पुणे, दि.२२ : पुण्यातील आंबेगाव पठार येथे राजतोरणा प्रतिष्ठान व मुद्रा क्लासेसच्या तर्फे १९ फेब्रुवारीला शिवजयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून, उत्साहात साजरी करण्यात आली.
राजतोरणा प्रतिष्ठान पुण्यातील आंबेगाव पठार येथे नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आंबेगाव पठार येथे राजतोरणा प्रतिष्ठान व मुद्रा क्लासेसच्या तर्फे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे हे पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या परखड, अभ्यासू शैलीत त्यांनी शिवचरित्रावरील व्याख्यानाचा विषय प्रभावीपणे मांडला.
राजतोरणा प्रतिष्ठान व मुद्रा क्लासेसच्या तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्सवमूर्तीसमोर श्रवणीय भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी आंबेगाव पठार परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आंबेगाव पठार येथील शिवजयंतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लहान मुलांच्या नृत्याच्या अविष्काराने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शालेय विद्यार्थ्यांची तबला व पखवाज जुगलबंदीही सर्वांना आवडली.
आंबेगाव पठार येथील महिला वर्गाने शिवजयंतीनिमित्त महाआरती केली. यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
शिवजयंती निमित्त राजतोरणा प्रतिष्ठान व मुद्रा क्लासेसच्या तर्फे महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
आंबेगाव पठार येथील शिवजयंती कार्यक्रमासाठी आबेगावचे सरपंच श्री सिध्दार्थ वनशिव, उपसरपंच श्री अनिल कोंढरे, ग्रामपंचायत सदस्य श्री चेतन मागंडे, ग्रामपंचायत सदस्य सौ आशाताई राजगुरु,मुद्रा कोचिंग क्लासेसचे संचालक श्री श्याम बिरादार, संचालिका सौ भावना बिरादार,शिवमुद्रा महिला बचत गट अध्यक्षा सौ रेखाताई देवगिरीकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस श्री मंगेश साळुंके, जेष्ठ नागरिक संस्थापक अध्यक्ष श्री भरत काका बाबर, श्री बाळासाहेब पासलकर उपस्थित होते.
या शिवजयंती कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्री सोमनाथ शेडगे, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक सरचिटणीस श्री दत्तात्रय बोरगे,श्री अशोक रासकर,श्री मनेष राजगुरु,श्री.भीमसेन रेणुसे,श्री चंद्रकांत देवगिरीकर व आंबेगाव पठार परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन राजतोरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री नदुशेठ देवगिरीकर व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी केले.
No comments:
Post a Comment