पुरंदर,वीर,दि.३० : पुरंदर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये तीन ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्याने उरलेल्या 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू झालेली आहे.
पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील वीर गाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी वीर येथे येत असतात. पुरंदर मधील प्रसिद्ध वीर ग्रामपंचायतीच्या 2023 मधील पंचवार्षिक निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 5 प्रभागांमधून 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.
वीर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
वीर गाव हे पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे गाव असून सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय दृष्ट्या या गावाला संपूर्ण तालुक्यात महत्व आहे.
वीर ग्रामपंचायतीची सार्वजनिक पंचवार्षिक निवडणूक 2023 ही अतिशय चुरशीची आणि अतितटीची असणार आहे.
पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 1)श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलतर्फे सौ. मंजुषा संतोष धुमाळ, 2)श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलतर्फे सौ. मिनल भरत धुमाळ, 3)श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलतर्फे सौ. हर्षला ऋषिकेश धसाडे व 4)अपक्ष उमेदवार सौ. कल्पना विलास वाघ यांच्यामध्ये सरपंच पदासाठी चुरशीची लढत होणार आहे.
वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार 1)सौ. पूनम प्रमोद धुमाळ, 2)सौ. प्रीती मोहन चवरे, 3)अनिकेत राजेंद्र समगीर तसेच प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार 1)युवराज प्रताप धुमाळ, 2)मोहन अरुण चवरे, 3)सौ.जयश्री अनिरुद्ध धुमाळ तसेच प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार 1)सौ. जयश्री रुपेश धुमाळ, 2)प्रतीक अशोक सोनवणे, 3)राहुल कुंडलिक खोमणे हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार 1)सौ. जयश्री सोपान समगीर, 2)सौ. सरिता अमोलराव धुमाळ, 3)सुरज बाळासाहेब समगीर तसेच प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार 1)विनोद कृष्णाजी चवरे, 2)सौ.गौरी श्रीकांत थिटे, 3)केशव बाप्पूसो धुमाळ तसेच प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार 1)पराग सखाराम साळुंखे, 2)सौ. गौरी सुजित धुमाळ, 3)सौ. योगिता महेश धुमाळ तसेच प्रभाग क्रमांक 4 चे अधिकृत उमेदवार 1)सौ.शोभा चंद्रकांत माळवे, तसेच प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार 1)विशाल सुदाम सोनवणे, 2)सौ.पूजा संग्राम माळवे 3)दीपक दत्तात्रय भांडवलकर हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनल तर्फे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार 1)चंद्रकांत दत्तात्रय समगीर, प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार 1)स्वप्नील चंद्रकांत धसाडे, 2) सौ.उषा आप्पा धसाडे, 3)तुषार गजानन यादव तसेच प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार 1)गणेश लक्ष्मण तांदळे 2)सौ.छाया संतोष धसाडे, 3)सौ.आशा प्रशांत जाधव तसेच प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार 1)वैभव बाळू बोडरे हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ जोगेश्वरी समाज परिवर्तन पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 4 चे अधिकृत उमेदवार 1)सौ.पूजा विनोद बुरुंगले, 2)सौ.दिपाली नानसो वाघ, 3)समीर रामदास वचकल हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
वीर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वात जास्त एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तसेच प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकूण दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वात कमी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, प्रसिद्ध वीर गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तसेच लोकनियुक्त सरपंच पदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"श्रीक्षेत्र वीर येथील ग्रामपंचायत निवडणूक ही येणाऱ्या काळात विकासाची मुहूर्तमेढ रोवणार आहे. निवडून येणारी लोकनियुक्त सरपंच महिला असल्यामुळे महिलांचे प्रश्न व महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य दिले जाईल तसेच वीरचा चांगला विकास होईल यात तीळ मात्र शंका नाही. वीर गावचा पाणी प्रश्न,अवैद्य धंदे, आरोग्य सुविधा यावर निवडून येणाऱ्या गावातील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुक ही काही दिवसांची असते नंतर पुन्हा प्रत्येकाला एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागत असते. याचे भान ठेवून प्रत्येकाने संयमाने, शांततेने, कुठलेही हेवेदावे व मत्सर न करता शांततेत ही निवडणूक पार पाडावी. आणि लोकशाहीच्या या उत्सवाला रंगाचा बेरंग होणार नाही याची वीर मधील प्रत्येक मतदाराने काळजी घेणे गरजेचे आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर मधील दैनिक पुढारीचे निर्भीड, अभ्यासू पत्रकार व महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे संपादक श्री शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष वेधणारी वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक अतितटीची आणि चुरशीची नक्कीच असेल अशी जनभावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन वीर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होईन.
No comments:
Post a Comment