पुणे,दि.२९ : मैत्री हे जगातील खूप सुंदर नाते असते.आयुष्यात चांगल्या मित्रांची संगत लाभली तर नक्कीच भविष्यकाळही खूप उज्वल असतो. मराठवाड्यातील लातूरच्या,औसा तालुक्यातील सारंग बिराजदार व सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील हर्षद मांढरे या दोन युवा मित्रांनी जिद्दीने, चिकाटीने व मेहनतीने शैक्षणिक कारकिर्दीमध्ये डॉक्टर बनण्याच्या नीट परीक्षेत व इंजिनियर बनण्याच्या सीईटी परीक्षेत देदीप्यमान यश मिळवून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
मराठवाड्यातील लातूरचा शेतकरी पुत्र सारंग बिराजदार याने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी द्यावी लागणारी देशातील कठीण परीक्षा (NEET) नीट या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवुन, वैद्यकीय क्षेत्रातील "एमबीबीएस" या पदवीसाठी भंडारा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील शेतकरीपुत्र हर्षद मांढरे याने इंजिनिअरिंगच्या अवघड असणाऱ्या सीईटी परीक्षेत 98.28 टक्के गुण मिळवून, अहोरात्र मेहनत घेऊन देदीप्यमान यश मिळवून, पुण्यातील नामांकित असणाऱ्या व्हीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याच्या आवडीच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेत प्रवेश मिळवुन, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले.
सारंग बिराजदार व हर्षद मांढरे हे दोघेही शेतकरीपुत्र या दोघांचेही कुटुंब पुण्यात मुलांच्या शिक्षणासाठी स्थायिक झाले. शालेय जीवनापासूनच एकमेकांचे खूप जवळचे असणारे हे दोघेही मित्र खेळाबरोबर अभ्यासातही खूप विशेष लक्ष द्यायचे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
शालेय जीवनापासूनच या दोन्ही मित्रांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगले स्वप्न ठेवून, दहावीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यानंतर,आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट व मेहनत घेतली.
आज या दोन्ही मित्रांची त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामांकित महाविद्यालयामध्ये एमबीबीएस डॉक्टर बनण्यासाठी व कॉम्प्युटर इंजिनिअर बनण्यासाठी प्रवेश मिळालेला आहे.
मराठवाड्यातील, लातूरच्या, औसा तालुक्यातील चिंचोली जोगण गावचे शेतकरी असणारे धनराज बिराजदार हे त्यांची पदवी पूर्ण झाल्यानंतर गावी पूर्णवेळ शेती करत होते. मराठवाड्यातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंब तसेच शेतमालाला भाव नसल्यामुळे बिराजदार कुटुंब कर्जाच्या विळख्यात सापडले.
"मराठवाड्यातील, लातूरच्या किल्लारी परिसरातील 185 उंबऱ्याचे आमचे जोगन चिंचोली गाव. आमचं अल्पभूधारक शेतकरी कुटुंब, तीन वर्ष शेती केल्यानंतर शेतीमध्ये खर्च जास्त, उत्पन्न कमी, शेतमालाला भाव नसल्यामुळे या दुर्दैवी चक्रात आमच्यावरती 12 लाखाचे कर्ज झाले. त्यानंतर पुणे शहरात येऊन आम्ही स्थायिक झालो. पुण्यात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेत काम करायला सुरुवात केल्यानंतर, मशाल संस्था, गोखले इन्स्टिटयूट अशा अनेक सामाजिक व विकासात्मक कार्य करणाऱ्या संस्थांकडेकडे हंगामी कामे केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व्हेच्या कामांमध्ये झोकून देऊन काम करून, प्रतिकूल परिस्थितीशी लढा दिला. माझ्या मुलाने केलेले कष्ट, मेहनत यामुळे त्याची भंडारा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर पदवीसाठी प्रवेश मिळाला. हा आमच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा क्षण आहे." अशी प्रतिक्रिया धनराज बिराजदार यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील, मिरजेवाडी गावचे शेतकरी असणारे संतोष मांढरे ग्रामीण भागात खूप उत्तम शेती करतात. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी संतोष मांढरे यांनी गाव सोडले व पुणे शहरात मुलांच्या उज्वल भविष्यासाठी स्थायिक झाले.
आजच्या स्पर्धेच्या युगात चांगले शिक्षण घेऊन उत्तम कामगिरी केली तरच मुले या काळात टिकू शकतात. याची जाणीव संतोष मांढरे यांनी आपल्या मुलांना वेळोवेळी करून देऊन, त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच हर्षद मांढरे याने अभियांत्रिकीच्या सीईटी परीक्षेत कष्टाने,मेहनतीने देदीप्यमान यश मिळवले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील मिरजेवाडी गावातील आमचे शेतकरी कुटुंब. लग्नानंतरही काही वर्ष पूर्ण वेळ आम्ही शेतीच करत होतो. ग्रामीण भागात शेती हेच आमचे उपजीविकेचे साधन. मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडले आणि पुण्यात स्थायिक झालो, नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत असतानाही आमच्या शेतीची नाळ कधीच आम्ही तोडली नाही. मुलांच्या शिक्षणासाठीच आम्ही गाव सोडून पुण्यात आलो याची जाणीव आमच्या मुलांना आम्ही नेहमीच करून दिली. हर्षदने अहोरात्र मेहनत करून, जिद्दीने चिकाटीने इंजिनिअरिंगच्या सीईटी परीक्षेत खूप चांगले यश मिळवुन, पुण्यातील नामांकित असणाऱ्या व्हीआयटी इंजिनिअरिंग महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला याचा आमच्या कुटुंबीयांना खूप आनंद आहे." अशी प्रतिक्रिया संतोष मांढरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
सारंग बिराजदार व हर्षद मांढरे या दोन्ही मित्रांनी कष्टाने, मेहनतीने जे देदीप्यमान यश मिळवले याबद्दल त्यांच्या मित्रांनी, नातेवाईकांनी तसेच लातूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला.
सारंग बिराजदार याने पहाटे पाचला उठून सकाळी मेडिटेशनने सुरुवात करून, दिवसभरात 12- 14 तास कष्ट, मेहनत घेतल्यामुळेच त्याची भंडारा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी निवड झाली. सारंग बिराजदार याच्या आई पद्मिनी बिराजदार यांचेही सारंगच्या या यशस्वी प्रवासात महत्त्वाचे योगदान आहे. सारंगचा भाऊ सोहम बिराजदार माध्यमिक शिक्षण घेत असून कलाक्षेत्रात त्याला आवड आहे.
सारंगने पुणे शहरात राहत असलेल्या आंबेगाव पठार परिसरातील प्रथमा हाईट्स सोसायटीच्या बिल्डिंगच्या टेरेस वरती बसून आठ - आठ तास अभ्यास केलेला आहे. लायब्ररीमध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. आई-वडिलांच्या कष्टाची व मेहनतीची जाणीव असल्यामुळे सारंग बिराजदार याने बारावीनंतर झोकून देऊन अभ्यास केला त्यामुळेच त्याला चांगले यश मिळवता आले.
मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून पुण्यात स्थायिक झालेले संतोष मांढरे यांचे कुटुंबही सुशिक्षित व ध्येयवादी विचारसरणीचे. संतोष मांढरे यांनी लहानपणापासूनच मुलांवरती चांगले संस्कार केले. आयुष्यात मोठी प्रगती करायची असेल तर चांगले शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे? याची जाणीव त्यांनी पदोपदी आपल्या मुलांना करून दिल्यामुळेच हर्षद मांढरे याने इंजिनिअरिंगच्या सीईटी परीक्षेत देदीप्यमान यश मिळवून, आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे मेहनतीचे चीज करून दाखवले.
