Wednesday, February 22, 2023

"पुण्यातील आंबेगाव पठार येथे राजतोरणा प्रतिष्ठान व मुद्रा क्लासेसतर्फे "या" सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून, 'शिवजयंती' उत्साहात साजरी"



पुणे, दि.२२ :  पुण्यातील आंबेगाव पठार येथे राजतोरणा प्रतिष्ठान व मुद्रा क्लासेसच्या तर्फे १९ फेब्रुवारीला शिवजयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून, उत्साहात साजरी करण्यात आली.




राजतोरणा प्रतिष्ठान पुण्यातील आंबेगाव पठार येथे नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आंबेगाव पठार येथे राजतोरणा प्रतिष्ठान व मुद्रा क्लासेसच्या तर्फे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.




संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे हे पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या परखड, अभ्यासू शैलीत त्यांनी शिवचरित्रावरील व्याख्यानाचा विषय प्रभावीपणे मांडला.



राजतोरणा प्रतिष्ठान व मुद्रा क्लासेसच्या तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.



Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्सवमूर्तीसमोर श्रवणीय भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी आंबेगाव पठार परिसरातील नागरिक उपस्थित होते.




आंबेगाव पठार येथील शिवजयंतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लहान मुलांच्या नृत्याच्या अविष्काराने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शालेय विद्यार्थ्यांची तबला व पखवाज जुगलबंदीही सर्वांना आवडली.




आंबेगाव पठार येथील महिला वर्गाने शिवजयंतीनिमित्त महाआरती केली. यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.




शिवजयंती निमित्त राजतोरणा प्रतिष्ठान व मुद्रा क्लासेसच्या तर्फे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आंबेगाव पठार येथील शिवजयंती कार्यक्रमासाठी आबेगावचे सरपंच श्री सिध्दार्थ वनशिव, उपसरपंच श्री अनिल कोंढरे, ग्रामपंचायत सदस्य श्री चेतन मागंडे, ग्रामपंचायत सदस्य  सौ आशाताई राजगुरु,मुद्रा कोचिंग क्लासेसचे संचालक श्री श्याम  बिरादार, संचालिका सौ भावना बिरादार,शिवमुद्रा महिला बचत गट  अध्यक्षा सौ रेखाताई देवगिरीकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस श्री मंगेश साळुंके, जेष्ठ नागरिक  संस्थापक अध्यक्ष श्री भरत काका बाबर, श्री बाळासाहेब पासलकर उपस्थित होते.




या शिवजयंती कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्री सोमनाथ शेडगे, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक सरचिटणीस श्री दत्तात्रय बोरगे,श्री अशोक रासकर,श्री मनेष राजगुरु,श्री.भीमसेन रेणुसे,श्री चंद्रकांत देवगिरीकर व  आंबेगाव पठार  परिसरातील नागरिक उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे  सर्व नियोजन राजतोरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री नदुशेठ देवगिरीकर व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी केले.


Monday, February 20, 2023

"आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात इतिहासात प्रथमच शिवजयंती जल्लोषात,उत्साहात साजरी; 'मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आलो आहे' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; आग्र्याच्या लाल किल्ल्यातील ऐतिहासिक शिवजयंतीची "ही" खास क्षणचित्रे पहा 'या' खास बातमीत....



नवी दिल्ली, दि. २० : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.




आग्रा (उत्तर प्रदेश) येथील लाल किल्ल्यामध्ये मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती आज साजरी करण्यात आली. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्तांची उपस्थिती होती.




यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे बोलत होते. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचा हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन, आर. आर. पाटील फाउंडेशन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, औरंगाबाद या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.



कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उत्तर प्रदेशचे विधी एवं न्याय मंत्री श्री. उपाध्य, तसेच


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय विधी राज्यमंत्री एस. पी. सिह बघेल, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, प्रशांत बंब, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आमदार संजीव शिरसाट, सतीश चव्हाण‌ आदी मान्यवर उपस्थित होते.




"लाल किल्ल्यात शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते. शिवरायांनी याच किल्ल्यात औरंगजेबाला खडे बोल सुनावले होते. येथून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुखरूप सुटले होते. या ऐतिहासिक लाल किल्ल्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणे हा एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण" असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.



Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "मी आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आलो आहे. आजचा दिवस अवघ्या महाराष्ट्रासाठी रोमहर्षक आहे. शिवरायांनी मोगल, आदिलशाही, निजामशाहीच्या अत्याचाराच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. "




त्यामुळे आजही शिवाजी महाराज हे सदैव मार्गदर्शक आहेत. शिवराय हे कुशल संघटक आणि राजनीतिज्ञ होते. शिवाजी महाराज म्हणजे दैवी शक्तीच. त्यांना केवळ साम्राज्य बनवायचे नव्हते तर रयतेचे कल्याण करायचे होते. स्वातंत्र्याचे बीज त्यांनी रोवले.




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "महाराष्ट्र आणि हिंदुस्तानचे दैवत म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबास महाराजांनी याच दिवाण - ए - खासमध्ये आपले तेज दाखवून दिले होते. तेथेच आज शिवजयंती साजरी होत आहे. हा दिवस आमच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे. मराठीजनांच्या जीवनातील हा रोमांचक क्षण आहे. आतापासून दरवर्षी येथे शिवजयंती साजरी करण्यात येईल" असे त्यांनी सांगितले.





उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या संदेशाचे यावेळी प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. आर. पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी केली.




कार्यक्रमात नितीन सरकते हंसराज, वैशाली माडे यांचे गायन, शिवाजी महाराज यांचा पाळणा गायला गेला. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास सॅन्ड कलेच्या माध्यमातून सर्वम पटेल या कलाकारांनी मांडला. शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर लघुनाटक सादर करण्यात आली. या दिमाखदार शिवजयंती सोहळ्याने हजारो शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले.



Sunday, February 19, 2023

"जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता; रयतेचे कल्याणकारी, जाणते राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज" - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, लेखक श्रीमंत कोकाटे यांचा विशेष लेख....

  




"जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता; रयतेचे कल्याणकारी, जाणते राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज"


धर्मनिरपेक्षता यालाच इंग्रजीमध्ये सेक्युलॅरिझम म्हणतात. ही संकल्पना आधुनिक असून तिचा उदय युरोपमध्ये झाला. आणि वासाहतिक राष्ट्रात तिचा प्रसार झाला. भारत हे ब्रिटिशांचे वासाहतिक राष्ट्र होते. 


पूर्वीपासूनच भारतात बहुसांस्कृतिक समाजरचना आहे. प्राचीन काळापासून अनेक पंथ, संप्रदाय आणि विचारधारा येथे आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील होत्या.




शिवाजी महाराजांना आपल्या इष्ट परंपरेचा अभिमान होता. परंतु अनिष्ठ परंपरा, चुकीच्या चालीरीती त्यांनी जाणीवपूर्वक नाकारल्या. 




त्यांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज आणि सनातनी व्यवस्था यांच्याविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी मोगल, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, यांच्याविरुद्ध राजकीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


तो धार्मिक कारणांसाठी नव्हे, धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांचा संघर्ष सनातनी व्यवस्थेविरुद्ध होता. तो राज्याभिषेकाच्या प्रसंगी प्रकर्षाने पुढे आला. आर्थिक आणि जमीन धारणेसाठी वतनदार - सरंजामदार विरुद्ध त्यांना लढावे लागले. त्यांचा संघर्ष तीन आघाडीवर होता हे स्पष्ट होते.




शिवरायांनी अफझलखान, शाहिस्तेखान यांना धडा शिकवला ते मुस्लीम होते म्हणून नव्हे, तर ते स्वराज्याचे शत्रू होते म्हणून. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


शिवरायांनी ज्याप्रमाणे अफजलखानाला मारले त्याप्रमाणेच त्याचा वकील कृष्णा कुलकर्णी आणि स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या बाबाजी गुजरला देखील मारले. यावरून स्पष्ट होते की शिवरायांची तलवार कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हती. 




तर ती अन्याय - अत्याचाराविरुद्ध होती. याउलट खानाच्या मुलांना प्रेमाने वागवले व त्याची कबर बांधण्याचा मदत केली.


आदिलशाहीत दुष्काळ असताना त्यांनी ज्वारी मदत म्हणून पाठवली. दक्षिण दिग्विजयच्या प्रसंगी शिवाजीराजे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला  म्हणाले, "तुम्ही माझा मोठा भाऊ, मी तुमचा धाकटा भाऊ." 




यावरून स्पष्ट होते की तत्कालीन संघर्ष हिंदू - मुस्लीम संघर्ष नव्हता. तो तसा असता तर सर्व हिंदू शिवरायांसोबत आणि सर्व मुस्लिम मोगल - आदिलशहा सोबत असायला हवे होते. 


वस्तुस्थिती अशी आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात व प्रशासनात अनेक मुस्लीम होते. त्यांच्या पदरी 700 पठाणांची फौज होती. त्यांचे काही अंगरक्षक मुस्लिम होते.



पायदळात नूरखान बेग होता. सिद्दी हिलाल, सिद्धी वाहवा होता. दर्यासारंग दौलतखान आरमार दलाचा प्रमुख होता.


शिवाजीराजांचे चित्र रेखाटणारा मीर महंमद होता. शिवरायांनी स्वधर्माप्रमाणेच इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळांना व धर्मग्रंथांना अभय दिले. 




सुरत मोहिमेच्या प्रसंगी त्यांनी सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे आणि धर्मगुरू यांना इजा पोचणार नाही याची काळजी घेतली. "ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळायला हवा" ही त्यांची भूमिका होती.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


पोर्तुगीज व्हाईसरॉय त्याच्या देशातील राजाला पाठवलेल्या पत्रात कळवतो की, "पूर्वेकडच्या जगातील शिवाजी महाराज हे पराक्रमी, मुत्सद्दी आणि धोरणी राजे आहेत. ते आणि त्यांची प्रजा जरी मूर्तिपूजक असली तरी मूर्तिपूजा न करणाऱ्यांना ते आपल्या राज्यात नांदू देतात.


परधर्मीयांच्या धार्मिक श्रद्धांवर त्यांनी आक्रमण केले नाही. आपल्या धार्मिक संकल्पना इतर धर्मियांवर त्यांनी लादल्या नाहीत. स्वधर्माचा अभिमान बाळगताना बहुसांस्कृतिक धोरणाचा आदर - सन्मान करणारा, मध्ययुगीन काळातील प्रगल्भ राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 




ज्या काळात युरोपमध्ये धर्मनिरपेक्षता या संकल्पनेने बाळसंही धरले नव्हतं; त्या काळात शिवाजीराजांच्या स्वराज्यात धर्मनिरपेक्षतेचा वटवृक्ष झालेला होता. त्या सावलीत हिंदू-मुसलमान आनंदाने नांदत होते. असे महाकवी वामनदादा कर्डक एका काव्यात म्हणतात.



लेखक : - शिवचरित्राचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जेष्ठ अभ्यासक, पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, इतिहास अभ्यासक, डॉक्टर श्रीमंत कोकाटे





Wednesday, February 15, 2023

"लाखो भाविक - भक्तांच्या 'सवाई सर्जाचं चांगभलं'च्या गजरात, महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची; रंगाचे शिंपण करून; भक्तिमय वातावरणात पारंपारिक मारामारी सोहळ्याने सांगता"



पुरंदर,वीर, दि. १५ :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील,  पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक  मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपारिक पद्धतीने, सवाई सर्जाचं चांगभलंच्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात, मानकरी, सालकरी, दागिनदार, लाखो भाविकांच्या उपस्थितीत शाही परंपरा जोपासत, उत्साहात पार पडला. मारामारीच्या  पारंपरिक सोहळ्याने 11 दिवस चालणाऱ्या वीरच्या ऐतिहासिक यात्रेची सांगता झाली.




आज बुधवार पारंपारिक मारामारीचा( रंगाचे शिंपण)  उत्सव काळातील महत्त्वाचा दिवस. आज पहाटे पाच वाजता देवाची पुजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक केल्यानंतर साडेदहा वाजता देवाला दहीभाताची पुजा बांधण्यात आली.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


बुधवारी दुपारी १२ वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडीच्या श्रीनाथ म्हस्कोबांच्या पालख्या व सर्व काठ्या देऊळवाड्यात आल्या. देवाची आरती होऊन छबिन्याला सुरुवात झाली.  




छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर भाविकांनी "श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं" असा गजर केला आणि गुलाल, खोबरे उधळले. मंदिराला दोन प्रदक्षिणा होऊन श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची अमृतवाणी(भाकनुक) झाली. 



Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


तिसऱ्या प्रदिक्षिणेवेळी जमदाडे मंडळीकडून दुपारी दीड वाजता रंगाचे शिंपण करण्यात आले. अशा पद्धतीने पारंपारिक मारामारी (रंगाचे शिंपण) सोहळ्याने ऐतिहासिक वीर यात्रेची, पारंपारिक उत्सवाची सांगता झाली.




या पारंपारिक सोहळ्यात लाखो लोकांनी "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात मंत्रमुग्ध होऊन, आपल्या अंगावर रंग पडण्यासाठी गर्दी केली.




या पारंपारिक सोहळ्यात दुपारी दीड वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीवर रंगाचे शिंपण करण्यात आले. त्यानंतर मानाच्या काठीवर रंगाचे शिंपण झाले आणि नंतर भाविकांच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आले. रंगाचे शिंपण होऊन, पारंपारीक मारामारी उत्सवाने ऐतिहासिक वीर यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.




महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला, भक्तीची ओढ लावणारा, भक्तिमय वातावरणात ऊर्जा देणारा  महाउत्सव असतो.


या पारंपरिक यात्रा सोहळ्यासाठी पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, मा.जिल्हाधिकारी पुणे, मा. तहसीलदार पुरंदर, सासवड पोलीस प्रशासन, पुरंदर पंचायत समिती, सासवड प्राथमिक आरोग्य केंद्र, विद्युत वितरण कंपनी, वीर देवस्थान ट्रस्ट,वीर ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, ग्रामस्थ, भाविक,  मानकरी, स्वयंसेवक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांच्या सामूहिक नियोजनातून यात्रा उत्सव व्यवस्थित पार पडला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


या पारंपारिक यात्रा उत्सव काळात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.



"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले." अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी  दिली.



"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र वीर येथे सर्व सालकरी, दागिनदार, भाविक भक्त व मानकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पडून,  ऐतिहासिक मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपरिक पद्धतीने पार पडला. यासाठी वीर देवस्थान ट्रस्टने खूप चांगले नियोजन केले. पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन, मानकरी, वीर ग्रामपंचायत, पत्रकार बांधव, ग्रामस्थ, स्वयंसेवक व भाविक भक्त सर्वांनीच यात्रा उत्सव पार पडण्यासाठी चांगले सहकार्य केले." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना ऊर्जा देणारा व भक्तीची ओढ लावणारा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करून टाकतो.