Saturday, December 21, 2024

"तू फक्त लढ मी तुझ्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभा आहे, चुलत्याचा पाठिंबा आणि पुतण्याची स्वप्नपूर्ती; आई - वडिलांचे स्वप्न पूर्ण करून वरसगावचा शेतकरीपुत्र गुरुप्रसाद गोरड बनला पोलीस शिलेदार; हॉटेल वरसगाव चौपाटीचा शिलेदार ते पोलीस शिलेदार, गोरड कुटुंबियांची एकजूटता ते चुलता - पुतण्याची यशोगाथा"....

पुणे,२१ : महाराष्ट्रातील धरणग्रस्त शेतकरी कुटुंबाची अवस्था फार भयानक असते. शासनाची मिळणारी तोकडी मदत स्वीकारून, नवीन आयुष्य, नवीन जग उभारायचं म्हटलं की खूप मोठ्या संघर्षाला धरणग्रस्त शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. 

निसर्ग सौंदर्य लाभलेल्या ग्रामीण भागातील, पुणे जिल्ह्यातील, राजगड (वेल्हा) तालुक्यातील, वरसगावच्या भिका गोरड यांच्या धरणग्रस्त शेतकरी कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीत, प्रचंड संकटावरती मात करून त्यांचं नवीन जग उभारण्याचा जिद्दीन व चिकाटीने प्रयत्न केला. शेतात कष्ट मेहनत करणाऱ्या गोरड कुटुंबियांनी पुन्हा आपल्या मूळ गावी वरसगावला येऊन "हॉटेल वरसगाव चौपाटी" हा हॉटेल क्षेत्रातील सिंहगड रोड - पानशेत परिसरातील ब्रँड बनवून, चुलता - पुतण्याची जोडी काय करू शकते? कुटुंबातील सदस्यांची एकजूटता काय करू शकते हे गोरड कुटुंबियांच्या यशस्वी भरारीवरून दिसून येते. 

"गुरुप्रसाद गोरड या गोरड कुटुंबातील ध्येयवेड्या तरुणाने त्यांचे चुलते प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक सचिन गोरड यांच्या खंबीर पाठिंब्याने व मार्गदर्शनाखाली व आई-वडिलांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली प्रचंड कष्ट व मेहनत करून, स्वप्नपूर्तीसाठी जिद्दीने, चिकाटीने व प्रचंड मेहनत घेऊन, पुणे पोलीस दलात भरती होऊन, पोलीस शिलेदार बनून ग्रामीण भागातील तरुणाईचे, राजगड(वेल्हा) तालुक्यातील तरुणाईचे मन जिंकलेले आहे."

गोरड कुटुंबियांची वरसगाव धरणात शेतजमीन गेल्यानंतर शासनाची तोकडी मदत मिळाल्यानंतर, हे कुटुंब पुणे जिल्ह्यातील,दौंड तालुक्यातील कानगाव येथे स्थलांतरित झाले. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"आपले मूळ गाव सोडून नवीन तालुक्यात, नवीन ठिकाणी कुटुंब उभे करणे, कुटुंबाची प्रगतशील वाटचाल करणे, प्रतिकूल परिस्थिती असताना शेती करून कुटुंब चालवणे ही त्या काळात खूप कठीण गोष्ट होती. काही वर्ष दौंड तालुक्यातील कानगाव येथे गोरड कुटुंबियांनी शेती करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवली. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत गोरड कुटुंबीय त्याकाळी कुटुंबाच्या प्रगतीच्या नवीन वाटा शोधत होते."

गोरड कुटुंबातील कष्टाळू व प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेले सचिन गोरड यांनी वडिलांच्या निधनानंतर त्या मोठ्या धक्क्यातून सावरून, कुटुंबाच्या प्रगतशील वाटचालीसाठी आयुष्यात वेगळ्या वाटेवरून जाण्याचा निर्णय घेतला.

