पुरंदर, वीर, दि.२४ : महाराष्ट्रातील महान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे डोळ्यांचे पारणे फेडणारा, ऐतिहासिक 'शाही दसरा' सोहळा मंगळवारी पारंपारिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात मंत्रमुग्ध होऊन, उत्साहात संपन्न झाला.
श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक विजयादशमीनिमित्त, श्रीनाथ म्हस्कोबा देवाची पालखी व वस्त्र परिधान केलेल्या व फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठया, छबिन्यासह निशाण, छत्री, अब्दागिरी या लवाजम्यासह सायंकाळी पाच वाजता भक्तिमय वातावरणात सीमोल्लंघनासाठी निघाल्या.
या ऐतिहासिक सोहळ्यावेळी सालकरी, मानकरी, दागिनदार, देवस्थानचे सर्व विश्वस्त, ग्रामस्थ,भक्त उपस्थित होते.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र वीर येथील शाही दसरा सोहळ्याची भक्त मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षीचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा भक्तिमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.
श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने तुकाई देवीची भेट घेऊन पारंपारिक पद्धतीने शाही दसऱ्याचे सीमोल्लंघन करून, गावाच्या वेशीवर विधिवत आपटा पूजन केले.
श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने पारंपारिक पद्धतीने गाव प्रदिक्षणा पूर्ण करून रात्री 8.30 वाजता मंदिरात आल्यानंतर, भक्तिमय वातावरणात छबीना संपन्न झाला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
या ऐतिहासिक शाही दसऱ्याच्या सोहळ्यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तवर्ग खूप आतुरतेने व आनंदाने या उत्सवात सहभागी होत असतो.
श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीला फुलांची केलेली आकर्षक सजावट तसेच आकर्षक विद्युत रोषणाई, आनंदमय वातावरणात फटाक्यांची केलेली आतिषबाजी, सुशोभिकरण केलेला पालखी मार्ग, फुलांची उधळण व "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात संपूर्ण भक्तवर्ग आनंदमय व भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध झाला.
"पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्र उत्सव व शाही दसरा, ऐतिहासिक वीर गावच्या भक्तिमय संस्कृतीचे दर्शन घडवतो."
"प्रत्येक वर्षी सर्व भक्तगण या ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याची भक्तिभावाने वाट पाहत असतो. यावर्षी पारंपारिक पद्धतीने, उत्साहाच्या वातावरणात,खुप आनंदाने शाही दसरा सोहळा पार पडला."
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील "ऐतिहासिक शाही दसरा सोहळा" अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकत्र जोडणारा व ऐतिहासिक वीर गावच्या महान संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसऱ्याची वैभवशाली परंपरा सर्व भक्तगण अभिमानाने व भक्तिभावाने जोपासत असतात."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा प्रत्येक वर्षी भक्तांसाठी आनंदमय वातावरणात, भक्तिमय संस्कृतीने समृद्ध करणारा असतो.
No comments:
Post a Comment