रुग्ण- (९३२८), बरे झालेले रुग्ण- (५४५१), मृत्यू- (३०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५७३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१८,२००), बरे झालेले रुग्ण- (१०,८१७), मृत्यू- (४८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९००)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१७,२००), बरे झालेले रुग्ण- (१२,१९६), मृत्यू- (६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३१०)

नाशिक: बाधित रुग्ण- (३२,७७८), बरे झालेले रुग्ण- (२१,५३६), मृत्यू- (७६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,४६८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१६,८३०), बरे झालेले रुग्ण- (१३,०५९), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५३५)

जळगाव: बाधित रुग्ण- (२२,६९८), बरे झालेले रुग्ण- (१५,३७६), मृत्यू- (७६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५५४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१८३८), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७०)

धुळे: बाधित रुग्ण- (६७३५), बरे झालेले रुग्ण- (४६५५), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०,९९६), बरे झालेले रुग्ण- (१४,९०७), मृत्यू- (६००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४८९)

जालना: बाधित रुग्ण-(३९१६), बरे झालेले रुग्ण- (२२९०), मृत्यू- (१२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०४)

बीड: बाधित रुग्ण- (४१६९), बरे झालेले रुग्ण- (२३२०), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७५५)

लातूर: बाधित रुग्ण- (६६७४), बरे झालेले रुग्ण- (३६५२), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७८७)

परभणी: बाधित रुग्ण- (२११०), बरे झालेले रुग्ण- (८००), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२४२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१२६८), बरे झालेले रुग्ण- (९६०), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९)

नांदेड: बाधित रुग्ण- (५३४२), बरे झालेले रुग्ण (२५७०), मृत्यू- (१६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६११)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५१६८), बरे झालेले रुग्ण- (२९३७), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०२)

अमरावती: बाधित रुग्ण- (४४०२), बरे झालेले रुग्ण- (३२४६), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४६)

अकोला: बाधित रुग्ण- (३५२८), बरे झालेले रुग्ण- (२८६७), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१२)

वाशिम: बाधित रुग्ण- (१४६०), बरे झालेले रुग्ण- (१०८४), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२८३०), बरे झालेले रुग्ण- (१७८९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२५५५), बरे झालेले रुग्ण- (१७९६), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९५)

नागपूर: बाधित रुग्ण- (२०,३२४), बरे झालेले रुग्ण- (११,०३२), मृत्यू- (५२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७६९)

वर्धा: बाधित रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३८)

भंडारा: बाधित रुग्ण- (७३८), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०५४), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१४३८), बरे झालेले रुग्ण- (८७५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५९०), बरे झालेले रुग्ण- (५२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८७)

एकूण: बाधित रुग्ण-(६,९३,३९८) बरे झालेले रुग्ण-(५,०२,४९०),मृत्यू- (२२,४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,६८,१२६)


(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २१२ मृत्यूंपैकी १६४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २९ मृत्यू  हे ठाणे ११, अहमदनगर- ८, औरंगाबाद -३, जळगाव -२, नाशिक -२, पुणे -२ आणि परभणी -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Thursday, August 20, 2020

पुरंदरचा कोरोना योद्धा, शिलेदार हरपला..कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विनायक बाबर यांचे कोरोनामुळे निधन...

 

 मुंबई - दिनांक 20 :  पुरंदर तालुक्यातील तोंडल या गावचे रहिवासी असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विनायक बाबर यांचे कोरोना संसर्गामुळे मुंबई येथे दुःखद निधन झाले.देवनार पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक विनायक बाबर यांचा   कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना दिनांक ०९/०८/२०२० रोजी डॉ डी वाय पाटील रुग्णालय ,नेरूळ ,नवी मुंबई येथे दाखल केले होते. त्यांना पुढील उपचारार्थ काल रोजी ICU  मध्ये हलवण्यात आले होते. आज दिनांक २०/०८/२०२०  रोजी पहाटे ०३:45 वाजता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. 


