Monday, November 6, 2023

"पुरंदरमधील प्रसिद्ध वीर गावच्या सरपंच पदाच्या अतितटीच्या व चुरशीच्या लढतीत मंजुषा संतोष धुमाळ यांचा मोठा विजय; ऐतिहासिक "वीर" ग्रामपंचायतीवर फडकला काँग्रेसचा झेंडा, वीर ग्रामपंचायत निवडणुकीतील "या" रोमहर्षक लढतींचा निकाल वाचा सविस्तर"...



पुरंदर,वीर, दि.6 :  महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र वीर गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा संतोष धुमाळ यांचा अतितटीच्या लढाईत 350 च्या मताधिक्याने मोठा विजय झाला.




काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलतर्फे नऊ उमेदवार वीर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी आठ उमेदवारांनी बहुमताने विजय मिळवून काँग्रेसने वीर ग्रामपंचायतीवर या निवडणुकीत झेंडा फडकवला.




महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांचे श्रद्धास्थान व अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडणारे प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र वीर.


पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गाव हे सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेची श्रीमंती असलेले वैभवशाली, ऐतिहासिक गाव आहे.




पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेल्या गाव तसेच सामाजिक, आध्यात्मिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वीर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे होते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रमुख तीन उमेदवारांमध्ये चुरशीची व अतितटीची लढत झाली. 


काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा संतोष धुमाळ यांचा वीर गावच्या सरपंच पदासाठीच्या चुरशीच्या लढतीत 350 च्या मताधिक्याने  मोठा विजय झाला. ऐतिहासिक वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच मंजुषा संतोष धुमाळ यांना गावातील सर्व प्रभागांमधून  एकूण 1541 मते मिळाले.





वीर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलच्या सरपंच पदाच्या  पराभूत झालेल्या उमेदवार हर्षला ऋषिकेश धसाडे यांना गावातील सर्व प्रभागांमधून  एकूण 1191  मते मिळाली. वीर गावच्या सरपंच पदाच्या अतितटीच्या लढतीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या मंजुषा संतोष धुमाळ यांनी भाजप पुरस्कृत पॅनलच्या हर्षला ऋषिकेश धसाडे यांचा 350 मतांनी पराभव केला.


श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या पराभूत झालेल्या उमेदवार मिनल भरत धुमाळ यांना गावातील सर्व प्रभागांमधून एकूण 1052 मते मिळाली.


वीर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अपक्ष उमेदवार कल्पना विलास वाघ यांना एकूण १४६ मते मिळाली.




वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत  नोटाला( वरीलपैकी कोणीही नाही) 13 जणांनी मतदान केले.


ऐतिहासिक वीर गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी गावातील एकूण 3943 नागरिकांनी मतदान केले.


"ऐतिहासिक वीर गावातील नागरिकांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत माझ्यावरती विश्वास ठेवून मला भरघोस मतांनी  विजयी केले त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. वीर गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन." अशी प्रतिक्रिया ऐतिहासिक वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच मंजुषा धुमाळ यांनी दिली.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर गावच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वीर ग्रामपंचायतीच्या 15 जागांपैकी काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलने 8 जागांवरती विजय मिळवला. भाजप पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलने 3 जागांवरती विजय मिळवला.  श्रीनाथ जोगेश्वरी समाज परिवर्तन पॅनलने 2 जागांवरती विजय मिळवला  तसेच श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलने एका जागेवरती विजय मिळवला. एका जागेवरती अपक्ष उमेदवार निवडून आला.


"पुरंदर तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवून अनेक ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या जनसेवकांना निवडून दिले. पुरंदर मधील मोठया असलेल्या वीर ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले. वीर गावच्या जनतेने विकास कामांना पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेली  विकास कामे तसेच आमदार फंडाच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागात आम्ही केलेल्या विकास कामांना हा जनतेने दिलेला कौल आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलचे 8 विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे  


प्रभाग क्रमांक 1  : - विजयी उमेदवार 

1) पुनम प्रमोद धुमाळ - 429  

2) अनिकेत राजेंद्र समगीर - 333 


प्रभाग क्रमांक 2 : - विजयी उमेदवार

3) मोहन अरुण चवरे - 349

4) जयश्री अनिरुद्ध धुमाळ - 348

5) युवराज प्रताप धुमाळ - 341


प्रभाग क्रमांक 5 : - विजयी उमेदवार

6) प्रतीक अशोक सोनवणे - 479

7) जयश्री रुपेश धुमाळ - 348

8) राहुल कुंडलिक खोमणे - 361




भाजप पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलचे विजयी 3 उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


प्रभाग क्रमांक 3 : - विजयी उमेदवार

1) गणेश लक्ष्मण तांदळे - 335

2) छाया संतोष धसाडे - 332

3) आशा प्रशांत जाधव - 310


श्रीनाथ जोगेश्वरी समाज परिवर्तन पॅनलचे विजयी 2 उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


प्रभाग क्रमांक 4 : - विजयी उमेदवार

1) पूजा विनोद बुरुंगले - 501

2) दिपाली नानासो वाघ - 375


शिवसेना व राष्ट्रवादी पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलचा विजयी 1 उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


प्रभाग क्रमांक 1 : -

1) जयश्री सोपान समगीर - 410


प्रभाग क्रमांक 4 मधील विजयी झालेला 1 अपक्ष उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


1) एकनाथ उत्तम वचकल : - 434



"श्रीक्षेत्र वीर येथील सरपंच पदाची निवडणूक अतिशय चुरशीची व प्रत्येकालाच थरारक अनुभव देणारी ठरली. या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार  सौं.मंजुषाताई संतोष धुमाळ  सरपंच पदावरती विराजमान झालेल्या आहे. त्यामुळे प्रथमता त्यांचे अभिनंदन. आणि या तिरंगी निवडणुकीत बाजी मारणं इतकं सोपं नव्हतं परंतु त्यांचे पती वीर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष बापू धुमाळ यांचा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत असलेला संपर्क,तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस घेतलेली मेहनत या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून हा अवघड वाटणारा विजय सोपा झाला आहे. हेही विसरून चालणार नाही. म्हणून या विजयाचे शिल्पकार सर्व ज्येष्ठ मंडळी,सर्व कार्यकर्ते,श्रीक्षेत्र वीर मधील विकासासाठी मतदान करणारा सुजाण नागरिक होय. येणाऱ्या काळात संतोषबापू धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ मंजुषाताई धुमाळ या गावातील सर्व घटकांना समान न्याय देऊन गावाचा विकास करावा आणि गावाचं गावपण टिकवण्यासाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन गावाला विकासाच्या वाटेवर घेऊन जावे." अशी प्रतिक्रिया दैनिक पुढारीचे निर्भीड पत्रकार व महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे   संपादक  शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"ऐतिहासिक वीर गावच्या जनता जनार्दनाने या ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेला हा कौल वीर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे पाऊल असेल. वीर गावातील पाण्याचा गंभीर प्रश्न, गावच्या सर्व गंभीर समस्या, चांगल्या आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, चांगल्या शैक्षणिक सुविधा यावरती लोकनियुक्त सरपंच व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य चांगले काम करतील व समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.



पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नवनिर्वाचित सदस्य तसेच लोकनियुक्त सरपंच एकजुटीने प्रयत्न करतील अशीच नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment