पुरंदर, सासवड, दि.२५ : पुरंदर तालुक्यातील, सासवड शहरातील औषधविक्री क्षेत्रातील मागील २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष सेवा देणाऱ्या सासवडचे मा.नगरसेवक नंदकुमार विठ्ठलराव जगताप यांच्या "माधुरी मेडिकल" ब्रँडने आता पशु औषध विक्रीच्या व्यवसायातही पदार्पण केले आहे.
पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सासवड येथे "माधुरी डिस्ट्रीब्युटर्स" पशु औषधाच्या दुकानाचे उद्घाटन बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत,उत्साहमय वातावरणात, करण्यात आले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"पशु सेवा हिच ईश्वर सेवा" हे व्रत घेऊन अहोरात्र पशु सेवा करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील सर्व नामांकित डॉक्टरांचा सत्कार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
माधुरी डिस्ट्रीब्युटर्स पशु औषधाच्या दुकानाच्या उद्घाटन सोहळ्या निमित्ताने पशु सेवा करणाऱ्या या नामांकित डॉक्टरांचा हा सन्मान करण्यात आला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी सासवडचे मा.नगरसेवक नंदकुमार जगताप यांच्या "माधुरी डिस्ट्रीब्युटर्स" पशु औषधाच्या या नवीन व्यावसायास शुभेच्छा देऊन, नंदकुमार जगताप यांच्या औषध विक्रीच्या व्यावसायिक क्षेत्रातील कर्तबगारीचे कौतुक केले.
या उद्घाटन सोहळ्यास पुरंदर तालुक्यातील डॉ मनोज शिंदे (अध्यक्ष पुरंदर तालुका पशु व दुग्ध सेवा संघ), डॉ नंदकुमार निगडे, डॉ. समीर हिवरकर, डॉ संदीप नवले (अध्यक्ष पुणे जिल्हा), डॉ सुनिल कामठे, डॉ बापू गायकवाड, डॉ आण्णासो दरेकर, डॉ मनोज सागडे, डॉ श्रीरंग नझिरकर, डॉ रवि ताकवले, तसेच
डॉ संतोष होले, डॉ सुजय कुंजीर, डॉ समीर पवार ,डॉ रोहिदास पवार डॉ विकास गाढवे, डॉ प्रशांत बनकर , डॉ बाप्पू भिसे , श्री विलास काका जगताप, मा. नगरसेवक नंदूबापू जगताप , मा उपनगराध्यक्ष श्री अजित जगताप, मा. उपनगराध्यक्ष श्री संजयअण्णा जगताप, मा. नगराध्यक्ष श्री दत्तानाना जगताप तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
"कै. श्री गगांधर (आण्णा) जगताप यांच्या आशीर्वादाने गेली 25 वर्षे आरोग्यसेवा माधुरी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या औषध विक्री व्यवसायाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये अविरतपणे सुरू आहे. वडिल श्री विठ्ठलराव जगताप आणि चुलते श्री चंद्रकांत ऊर्फ आबा जगताप हे पारंपरिक शेती आणि दुग्धव्यवसायात असल्यामुळे त्यांच्या प्रेरणेने माधुरी डिस्ट्रीब्युटर्स या नावाने होलसेल पशु औषधालय हा नविन व्यवसाय चैत्र पाडवा दिं 22 मार्च रोजी सुरू केला . "
"हा नविन व्यवसाय करण्यासाठी मोठे भाऊ श्री विलास काका जगताप (शेती उद्योग भंडार सासवड)आणि श्री विजय दादा जगताप (शेती उद्योग भंडार जेजुरी)माझ्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहिले. हा व्यवसाय उभा करत असताना माझे लहान भाऊ श्री कृष्णा जगताप, श्री सचिन जगताप (श्री सद्गुरू सिडस् पुणे)आणि श्री रोशन जगताप (हॉटेल व्यवसायिक)सतत सर्व प्रकारची मदत करत राहीले. या नविन व्यवसायाची धुरा माझी पत्नी उर्मिला जगताप (माधुरी diagnostic)यांनी घेतली आहे. सर्व व्यवस्थापन ती स्वतः करत आहे. पुरंदर तालुक्यातील दुग्ध व्यवसायिक शेतकरी बांधवांना सर्व प्रकरच्या जनावरांची सर्व औषधे होलसेल दरात उपलब्ध केलेली आहेत." अशी प्रतिक्रिया सासवडचे मा. नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुरंदर तालुक्यातील औषध विक्री क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँड "माधुरी मेडिकलच्या" माध्यमातून नंदकुमार जगताप यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात दिलेल्या प्रामाणिक सेवेमुळेच, त्यांनी केलेली वेगवेगळ्या क्षेत्रातील ही व्यावसायिक भरारी तालुक्यातील युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
"माधुरी डिस्ट्रीब्युटर्स" पशु औषधाच्या दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर, हितचिंतक आणि शेतकरी बंधूचे नंदकुमार जगताप यांनी मनःपूर्वक जाहीर आभार मानले .
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
No comments:
Post a Comment