त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून ते कामोठे ,नवी मुंबई येथे राहत होते. विनायक बाबर यांचे मूळ गाव मु.पो. तोंडल, तालुका -पुरंदर, जिल्हा पुणे हे असून सदर ठिकाणी त्यांचे आई, वडील, भाऊ व त्याची  पत्नी राहतात. विनायक बाबर यांचे मित्रपरिवार आणि शिक्षकवर्ग यांनाही तीव्र शोक व्यक्त केला. विनायक बाबर हे अनेकांचे आवडते व्यक्तिमत्त्व असल्याने पुरंदर तालुक्यातील तोंडल,वीर या पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे.पुरंदरचा कोरोना योद्धा हरपल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



 



जगभरात महाराष्ट्राचे, भारताचे नाव अभिमानाने उंचावणारे भारताचे एल.आय.सी.ऑफ इंडियाचे प्रसिद्ध अधिकारी मिलिंद माने यांचा प्रेरणादायी,संघर्षमय प्रवास... महाराष्ट्राचे प्रेरणादायी योद्धे - मिलिंद माने...

 

जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांच्या महान पराक्रमाने, महान कार्याने पावन झालेली ही महाराष्ट्राची महान भूमी. महाराष्ट्राला जशी महान संतांची,महापुरुषांची, क्रांतिकारकांची,समाजसुधारकांची परंपरा लाभली तशीच आजच्या प्रगतशील महाराष्ट्राच्या वाटचालीत सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा,साहित्य, विज्ञान,शिक्षण, तंत्रज्ञान यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महान कर्तृत्ववान मराठी व्यक्तिमत्वांनी  महाराष्ट्राला प्रगतीच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. सचिन तेंडुलकर, शरद पवार, लता मंगेशकर यांच्यासारखी कर्तृत्ववान, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व बहूसंख्य लोकांना माहिती असतात.


पण महाराष्ट्राचे, भारताचे नाव आपल्या कर्तृत्वाने जगभर गाजवणारी काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अश्या लोकप्रियतेपासून लांब राहून देखील आपल्या कर्तृत्वाने,प्रभावशाली कार्याने, संघर्षमय प्रवासाने तरुण पिढीला प्रेरणा देत असतात.आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार TOT - TOP OF TABLE, COT - COURT OF TABLE, MDRT - MILLION DOLLAR ROUND TABLE शेकडो व्यक्तिमत्वांना मिळवून देण्याची अनमोल कामगिरी करणारे एल.आय. सी. ऑफ इंडियाचे, महाराष्ट्राचे,भारताचे प्रसिद्ध,कर्तृत्ववान विकास अधिकारी मिलींद माने यांचा संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास तरुण पिढीसाठी खूप मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. 


जगभरातील अमेरिका, कॅनडा यासारख्या विकसित देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जीवन विमा, आर्थिक नियोजन यासारख्या महत्वाच्या विषयावर जगभरातून आलेल्या विमा, आर्थिक क्षेत्रातील प्रोफेशनल लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या मिलिंद माने यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामनेर या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. 


सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शालेय जीवन जगत असतानाच महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर पुणे येथे  उच्च शिक्षणासाठी जायचे असे ठरविले असल्याने मिलिंद माने यांनी घरच्यांचा विरोध असतानाही दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी थेट पुणे गाठले.ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने घरच्यांचा विरोध डावलून, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून पुण्यासारख्या मोठया शहरात 1970 - 80 च्या दशकात उच्च शिक्षणासाठी जाणे हा धाडसीच निर्णय होता.फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षणाला प्रारंभ झाला. अनेक अडचणींना तोंड देत, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत मिलिंद माने यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातुन विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातुन MSC - Statistics ही पदवी पूर्ण केली. यानंतर MBA - Marketing and Finance ही व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेऊन मुंबई येथील हिंदुस्तान लिवर लिमिटेड या नामांकित कंपनीत व्यस्थापकीय मोठया पदावर रुजू झाले. यानंतर 1987 - 88 मध्ये Volta's LTD Mumbai या नामांकित कंपनीत काम करत असताना मिलिंद माने यांच्या आयुष्यात एक घटना घडली ज्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. 


