पुरंदर,वीर, दि.19 : - पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावातील बहुतांश शाळकरी मुले असलेल्या शिवतेज मित्रमंडळ वीर - समगीरवाडी येथील या मंडळाने यंदा "केदारनाथ मंदिर" हा आकर्षक देखावा सादर करून गणेशभक्तांची मने जिंकली. या हलत्या देखाव्यात महादेवाच्या पिंडीवरून पडणारे पाणी व खाली केदारनाथ मंदिर असे सुंदर दृश्य असून हा सुंदर देखावा गणेशभक्तांच्या पसंतीस उतरला आहे.
हा देखावा उभारण्यासाठी जेमतेम गोष्टी वापरल्या असून, निरुपयोगी पुठ्ठे, बारदाना, शाडूमाती इत्यादी कमीत कमी साहित्यात लहान मुलांच्या मदतीने हा देखावा उभारण्यात आला.
"केदारनाथ मंदिर" या आकर्षक देखाव्याचा व्हिडिओ : -
"हिमालयाच्या पायथ्याशी असलेले "केदारनाथ धाम" हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. पौराणिक ग्रंथांमध्ये या धामशी संबंधित अनेक कथा सापडतात. महादेवांनी स्वतः येथे पांडवांना स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवला होता, म्हणूनच हिंदू धर्मात केदारनाथ हे मोक्षस्थळ मानले जाते."
"खेडोपाड्यातील लोकांना या तीर्थक्षेत्राला जाता येत नाही म्हणून शिवतेज मंडळाने ही संकल्पना अमलात आणली आहे. या पूर्वी कैलास पर्वत, महाभारत यासारखे देखावे या मंडळाने साकारले होते. गेल्यावर्षी वीर धरणाचा हलता देखावा सादर केला होता." अशी माहिती शिवतेज मित्रमंडळाचे मार्गदर्शक अजय समगीर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
गणेश उत्सवाच्या निमित्ताने शाळकरी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या लोकांना विरंगुळा म्हणून शिवतेज मंडळ दरवर्षी नेहमी आग्रही असते.
हा देखावा उभारण्यासाठी मोठ्या कार्यकर्त्यांसोबत सहभागी असणारी शाळकरी मुले : -
स्वयम समगीर - इयत्ता ६ वी
ओम समगीर - इयत्ता ७ वी
आयुष समगीर - इयत्ता ९ वी
रोहित समगीर - इयत्ता १० वी
अक्षय समगीर - इयत्ता ८ वी
ईश्वर समगीर - इयत्ता ३ री
लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गणेश मंडळांनी असे वेगवेगळे उपक्रम राबवून शाळकरी मुलांच्या पंखांना बळ देणे गरजेचे आहे.
BIG BAZAAR BIG SAVING SALE... Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
वाडी वस्तीवरील मुलांच्या या उपक्रमाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र गर्जना न्युज चॅनलचे आभार 🙏
ReplyDeleteखूपच अप्रतिम..
ReplyDeleteअप्रतिम सजावट केली आहे.
ReplyDeleteव्हिडीओद्वारे देखील अनेकांना या कलेने भुरळ घातली जाणार यात काहीच शंका नाही...
आपला,
सचिन शिंदेपाटील, पुणे
Karach apratim ahe
ReplyDelete