म्हसवड, दि.8 : केंद सरकारच्या कृषी कायद्याविरोधात संपूर्ण भारतातील शेतकरी वर्ग आक्रमक झालेला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी वर्गाने पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्हातील म्हसवड येथे शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे रद्द करावेत म्हणून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कडकडीत बंद पाळण्यात आला.
"शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे अन्यायकारी आहेत,पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या क्रांतिकारी आंदोलनाला संपूर्ण भारतातील शेतकरी वर्गाने आणि सामान्य लोकांनी पाठींबा दिला आहे. केंद सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा, धोरणांचा आम्ही काळ्या फिती लावून महाविकास आघाडीच्या वतीने व शेतकरी वर्गाच्या वतीने तीव्र निषेध करतो, केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे लवकर रद्द करावेत नाहीतर शेतकरी वर्गाचे आंदोलन अजून आक्रमक होईन." अशी माहिती सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस निलेश काटे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
यावेळी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस निलेश काटे,प्रा विश्वंभर बाबर , विजय धट ,नगरसेवक विकास गोंजारी, अनिल लोखंडे, महावीर ढवळे , बाबासाहेब माने , मन्सूर मुल्ला तसेच महाविकास आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.
या निमित्ताने महात्मा फुले यांच्या पुतळ्याला शेतकऱ्याच्या हस्ते पुष्पहार घालून केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी निलेश काटे, विश्वंभर बाबर सर, विजय धट ,विकास गोंजारी यांनी मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment