पुणे, दि. 29 : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष लढविणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यानकार, इतिहास अभ्यासक, उच्चविद्याविभूषित उमेदवार डॉ.श्रीमंत शिवाजी कोकाटे यांना छावा स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेने जाहीर पाठींबा दिला.
छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील) यांनी डॉ. श्रीमंत कोकाटे यांची सदिच्छा भेट घेऊन पुणे पदवीधरसाठी श्रीमंत कोकाटे निवडणूक लढवीत आहेत यामुळे त्यांचे अभिनंदन केले व निवडणुकीबाबत काही महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ. श्रीमंत कोकाटे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
या जाहीर पाठिंब्याचे पत्र डॉ. श्रीमंत कोकाटे यांना देताना छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील),प्रदेश कार्याध्यक्ष श्री.अरीफभाई शेख तसेच श्री.अमित हातवळणे,श्री.उमेश चांदणे, श्री.नितीन पवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुरोगामी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, विचारवंत, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे पदवीधरांचे प्रश्न नक्कीच सोडवतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे असे छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक(पाटील)यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूज शी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment