"तिचा प्रेरणादायी, संघर्षमय प्रवास"
लहान असताना सर्वजण शाळा - शाळा हा खेळ खेळतात. मी ही अतिशय आवडीने हा खेळ खेळायचे. पण पुढे जाऊन हाच खेळ माझ्या आयुष्याचे स्वप्न बनला. आणि मग सुरू झाली त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा.
बारावी नंतर मला डी.एड.ला भोर येथील अध्यापक विद्यालयात प्रवेश मिळाला. प्रथमच घरापासून आपल्या मायेच्या प्रेमाच्या लोकांपासून दूर वस्तीगृहात राहावे लागले. त्यासाठी उपयोगी पडली ती आई-वडिलांकडून मिळालेली संस्कारांची शिदोरी. या शिदोरीच्या जोरावर मी अनेक समस्यांना तोंड देत इ. सन 1997 साली डीएड पूर्ण केले व शिक्षिका झाले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"मी जेव्हा प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशालेमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, तेव्हा शाळेची पटसंख्या 200 च्या आसपास होती. इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाच्या या छोट्याशा रोपट्याचे आज 2023 साली मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले पाहून संस्थेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी योग्य प्रकारे न्याय देऊ शकले याचे समाधान वाटते. परंतु हा यशाचा मार्ग काही सोपा नव्हता."
तसे पाहता खूप लवकर माझ्यावर मुख्याध्यापिका पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्याच वयाच्या इतर सहकाऱ्यांना सांभाळून घेताना, पालक - विद्यार्थी, प्रशासकीय कामकाज या सगळ्याची जबाबदारी पेलताना अनेक समस्या निर्माण होत होत्या.
परंतु त्यावर मात करताना मला माझ्या कुटुंबियांनी व सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री आप्पासाहेब रेणुसे व माननीय श्री दत्तात्रय धनकवडे यांनी मला जी खंबीर साथ दिली व माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला त्याच्या बळावर मी मुख्याध्यापिका पदाची जबाबदारी पार पाडण्यास सज्ज झाले.
"आज प्रशालेमध्ये सुमारे 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व 60 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशालेमध्ये अध्यापक वर्ग हा प्रामुख्याने महिलावर्गच आहे. सर्वजणी एकमेकींना समजून घेतात त्यामुळे आपसातील भांडणे - तंटे या गोष्टी होत नाहीत. व शाळेतील वातावरण चांगले राहते. एवढ्या महिला एकत्र काम करताना मला तरी काही अडचणी जाणवत नाहीत."
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
कारण मी ही एक महिलाच आहे. त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांच्या अडी - अडचणींची मला कल्पना आहे. त्यामुळे अशा समस्या आम्ही एकमेकांच्या सहकार्याने, सामंजस्याने सोडवून टाकतो. त्यामुळे सर्वांमध्ये मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले आहेत. जे शाळेच्या प्रगतीसाठी, निकोप वातावरण तयार करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरते.
"प्रशालेचा आजवरचा प्रगतीचा आलेख हा कायम चढताच राहिला आहे. मला सांगण्यास अभिमान वाटतो की आमच्या प्रशालेमध्ये अगदी सामान्य कुटुंबातून आलेले विद्यार्थी आहेत. घरी शैक्षणिक पार्श्वभूमी नसली तरी शिक्षकांच्या प्रयत्नातून हे विद्यार्थी कुठेही कमी पडले नाहीत."
आज प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सातत्याने वीस वर्षे इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याची आमच्या प्रशालेची परंपरा अखंडीतपणे चालू आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यांसारख्या क्षेत्रांमध्ये शाळेचा दबदबा निर्माण केला आहे.
यंदाच्या वर्षी प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांनी टेनिस हॉलीबॉल स्पर्धेमध्ये अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे.
"प्रशालेतील अनेक माजी विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरी पासून वैद्यकीय, अभियांत्रिकेपर्यंत व एअर होस्टेस पासून आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकापर्यंत सर्वच क्षेत्रात बाजी मारली आहे. आणि या सर्वांमध्ये मुलींचे प्रमाण कायम आघाडीवर असते हे मी अभिमानाने सांगते."
"अश्या या माझ्या प्रशालेमध्ये विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यापैकी एक उल्लेख मी आवर्जून करेल तो उपक्रम म्हणजे इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेत प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान दिला जातो.त्यांच्या हस्ते ध्वज फडकविला जातो."
हा सन्मान आपल्या पालकांना मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागते व याचा परिणाम म्हणजे इयत्ता दहावीला 85% च्या पुढे अनेक विद्यार्थी गुण मिळवतात व त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग थोडा सुकर होतो.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
'ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे पालकांसाठी ही "ग्रंथालय सुविधा" उपलब्ध करून दिली जाते. काही चर्चासत्रेही आयोजित केली जातात व त्याचबरोबर पालकांना आपल्या मुलांचा अभ्यास घेताना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी खास पालकांसाठी "अभ्यास कसा घ्यावा?" यासारख्या कार्यशाळा ही शिक्षकांच्या सहकार्याने आयोजित केल्या जातात.'
प्रशालेमध्ये ज्यावेळी पालक सभा आयोजित केल्या जातात त्यावेळी प्रत्यक्ष पालकांची चर्चा होते त्यावेळी विशेषतः महिला पालकांच्या अनेक समस्या निदर्शनास येतात. त्या समस्या सोडवण्याची ताकद ही तिच्यामध्ये असते परंतु तिला आवश्यकता असते ती कुटुंबाच्या पाठिंब्याची.
जर प्रत्येक कुटुंबातून असा पाठिंबा महिलांना मिळाला तर त्या नोकरी, व्यवसाय, मुले, कुटुंब यांच्या प्रती सर्व जबाबदाऱ्या हसत हसत पार पाडतील.
मलाही माझे पती श्री संजय व मुलगा चिरंजीव पारस यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच तर मी माझ्या शाळेप्रती असलेल्या व कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडण्यात यशस्वी झाली आहे.
"आज शाळेने एवढी उंची नक्कीच गाठली आहे की पूर्वी बरेच पालक नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी रांग लावत होते, ते आता आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक असतात हे पाहून आजवर घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे जाणवते."
कोरोना नंतर लॉकडाऊन संपल्यावर जेव्हा विद्यार्थी आमच्या समोर आले तेव्हा त्यांच्या वर्तनामध्ये लक्षणीय बदल झालेला जाणवतो. अभ्यास नकोसा वाटणे, मन स्थिर नसणे, इतरांना समजावून घेणे, समायोजन साधणे या गोष्टींचा अभाव दिसून येतो.
त्यामुळे शिक्षकांनाही विद्यार्थ्यांसाठी खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. अगदी वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाही पायाभूत संकल्पना समजावून सांगाव्या लागत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आपली मुले नियमित शाळेत पाठवली व त्यांच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष देऊन सहकार्य करावे ही आमची माफक अपेक्षा आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
या संदर्भात मी पालकांना एवढेच सांगेल की आपल्या पाल्याच्या समस्या जाणून घ्या. यासाठी वेळ काढून मुख्याध्यापक - शिक्षक यांच्याशी चर्चा करा. व मुले आपल्या समस्या मोकळेपणाने सांगू शकतील असे कौटुंबिक वातावरण तयार करा.
"आपण आपल्या मुलांचे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून संगोपन करा व तुम्ही मुलांचे मालक नाही तर एक सुजाण पालक आहे ही भावना सदैव मनामध्ये ठेवा.यातून नक्कीच विद्यार्थ्यांच्या विकासास मदत मिळणार आहे. "
"शाळेमध्ये आज जेव्हा माजी विद्यार्थी आपले नातेवाईक, स्वतःच्या मुलांना आमच्या शाळेत प्रवेश घेतात तेव्हा त्यांनी आमच्यावर पिढ्यान पिढ्या टाकलेल्या विश्वासाने मन कृतार्थ होते."
माझ्या या 22 वर्षांच्या कार्यकाळातील शाळेचा प्रगतीचा आलेख सदैव चढता ठेवण्यात मला यश आले ते केवळ माझे सहकारी, पालक, संस्थेचे पदाधिकारी यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच. यात शंकाच नाही.
शेवटी मी एवढेच सांगेल की माझी शाळा, माझे विद्यार्थी, माझे सहकारी व माझे पालक या सर्वांचा मिळून जो एक सुंदर कौटुंबिक वटवृक्ष तयार झाला आहे तो सदैव बहरत ठेवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील. माझ्या सर्व महिला - भगिनी मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
लेखिका - पुण्यातील धनकवडी येथील प्रसिद्ध प्रशाला प्रियदर्शनी विद्यामंदिरच्या आदर्श मुख्याध्यापिका, आदर्श शिक्षिका राजश्री दिघे - निंगुणे.
No comments:
Post a Comment