हर्षद मांढरे याच्या आई मनीषा मांढरे यांचेही हर्षदला त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीमध्ये वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले त्यामुळे त्याला हा यशाचा पहिला चांगला टप्पा गाठता आला. हर्षद मांढरे याची बहीण संजना मांढरे ही देखील उच्चशिक्षित असून पुण्यामध्ये नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत आहे. चांगले शिक्षण घेतले तरच आयुष्यामध्ये चांगली प्रगती करता येते हा विचार मांढरे कुटुंबियांनी उत्तमरीत्या जपलेला आहे.
मराठवाड्यातून पुण्यात येऊन, संघर्ष करून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून, शिस्त लावून, त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये कशी चांगली प्रगती करता येईल? हे बिराजदार कुटुंबियांनी सर्वांना दाखवून दिलेले आहे.
सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून फक्त मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात येऊन, उच्च शिक्षणाचे चांगले संस्कार करून व चांगली शिकवण देऊन, गावाकडच्या शेतीशी नाळ न तोडता, पुण्यात राहून मुलांवरती चांगले संस्कार व चांगले मार्गदर्शन करून शैक्षणिक कारकीर्दीमध्ये कसे चांगले यश मिळवता येते हे मांढरे कुटुंबीयांनी सर्वांनाच दाखवून दिलेले आहे.
"माझे आई - वडील, शिक्षक यांचे माझ्या यशामध्ये खूप मोठे योगदान आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस ही पदवी पूर्ण झाल्यानंतर मला पुढे एम.डी. करायचे आहे आणि हजारो रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करायची आहे." अशी प्रतिक्रिया सारंग बिराजदार याने महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आई-वडिलांचा, शिक्षकांचा सर्वांचाच पाठिंबा व मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते. माझ्या आई वडिलांचे मार्गदर्शन व उच्च शिक्षणासाठीचा भक्कम पाठिंबा यामुळेच मला हे यश मिळवता आले. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिग्री पूर्ण झाल्यानंतर, आयटी क्षेत्रामध्ये मोठया कंपनीसाठी चांगले काम करायचे आहे." अशी प्रतिक्रिया हर्षद मांढरे याने महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
सारंग बिराजदार व हर्षद मांढरे या दोन्ही मित्रांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी, जिद्दीने, चिकाटीने, प्रयत्न केले. दहा - दहा ,बारा - बारा तास अभ्यास केला. त्यामुळे या दोन्ही मित्रांना चांगले यश मिळवता आले.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
सोशल मीडिया, मोबाईल, चुकीची संगत यामुळे भरकटलेली तरुण पिढी आजच्या काळात आपल्याला पाहायला मिळते. परंतु आई-वडिलांच्या कष्टाची, मेहनतीची जाणीव ठेवून शैक्षणिक कारकिर्दीमध्ये संपूर्ण आयुष्य झोकून देऊन, कष्ट व मेहनत केली तर नक्कीच आई-वडिलांची व स्वतःची स्वप्न पूर्ण करता येतात हे सारंग बिराजदार व हर्षद मांढरे या दोन्ही मित्रांनी त्यांच्या या जिद्दीच्या, चिकाटीच्या व या देदीप्यमान यशाच्या प्रवासातून सर्वांना दाखवून दिलेले आहे.
आजच्या आधुनिक काळात शिक्षणाची साधने भरपूर आहेत. करिअरसाठी अनेक पर्याय आहेत परंतु आपली आवड नक्की कोणत्या क्षेत्रात आहे हे आजच्या तरुण पिढीला कळणे खूप गरजेचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट व मेहनत करून आपली ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद एक वेगळाच असतो ही जाणीव आजच्या यशस्वी तरुणाईला नक्कीच असते.
आजच्या काळामध्ये उच्च शिक्षण घेत असताना आई-वडिलांचे संस्कार व मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते.