Wednesday, February 15, 2023

"लाखो भाविक - भक्तांच्या 'सवाई सर्जाचं चांगभलं'च्या गजरात, महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची; रंगाचे शिंपण करून; भक्तिमय वातावरणात पारंपारिक मारामारी सोहळ्याने सांगता"



पुरंदर,वीर, दि. १५ :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील,  पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक  मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपारिक पद्धतीने, सवाई सर्जाचं चांगभलंच्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात, मानकरी, सालकरी, दागिनदार, लाखो भाविकांच्या उपस्थितीत शाही परंपरा जोपासत, उत्साहात पार पडला. मारामारीच्या  पारंपरिक सोहळ्याने 11 दिवस चालणाऱ्या वीरच्या ऐतिहासिक यात्रेची सांगता झाली.




आज बुधवार पारंपारिक मारामारीचा( रंगाचे शिंपण)  उत्सव काळातील महत्त्वाचा दिवस. आज पहाटे पाच वाजता देवाची पुजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक केल्यानंतर साडेदहा वाजता देवाला दहीभाताची पुजा बांधण्यात आली.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


बुधवारी दुपारी १२ वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडीच्या श्रीनाथ म्हस्कोबांच्या पालख्या व सर्व काठ्या देऊळवाड्यात आल्या. देवाची आरती होऊन छबिन्याला सुरुवात झाली.  




छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर भाविकांनी "श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं" असा गजर केला आणि गुलाल, खोबरे उधळले. मंदिराला दोन प्रदक्षिणा होऊन श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची अमृतवाणी(भाकनुक) झाली. 



Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


तिसऱ्या प्रदिक्षिणेवेळी जमदाडे मंडळीकडून दुपारी दीड वाजता रंगाचे शिंपण करण्यात आले. अशा पद्धतीने पारंपारिक मारामारी (रंगाचे शिंपण) सोहळ्याने ऐतिहासिक वीर यात्रेची, पारंपारिक उत्सवाची सांगता झाली.




या पारंपारिक सोहळ्यात लाखो लोकांनी "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात मंत्रमुग्ध होऊन, आपल्या अंगावर रंग पडण्यासाठी गर्दी केली.




या पारंपारिक सोहळ्यात दुपारी दीड वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीवर रंगाचे शिंपण करण्यात आले. त्यानंतर मानाच्या काठीवर रंगाचे शिंपण झाले आणि नंतर भाविकांच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आले. रंगाचे शिंपण होऊन, पारंपारीक मारामारी उत्सवाने ऐतिहासिक वीर यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.




महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला, भक्तीची ओढ लावणारा, भक्तिमय वातावरणात ऊर्जा देणारा  महाउत्सव असतो.


या पारंपरिक यात्रा सोहळ्यासाठी पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, मा.जिल्हाधिकारी पुणे, मा. तहसीलदार पुरंदर, सासवड पोलीस प्रशासन, पुरंदर पंचायत समिती, सासवड प्राथमिक आरोग्य केंद्र, विद्युत वितरण कंपनी, वीर देवस्थान ट्रस्ट,वीर ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, ग्रामस्थ, भाविक,  मानकरी, स्वयंसेवक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांच्या सामूहिक नियोजनातून यात्रा उत्सव व्यवस्थित पार पडला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


या पारंपारिक यात्रा उत्सव काळात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.



"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले." अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी  दिली.



"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र वीर येथे सर्व सालकरी, दागिनदार, भाविक भक्त व मानकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पडून,  ऐतिहासिक मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपरिक पद्धतीने पार पडला. यासाठी वीर देवस्थान ट्रस्टने खूप चांगले नियोजन केले. पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन, मानकरी, वीर ग्रामपंचायत, पत्रकार बांधव, ग्रामस्थ, स्वयंसेवक व भाविक भक्त सर्वांनीच यात्रा उत्सव पार पडण्यासाठी चांगले सहकार्य केले." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना ऊर्जा देणारा व भक्तीची ओढ लावणारा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करून टाकतो.


No comments:

Post a Comment