सचिन गोरड यांनी त्याकाळी विविध ठिकाणी नोकरी केल्यानंतर, आपल्या मूळ गावी वरसगावला येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

वरसगावला येऊन पुन्हा एकदा शून्यातून आपले विश्व निर्माण करणे हा संघर्ष खूप मोठा होता तरी देखील आयुष्यातील फार मोठे आव्हान स्वीकारून सचिन गोरड यांनी वरसगावला धरण परिसरात मक्याचे कणीस विक्रीचा स्टॉल ते स्नॅक्स सेंटर ते  छोट्याशा हॉटेलच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली. कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ,भावाची व चुलता - पुतण्याची एकजूट, शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्कृष्ट चव यामुळे "हॉटेल वरसगाव चौपाटी" अल्पावधीतच सिंहगड रोड व पानशेत परिसरातील उत्कृष्ट सेवा देणारा एक हॉटेल क्षेत्रातील चांगला ब्रँड बनला.

"हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांचे पुतणे गुरुप्रसाद गोरड यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा देण्याची, पोलीस बनण्याची आवड होती."तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे तुला जे काय लागेल ती मदत, मार्गदर्शन माझ्याकडून मिळेल तू पोलीस झालाच पाहिजे." अशा प्रकारचा खंबीर पाठिंबा गुरुप्रसाद यांचे चुलते सचिन गोरड यांच्याकडून मिळाल्यामुळे तसेच आई-वडिलांचे आशीर्वाद व मार्गदर्शन पाठीशी असल्यामुळे गुरुप्रसाद गोरड यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास जिद्दीने, चिकाटीने सुरू केला आणि प्रचंड कष्ट, मेहनत घेऊन पुणे पोलीस दलात भरती होऊन, पोलीस शिलेदार बनून त्यांचे स्वप्न पूर्ण करून मोठे यश मिळवले."

गुरुप्रसाद गोरड यांचा जन्म दौंड तालुक्यातील कानगाव या ठिकाणी धरणग्रस्त शेतकरी कुटुंबात झाला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा संघर्ष सुरू असतानाच गोरड कुटुंबियांची प्रतिकूल परिस्थितीशी लढा देण्याची वाटचाल त्याकाळी सुरू होती. 

धरणग्रस्त शेतकरी गोरड कुटुंबियांना दौंड तालुक्यातील कानगाव येथे मिळालेली शेतजमीन कसण्याचे काम गुरुप्रसाद यांचे आजोबा भिका गोरड, चुलते सचिन गोरड व वडील संदीप गोरड हे प्रचंड कष्ट, मेहनत करून, कुटुंबातले सर्व सदस्य शेती करूनच त्याकाळी कुटुंबाची उपजीविका भागवत होते.

गुरुप्रसाद यांचे प्राथमिक शिक्षण कानगावच्या जिल्हा परिषद मराठी शाळेत झाले. गोरड कुटुंबीय पुन्हा त्यांच्या मूळ गावी वरसगावला स्थलांतरित झाल्यानंतर गुरुप्रसाद यांचे माध्यमिक शिक्षण पानशेत गावातील श्री शिवाजी वीर बाजी पासलकर माध्यमिक विद्यालयात झाले. 

गुरुप्रसाद गोरड शालेय जीवनात खूप अभ्यासू वृत्तीचे होते व शाळेत हुशार असल्यामुळे शिक्षकांचे आवडते विद्यार्थी होते. गुरुप्रसाद गोरड दहावीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत त्यांनी प्रवेश घेतला.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"वरसगाव - पानशेत परिसरातील प्रसिद्ध हॉटेल वरसगाव चौपाटीमध्ये गुरुप्रसाद यांचे चुलते सचिन गोरड यांच्या खांद्याला खांदा लावून  गुरुप्रसाद स्वतः व त्यांचा भाऊ सौरभ गोरड, वडील संदीप गोरड,आई मनीषा गोरड, चुलती सखू गोरड तसेच कुटुंबातील सर्व सदस्य हॉटेल व्यवसायाच्या प्रगतीसाठी आजही प्रचंड कष्ट व मेहनत घेत आहेत. गुरुप्रसाद यांचे महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना हॉटेल वरसगाव चौपाटीमध्ये देखील त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देऊन, कुटुंबाला मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे."

"पुण्यातील प्रसिद्ध सुधाकरराव जाधवर महाविद्यालयात शिक्षण घेऊन गुरुप्रसाद गोरड यांनी बीकॉमची पदवी घेतली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच गुरुप्रसाद यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची आवड लागली आणि विशेषतः पोलीस बनण्याचे स्वप्न त्यांना त्याकाळी स्वस्थ बसून देत नव्हते. गुरुप्रसाद गोरड यांनी पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक व्यायाम, सराव,धावणे,शारीरिक चाचणीची तयारी तसेच लेखी परीक्षेची तयारी यासाठी प्रामाणिकपणे कष्ट व मेहनत घेतले."

"पोलिसांची वर्दी पाहिल्यानंतर मला खूप मोठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळायची. पोलीस बनण्याचे माझे स्वप्न होते. माझे चुलते सचिन गोरड यांचा खंबीर पाठिंबा व मार्गदर्शन माझ्या पाठीशी होतेच तसेच माझ्या आई-वडिलांचेही आशीर्वाद व मार्गदर्शन होते. पोलीस भरती होण्याच्या या प्रवासात मला मित्रांचीही खूप साथ मिळाली. कुटुंबाची भक्कम साथ असल्यावर तुम्ही जिद्दीने, चिकाटीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर कुठलेही स्वप्न पूर्ण होते याची प्रचिती मला पोलीस बनून माझे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मिळाली." अशी प्रतिक्रिया पुणे पोलीसदलात भरती झालेले पोलीस शिलेदार गुरुप्रसाद गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

आज महाराष्ट्राच्या राजकारणात आपण चुलता - पुतण्याची राजकीय स्पर्धा पाहतो. चुलता - पुतण्याचे राजकीय वैर पाहतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, शेकडो गावांमध्ये चुलता - पुतण्याची जमिनीवरून, वेगवेगळ्या संवेदनशील विषयांवरून भांडणे पाहतो. पण चुलत्याने पुतण्याला पाठिंबा दिला व मार्गदर्शन केले आणि चुलता,पुतण्या आणि कुटुंबातील सर्व सदस्य एक झाले तर कुटुंबाची कशी मोठी प्रगती होऊ शकते? कुटुंबातील तरुणांचे स्वप्न कसे पूर्ण होऊ शकते हे गोरड कुटुंबियांनी ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या प्रगतशील वाटचालीतून दाखवून दिलेले आहे.

हॉटेल वरसगाव चौपाटी हा गोरड कुटुंबियांनी त्यांच्या कष्टाने, मेहनतीने आणि एकजुटीने तसेच हजारो ग्राहकांना उत्तम सेवा देऊन सिंहगड रोडवरील हॉटेल क्षेत्रातील एक मोठा ब्रँड बनवलेला आहे. हॉटेल वरसगाव चौपाटीच्या प्रगतशील वाटचालीमध्ये सचिन गोरडे यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. पुणे शहरातून आयटी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील  तरुणाईचा वर्ग तसेच  व्यावसायिक तरुण वर्ग हॉटेल वरसगाव चौपाटीमधील व्हेज व नॉनव्हेज पदार्थांची उत्कृष्ट चव व उत्तम सेवा यामुळे हॉटेल वरसगाव चौपाटीचा खूप मोठा चाहता वर्ग बनलेला आहे. सचिन गोरडे यांची मुले रितेश गोरड व रुद्र गोरड हे देखील हॉटेलमध्ये आपल्या वडिलांना मदत करतात.

"हॉटेल वरसगाव चौपाटीच्या प्रगतशील वाटचालीमध्ये आमच्या गोरड कुटुंबातील सर्व सदस्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. माझा भाऊ, पुतणे, वहिनी, पत्नी, मुले कुटुंबातील सर्व सदस्य आमच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना उत्कृष्ट चवीचे जेवण देण्यासाठी व उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असतात. वरसगाव धरणाच्या निसर्गसंपन्न व सुंदर ठिकाणी आमच्या हॉटेलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना प्रामाणिक सेवा देत असल्यामुळे, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी आवर्जून आमच्या हॉटेलमध्ये शाकाहारी व मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी येतात तसेच हिवाळ्यामध्ये कॅम्पिंग साठीही तरुण वर्ग आवडीने येत असतो आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळते याचा खूप आनंद वाटतो." अशी प्रतिक्रिया हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"वरसगाव, पानशेत धरणातील ताज्या माशांची मच्छी थाळी, ग्रामीण भागातील अस्सल चवीची मटन थाळी व शाकाहारी पदार्थांच्या उत्कृष्ट थाळीचा आस्वाद घेण्यासाठी हजारो ग्राहक हॉटेल वरसगाव चौपाटीमध्ये आवडीने येत असतात. पानशेत धरण परिसरातील अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांच्या फार्म हाऊसवरतीही सचिन गोरड यांच्या हॉटेल वरसगाव चौपाटीच्या माध्यमातून  उत्कृष्ट चवीचे जेवण त्यांना मिळत असते."

"माझा पुतण्या गुरुप्रसाद पोलीस भरती होण्यासाठी खूप कष्ट,मेहनत घेत होता. आमचे मार्गदर्शन व पाठिंबा त्याच्या पाठीशी होताच परंतु त्याची जिद्द खूप मोठी होती. आमच्या गोरड कुटुंबातील एक मुलगा पोलीस झालेल्याचा आनंद आमच्यासाठी खूप मोठा आहे. गुरुप्रसादचे कष्ट, मेहनत व प्रामाणिकपणा यामुळेच त्याचे पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे." अशी प्रतिक्रिया हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

राजगड(वेल्हा) तालुक्यातील नागरिकांनी तसेच वरसगावच्या ग्रामस्थांनी, गुरुप्रसादच्या मित्रांनी, नातेवाईकांनी गुरुप्रसादच्या या पोलीस बनण्याच्या स्वप्नपूर्तीच्या यशस्वी प्रवासावरती कौतुकाचा वर्षाव केलेला आहे.

"पुणे पोलीस दलात भरती होऊन,पोलीस बनून माझे पहिले स्वप्न पूर्ण झालेले आहे. आता पुढे मोठा पोलीस अधिकारी बनण्यासाठी माझा स्पर्धा  परीक्षांचा अभ्यास सुरू आहे. एक चांगला पोलीस अधिकारी बनून महाराष्ट्रातल्या लोकांची सेवा करण्याची मला संधी मिळावी यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन." अशी प्रतिक्रिया पोलीस शिलेदार गुरुप्रसाद गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"ग्रामीण भागातील कुटुंबातील सर्व सदस्यांची एकजूट असेल तर, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, कितीही मोठे संकट असले तरी कुटुंबातील सदस्यांची एकजूट व जिद्दीने,चिकाटीने  प्रयत्न केले तर आपली स्वप्न पूर्ण होऊ शकतात. मोठे यश मिळू शकते व कुटुंबाची मोठी प्रगती होऊ शकते हा गोरड कुटुंबीयांचा प्रगतशील प्रवास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप प्रेरणादायी आहे."

महाराष्ट्राच्या तरुण पिढीने वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत व स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड कष्ट व मेहनत केली पाहिजे.

Friday, December 20, 2024

"बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड घटनेने महाराष्ट्र हळहळला; आरोपींवर मकोका, बीड घटनेची न्यायालयीन व एसआयटी मार्फत दुहेरी चौकशी, बीड पोलीस अधीक्षकांची बदली; सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी;मृत सरपंचांच्या मुलीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न"

नागपूर,दि.२० : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण बीड जिल्हासह महाराष्ट्र हळहळला. 

या गंभीर प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, सर्व आरोपींना कायदेशीर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनतेकडून करण्यात येत आहे. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या गंभीर प्रकरणाविषयी विधानसभेत बुलंद आवाज उठवून मागणी केली आहे की "या गंभीर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मीक कराडला लवकरात लवकर अटक करा, सर्व आरोपींना अटक करा. राजकीय दबावाला बळी पडू नका व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सरकारने न्याय मिळवून द्या". अश्या भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी, काँग्रेसचे नेते नाना पटोले, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे या राजकीय नेत्यांनीही वाल्मिक कराडला अटक करून, सर्व आरोपींना अटक करून संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे. या गंभीर प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून आरोप केला गेलेला वाल्मीक कराड हा "राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्याला वाचवले जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने विधानसभेत सभात्याग केला."

बीड जिल्ह्यातील लोकप्रिय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वास्तव देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन दिल्लीत त्यांच्यासमोर मांडलेले आहे. बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा यांनी देखील विधानसभेत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरती आवाज उठवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वास्तव विधानसभेत खूप पोटतिडकेने मांडलेले आहे.

"बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मीक कराड याचे नाव समोर आल्यामुळे, त्याचे फोटो कोणासोबतही असू द्या त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल."अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची गाडी अडवली. सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना बेदम मारहाण करुन नंतर त्यांची हत्या करण्यात आली.

"सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याच राजकारण तापलं आहे. हे गंभीर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बीडच्या या वाईट घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षातील अनेक राजकीय नेत्यांनी या क्रूर घटनेविषयी विधानसभेत आवाज उठवलेला आहे."

"बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल." अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभेत दिली.

बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"बीड मधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करून बीड जिल्ह्यातील भूमाफिया, वाळूमाफियांसह इतर प्रकारच्या गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढू, अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली."

परभणीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी वाजवीपेक्षा अधिक पोलीस बळाचा  वापर केला आहे काय, याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बीड, परभणी येथील घटनेसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "परभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही. 

परभणी येथील कृत्य एका मनोरूग्णाने केले आहे. तो मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. "

"या प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन झाले नाही. परभणीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा सर्वपक्षीय होता. या मोर्चात बांग्लादेशमधील हिंदूंसंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही हिंदू विरूद्ध दलित अशी दंगल नाही. परभणीत झालेल्या तोडफोडीत दुकाने, वाहने, सरकारी कार्यालयांचे नुकसान झाले आहे." असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीड येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

"बीडमध्ये आवाडा ग्रीन एनर्जी कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीची कामे आम्हालाच द्या किंवा खंडणी द्या अशी मानसिकता काहींची तयार झाली आहे. त्यामुळे बीड प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील पोलीसांनी देखील योग्य कारवाई करावी. गुन्हे दाखल करताना वस्तुस्थिती तपासावी, असेही मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणाले."

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे देशमुख कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. मृत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. परंतु वडिलांच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का तिला व तिच्या कुटुंबीयांना बसलेला आहे.

“सरकारने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. माझे वडील खूप चांगले होते, देवमाणूस होते. त्यांची अशाप्रकारे हत्या करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात ही दहशत आहे की चांगल्या माणसाबरोबर असं झालं तर मग आपलं काय होईल? त्यामुळे गुन्हेगारांना लवकर अटक झाली पाहिजे. मी डॉक्टर व्हावं किंवा चांगलं काहीतरी मोठ्या पदावर जावं असंच माझ्या वडिलांना वाटत होतं आणि मी त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण करणार” असे मृत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने म्हटले आहे.

“मला वडिलांचं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी मला सरकारने सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आत्ता पोलिसांकडून जो तपास सुरु आहे त्यावर आम्ही समाधानी नाही. या घटनेत एकूण सात आरोपी आहेत असं सांगितलं जातं आहे. त्यातल्या चौघांनाच अटक झाली आहे. बाकी तीन आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे. तसंच या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे. आज माझी ही मागणी आहे की माझ्या वडिलांना जसं ठार मारण्यात आलं तशीच शिक्षा आरोपींना झाली पाहिजे.” असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे.

"महाराष्ट्राच्या राजकारणाला व समाजकारणाला काळिमा फासणारी ही बीडमधील ही खूप गंभीर घटना आहे. संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना लवकरात लवकर, कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्रातील कुठल्याही मोठ्या मंत्र्याचा राजकीय वरदहस्त असलेला वाल्मीक कराड असो की कोणीही आरोपी असो, सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी जनभावना महाराष्ट्रातील जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे."

राज्य सरकार या गंभीर प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी, योग्य ती पावले उचलून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील. अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे.