पुरंदर,दि.२६,सासवड : संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात गौरवशाली इतिहास असणाऱ्या मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी व मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नांसाठी पुरंदर तालुका सकल मराठा क्रांती मोर्चा नेहमीच आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आंदोलनाच्या चळवळीसाठी जागरूक असतो.
"महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्केच्या आतमध्येच मराठा कुणबी म्हणून आरक्षण मिळावे आणि मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाकडून गुरूवार पासून सासवड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करून “बेमुदत ठिय्या आंदोलन” सुरू करण्यात आले आहे. "
यापुर्वीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सासवडच्या शिवतीर्थावर मराठा आरक्षणासाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून सलग १०० दिवस ठिय्या आंदोलन करून मराठा आरक्षण मागणीची ज्योत तेवत ठेवण्यात आली होती.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
आताही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे पुरंदरच्या मराठा आंदोलकांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजाच्या मुलांचा व मुलींच्या शिक्षण व नोकरीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
याबाबत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील प्रत्येक भागात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
त्याला प्रतिसाद देत सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदर यांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करून महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षण, मराठा - कुणबी म्हणून ५० टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गातूनच कायम स्वरुपी मिळण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार यांना करण्यात आली.
मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात टिकणारे कायदेशीर, ओबीसी प्रवर्गातील ५० टक्क्याच्या आत मधील मराठा आरक्षण मराठा समाजाला दिले पाहिजे. अशी मागणी मराठा समाजातील लाखो - करोडो तरुणांकडून संपूर्ण राज्यभर करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment