जेजुरी,दि.१४ : मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक आंदोलन करणाऱ्या पुरंदरकरांच्या ऐतिहासिक भूमीत मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील जनसंवाद यात्रेसाठी येणार आहेत.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला १५ तारीख, बुधवार पासून सुरवात होत आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील येत्या गुरुवारी १६ नोव्हेंबरला जेजुरी येथे मराठा आरक्षणाच्या जनसंवाद यात्रेसाठी येत आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा गडावर दर्शन घेऊन जुनी जेजुरी येथे उपस्थित मराठा समाज बांधवांशी ते संवाद साधणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जेजुरी येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने जेजुरी येथे ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले होते.
ऐतिहासिक सासवड या ठिकाणी सुद्धा मराठा समाजाच्या वतीने साखळी आंदोलन करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील जेजुरी येथे येत आहेत.
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर जुनी जेजुरी येथे गुरुवारी दुपारी २ वाजता ते मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना मनोज जरांगे पाटील जेजुरीमध्ये येत असल्याने या दौऱ्याकडे शहर आणि पुरंदर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला राज्यभरातुन मराठा तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुरंदर तालुक्यातुन मराठा समाजातील हजारो - लाखो बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या जनसंवाद यात्रेला उपस्थित राहतील अशी भावना मराठा तरुणाईने व्यक्त केली."
मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने गांभीर्य घेऊन योग्य पावले टाकणे गरजेचे आहे. मराठा तरुणाईचा आक्रोश समजून घेणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment