पुरंदर,वीर, दि.3 : महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांचे श्रद्धास्थान व अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडणारे प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र वीर.श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक - भक्त क्षेत्र वीर येथे प्रत्येक वर्षी येत असतात.
पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गाव हे सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेची श्रीमंती असलेले वैभवशाली, ऐतिहासिक गाव आहे.
पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेले गाव तसेच सामाजिक, आध्यात्मिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वीर गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीकडे आहे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीतील सरपंच पदाच्या प्रमुख चार उमेदवारांनी या निवडणूकीच्या काळात आपले जाहीरनामे, वचननामे,गावातील गंभीर समस्या, गावातील विकास कामे यासंदर्भात निवडणुकीतील प्रचार काळात आपापली भूमिका मांडलेली आहे.
"महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील सुजाण व जागरूक नागरिकाला वाटत असते "आपले गाव आदर्श गाव व्हावे. आपले गाव विकसित, समृद्ध व्हावे. आपल्या गावातील गंभीर समस्या सुटल्या पाहिजेत. तसेच आपल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे." अशी भावना प्रत्येक गावातील सुजाण नागरिकांची असते.महाराष्ट्राच्या आदर्श गावांमधील तरुण पिढी ही प्रस्थापित स्वार्थी राजकारणाला तिलांजली देऊन गावातल्या समस्या सोडवण्यावरती तसेच गावचा सर्वांगीण विकास करण्याच्या भूमिकेवरती प्रामाणिकपणे काम करत असते."
सामान्य माणसाला लोकशाहीत, राजकीय व्यवस्थेत, संविधानाने विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी कायदेशीर अधिकार बहाल केलेले असतात.
"गावची जनता ही लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती असते. गावच्या विकासाची दिशा जनतेच्या हातात असते त्यामुळेच आदर्श गावांमध्ये निवडणूक काळात सरपंच पदाचा उमेदवार निवडत असताना गावातील जनता उमेदवाराचे शिक्षण, पार्श्वभूमी, सामाजिक कार्य, लोकसंपर्क, गावातील प्रमुख समस्यांची जाण, समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, विकास निधी आणण्यासाठी प्रशासकीय कौशल्य, गावच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन या सर्व गोष्टी गांभीर्याने पाहत असते."
वीर गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, अवैध धंदे, व इतर समस्यांवरती वीर गावचे सुजाण नागरिक व पुरंदर मधील पुढारीचे निर्भीड,अभ्यासू पत्रकार शिवदास शितोळे यांनी प्रामाणिकपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"वीर गावातील सर्वच गंभीर समस्या सोडवण्यासाठी गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय राजकीय नेते, सर्व विश्वस्त, गावातील सुजाण नागरिक तसेच सर्व नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.वीर गाव हे पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील एक आदर्श गाव घडण्यासाठी तसेच वीरगावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, योगदान देणे गरजेचे आहे.वीर गावातील सर्व गंभीर समस्या सोडवून, वीर गावाचा सर्वांगीण विकास करून, गावाला विकासाच्या एका नव्या उंचीवर घेऊन जाणारे व आदर्श वीरगाव निर्माण करणारे नेतृत्वच जनतेच्या मनातील सरपंच असेल."
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जात, धर्म, पंथ, गावकी, भाऊकी, प्रस्थापित स्वार्थी नेत्यांचे गलिच्छ राजकारण, जेवणावळी, दारूच्या पार्ट्या, पैशातुन मतविक्री यासारखे समाजाचे अतोनात नुकसान करणारे घटक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
महाराष्ट्रातील गाव संस्कृतीला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं असेल तर "माझा गाव माझा अभिमान माझे व्हिजन" या संकल्पनेप्रमाणे गावातील प्रत्येक सुजाण नागरिकांनी गावच्या विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान गांभीर्याने दिले पाहिजे.
"वीर गावातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सुविधा, मुबलक पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, बंदिस्त गटार योजना, दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा, सरकारी शाळेत व सरकारी दवाखान्यात दर्जेदार सुविधा, उच्च शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तरुणांना रोजगार संधीसाठी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम, आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तरुणांना उद्योग - व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे यासारखे समाज हितवादी उपक्रम राबवणारे व समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे नेतृत्व जनतेच्या मनातील सरपंच असेल." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली."
"लोकशाहीच्या प्रक्रियेत जनता जनार्दन निवडणुकीत मतदानाद्वारे गावचा कारभारी ठरवत असते. पण गावातील प्रमुख समस्या सोडवणारे तसेच गावचा सर्वांगीण विकास करणारे, राज्यात आदर्श गाव निर्माण करणारे नेतृत्वच जनतेच्या मनातील सरपंच असेन."
No comments:
Post a Comment