Wednesday, March 8, 2023

"दहावी नापास ते पी.एच.डी डॉक्टरेट ते प्रसिद्ध इतिहास संशोधिका, लेखिका; महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास संशोधिका,प्रसिद्ध लेखिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांचा महाराष्ट्राच्या इतिहासातील "या" कर्तृत्ववान,ऐतिहासिक स्त्री व्यक्तिमत्त्वाचे चरित्र लेखन करतानाचा प्रेरणादायी, संघर्षमय प्रवास वाचा महिला दिनानिमित्त लेखिकेच्या शब्दात "ती चा प्रेरणादायी,संघर्षमय प्रवास" या खास सदरात"....



"ती चा प्रेरणादायी, संघर्षमय प्रवास"

जून १९७५  प्रतिवर्षाप्रमाणे एस.एस.सी. बोर्डाचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी एक निकाल होता सुवर्णा साळुंखे एस.एस.सी अनुत्तीर्ण.   


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा गावची मी विद्यार्थिनी. माझे वडील शिवाजीराव साळुंखे  जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन व विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. सुवर्णा अनुत्तीर्ण झाली ही ४३  वर्षांपूर्वी बातमी नव्हती. पण आज त्याच घटनेला बातमी मूल्य प्राप्त होते आहे. एस.एस.सी नापास झाल्यानंतर जे इतर विद्यार्थिनींच्या बाबतीत घडले तेच माझ्या बाबतीत घडले. मॅट्रिक नापास नंतर दोनच वर्षात सोलापूर जिल्ह्यातील वैराग गावचे सुपुत्र कृष्णराव नाईक निंबाळकर यांच्याबरोबर माझा विवाह झाला. माझे पती मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. उच्च पदाची नोकरी म्हणजे  बदली होण्याची शक्यता असायची. 




माझी विवाहा नंतरची पहिली बारा वर्ष सर्वसामान्य गृहिणी प्रमाणे गेली. पुढे काहीतरी करावे, शिकावे असे सतत वाटत होते. परंतु एस.एस.सी नापास असल्यामुळे शिक्षणाची सर्व दारे बंद झाली होती. मुंबईसारख्या महानगरात वास्तव्य असूनही मला शिक्षणापासून वंचित रहावे लागल्यामुळे मी निराश होते. अशा निराशमय वातावरणात एक सकाळ प्रकाशरुपी ज्ञानज्योत घेऊन माझ्या आयुष्यात आली.  


एका वर्तमानपत्रात पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्रवेश परीक्षेची जाहिरात वाचण्यात आली. ही जाहिरात माझ्या जीवनाला एक वेगळेच वळण देऊन गेली. तब्बल बारा वर्षानंतर कुटुंब सांभाळून मी शिक्षणाला सुरुवात केली. टिळक विद्यापीठ (पुणे ) प्रवेश परीक्षा मी सहज उत्तीर्ण झाले.




१९९१  मध्ये मी बी.ए समाजशास्त्र ही पदवी संपादन केली. त्यानंतर मात्र मी मागे वळून पाहिलेच नाही. माझ्या पतींची बदली बीड येथे झाली.तेथे असताना मी मराठवाडा विद्यापीठाचे एम. ए .समाजशास्त्र ही पदवी प्राप्त केली. ऑगस्ट १९९३ मध्ये मी मुंबई येथील नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात प्रवेश घेऊन पीएच.डी. ला प्रवेश  मिळवण्याचा प्रयत्न केला.  परंतु प्रवेश न मिळाल्याने मला तेथे अपयशी ठरावे लागले.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या प्रसंगाने खचून न जाता याच महिला विद्यापीठात मी एम. ए मराठीची पदवी पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर माझ्या पतींची बदली पुणे येथे झाली.१९९८ मध्ये पुण्यातील महिला विद्यापीठात मी एम.फिल. साठी  प्रवेश घेतला. धरणग्रस्तांचा विषय असणाऱ्या झाडाझढती या विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर संशोधन करून विशेष प्राविण्यासह मी पदवी प्राप्त केली. 




 सन २००० मध्ये रणजीत देसाई यांचे समग्र साहित्य घेऊन पी.एच.डी.साठी रजिस्ट्रेशन केले. मात्र हा अभ्यास मला अर्धवट सोडावा लागला. कारण नाथीबाई दामोदर ठाकरसी हे महिलांसाठी असणारे विद्यापीठ येथे मला अत्यंत त्रास झाला.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


या त्रासावर मात करून मी पुणे विद्यापीठात पी.एच.डी. साठी रजिस्ट्रेशन केले व दोन वर्षात मी माझ्या पी.एच. डी.चा प्रबंध  पूर्ण केला. दरम्यान २००० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या सौभाग्यवतींच्या मुलाखतीचे २० लेख असणारे, पद्मगंधा दिवाळी अंकासाठी लिहून "गप्पा मंत्र्यांच्या पत्नीशी" हे सदर लिहिले व येथूनच माझ्या लेखनास सुरुवात झाली.




शोध झाडाझडतीचा हे पुस्तक नंतर प्रकाशित झाले. त्यानंतर रणजित देसाई यांचे कथाविश्व हे पुस्तक प्रकाशित झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात सावित्रीबाई फुले यांनी दगड धोंडे, शेणाचा मारा सहन करून स्त्री शिक्षणाचा पाया  रोवला. विद्येची कास धरून डॉक्टर आनंदीबाई जोशी परदेशी गेल्या. त्यांना का कमी कष्ट पडले? कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीने ही गोरगरीब दलित मुलांच्या शिक्षणासाठी आपले मंगळसूत्र सुद्धा दिले.

    

स्वातंत्र्यसंग्रामात कस्तुरबा, कमला नेहरू ,अरुणा असफली,  विजया लक्ष्मी  पंडित,  कॅप्टन लक्ष्मी यांनी ही मोलाचे कार्य केले.आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे याकरिता अनेक स्त्रियांनी तुरुंगवास भोगला.  वर्तमान काळातील किरण बेदी ,मेधा पाटकर, मीरा बोरवणकर यांचे कार्यही अभिमानास्पद आहे .




अंजली भागवत ,पी टी उषा यांनीही क्रीडा क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. अंतराळवीर कल्पना चावला त्याचबरोबर शिडाच्या होडीतून एकटीने प्रवास करणाऱ्या उज्वला धर पाटील याही सर्व महिला माझ्या डोळ्यासमोर होत्या.


महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांच्या शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व दिले होते .शिकलेल्या महिलांना धर्मग्रंथांनी त्यांच्यावर केलेले अन्याय समजल्यास महिला धर्मग्रंथ जाळतील असे ज्योतिबा व सावित्रीबाईंना वाटत होते.




उपकार करणे, व्रत करणे, पूजा करणे, कर्मकांड करणे म्हणजेच धार्मिकता हा गैरसमज दूर झाला पाहिजे. कथा, पुराने, सण, उत्सव या सर्वांचे परिणाम स्त्रियावर होतात. येथेच आपली मानसिकता मारली जाते. त्यामुळे भोंदू लोकांचा सुळसुळाट झाला आहे. पुन्हा ते लोक स्त्रियांना ज्ञानाकडून अज्ञानाकडे नेत आहेत .बहिणाबाई म्हणायच्या

 अरे अरे ज्योतिषा,

 नको माझा हात पाहू, 

 माझे दैव मला कळे ,

माझ्या दारी नको येऊ.

कधी न शिकलेल्या बहिनाबाई आम्हा शिकलेल्या व बुवाबाजींच्या नादी लागणार्ण्यांना केंव्हा कळणार.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आमच्या सावित्रीबाई, आनंदीबाई, रमाबाई यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. आयुष्यातील मौलिक क्षण गप्पा मारण्यात , मोबाईल बघण्यात न दवडता मुला-मुलींना चांगले संस्कार द्या. उत्तम संस्कार दिल्यानेच उद्या त्यातून राजमाता जिजाऊ ,राजा शिवछत्रपती ,महाराणी सईबाई,  ताराराणी,येसूबाई , सावित्रीबाई ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,डॉक्टर अब्दुल कलाम , इंदिरा गांधी ,कल्पना चावला ,मीरा बोरवणकर या सारख्या हुशार स्त्रिया आणि मुले  निपजतील .


टीव्ही, मोबाईल , चित्रपट ,फॅशन यामुळे दैनंदिन जीवनावरा होणारा परिणाम पाहता  नवीन पिढी घडवणे  महिलांच्या वर मोठी जबाबदारी आली आहे .


समाजशास्त्रामध्ये मी एम. ए. ची डिग्री घेतल्यामुळे समाजक्रांतीकारक राजर्षी शाहू यांचे पुस्तक मला प्रेरणादायी ठरले .त्यानंतर ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांनी मला शिक्षणाची प्रेरणा दिली.




हे पुस्तक लिहित असताना ची जबाबदारी पार पाडत असताना आपल्या  ऐतिहासिक कारकीर्द असणाऱ्या अनेक महिलांचे चरित्र आपल्याला खूप काही शिकवून आणि घडवून जाणारे होते हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी भद्रकाली ताराराणी हे पुस्तक हाती घेतले. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणी ,शूर , तेजस्वी, उदार व धार्मिक अशा बऱ्याच स्त्रिया होऊन गेल्या. परंतु त्यांच्या चरित्र लेखनाचा फारसा अभ्यास झालेला दिसून येत नाही. काही अपवाद सोडले तर बहुतेक स्त्रियांची चरित्र लिहिलीच गेली नाहीत .

 


जी काही चरित्र लिहिली गेली ती फारच त्रोटक स्वरूपात आहेत. कित्येक ऐतिहासिक स्त्रियासंबंधीची माहिती अनेक कागदपत्रातून इथस्तथा  विखुरलेली होती.त्यामुळे अनेक घराण्यातील अमुक स्त्री थोर वशोर्यशाली होऊन गेली या पलीकडे त्यांच्याविषयी काहीच माहिती नव्हती. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात राजमाता जिजाऊ , महाराणी येसूबाई ,महाराणी ताराराणी या स्त्रिया राजकारणात विशेष चमकल्या. परंतु त्यांचे सविस्तर व संगतकार माहिती मिळत नव्हती. अनेक ठिकाणी सापडलेली माहिती गोळा करून शक्य तितक्या संदर्भासह सर्वांचे चरित्र उलगडून दाखवण्याचा मी प्रयत्न केला. मराठा कालखंडात बऱ्याच कर्तबगार स्त्रियांची मालिका दिसून येते. छत्रपती शिवाजी राजांनी जिजाऊंच्या रूपाने समस्त स्त्रीवर्गांना मान सन्मानाची जागा मिळवून दिली. जिजाऊंच्या कर्तबदारीचा वारसा त्यांच्या घराण्याला व समस्त स्त्री वर्गाला लाभला .त्यामुळे महाराणी सईबाई, महाराणी  येसूबाई, महाराणी ताराबाई,कोल्हापूरच्या जिजाबाई, सरसेनापती उमाबाई दाभाडे, दर्याबाई नाईक निंबाळकर यासारख्या अत्यंत कर्तृत्ववान, विलक्षण ,हुशार स्त्रियांची मालिकाच आढळून आली.



मराठ्यांच्या इतिहासातील या स्त्रिया त्यांच्या असमान्य कर्तुत्वाने तर, कधी त्यांच्या धार्मिक परायणते मुळे, दानधर्मामुळे ,कधी राज्यकारभारातील लोक कल्याणकारी कार्यामुळे तर प्रसंगी त्यांनी घेतलेल्या मोहिमेतील सहभागांबरोबरच, गाजविलेल्या शौर्यामुळे तर कधीकधी विलक्षण बुद्धीच्या चातुर्यामुळे त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखद प्रसंगाने आघात सहन करून त्यांनी दाखवलेल्या विलक्षण धैर्यामुळे अशा एकना अनेक कारणाणे बऱ्याच दिवसापासून या स्त्रिया माझ्या मनाशी संवाद साधत होत्या .त्यांच्या इतिहासातील कर्तबदारीने माझ्यामध्ये एक प्रकारचे झपाटले पण आले होते .


त्या झपाटलेल्या अवस्थेतील परिणीती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब, शिवपत्नी महाराणी सईबाई, महाराणी येसूबाई भद्रकाली ताराराणी, पहिल्या सरसेनापती उमाबाई दाभाडे, करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब , दक्षिणेतील सौंदर्य लतिका बायजाबाई शिंदे , हे अनेक ग्रंथ माझ्या लेखणीतून उदयास आले.




आजच्या विस्कटलेल्या समाजामध्ये या साऱ्या स्त्रिया आपल्या कर्तुत्वाचा आगळावेगळा परिचय देऊन आत्ताच्या स्त्रियांना दीपस्तंभासारखा मार्ग दाखवतील, प्रेरणा देतील .म्हणून या सर्व स्त्रियांचे चरित्र लेखन करण्याचा मी प्रयत्न केला.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


भद्रकाली ताराराणी  यांच्या पराक्रमाचे आणि बुद्धीच्या च्यातुर्याचे वर्णन मोगल इतिहासकारांनी केले आहे .त्या ताराराणीचे शौर्य महाराष्ट्र विसरला आहे, अशी खंत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर "जयसिंगराव पवार" यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्यांनी व्यक्त केलेली खंत मलाही कधीतरी, कुठेतरी जाणवत होतीच .आणि तोच धागा धरून मी महाराणी ताराराणींच्या जीवनावरती पुस्तक लिहिण्याचा निश्चय केला. महाराष्ट्रातील ऐतिहासिक कर्तुत्ववान स्त्रियांच्यामधे  ताराराणींचे कार्य आढळपदावर जाऊन बसलेले आहे.


जगातील सर्वश्रेष्ठ शौर्यशाली,  झुंजार,कर्तबगार स्त्री म्हणून ताराराणी यांची ओळख आहे. वयाच्या पंचविशीत वैधव्य आलेले असताना ताराराणींनी स्वराज्य सांभाळले. औरंगजेबासारखे क्रूर व कपटी राजाला त्यांनी समर्थपणे दिलेला लढा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.




ताराराणीने जीवनात खूप चढउतार भोगले. स्वराज्य ,प्रेम, न्याय, प्रामाणिकपणा ,निपक्षपातीपणा या मूल्यांसाठी त्या सतत संघर्ष करत होत्या. स्वतःच्या सोयीसाठी, स्वार्थासाठी किंवा फायद्यासाठी म्हणून त्यांनी आपली तत्त्वे, आपली मुल्य कधीच सोडली नाहीत .




ताराराणींनी मोगली सत्तेशी टक्कर दिली नसती तर भारताचा इतिहासच बदलला असता. ताराराणी महत्त्वकांक्षी होत्या म्हणूनच तर शून्यातून त्यांनी स्वराज्य उभे केले. नष्ट झालेले हिंदवी स्वराज्य पराक्रमाने, कष्टाने ,मुत्सद्दीपणाने  निर्माण केले.


  दिल्ली झाली दिण वाणी

 दिल्लीशाचे गेले पाणी

 ताराबाई रामरानी 

भद्रकाली कोपली.


असे वर्णन कवींद्र गोविंद यांनी लिहून ठेवलेले आहे. अशा शूर ताराराणी यांचे पुस्तक लिहिण्याचे भाग्य मला मिळाले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


यानंतर मी महाराणी येसूबाई हा ग्रंथ प्रकाशित केला. मराठेशाही मधील येसूबाई राणींचे जीवन सर्वार्थाने शोकांतिकेचा विषय आहे. मोघलांच्या कैदेत सुमारे २९ वर्षे जीवन जगण्याची अपरिहार्यता येसुबाईंच्या वाट्याला आली. येसूबाईं राणीसाहेबांचे जीवन म्हणजे अनेक महाकाव्यांचा विषय आहे .छत्रपती शिवरायांच्या सून महाराष्ट्राच्या अतिशय पडत्या काळातील धैर्यशील महाराणी म्हणून सर्व पुढे आल्या. महाराणी येसूबाई रणांगणात नसल्या तरी त्या धैर्यशील, कर्तव्यदक्ष व कणखर वृत्तीच्या होत्या. 




छत्रपती संभाजीराजे यांच्यासारख्या निखाऱ्याला पदरात बांधून त्यांच्यावर मायेने पांघरून घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या. पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट्रभर गरुड  भरारी मारणाऱ्या संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या .गडावर येणारे वाद आणि तंटे त्या स्वतः सदरेवर बसून कुशल वृत्तीने सांभाळत होत्या .तब्बल २९ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत राहिल्याने त्यांचे कर्तुत्व, व्यक्तिमत्व पडद्याआडच राहिले. मराठी राज्याची पहिली युवराज्ञी म्हणून त्यांना सन्मानाचे स्थान मिळाले. अशा येसूबाई राणीसाहेबांचे चरित्र आख्या महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरणारे आहे. 


या पुस्तक वाचनाने आजच्या घटस्फोटाच्या युगात एक जरी घटस्फोट वाचला तरी मी लिहीलेल्या या पुस्तकाचे सार्थक होणार आहे.

     


लाल महाल पुणे येथे संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांनी माझा मोठा सन्मान करून मला मानाचा समजला जाणारा जिजाऊ पुरस्कार बहाल केला. तो पुरस्कार घेताना त्यांनी मला जिजाऊ वरती पुस्तक लिहिण्याची विनंती केली.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या विनंतीला मान देऊन "राजमाता जिजाऊ साहेब "हा ग्रंथ लिहून मी पूर्ण केला. राजमाता जिजाऊसाहेब या पहिल्या भारतीय स्त्री आहेत की,  ज्यांनी आपल्या पती निधनानंतरही स्वराज्य सांभाळून आपल्या पुत्राच्या माध्यमातून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. जिजाऊ या स्वतंत्र प्रकृतीच्या स्वतंत्र प्रतिभा आणि प्रज्ञा असणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांचे चरित्र शब्दात पकडणे अगदी अवघड होते. रयतेचे कल्याण हाच त्यांचा श्वास आणि ध्यास होता. अन्यायाची चिड आणि न्यायाची चाड त्यांच्या रोमारोमात भरली होती. प्रजेच्या अंगातील गुण त्या चांगलेच ओळखून होत्या. त्या खऱ्या अर्थाने वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता, राजमाता, राष्ट्रमाता आणि लोकमाता ही होत्या.  


जिजाऊ साहेबांची सर्वात मोठी कामगिरी कोणती असेल ,तर ती म्हणजे स्वराज्याची संकल्पना आपल्या पुत्राकडून प्रत्यक्षात उतरवली व हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले .अशा जिजाऊ मातेचे चरित्र लिहून मी पूर्ण केले. त्यानंतर मी शिवपत्नी सईबाई हे पुस्तक लिहिण्यासाठी घेतले. महाराणी ताराराणींचे शौर्य लिहिताना जेवढा आनंद झाला ,तेवढेच दुःख येसूबाई राणीसाहेबांचे चरित्र लिहिताना झाले .दोघीही छत्रपती शिवरायांच्या सुना. 




आयुष्य अतिशय खडतर व स्वराज्यासाठीच पणाला लागलेले. सईबाई राणीसाहेबांचे आयुष्य तर अवघे २६ वर्षाचे अल्प आयुष्य. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात तब्बल १९ वर्षे त्यांनी आयुष्य काढले .परंतु इतिहासाला मात्र त्यांची नोंद ठेवण्याचा विसर पडला. फलटणच्या मुधोजी नाईक निंबाळकर यांच्या त्या कन्या. वनंगपाळ बारा वाजी राचा काळ .अशी ख्याती असलेल्या व वणंगपाळ नाईक निंबाळकर यांच्या त्या नात होत्या. 




माझे आजोळ व सासर नाईक निंबाळकर यांचे असल्यामुळे हे पुस्तक लिहिताना मला अतिशय आनंद झाला .आणि महाराणी सईबाई यांचे बालपण, त्यांच्यावरील संस्कार हे चित्र रेखाटताना मला फारसा त्रास झाला नाही. सईबाई राणीसाहेब हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी तर छत्रपती शंभुराजेंच्या त्या माता होत्या. 




 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी  आणि एका छाव्याची माता असणार्या विविध संयमी ,आदर्शवत व्यक्तिमत्व असणाऱ्या सईबाई राणीसाहेबांचे चरित्र लिहिण्याचा मोह मला आवरला नाही .खरे तर मला स्वतःलाच खूप वाईट वाटले की हे लिखाण मी खूप पूर्वीच वाचकांच्या समोर आणायला पाहिजे होते .


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


स्त्री इतकी संयमी, समजूतदार असू शकते हे मला सईबाईंच्या प्रतिमेत दिसून आले. छत्रपती शिवाजीराजांच्या यशस्वी कारकीर्दीत  जसा जिजाऊ साहेबांचा महत्त्वाचा सहभाग होता, तसाच तब्बल १९ वर्ष पत्नी सईबाई साहेबांचा सुद्धा तेवढाच सहभाग होता .सईबाईंची संसारात साथसंगत लाभल्यामुळे छत्रपती शिवाजीराजे यांना  तब्बल १९ वर्ष घरातील कोणत्याही संघर्षाला  तोंड द्यावे लागले नाही. या पार्श्वभूमीवर महाराणी सईबाई साहेबांचा त्याग ,पूर्ण योगदान, मराठी मनाला मोहून टाकणारे ठरले .




 यानंतर पहिल्या "सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे "यांचा ग्रंथ मी प्रकाशित केला .छत्रपती शाहू काळातील पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांनी पराक्रमाची  झालर चढवली आणि नाशिकच्या अभोने गावाच्या इतिहासाला शौर्याचे कोंदन मिळवून दिले. अभोना फक्त गाव नाही तर देशातीलच बहुदा जगातील पहिली महिला सरसेनापती देणारी ही भूमी ठरली आहे .आपल्या इतिहासात अनेक लढवय्या रणरागिनी निर्माण झाल्या होत्या .त्यामध्ये उमाबाई दाभाडे यांचा एक वेगळाच पैलू माझ्या नजरेसमोर आला. आणि हे पुस्तक लिहिण्यास मी प्रवृत्त झाले .उमाबाई या एक विलक्षण तडफदार राणी म्हणून मराठ्यांच्या इतिहासात गाजल्या. एक स्त्री म्हणून उमाबाईंचे धाडस खरेच कौतुकास्पद होते. पतीच्या पश्चात उमाबाईंनी जवळजवळ २४ वर्षे आपली सत्ता सांभाळली .


 स्त्रीशक्तीला कमी लेखनारांना  उमाबाई दाभाडे हे नेहमीच एक उत्तम उदाहरण राहिले आहे. एक महिला असून तडफदार, लखलखणारी सळसळती , विजयाची तलवार होती. महिला सरसेनापती म्हणून त्यांना अगदी लहान वयातच अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या दुर्लक्षित सरसेनापतीचा अभ्यास करून त्यांचे चरित्र मी वाचकांपुढे आणले. माघार हा शब्द उमाबाईंना माहित नव्हता. त्या अत्यंत शूर बाणेदार व व्यवहारदक्ष होत्या. कोणत्याही परिस्थितीत त्या आपल्या निर्भयवृत्तीला सोडत नसत. स्वतःच्या कर्तबदारीने राजचिन्ह मिळवणारी ही पहिलीच विरांगणा होय. म्हणूनच मला या शौर्यशाली विरांगणेचे चरित्र लिहिण्याचा मोह आवरला नाही.




यानंतर मी कोल्हापूर घराण्यातील "छत्रपती इंदुमती राणीसाहेब" यांचा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. ज्या काळात स्त्रियांचे आयुष्य सर्वच बाजूंनी बंदिस्त होते.  परंपरेने महिलांना शिक्षण नाकारले होते .त्यांना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी येण्याचे स्वातंत्र्य नव्हते. मग अर्थार्जनाचे  स्वातंत्र्य असणे तर दूरच. त्याकाळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. निर्णय स्वातंत्र फक्त पुरुषालाच होते. खानदानी कुटुंबातील स्त्रीचे नखही दृष्टीस पडत नव्हते.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


 स्त्रीयांच्या चारित्र्याचे रिती रीवाज तर फार कठोर होते. या सर्व कुलप्रतिष्ठेला धक्का लागला तर समाजात टिकेची झोड उठत होती. या सर्व पार्श्वभूमीवर राजर्षी शाहूंचे व त्यांच्या सुनबाई इंदुमती राणीसाहेब या दोघांचेही कर्तुत्व आणि व्यक्तित्व काळाच्या मर्यादा ओलांडणारे होते.हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा हे पुस्तक लिहण्याकडे माझे मन जास्तच ओढ घेऊ लागले.




सासवडच्या जगताप घराण्यातील मुलगी राजर्षी शाहूंनी सून म्हणून निवडली म्हणजे त्यांच्यात काही विशेष गुण होते, त्याखेरीज छत्रपती शाहू महाराज इंदुमती राणी साहेबांची निवड करणे शक्य नव्हते. त्या काळातील रूढी, परंपरा, संकेत झुगारून महाराजांनी राणीसाहेबांना आपली सून म्हणून राजवाड्यात आणले.  त्यांच्याविषयी मलाही कुतुहल  वाटत होते.  म्हणून मी  "छत्रपती इंदुमती राणीसाहेब" यांचा ग्रंथ लिहून पूर्ण केला.




मराठ्यांच्या इतिहासामध्ये बायजाबाई साहेबांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. "सर्वात सुंदर दक्षिण लावण्यवती" बायजाबाई साहेब शिंदे यांनी राजकारणात जो धुमाकूळ घातला त्याचे इतिहासात वर्णन सुवर्ण अक्षराने लिहिले गेले.   


अनेक वेळा आपल्या भारतीय स्रीयांनी देशाच्या शत्रूशी घोड्यावर बसून टक्कर दिली आहे. बायजाबाई साहेब स्वभावाने अत्यंत कडक होत्या. परंतु त्या क्रूर किंवा कट्टर नव्हत्या. त्यांनी ग्वाल्हेरचा राज्यकारभार इतर संस्थानाच्या बरोबरीने अतिशय चांगल्या रीतीने चालवला. आपल्या शांत व सुखकर कार्यकाळामधे देशाची अंतर्गत सुधारणा करून प्रजेच्या सुखात त्यांनी भरच घातली.१८५७ च्या स्वातंत्र्य समर्पनामधे बायजाबाई साहेबांचा दबदबा चोहीकडे कायम राहिला. त्यांनी अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोड्यावर बसून टक्कर दिली होती. 




भारतीय स्त्रीला समाजाकडून नेहमीच मानाचे पान देण्यात आले.   आपल्या सौंदर्याने आपल्या पतीचे मान विचलित झालेले पाहून स्वतःच शिरकमल तलवारीने छेदून पतीला युद्धभूमीवर ते भेट म्हणून पाठविणारी हाडा राणी. दिल्लीच्या सुलतानाची प्रथम स्त्री रजीया सुलताना ,मोघलांना नामोहरण करणारी अहमदनगरची शूर चांदबिबी,जिच्या ममत्वाची साक्ष अजूनही ठाई ठाई दिसून येते.  कर्तव्यदक्ष, राज्यकारभार कुशल अहिल्यादेवी, इंग्रजांच्या साम्राज्यावर व स्वाभिमानावर लाथ मारणारी आणि प्रत्यक्ष शत्रू कडून गौरवले गेलेली रणचंडिका झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ महाराणी, ताराराणी ,महाराणी सईबाई ,महाराणी येसूबाई यांचा धावता इतिहास नजरेसमोर आणला तरी या स्त्रियांनी भारतीय इतिहासात किती चिरंजीव कामगिरी करून ठेवली आहे हे आपल्या सहज ध्यानात येते.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


अशा या थोर व शोर्यशाली स्रीयांच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेची सौंदर्य लतिका बायजाबाईसाहेब यांचे चरित्र लिहिणे मला आव्हानात्मक  होते. आपल्या समाजातील स्त्रियांनी आपला इतिहास वाचून खूप काही शिकण्यासारखे व घेण्यासारखे आहे. आपल्याला संस्कार घ्यायचे असतील तर या स्रियांकडून घ्यावे.


 मी अत्यंत कष्टाने ,संदर्भाने     "राजमाता जिजाऊ"

" शिवपत्नी सईबाई"

 "भद्रकाली ताराराणी"

 "महाराणी येसूबाई"

 "सरसेनापती उमाबाई दाभाडे"  

"करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब  राणीसाहेब"

 "दक्षिणेतील सौंदर्य लतिका"

या शौर्यशाली स्त्रियांचे अंतरंग, त्यांचा इतिहास वाचकांसमोर आणला आहे.




 या इतिहासाचे अवलोकन करताना मला अत्यंत त्रास झाला. आणि खूप कष्टातून हे ग्रंथ मी वाचकांच्या समोर आणले आहेत. अगदी आपल्या छत्रपतींच्या इतिहासापासून स्त्रिया कोणत्याही गोष्टीत कमी नव्हत्या ,हेच आपल्या इतिहासातून दिसून येते. तमाम स्त्री वर्गाला आजच्या मोबाईलने संपूर्णपणे दुबळे बनवले आहे. यातून चांगले घेण्यासारखे काहीच नाही .टीव्ही वरती तर सासु सुनाची भांडणे, भावाभावांचे युद्ध ,बाहेर ख्यालीवर्तन यातून आपण काय घेणार आणि नवीन पिढीला काय देणार?


आपल्या प्रत्येक समाजातील स्त्रीने आपल्या मुलीला तिच्या मर्यादाची जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य आहे की आपल्या मुलाचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, शाळा कॉलेज व्यतिरिक्त आपली मुलं कुठे जातात? काय करतात ?याची चौकशी करावी. संध्याकाळ झाल्याबरोबर मुलांची पावले आपोआप घराकडे वळली पाहिजेत असे घरातले वातावरण तयार झाले पाहिजे.




 हे काम फक्त स्त्रियाच करू शकतात .कारण घरात जास्त वेळ आईच असते .आपण घडवू तसे मुलं घडत असते. कोरी पाटी असलेली, त्यावर अक्षर लिहिणारी बोटे सुसंस्कृत नसतील तर त्यावर ओवी ऐवजी शिवीच येणार.



जगात सर्वप्रथम ज्ञानाचा स्पोट भारतातच झाला .सुरुवातीपासूनच स्त्रियांना शिक्षण, ज्ञान मिळाले असते तर आज जगावर भारताचे साम्राज्य असले असते. जर सर्व स्त्रियांनी शिकायचे ठरवले तर भारतातच नव्हे तर जगात शांतता ,सुरक्षितता व समृद्धी स्थापन होईल .खेड्यातील महिलांनी शिकले पाहिजे व शिकून अत्यंत जिद्दीने प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले पाहिजे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिला आरक्षण झाले आहे .त्या आरक्षणाचा फायदा ग्रामीण महिलांना मिळत आहे. यासाठी महिलांनी प्रथम वाचन, चिंतन ,मनन व कृतीशीलता  आत्मसात कराव्या. सावित्रीबाईंनी शंभर वर्षांपूर्वी इंग्रजी व परकीय भाषावर प्रभुत्व मिळवावे असे आवाहन केले होते.




आता २१ व्या शतकात तरी सावित्रीबाईंच्या सादाला प्रतिसाद द्यावा .आपल्यावर होणारा अन्याय न सहन करता त्याविरुद्ध पेटून उठले पाहिजे .अन्यायाला न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी अनादी काळापासून भारतीय संस्कृतीने स्त्रीचा जो गौरव केलेला आहे तो अनाठाई होता असे स्त्रीने कधीही भासू दिले नाही. उलट भारत वर्षाला अभिमानास्पद ठरलेल्या या नारीरत्नांचा इतिहास म्हणजे भारतीय संस्कृतीचे एक मनोहारी वाचन आहे. पतिव्रत, पराक्रम, निष्ठा ,त्याग ,ध्येय व सेवा या सर्वच बाबतीत भारतीय स्त्रीचे कर्तृत्व इतके अतुलनीय आहे की जगातील कोणत्याही देशाच्या इतिहासात त्याला तोड सापडणार नाही .तुलनाच करायची झाल्यास भारतीय स्त्रीला भारतीय स्त्री याच शब्दात संबोधावे लागेल.



आत्तापर्यंत माझी तेरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रत्येक पुस्तक लिहिताना मला विविध अनुभवाला सामोरे जावे लागले.




परंतु मी न चिडता, न  रागवता प्रत्येक पुस्तकाचा अत्यंत तळमळीने अभ्यास करून आपल्या सर्व काळाच्या पडद्याआड गेलेल्या ऐतिहासिक स्त्रियांचे कार्य वाचकांच्या समोर आणले. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सुद्धा मला खूप विविध अनुभव आले.




ते लेखक म्हणून मला मांडावेसे वाटतात . माझ्या तीन प्रकाशनाच्या वेळी मला अत्यंत वाईट अनुभव आलेले आहेत. हे अनुभव म्हणजे वंशजांचे अंतर्गत वाद. मी खरा वंशज का? तो खरा वंशज?. मी थेट वंशज आहे आणि ते आमच्यातले नाहीत. 


डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वंशाच्या वादात सध्या मीच अडकले आहे. मलाच समजेना की आपण एवढे ऐतिहासिक ग्रंथ  अभ्यासतो  पण हे डायरेक्ट आणि इन डायरेक्ट वंशज  प्रकरण तरी काय आहे ? याचा उलगडा मला तरी होत नाही. 



छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन  केले त्यावेळेस डायरेक्ट, इन डायरेक्टचा विचार केला असता तर हे हिंदवी स्वराज्य स्थापन तरी झाले असते का?  या वंशज्यांच्या वादाचे प्रदर्शन पुस्तक प्रकाशनाच्या वेळी मला आतापर्यंत तीन वेळा पाहायला मिळाले. खरे तर आपल्याला शापच आहे हा. कोण पुढे जात असेल तर त्याला कसे पाडायचे हे आपण मनोमन ठरवलेले असते.




आपल्या लोकांनी अंतर्गत वाद अशावेळी चव्हाट्यावर आणणे  कितपत योग्य आहे ? लेखक  ज्यावेळेस तुमच्या पुर्वजांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलेले असते,तो इतिहास  दिवस-रात्र मेहनत करून संशोधन करून  इतिहास समोर आणतो, त्यावेळेस त्यांच्या  सर्व वंशजांनी त्या ग्रंथाचे आनंदाने स्वागत करायला हवे .आपण वंशज आनंदाने कार्यक्रम घेता, ज्याने कोणी कार्यक्रम घेतला आहे त्याचा कार्यक्रम कसा पाडायचा,बघतोच कसा कार्यक्रम घेतो ते , हे  दुसरा गट ठरवतो ,आणि तशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना तोंडावर पाडले जाते. ही पद्धत चांगली आहे का? 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


एका तर वंशजाने अतिशय घाणेरड्या पध्दतीने आपल्या कर्तृत्ववान स्रीवर लिहीलेल्या पुस्तकाला विरोध केला. त्यावेळेस त्यांनी रात्री ड्रिंक्स घेऊन मला आणि माझ्या प्रकाशकाला रात्री बारा वाजता दमदाटी केली .या वादामध्ये आदरनीय शरद पवार साहेबांची प्रकाशनाची  घेतलेली वेळ गेली ,आणि त्या पुस्तकाचे प्रकाशन झालेच नाही .या वंशजाची शेवटी मला सायबर क्राईमला कंप्लेंट देऊन हा विषय संपवावा लागला. लाज वाटते मला अशा वंशजांची.


मला आता प्रश्न पडला आहे की इतिहासातल्या ज्या शौर्यशाली स्त्रिया आहेत, ज्यांनी इतिहास घडवला आहे, त्यांचे दिवस - रात्र आम्ही संशोधन करतो , मेहनत करतो मगच  पुस्तक लिहितो. आणि प्रकाशनाच्या वेळेला हे वंशज एकमेकांचे पाय ओढतात आणि एकमेकांवर कुरघोडी  करून आपला वाद  चव्हाट्यावर आणतात. हीच वेळ असते का शक्ती प्रदर्शन करण्याची ? स्वतःला काहीही समजत नसते. ज्याला काही समजत नाही त्याला इतिहास फार लवकर समजतो. मला असे वाटते की प्रत्येक वंशजांनी  आपला इतिहास आपणच लिहावा.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या सर्व प्रकारात मला चांगला अनुभव आला तो फक्त आणि फक्त महाराणी येसूबाई राणीसाहेब यांच्या वंशजांचा .राजेशिर्के घराण्याचा  अतिशय शांत आणि संयमी आहेत हे राजेशिर्के. कोणताही वाद नाही वंशजांचा .तू मोठा का मी मोठा म्हणण्याचा खटाटोप नाही .आपले जे काही वादविवाद असतील तर या वेळेस सर्व बाजूला सारून सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.  

 


 चित्रपटांमधे चित्रण अधिक अधिक ग्लॅमरस करण्याकडे निर्माता आणि दिग्दर्शकांचा कल असतो. चित्रणातील खरे चढउतार ,यश, अपयश हे सखोलपणे मांडले जात नाहीत.चित्रपट निर्माते गल्ला भरण्यासाठी आपल्या महापुरषांची बदनामी करतात. परंतु आम्ही कलाकृतीमधे त्या व्यक्तीचे जीवन चरित्र अधिकाधिक सखोल आणि वास्तववादी, अभ्यासपूर्ण  वर्ष, वर्ष मेहनतीने तयार करतो. आपल्या कर्तुत्ववान पूर्वजांबद्दल  लिहिलेल्या इतिहासाचा या वंशजांना या कुरघोडीत विसर पडतो आणि लेखकाचे खच्चीकरण होते.


 मला इथे आणखी एक गोष्ट प्रकर्षाने मांडावयाची आहे. कोणीही उठते आणि स्वतःला राजे म्हणवून घेते. या राजे म्हणण्याची जणू चढाओढच लागलेली आहे. कोणाचा कधी राज्याभिषेक आणि राज्यारोहन सोहळा झालेला आहे, आणि कोणत्या संस्थानिकाचे कोण राजे आहेत तेच आम्हाला समजत नाही.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


कोणीही उठते हातात तलवार आणि डोक्याला पगडी घालून आम्ही राजे म्हणून सोशल मीडियावर  मिरवतात. खरे तर आता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून पहावे आपण कोणत्या गादीचे राजे आहोत.जे खरेच राजे आहेत त्यांना आंम्ही राजे आहेत असे सांगण्याची काहीच गरज नसते.राज घराण्यात देखील जेष्ठ पुत्रालाच गादिचा अधिकार होता.सोशल मिडीयावर मात्र सगळेच राजे आहेत.

  ( सोशलमिडीयाला लागलेली खुप मोठी किड आहे ही व्यवहारात कोणीच या सोशलमिडीयावर तयार झालेल्या राजांना विचारत नाही. हिचतर खरी शोकांतिका आहे. ) 


एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जण तर मीच ह्या सरदार,  सरसेनापती घराण्यातील वंशज आहे म्हणून फुकटचा मोठेपणा घेण्यासाठी पुढे पुढे करतात,कर्तृत्व मात्र शून्य.या राजे म्हणून घेण्यात स्रियाही काही मागे नाहीत.


 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


छत्रपती घराण्यातील पाच राजस्त्रियांची चरित्र मी आतापर्यंत लिहीली आहेत. माझ्या प्रत्येक प्रकाशनाला युवराज छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहिले होते. त्यांनी माझ्या प्रत्येक पुस्तकाचे कौतुक केले व मला प्रोत्साहन दिले. 



३० नोव्हेंबरला "करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब" यांच्या पुस्तक प्रकाशनाला श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आवर्जुन उपस्थित होत्या. किती शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आहे युवराज्ञी साहेबांचे .आणि युवराज छत्रपती संभाजीराजे यांचेही. खरे म्हणजे हेच  खरे छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांच्या विचाराचे , घराण्याचे, कर्तृत्वाचे  वारसदार आहेत, आणि हेच खरे राजे आहेत.


श्रीमंत युवराज्ञी  संयोगिताराजे छत्रपती यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला केलेले भाषण संपूर्ण  महाराष्ट्राने ऐकले आहे.एखाद्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला ही लाजवेल असे अतिशय सुंदर आणि वैचारिक मांडणी त्यांनी केली आहे. यातुन बरेच काही  शिकण्यासारखे आहे इतर वंशजांना.




आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडले आणि आता त्यांचे वंशज मोठेपणासाठी  भांडून आपले स्वतःचे अस्तित्व काय आहे हे दाखवून देतात.  पुढार्‍यांना आपण नाव ठेवतो की ते आमच्या दैवतांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करतात. आपण मात्र उघड उघड टीका न करता आपल्या कृतीतून हे सर्व दाखवून देत आहात. कारण आम्ही जी पुस्तक लिहितो ती सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील  कर्तुत्ववान स्त्रियांची पुस्तक असतात. आपल्या पूर्वजांनी काय इतिहास गाजवला आहे ,हे या वंशजांना कधी कळणार ? नातेसंबंध,समाजकारण, राजकारण या गोष्टी अशा कार्यक्रमात का पुढे आणल्या जातात? 


सध्या राजकारणात वादग्रस्त वक्तव्याची लाटच  सुरू आहे .आणि इकडे वंशजांच्या कुरघोडीची स्पर्धा सुरू आहे. काही जण तर मीच ह्या सरदार,सरसेनापती घराण्यातील वंशज आहे म्हणून फुकटचा मोठेपणा घेण्यासाठी पुढे पुढे करतात. कर्तृत्व मात्र शून्य.या राजे म्हणून घेण्यात स्रियाही काही मागे नाहीत. त्या स्त्रियांचे पती मात्र दगडु,धोंडु,रामु असे सर्वसामान्य नाव असणारे असतात. मात्र या स्त्रिया स्वःतला राजे  म्हणण्याची हौस भागवून घेतात.त्या कोणत्या घराण्यातील राजा असतात ते त्यांनाच माहित. स्वतःच स्वयंघोषित राजे म्हणून कोणी राजा होत नाही.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


 मराठी लोकांना लागलेला शाप आणि किड आहे ही .ही किड सर्वांना पोखरून टाकते आहे, तरी आम्ही शहाणे होत नाही. जोपर्यंत हे  थांबणार नाही तोपर्यंत आमची कधीच प्रगती होणार नाही. 


फेसबुक वरील सर्व मंडळींनी काळजी घ्यावी. कोणालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजे ,सरकार,थेट वंशज, डायरेक्ट वंशज असे कोणाचे उल्लेख करू नये.




महिला दिनासाठी लेख लिहिताना मला हे नमूद करावेसे वाटते स्त्रिया आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. ८ मार्च हा एक दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा वर्षातील ३६५ दिवस महिला दिन साजरा करायला पाहिजे .तरच खऱ्या अर्थी महिलांना न्याय मिळणार  आहे.


 सर्व माझ्या सख्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा . आपल्या कर्तुत्वाची शिखरे अशीच उंच उंच  जाऊ देत.  सर्व जिजाऊंच्या आणि सावित्रीच्या लेकींना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.


लेखिका : -  महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास संशोधिका, प्रसिद्ध लेखिका डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर.


No comments:

Post a Comment