पुरंदर,वीर,दि.२३ : महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकजूट करणारा व समृद्ध करणारा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्रोत्सव हा पारंपरिक संस्कृतीचे अलौकिक दर्शन घडवतो.
पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथे ऐतिहासिक नवरात्रोत्सवात अष्टमीला म्हणजेच पारंपरिक आठव्या माळेला, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या पालखीची वस्त्र परिधान केलेल्या मानांच्या काठ्यांसह, भक्त कमळाजी भेट सोहळा भक्तीमय वातावरणात रविवारी संपन्न झाला.
या ऐतिहासिक श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीची भक्त कमळाची भेट पारंपरिक सोहळ्यामध्ये सर्व जाती - धर्माचे लोक उत्साहात,आनंदात सहभागी झाले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
हा नयनरम्य, अलौकिक, पारंपारिक भक्त कमळाजी भेट सोहळा पाहण्यासाठी वीर पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.
सवाई सर्जाचं चांगभलच्या भक्तीमय गजरात, वीर येथील माळावर सर्व पारंपरिक लवाजम्यांसह होणारा हा अष्टमीचा भक्त कमळाची भेट अलौकिक सोहळा सर्व भक्तांना वर्षभर खूप मोठी ऊर्जा देतो.
रविवारी पहाटे पाच वाजता महापूजा करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपासकाळात उष्णता वाढते म्हणून देवाचा दाह कमी करण्यासाठी रिट्याच्या पानाची पूजा करण्यात येते. रिट्याच्या पानांचे अलंकार बनवून देवाला घालण्यात येतात.
श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची रिट्याच्या पानांनी पूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांचे मुखवटे पालखीत ठेवून छबीना निघाला.
"मंदिराला दोन प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी दक्षिण दरवाजाने बाहेर काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठ्या, निशान, अब्दागिरी, छत्री आदी लवाजम्यांसह गुलालाची उधळण करत, सवाई सर्जाचं चांगभलंच्या गजरात मंदिर परिसर दणाणून गेला."
"हा सर्व पारंपारिक लवाजमा पुढे भक्त कमळाजींच्या भेटीसाठी माळावरती आला. पारंपारिक भक्त कमळाची भेट सोहळा हा सर्व भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा अलौकिक सोहळा होता."
या ऐतिहासिक नवरात्रोत्सवात सर्व भक्तांना चांगल्या सोयी सुविधा वीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पुरवल्याची माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये दोन प्रहर देवाची पूजा, छबिण्यासह पालखीची मंदिर प्रदक्षिणा, कीर्तन भजन, गोंधळ, लोकनाट्य कलावंतांची हजेरी असे विविध धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडले.
नवरात्रोत्सव निर्विघ्नपणे व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी वीर देवस्थान ट्रस्टने चांगले नियोजन केले.
हा पारंपारिक सोहळा पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, स्वयंसेवक, वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त, सल्लागार मंडळ, ट्रस्टचे कर्मचारी, सालकरी, मानकरी, वीर ग्रामस्थ, गुरव, घडशी, गोसावी, आणि सर्व भाविक भक्तांचेही सहकार्य लाभले.
"वीर गावची आध्यात्मिक संस्कृती समृद्ध करणारा "पारंपारिक भक्त कमळाजी भेट" सोहळा हा अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्यात बांधणारा असा अलौकिक व नयनरम्य तसेच हजारो भक्तांना ऊर्जा देणारा सोहळा असतो."
No comments:
Post a Comment