लोणावळा येथिल एका आलिशान हॉटेलमध्ये मिलिंद माने यांच्या कंपनीचा खास कार्यक्रम होता आणि त्याच हॉटेलमध्ये एल. आय.सी.ऑफ इंडियाचे देशभरातील वेगवेगळ्या अधिकारी लोकांची टीम आली होती. यामधील पुणे येथील एका अधिकाऱ्याचा त्या हॉटेलमध्येच दुर्दैवाने हृदयविकाराने निधन झाले होते. देशभरातील हे सर्व अधिकारी खूप घाबरले होते कारण मृत्यू झालेल्या या पुण्याच्या अधिकाऱ्याला त्याच्या घरी कोण,कसे घेऊन जाणार,काय सांगणार,कुणाला व्यवस्थित पत्ताही माहिती नव्हता अश्या संकट काळी मिलिंद माने या सर्व अधिकारी वर्गाच्या मदतीला धावून आले.मिलिंद माने यांनी मृत्यू झालेल्या त्या पुण्यातील अधिकाऱ्याची सर्व माहिती मिळवून त्यांना पुण्यातील घरी पोहचवण्यासाठी स्वता ते सर्व अधिकाऱ्यांबरोबर पुण्याला गेले, त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन पुढील सर्व व्यवस्था लावून मार्गक्रमण झाले. 


या घटनेमुळेच मिलिंद माने यांची एल.आय.सी. ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख झाली आणि यातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मिलिंद माने यांना एल.आय. सी.ऑफ इंडिया या सरकारी कंपनीच्या विकास अधिकारी या महत्त्वाच्या पदाविषयी माहिती व महत्व सांगून त्यासाठी तयारी आणि अर्ज करण्यास सांगितले पण मिलिंद माने यांनी प्रथम साफ नकार दिला कारण त्यावेळी ते एका मोठया खासगी कंपनीत चांगल्या पदावर,मोठया पगाराची नोकरी करत होते. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे पुन्हा ज्यावेळेस पुणे शहरात काम असे त्यावेळेस ते मिलिंद माने यांना भेटत आणि त्यांच्यातील सकारात्मक संवादामुळेच मिलिंद माने यांनी 1989 ला मोठया पगाराची Voltas LTD या नामांकित खासगी कंपनीतील नोकरी सोडून एल.आय.सी.ऑफ इंडिया या सरकारी कंपनीच्या पुणे डिव्हिजनला विकास अधिकारी म्हणून रुजू झाले. खासगी कंपनीतील मोठया पगारापेक्षा  मिलिंद माने यांना  विकास अधिकारी या पदावर कमी पगार मिळणार होता हे माहिती असून देखील त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला.


 जिद्दीने, चिकाटीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, ध्येयवादी दूरदृष्टी असलेल्या मिलिंद माने यांनी पहिल्याच वर्षी पुणे येथे एल.आय. सी.ऑफ इंडियाचे विकास अधिकारी म्हणून विमा क्षेत्रात दमदार,उल्लेखनीय,उत्कृष्ट कामगिरी करून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.पुढील वर्षी आपल्या विमा क्षेत्रातील दमदार,विशेष कामगिरीने मिलिंद माने यांनी पुणे विभागात विकास अधिकारी म्हणून प्रथम स्थान पटकावले. यानंतर मिलिंद माने यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.जिद्दीने,चिकाटीने, निष्ठेने, प्रचंड मेहनतीने यशाची नवनवीन शिखरे गाठतच गेले. अवघ्या काही वर्षातच मिलींद माने या महाराष्ट्रातील प्रभावशाली वरिष्ठ विकास  अधिकाऱ्याने जीवन विमा क्षेत्रात दमदार, विशेष कामगिरी करत भारताच्या All India Ranking Top 5 - सर्वोत्कृष्ट 5 अधिकाऱ्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कारण एल.आय.सी.ऑफ इंडियाच्या विकास अधिकाऱ्याला एखादया शहरातील शाखेत दमदार काम करून देखील शाखेत कामगिरीच्या बाबतीत प्रथम क्रमांक मिळवणेही अवघड असते. मग जिल्हा, राज्य,देश पातळीवर विमा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून मोठे स्थान मिळवणे तर खूप कठीण गोष्ट असते. पण मिलिंद माने या प्रचंड ध्येयवादी दृष्टिकोन असलेल्या,प्रामाणिक, मेहनती,बुद्धिमान,कर्तृत्ववान मराठी माणसाने आपल्या प्रभावशाली कार्याने महाराष्ट्राचे नाव देशभरातच नाही तर जगभर उंचावले. 


2005 मध्ये विमा क्षेत्रातील जगातील सर्वोच्च पुरस्कार MDRT हा मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली  भारतातील त्यांच्या टीममधील अनेक व्यक्तींना मिळवून देण्याची अनमोल विक्रमी कामगिरी करणाऱ्या मिलिंद माने यांचा विशेष सन्मान MDRT या जागतिक संस्थेच्या अध्यक्षांनी केला. खरं तर ही प्रत्येक मराठी माणसासाठी आणि प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विमा क्षेत्रातील MDRT या  जगातील एवढया मोठया संस्थेचा अध्यक्ष मिलिंद माने यांचा भारतातील विमा क्षेत्रातील  विशेष, विक्रमी कामगिरीमुळे विशेष सन्मान करतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.


जीवन विमा, आर्थिक नियोजन, या विषयावरील मिलिंद माने यांचा एवढा दांडगा अभ्यास आहे की देशभरातील दिल्ली, बंगलोर, कलकत्ता, मुंबई यासारख्या मोठया शहरातील हजारो अधिकाऱ्यांना मिलिंद माने मार्गदर्शन करत असतात. मिलिंद माने यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते जीवन विमा, आर्थीक नियोजन याविषयी नवीन दृष्टिकोन देत असतात. मिलिंद माने नेहमी सांगतात, "जीवन विमा ही लोकांना विकायची वस्तू नाही तर लोकांना आर्थिक साक्षर करायची मोहीम आहे. जीवन विम्याच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाचे नियोजन, रिटायरमेंट नियोजन, मुलींच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन,कुटुंबाची आर्थिक सुरक्षा, पेंशन नियोजन कसे करता येते याविषयी लोकांना साक्षर करा."


2006 ला मिलींद माने यांना अमेरिकेत MDRT या जागतिक संस्थेने आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून विशेष सन्मानित केले. जगभरातील विमा क्षेत्रातील प्रोफेशनल व्यक्तींना मार्गदर्शन करणारे मिलिंद माने यांचा जीवनप्रवास तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे. MDRT या विमा क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जेव्हा मिलिंद माने भारताचे प्रतिनिधित्व करत असताना ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा झेंडा घेऊन अभिमानाने फडकवत असतात ते मनाला आनंद देणारे दृश्य पाहून वाटते की हा महाराष्ट्राचा,भारताचा प्रेरणादायी योद्धा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन देखील शिक्षणाच्या, ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या जोरावर जगभरात देशाचे नाव उंचावतोय ही तरुणांसाठी खूप विलक्षण आणि प्रेरणादायी यशोगाथा आहे.


2006 मध्येच भारतातील प्रसिद्ध लेखक,प्रेरणादायी वक्ते शिव खेरा यांच्या हस्ते मिलिंद माने यांना भारतातील विमा क्षेत्रातील विशेष कामगिरी, योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार मिळाला. 2006 नंतर सलग अनेक वर्षे जगभरातील विविध देशांमध्ये मिलिंद माने यांना आंतरराष्ट्रीय विमा परिषदेसाठी आमंत्रित केले जायचे. 2012 ला पुन्हा एकदा मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीममधील 17 व्यक्तींना विमा क्षेत्रातील MDRT हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यामुळे MDRT या जागतिक संस्थेच्या अध्यक्षांनी मिलिंद माने यांचा  विशेष सन्मान केला.


मिलिंद माने यांचे जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था यावरील अभ्यासपूर्ण विश्लेषण सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना समजेल अश्या सोप्या भाषेतील, प्रभावशाली आणि मनाला विचार करायला भाग पाडणारे आहे. देशभरातील एल.आय. सी.ऑफ इंडियाच्या हजारो वरीष्ठ विकास अधिकाऱ्यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी जी All India Sr Business Associate Forum  या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे स्थापना केली त्याचे मिलिंद माने संस्थापक सदस्य आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत.


मिलिंद माने यांनी विमा क्षेत्रातील यशाची एवढी मोठी शिखरे गाठल्यानंतरही शिक्षणाचा ध्यास काही सोडला नाही. 2018 ला MBA - Insurance and Financial Planning ही व्यस्थापन शास्त्राची पदवी मिळवली. मिलिंद माने यांनी विमा क्षेत्रात काम करणाऱ्या आर्थिक सल्लागार,विमा सल्लागार यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी जीवन विमा या विषयावरील आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रेनिंग प्रोग्राम बनवला आहे. नुकताच मिलिंद माने यांनी जीवन विमा विषयावरील शोधनिबंध PHD साठी विद्यापीठात सादर केला आहे. 


मिलिंद माने यांची भारतीय समाजाशी नाळ खूप घट्ट निर्माण झालेली आहे.2003 साली स्थापन केलेल्या Lend a Hand India या सामाजिक संस्थेचे मिलिंद माने संस्थापक सदस्य आणि सल्लागार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील, शहरी भागातील गरीब, गरजू मुलांना व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास,रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाते. आयुष्यात माणूस कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठा झाला, यशस्वी झाला तरी त्याचे पाय जमिनीवर पाहिजे. सर्वांशी नम्रतेने आणि माणुसकीने वागले पाहिजे. या साऱ्या गोष्टींची प्रचिती मिलिंद माने यांना भेटल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील,भारतातील तरुण पिढीसाठी  प्रेरणादायी असणाऱ्या मिलींद माने यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. 


लेखक, पत्रकार - अजित श्रीरंग जगताप

संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.



Friday, August 14, 2020

Breaking News.. वीर धरण 98.93 टक्के भरले, वीर धरणाचे पाच दरवाजे चार फुटांनी उचलले; निरा नदीपात्रात 23 हजार 525 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू....

 

वीर, दिनांक 14 : वीर धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडा भरापासून पावसाचा जोर वाढू लागल्याने वीर धरण 98.93 टक्के भरले आहे.


गुरुवारी  चार फुटांनी उचललेल्या सात दरवाजातून 32 हजार 368 क्यूसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात आला होता. शुक्रवारी आज 9 वाजता दोन दरवाजे बंद करण्यात आले आहेत, धरणाचे पाच दरवाजे चार फुटांनी उचलून 23 हजार 525 क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात  सोडण्यात आलेला आहे अशी माहिती वीर धरण अभियंता विजय नलावडे यांनी दिली.


विद्युतगृहातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.वीर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच आहे. वीर धरणाच्या पाच दरवाज्यातून 23 हजार 525 क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे निरा नदीकाठच्या  गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.


वीर धरण पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या निरा खोऱ्यातील भाटघर धरण 78.91 टक्के, गुंजवणी - 95.81 टक्के, निरा - देवघर 66.07 टक्के भरलेले आहे.


Thursday, August 13, 2020

महाराष्ट्रातील "१० जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांना" केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर...

 

नवी दिल्ली, दि. 12 : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज वर्ष २०२० साठीच्या विशेष पोलीस पदकांची घोषणा केली. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण व्हावा व उत्तम तपास कार्याची दखल म्हणून २०१८ पासून सुरु झालेल्या या पुरस्कारासाठी यावर्षी महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्रातील या अधिकाऱ्यांना विशेष पोलीस पदक

  • श्री. शिवाजी पंडीतराव पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, पुणे शहर ) 
  • श्री. राजेंद्र सिदराम बोकडे, पोलीस निरीक्षक
  • श्री. उत्तम दत्तात्रेय सोनवणे, पोलीस निरीक्षक
  • श्री. नरेंद्र कृष्णराव हिवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
  • श्रीमती ज्योती लक्ष्मण क्षिरसागर, पोलीस अधीक्षक
  • श्री. अनिल तुकाराम घेरडीकर, उप विभागीय पोलीस अधिकारी
  • श्री. नारायण देवदास शिरगावकर, उप पोलीस अधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती)
  • श्री. समीर नाजीर शेख, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा,नाशिक शहर)
  • श्री. किसन भगवान गवळी, सहायक पोलीस आयुक्त
  •  श्री. कोंडीराम रघु पोपेरे , पोलीस निरीक्षक


विशेष पोलीस पदकासाठी देशातील १२१ पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांची नावे जाहीर झाली असून यात केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाचे १५, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील प्रत्येकी १०, उत्तर प्रदेशातील ८, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ७ अधिकारी कर्मचाऱ्यांसह उर्वरित अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकूण २१ महिलांचा समावेश आहे.


Friday, August 7, 2020

महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतींसाठी महत्वाचा निर्णय; पंधराव्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतून गावातील घरांना मिळणार घरगुती नळजोडणी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील; कशी होणार अंमलबजावणी? वाचा सविस्तर...

 

जळगाव (जिमाका) दि. 6 :- केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधी हा सद्यस्थितीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी प्राधान्याने वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निधीतून गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.


मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणारा निधी ५०% बंधीत स्वरुपात ठेवला असून त्याचा वापर मुख्यत: पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या योजनांसाठी करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार हा निधी पुढील आदेशापर्यंत संबंधित ग्रामपंचायतीने १००% कार्यात्मक घरगुती नळजोडणी देण्यासाठीच वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील गावांमध्ये घरगुती नळ जोडणीची कामे पूर्ण होणार असून यामुळे नागरिकांना घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.


अशी होणार अंमलबजावणी

या निर्णयाची अंमलबजावणी करताना जी गावे जल जीवन मिशन अंतर्गत निवडण्यात आली आहेत त्यांची कार्यात्मक घरगुती नळ जोडणीची कामे ग्रामपंचायत पातळीवर पूर्ण करावी. यासाठी ग्रामविकास विभागाने दिलेला वित्त आयोगाचा निधी वापरासंबंधीचे प्रशासकीय अधिकार ग्रामपंचायतीस आहे त्या मर्यादित प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायतीस देता येणार आहे. मात्र, अशा कामांना तांत्रिक मान्यता देण्यास उपअभियंता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद हे सक्षम राहतील. तसेच यापूर्वी ज्या गावांमध्ये स्रोत विकास, नवीन स्रोतांचा शोध, ऊर्ध्व वाहिन्या, पाण्याची टाकी बांधणी ही कामे करण्याचे निश्चित झाले आहे ती कामे करून कार्यात्मक घरगुती नळ    जोडण्याची कामे करावयाची आहेत. अशा गावांनी 15 व्या वित्त आयोगातून प्रथम 100 टक्के घरांना नळजोडणीची कामे पूर्ण करावी. ग्रामपंचायतींनी कार्यात्मकता साध्य करण्यासाठी नळजोडणी व्यतिरिक्त इतर आवश्यक कामाचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करावे, अशा कामांना पंधरा लाख रुपये पर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायतीला देता येईल. मात्र या सर्व प्रस्तावांना तांत्रिक मान्यता कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांची घ्यावी लागणार आहे असे पाणीपुरवठा मंत्र्यांनी सांगितले.


पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील पुढे म्हणाले, ही कामे करताना वित्त आयोगाचा निधी कमी पडल्यास त्या प्रमाणात जल जीवन मिशनचा निधी जिल्हास्तरावरून ग्रामपंचायतीच्या खात्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जमा करतील. ही सर्व कामे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने वित्त आयोगाच्या निधीसाठी घालून दिलेल्या प्रक्रियांचे पालन करून करावी लागणार  आहेत. यासाठी तांत्रिक मान्यता देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याने प्रत्येक अंदाज पत्रकांना मान्यता देताना  गावातील ज्या घरांना जल जीवन मिशनच्या निकषानुसार कार्यात्मक नळजोडणी मिळेल त्याचे निकषानुसार मूल्यमापन करून घेण्यात येईल. वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेले अंदाजपत्रकातील समाविष्ट कामांचा जल जीवन मिशन अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकात समावेश करण्यात येऊ नये, वित्त आयोग अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी जिल्हा परिषद तांत्रिक मंजुरीसाठी कोणतीही प्रशासकीय फी आकारणार नाही. जल जीवन मिशन अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकाबाबत प्रचलित पद्धतीनुसार कार्यवाही करावी लागेल.  वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचा अहवाल जिल्हा परिषदेस द्यावा लागेल. शिवाय 15 लक्ष किमतीपेक्षा जास्त किमतीच्या सुधारात्मक पूनर्जोडणीची कामे प्रचलित पद्धतीने करावी लागतील असेही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.


Wednesday, August 5, 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमेदवार यशस्वी, महिला उमेदवारांनीही मारली बाजी, महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधरावी आणि राज्यात प्रथम...


नवी दिल्‍ली, 4 :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण  829 यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून नेेहा भोसले  पहिल्या स्थानावर तर देशात पंधराव्या स्थानावर आहे.


केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2019 च्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. यात नेहा भोसले 15 व्या स्थानावर,मंदार पत्की 22 व्या स्थानावर, आशुतोष कुलकर्णी 44 व्या स्थानावर, योगेश पाटील 63 व्या स्थानावर, विशाल नरवाडे 91 व्या स्थानावर, आहेत. दिव्यांगामधून राज्यातील जयंत मंकले हे 143 व्या स्थानावर आहेत.

जयंत मंकलेंची अंधत्वावर मात : केंद्रीय लोकसेवा आयोगात 143 क्रमांक

पुण्याचा जयंत मंकले या दिव्यांग उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2019 च्या परीक्षेत 143 वा क्रमांक मिळविला आहे. या आधी जयंतने 2018 मध्ये ही लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती, त्यावेळी त्याचा क्रमांक 937 होता. यावेळी पुन्हा प्रयत्न करीत 143 वा क्रमांक मिळविला.

महाराष्ट्रातील महिला उमेदवारांनीही मारली बाजी

यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील 12 महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. या मध्ये नेहा भोसले यांना देशभरातील गुणांनुक्रमानुसार 15 वे स्थान मिळाले आहे तर महाराष्ट्रातून त्या पहिल्या ठरल्या आहेत. याशिवाय नेहा दिवाकर देसाई (137), अश्विनी तानाजी वाकडे (200), गौरी पुजारी (275), नेहा किरडक (383), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), अंकिता अरविंद वाकेकर (547), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), प्रियंका कांबळे (670), प्रज्ञा खंडारे (719), अनन्या किर्ती (736).


एक नजर निकालावर

 केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीर झाला. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 829 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –304, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस)78, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 251, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 129, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 67 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 60 शारिरीकरित्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 182 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 91, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)-09,  इतर मागास वर्ग -71, अनुसूचित जाती- 08, अनुसूचित जमाती  - 03 उमेदवारांचा समावेश आहे. 


भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 72, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –52, अनुसूचित जाती (एस.सी.) –25, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 24 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 12, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 02,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 06, अनुसूचित जाती (एस.सी.) – ०3, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 01 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 150 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60,  उमेदवार आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 15,  इतर मागास प्रवर्गातून - 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 23, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 10  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - 438 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 196 उमेदवार, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  34, इतर मागास प्रवर्गातून - 109, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 64 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 35 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – 135  जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) -57, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 14  उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 14  तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 08 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

या परीक्षेत यश मिळविणाऱ्या  महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये यांचा समावेश आहे. -

नेहा प्रकाश भोसले (15), मंदार जयवंतराव पत्की (22), आशुतोष कुलकर्णी  (44), दिपक करवा (48),  योगेश अशोकराव पाटील (63), विशाल तेजराव नरवडे (91), मयुर खंडेलवाल (106), राहूल लक्ष्मण चव्हाण (109), विनोद पाटील (132), कुलदिप जंगम (135), नेहा दिवाकर देसाई (137), जयवंत किशोर मनकाळे (143), अभयसिंह बाळासाहेब देशमुख (151), शेख मोहमद झेब झाकीर (153), अश्विनी तानाजी वाकडे (200), सागर भारत मिसाळ (204), माधव विठ्ठलराव गित्ते (210), कुणाल मोतीराम चव्हाण (211), सचिन हिरेमठ (213), सुमित महाजन (214), श्रेणिक लोढा (221), अविनाश शिंदे (226), शंकर गिरी (230), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), आयुष खरे (267), गौरी पुजारी (275), गजराज बच्छावत (277), शंतनु अत्रे (281), प्रसाद शिंदे (287), रजनिश पाटिदार (307), आकाश अग्ले (313), मंदार देशपांडे (334), रजत उभयकर (378), आदित्य काकडे (382), नेहा किरडक (383), निमिश पाटील (389), महेश गिते (399), अभिषेक शिवहरे (414), कांतीलाल सुभाष पाटील (418), अमित कुमावत (423), अविनाश जगधवर (433), परमानंद प्रविण दराडे (439), स्वप्नील पवार (448), ऋषिकेश जयसिंग देसाई (481), नकुल राजेंद्र देशमुख (489), शुभ्रमण्य भालचंद्र केळकर (497), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), सुमित कैलास जगताप (507), दिपक धनखेर (520), प्रसन्न लोढा (524), नवनाथ शिवाजी माने (527), प्रफुल्ल देसाई (532), वैभव हिरवे (541), अंकिता अरविंद वाकेकर (547), विजयसिंहराव साहेबराव गिते (550), समिर प्रकाश खोडे (551), सुरेश कैलासराव शिंदे (574), अभिनव प्रविण इंगोळे (624), अजय गणपती कुंभार (630), स्वप्नील जगन्नाथ पवार (635), अभिषेक दिलीप दुधाळ (637), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), अशित कांबळे (651), करूण गरड (656), प्रियंका कांबळे (670), ऋषिकेश देशमुख (688), सौरभ व्हटकर (695), अक्षय भोसले (704), अभिजीत सरकटे (710), प्रज्ञा खंडारे (719), साकेत धवने (727), निखिल दुबे (733), राजीव मेश्राम (735), अनन्या किर्ती (736), शशांक माने (743), निखील कांबळे (744), सुमित रामटेके (748), शुभम भैसारे (749), निलेश गायकवाड (752), कुणाल उत्तम शिरोटे (765), वैभव वाघमारे (771), अश्विन गोलपकर (773), विधित्या नायक (780), किशोर सुत्रधार (784), सरगम शिंदे (785), सर्वेश सोनवाणी (787), अजिंक्य विद्यागर (789), सत्यजित यादव (801), समिर महाजन (810), सुनिल शिंदे (812), हेमंत नंदनवार (822), स्वरूप दिक्षित (827).  

यापैकी यशस्वी झालेल्या 66 उमेदवारांची निवड तात्पुरती आहे.

अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.