Thursday, March 2, 2023

"पुण्यातील कसब्यात भाजपच्या बालेकिल्ल्यात लोकनेत्याचा विजय,काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 'इतक्या' हजाराच्या मताधिक्याने विजयी; अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात, चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप ३६ हजाराच्या मताधिक्याने विजयी; चिंचवडमध्ये "जगताप पॅटर्नची" यशस्वी घोडदौड"....


पुणे, दि.२ : महाराष्ट्रातील अत्यंत चुरशीच्या,  प्रतिष्ठेच्या व उत्कंठावर्धक ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ११ हजार 40 मतांनी विजयी झाले. "कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पुण्यातील लोकनेत्याचा विजय झाला. जनसामान्यांच्या हृदयात राज्य करणाऱ्या लोकनेत्याचा विजय झाला." अशी भावना पुणेकरांनी व्यक्त केली.




पुण्यातील गाजलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला  मोठा धक्का बसला असून भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ९१ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटे यांचा पराभव केला आहे. 




विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड परिसरातील, चिंचवड पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मागील अनेक  वर्षांतील कामावर लोकांनी पसंतीची मोहोर उठवून भाजपाच्या आश्विनी जगताप यांना निवडून दिले. चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मागील अनेक वर्षांत केलेल्या विकास कामांच्या "जगताप पॅटर्न" ची यशस्वी घोडदौड झालेली दिसून येत आहे.



चिंचवडमध्ये भाजपाकडून अश्विनी जगताप तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मात्र अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसलेला दिसत आहे. 




पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली. भाजपचा २८ वर्ष बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार 40  मतांनी विजयी झाले आहे. 




कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाली. पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी  11 हजार 40 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.




कसबा पेठ मतदारसंघातून निवडणूक लढत असलेल्या हेमंत रासने यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी पराभव केला. रवींद्र धंगेकर यांना तब्बल 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली.




पुण्यातील गाजलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली होती. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"हा चिंचवड मधील जनतेचा विजय असून, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या कामांची पावती मतदारांनी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षासह महायुतीतील सर्व पक्षांनी, कार्यकर्त्यांनी काम केले. विजयाचे श्रेय जनतेला, पक्षातील कार्यकर्त्यांना आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आहे. हा विजय मी साहेबांना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि सर्वसामान्य नागरिकांना समर्पित करते. मतदारसंघातील प्रलंबित राहिलेली कामे मी पूर्ण करणार आहे," अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी दिली आहे.



भाजपच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. अश्विनी जगताप या पहिल्यांदाच निवडणूक लढल्या. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


सातारा हे त्यांचं मूळ गाव आहे. त्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप निवडणुकीसाठी उभे असताना त्या प्रचारात सक्रिय असायच्या. सामाजिक कार्यात तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतात.




पुण्यातील कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल येणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी दिशादर्शक असेन.

No comments:

Post a Comment