पुणे, दि.२८ : पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत पुण्याच्या प्रसिद्ध प्रियदर्शिनी विद्यामंदिर व प्राईड इंग्लिश स्कूल या विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकूण 28 खेळाडूंची महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली.त्यामध्ये सहा खेळाडू पुणे जिल्ह्यातून निवडले गेले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
शिर्डी येथे 14 व 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या टेनिस व्हॉलीबॉल राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पुणे शहराकडून खेळताना सब ज्युनिअर मुली प्रथम क्रमांक व सब ज्युनिअर मिक्स डबल द्वितीय क्रमांक पटकवला.
या विजयामुळे महाराष्ट्राच्या संघामध्ये पुणे शहराच्या सहा खेळाडूंची निवड झाली.राजवीर भोसले, ओंकार पोळ, श्रेया ढवान, तनुजा रांजणे, प्रांजल सूर्यवंशी, सायली बाटे.
राष्ट्रीय स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे 21 ते 24 ऑक्टोंबर रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये भारतातून एकूण 18 राज्यातील एकूण 400 खेळाडू सहभागी झाले होते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
बालेवाडी येथील शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल स्टेडियमवर स्पर्धा अतिशय व्यवस्थित पार पडल्या. खेळाडूंसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केलेली होती.
आंतरराष्ट्रीय स्टेडियम असल्यामुळे स्पर्धेचे महत्त्व खूप वाढले होते. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमवर खेळण्यासाठी मिळणे हा त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रसंग होता.
या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन उदगीरचे माजी आमदार गोविंद केंद्रे, महादेव कसगावडे (पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी) टेनिस व्हॉलीबॉल जनक व्यंकटेश वांगवाड, गणेश माळवे, प्रफुल्ल बनसोडे , दिनेश सिंगाराम व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने सब ज्युनिअर मुले सुवर्णपदक पटकावले, सब जूनियर मुली रौप्य पदक, सब जूनियर मिक्स डबल रौप्य पदक, जूनियर मिक्स डबल कांस्यपदक पटकावून भरीव कामगिरी केली.
"सब ज्युनियर मुली महाराष्ट्र संघाकडून खेळताना इतर खेळाडू बरोबरच प्रियदर्शिनी विद्यामंदिरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून दिले."
"सब जुनियर मिक्स डबल मध्ये राजवीर भोसले प्राइड इंग्लिश स्कूल व प्रांजल सूर्यवंशी प्रियदर्शिनी विद्यामंदिर. या संघाने तेलंगणा, केरला, झारखंड या राज्यांचा पराभव करत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवुन दिले."
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
खेळाडूंना क्रीडामार्गदर्शन संदीप भोसले यांनी केले. खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेल्या भरीव कामगिरीचे कौतुक मुख्याध्यापिका राजश्री दिघे, रूपाली मालुसरे व संस्थेचे सचिव मा. नगरसेवक आप्पासाहेब रेणुसे यांनी केले.
पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशाला तसेच प्राईड इंग्लिश स्कूल या प्रशाला नेहमीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी दाखवत असतात.
No comments:
Post a Comment