Sunday, January 15, 2023

"युरोपातल्या नेदरलँडच्या दाटलेल्या धुक्यात 'आतुरता' महाराष्ट्रातील प्रसिद्ध वीर गावच्या आमच्या ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची" - युरोपमध्ये संगणक अभियंता पदावर कार्यरत असणाऱ्या युवा लेखक अजय समगीर यांचा रविवार विशेष लेख...

 



"युरोपातल्या नेदरलँडच्या दाटलेल्या धुक्यात 'आतुरता' महाराष्ट्रातील प्रसिद्ध वीर गावच्या आमच्या ऐतिहासिक  यात्रा सोहळ्याची"

युरोपातील नेदरलँडच्या दाटलेल्या धूक्यातील आजची सकाळ. युरोपचं वातावरण पुन्हा लहरी झालं होतं. आठवडाभर गोठलेल्या नद्या नुकत्याच वाहू लागल्या होत्या. धूसर वातावरणातून बस निघाली होती, विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला बगल देऊन खालच्या बाजूला ऑफीसच्या दिशेने वळली. गुलाबी वातावरण अन रोजचा रस्ता पण नवीन रुपात खुलला होता. ऑफिसला जाऊन काय काम करायचं आहे? हा नेहमीचा विचार आज नव्हता. 




रस्त्याच्या उजव्या बाजूला उभी असणारी विमानं आज लक्ष वेधून घेत नव्हती. नेहमी कानात असणारे हेडफोन आज खिशातच पडून होते. कारण कानात ढोलांचा आवाज घुमत होता. धुक्यात उधळलेला नाथाचा गुलाल फक्त मलाच दिसत होता. ही चाहूल एक आतुरता निर्माण करणारी होती... ही आतुरता महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची. ही आतुरता आमच्या गावचा आनंदी सोहळा असणाऱ्या ऐतिहासिक यात्रेची होती. 




ती दरवर्षी असते, मला आणि पुरंदरच्या पंचक्रोशीत ती सगळ्यांना असते. हळू हळू ही चाहूल खाली सरकत जाते अगदी सोलापूर ते कर्नाटक पर्यंत. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


"सात समुद्रापलिकडे पूर्वेला पौष पौर्णिमेला वाऱ्याने दिशा बदललेली होती. त्याची चाहूल मला पश्चिमेला येऊ लागली होती. युरोपची गुलाबी थंडी आता वीर गावच्या यात्रेतली लाल थंडी वाटू लागली होती."




कोणत्याही यात्रेकरूंच्या नजरेसमोर उभं राहावं असं चित्र समोर रंगत होतं.


यात्रेचा पहिला दिवस म्हणजे कोडितवरून निघालेली श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी आणि सोबत सासनकाठी म्हणजेच कोडीतचा बडदा.




पांढऱ्यातक कपड्यात सजलेली, डोक्यावर कडक टोपी, अनवानी पायाला भिंगरी लावून चालणारी, एका हातात निवदाचं ताट आन दुसऱ्या हातात नारळ, आवाज चढता, वाटेत भेटेल त्याला "अवाराआवरी" ची विचारपूस करणारी कोडीतकर मंडळी. पुरंदरच्या कोंदणात वसलेलं गाव म्हणून कदाचीत त्याचं नाव कोंदित (कोडित).




जत्रा आली की गावकीची, भावकीची, बांधावरची भांडणं वेस ओलांडून पळून गेलेली. सगळे एक होऊन देवाच्या लग्नाच्या तयारीला लागलेले. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


आदल्या दिवशी देवाची मिरवणूक, गाव बैठक पार पाडून ठरलेला रीवाज पाळून एकमतानं यात्रा उत्सव साजरा करणे हा अलिखित नियम शेकडो वर्षापासून चालत आलेला. 




"ह्यांचं नेतृत्व करणारा राजबिंडा बडदा(मानाची सासनकाठी) तुळजीबुवांच्या मंदिराच्या शिखर - माथ्यावर रेलून उभा राहिलेला. दिमाखदार मोरपीस, पुरंदरच्या बुरुजातून घोंगावत येणारा वारा जरीपटक्यावर घेत जणू गावकऱ्यांची तयारी कौतुकाने बघतोय असा भासावा. "




ही सासनकाठी पुढचे दहा दिवस यात्रेचे नेतृत्व करणारी. वर्षभर खुटीवर आराम करणारे ढोल एकसारखे चाल धरू लागावेत. पुढचे दहा दिवस थांबायचं नाही ते त्यांनाही कळून चुकलेलं. नव्या चापाचा जुन्या टिपरीवर रुबाब वाढलेला. संपूर्ण शिवार दुमदुमून टाकण्याची त्यांना जणू घाईच झालेली.



नाथाच्या मंदिरापासून कच्चे पक्के रस्ते, रानाचे बांध ओलांडून गावाकडे लांब नजर फेकली की मुंग्यांची रांग वारुळा भोवती लागावी तशी ही मंडळी गाव ते तुळाजीबुवांच्या मंदिराकडे ये जा करताना दिसावीत. 




घरातली म्हातारी माणसं अंतर वेळेत पूर्ण करायला आणि तरणी पोरं पालं उभी करायला पहिल्या पहरातच बाहेर पडलेली. घरातल्या कर्त्या मंडळींनी सर्व लवाजमा घेऊन चालत वीरला जायची तयारी केलेली.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


वेळेने इशारत देताच बडदा(मानाची सासनकाठी) मार्गस्थ व्हावा. कधी शेताच्या बांधावरून, कधी रान तुडवत, कधी पायवाटेने तर कधी दोन वाव रस्त्यावरून एकसारखी चाल करत. पुढे ढोल पिपाण्या वर्दी द्यायला. आन त्यांच्यामागे हार घालून सजलेलं भगवं निशाण दिमाखात चालावं. सोबत दुनितलं रखान, अब्दागिरी, झाल, दागिने असा ऐवज आणि लवाजम्यासह चालणारे अनवानी पाय. सर्वांना राऊतवाडीचा थांबा जवळ करण्याची घाई झालेली.




पाटाला डोकं देऊन काठी पेलवणारा मानकरी आणि काठीचा तोल सांभाळत चार बाजूने रस्सी सांभाळत धावणारे तोलकरी. रानातील घरं, वाटेवरच्या वस्त्या, खोऱ्यातली गावं दर्शनाला धावावी. तुळबाबानं चालता चालता त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावेत आणि तुडवलेली काळी माती हिरवं सोनं पिकवत राहावी. 




पुरंदरच्या पायथ्यापासून वीर पर्यंत यात्रेकरूंच्या रांगा लागलेल्या.त्यांची तहान भागवायला रुद्रगंगेचं पाणी आणि पुण्य पदरी पडावं म्हणून सढळ हातांनी केलेले अन्नदान. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


पुढे पालखी रानावनातून घाटात पोहोचावी, गाडी मार्गाने येणाऱ्या बैलगाड्या पालखीच्या सोबतीला याव्यात, घुंगरू आणि चाळाचा लयबद्ध आवाज करत धावणाऱ्या बैलांना पालखीने वाट द्यावी. सजलेला बैल आणि सजवणारा मालक साटीभर आशीर्वाद घेऊन पुढे मार्गस्थ व्हावा. पालखी गावात पोहोचायच्या आत त्यानं वीर गाव जवळ करून पालात संसार थाटावा अगदी यात्रा संपेपर्यंत...




रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सावटीचा आधार घेत, बसत उठत वयस्कर मंडळी राऊतवाडीत पोहोचावी. शाळा कॉलेजच्या पोरांचा कळप, भावकीतल्या बायकांचा तांडा, आसपासच्या गावातील तरुण मित्र मंडळी दिवसभर चालून वाडीच्या पटांगणात स्थिरावलेली. 




ठरलेल्या वेळेत सासनकाठी वाडीत दाखल व्हावी, राऊत मंडळींनी कोडितकरांच स्वागत करावं. पूर्वेला चंद्र आणि पश्चिमेला मावळता सुर्य साक्षीला ठेवून राऊतांच्या मानाच्या काठीने बडद्याला आलिंगन द्यावं.




पुढे परंपरेप्रमाणे  राऊत मंडळींनी सर्व लवाजमा स्वतःच्या हाती घ्यावा आणि शाही सोहळ्याकरता वाजत गाजत वीर गावाकडे मार्गस्थ व्हावं. तिथं मानकरी, गावकरी भेटीला सज्ज झालेले. दोन्हीच्या लोकांनी मिळून यात्रा उत्सव सुरू करावा. सोबतीला इतर गावच्या मानाच्या पालख्या आणि काठ्या दाखल व्हाव्यात.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"कोडीतकरांनी अवघा आयुष्याचा पसारा नाथाच्या जीवावर आहे तसाच सोडून  वीर गावात पालं उभी करायची. पांढरी कपडे जसजसा यात्रेला रंग चढतो तसतशी लाल बुंद होत जातात. जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा बदलतात. भक्तीत तल्लीन झालेल्या कित्येकांना झोपेची आठवणच राहत नसावी. इतरवेळी गावाकडे आरवणाऱ्या कोंबड्यांचा आवाज गायब होतो आन वीर गावाला ढोलाच्या आवाजाने जाग यावी."




सकाळच्या प्रहरात ढोलाची एक लयबद्ध चाल सुरू राहावी. कोडितकरांची पूजा सुरू झाली म्हणून वीर गावात लगबग वाढावी. बडदा(मानाची सासनकाठी) एका नेहमीच्या देवराईला टेकून उभा. त्या रुखाच्या सावलीतच नाथांची पालखी स्थिरावलेली. एका बाजूला पुजाऱ्याची पूजा आन दुसऱ्या बाजूला दर्शनाची रीघ लागलेली.


सकाळी उठून कामाच्या व्यापात निघालेल्या लोकांनी पालखी जवळ माथा टेकवून मनातल्या विचारांचा भार नाथांच्या चरणावर सोडावा. काठीच्या पाटावर डोकं टेकवून अजून एक नवं मागणं मागावं आणि मार्गस्थ व्हावं. वीरगावची वेस संपेपर्यंत रुखाच्या वर डोलणाऱ्या बडद्याकडे राहून राहून नजर जावी.




'बघता बघता दुसरा प्रहर संपावा. निशाणी फडकावी. बघता बघता पालं भरलेली रिकामी व्हावी आणि देऊळवाडा भरून जावा. बडदा मंदिराकडे निघावा आणि पलीकडे वीरकरांची धांदल उडवी. गावच्या पारावर रंगलेल्या गप्पा सोडून ढोल घेऊन मंदिर गाठावं. कुणाचा रानातल्या झाडाच्या सावलीत डोळा लागलेला. छबिन्याचा आवाज ऐकून त्यांनी टोपी घेऊन पळत सुटावं.'


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


गुरं ढोरं जागच्या जागी करून वीरच्या छबिण्यात गर्दी उसळावी. मानकऱ्यांची गडबड, ढोल्यांचा ताव, ताशांचा खणखणाट त्यांना पिपाणीची साथ. गजे मंडळींनी रिंगण धरलेलं त्यात जाणकारांचा थाट आन नवख्यांची आबदा. डोक्यात टोपी नसणाऱ्यानी फेर धरायला अवकाश की हकालपट्टी ठरलेली...




देऊळवाड्यात दोन छबिने रंगात आलेले. ढोल ताशा वाजवत आणि नाचत ठरलेल्या प्रदक्षिणा घालणे. प्रत्येक तपकावर मानाच्या काठ्या व पालख्या उभ्या करून ठरलेल्या चाली आणि छबीना ह्यांनी शिवार गर्जून उठावा.




"दिवस चढत जावा तसा छबिना रंगात यावा. प्रत्येक वेढ्यागणीस शरीर थकत जावं आणि मनानं उसळी घ्यावी. दुसऱ्या वेढ्यात जोर कमी व्हावा तिथं तिसऱ्या वेढ्यात ढोल मस्तीत आलेले. बाळ गोपाळ तरणी ताठी ते अनुभवी धोतर - पायजमा रंगात रंगून जावा. प्रत्येक गिरकी "चांगभलं" म्हणत दुमदुमावी!"




शेवटचे निशाण फडकले की कोडितकरांनी भारावलेला छबिणा वीरकरांनी धूप आरती करून उतरवावा. मानाच्या काठ्या सहित पाच पालख्या पालात विश्रांतीला जाव्यात.



Snapdeal  Best Offer... Upto 90% Off On Fashion, Electronics & More...  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                                  Buy Now


उरलेलं गुठं, सांडगा, डाळीची आमटी, पापड, भरीत ज्वारी बाजरी सहित पोटाच्या आधीन व्हावी. बघता बघता काळोख दाटावा, शिवार कडाक्याच्या थंडीत बुडून जावं पण कोडीतकरांनी फक्त "कानांनी ऐकावं".




ठरलेल्या वेळेत पुन्हा निशाण फडकावं, रात्रीच्या छबिन्याला सुरुवात व्हावी. चादर सतरंज्या लपेटून छबिण्याला आलेली मंडळी ढोलांचा निनाद ऐकुन घामाघूम व्हावी आणि यात्रेचा लाल रंग चढत जावा... तो सात समुद्रापार दिसावा!


लेखक : - युरोपातील नेदरलँड येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे संगणक अभियंता, युवा लेखक अजय समगीर.


5 comments:

  1. अजय भाऊ..
    खूपच भारी..
    डोळ्यासमोर चित्र उभं केलंत...

    तुमच्या भावना नाथचरणी नक्की पोहोचतील..🙏💙😀

    ReplyDelete
  2. गावच्या मातीशी व नाथा शी असलेली नाळ...
    पुर्ण यात्राच वातावरणा सहित डोळ्या समोर उभी केलीत...👍

    ReplyDelete