"हॉस्पिटलमध्ये चारशे रुपये पगार ते कपड्याच्या दुकानातील सामान्य कर्मचारी ते कुटुंबाला आधार देण्यासाठी संघर्ष करणारी रणरागिणी ते सॉफ्टवेअर कंपनीत 2500 रुपये पगारावर काम करणारी सर्वसामान्य कर्मचारी ते त्याच सॉफ्टवेअर कंपनीची यशस्वी संचालिका ते महाराष्ट्रातील लाखो - करोडो रुपयांची उलाढाल असणाऱ्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीची मालकीण,रणरागिणी, प्रेरणादायी शिलेदार जयश्री फडतरे"
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, महान पराक्रमाने पावन झालेल्या महान जुन्नरच्या भूमीतील, येणेरे या गावी महाराष्ट्रातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी "ग्रामसॉफ्ट" सॉफ्टवेअर कंपनीच्या यशस्वी संचालिका जयश्री फडतरे यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या जयश्री फडतरे यांचे येणेरे गावातील जिल्हा परिषद शाळेत, मराठी माध्यमात शिक्षण झाले.
आजी व आजोबांची लाडकी असणाऱ्या जयश्री फडतरे त्यांचे बालपण मामाच्या गावी येणेरे येथे, खूप हृदयस्पर्शी आठवणींमध्ये,ग्रामीण भागातील आनंददायी वातावरणामध्ये फुलले होते. पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील, येणेरे या गावात जयश्री फडतरे यांची आजी,आजोबा, मामा सर्वजणच जयश्री यांची त्यांच्या बालपणी खूप काळजी घेत असत. आजोबा व नातीचं नातं खूप सुंदर असतं. जयश्री फडतरे यांचे आजोबा जयराम ढोले हे जयश्री यांना येणेरे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सोडायला जायचे व शाळेचा दिवस पूर्ण होईपर्यंत शाळेच्या वरांडयामध्येच थांबायचे तसेच सुट्टीमध्ये त्याकाळी मुलांना मिळणारी सुकडी जयश्री फडतरे त्यांच्या आजोबांसोबत खाऊन तो आजोबांबरोबरचा सुंदर काळ खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जगला. जयश्री फडतरे यांच्या बालपणी त्यांची मावशी रंजना ढोले व आजोबा जयराम ढोले जयश्री यांचा अभ्यास करून घ्यायचे.
जयश्री फडतरे यांचे मामा शरद ढोले मुंबईला कॅन्टीनमध्ये कामाला असल्यामुळे मामा कधी गावी येईल याची त्या वाट पाहायच्या कारण मुंबई मधला चविष्ट खाऊ घरातील सर्वच मुलांसाठी उत्सुकतेचा विषय होता. जयश्री फडतरे यांच्या आजोबांचा जयश्री यांच्यावरती खूप जीव होता. घरातील सर्वच मंडळी आजी - आजोबा, मावशी, आई-वडील सर्वचजण बालपणी जयश्री फडतरे यांना खूप जीव लावत. बालपणी मामाच्या गावी राहत असल्या तरी जयश्री फडतरे यांच्या आई सुभद्रा वर्पे आणि वडिल सुभाष वर्पे यांनी केलेले संस्कार, शिस्त त्या कधीच विसरल्या नाहीत.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
सातारा जिल्ह्यातील, कोरेगावमध्ये राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांचे पत्र येणेरे या गावी आल्यानंतर त्यातील मजकूर वाचून सुखावणाऱ्या जयश्री फडतरे आपल्या आई-वडिलांना लगेच प्रतिसादाचे दुसरे पत्र पाठवून त्यांची खुशाली कळवायच्या. आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळात हा जुन्या काळातील पत्रांचा प्रेमळ संवाद लुप्त झालेला आहे. आईने आपल्या मुलीला पाठवलेले पत्र व मुलीने आपल्या आई-वडिलांना पाठवलेले पत्र हा प्रवास त्याकाळी खरच खूप हृदयस्पर्शी होता.
शाळेत अभ्यासात हुशार असणाऱ्या जयश्री फडतरे शाळेतील वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होऊन, अनेक पारितोषिके त्याकाळी मिळवत होत्या. शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना जयश्री फडतरे यांनी खोखो, कबड्डी या स्पर्धांमध्ये, जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. जयश्री फडतरे यांच्या आजी-आजोबांचे शेतकरी कुटुंब, शेतामध्ये मजुरी करणारे कुटुंब असल्यामुळे जयश्री फडतरे यांनी त्यांच्या शालेय जीवनामध्ये शेतामधील विविध प्रकारची कामे आनंदाने केलेली आहेत.
शेतामधले खुरपने, कांदे लावणे, लसूण लावणे, गवत काढणे, दुसऱ्याच्या शेतावरती सुट्टीच्या दिवशी मजुरीसाठी जाणे ही सगळी कामे त्या काळामध्ये त्यांनी केली होती. चुलीवरचे जेवण बनवणे, शेतातील सरपण आणणे, अभ्यास करणे तसेच ग्रामीण भागामध्ये खेळणे, बागडणे हा त्यांचा बालपणातील काळ खूपच संस्मरणीय होता. जयश्री फडतरे दहावीला उत्तीर्ण झाल्या तो काळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा टप्पा होता आणि त्याकाळी दहावीमध्ये नापास होणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त होते. जयश्री फडतरे यांच्या दहावीच्या वर्गातील अनेक मुले नापास झालेली होते अशा वेळेस जयश्री फडतरे दहावीमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या हा त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप आनंदाचा क्षण होता.
"मी दहावी उत्तीर्ण झाले तो माझ्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण होता. माझ्या कुटुंबातील लोकांसाठीही खूप आनंदाचा क्षण होता. माझ्या आई-वडिलांना, मामाला, मावशीला, आजीला व सर्वच नातेवाईकांना माझा खूप अभिमान वाटला. मामाच्या गावी राहून, एका संस्कारी कुटुंबात जडणघडण झाल्यामुळे, दहावीत चांगले यश मिळवल्यामुळे सर्वजण आनंदी होते. आई-वडिलांची कौतुकाची थाप खूप प्रेरणा देणारी असते." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
आपल्या मुलीला मिळालेले उत्तुंग यश पाहून कुठल्याही वडिलांचे व मुलीचे नाते अजून घट्ट व प्रेमाच्या बंधाने मजबूत होते .
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
येणेरे गावातील श्री छत्रपती विद्यालयात जयश्री फडतरे यांनी माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण जुन्नर येथील प्रसिद्ध असणाऱ्या श्री छत्रपती महाविद्यालयात घेतले.जयश्री फडतरे बारावीत शिकत असताना त्यांच्या आयुष्यात एक धक्कादायक घटना घडली. त्यांच्या वडिलांना पॅरालीसीस अटॅक (पक्षघात)आला त्यामध्ये ते गंभीर आजारी होते. सातारला दोन महिने हॉस्पिटलमध्ये या गंभीर आजाराशी संघर्ष करत असताना जयश्री फडतरे यांचे वडील उपचार घेत होते.
जयश्री फडतरे यांचे बारावीचे वर्ष असल्यामुळे अभ्यासाचा ताण-तणाव होताच त्याबरोबर वडिलांना झालेल्या गंभीर आजारामुळे खूप दुःखद असा काळ त्यांच्यासाठी तो होता. वडिलांना हॉस्पिटलमध्ये भेटून आल्यानंतर पुन्हा जयश्री फडतरे यांनी बारावीचा अभ्यास जोमाने सुरू केला व बारावीच्या परीक्षेत पुन्हा घवघवीत यश मिळवले. बारावीनंतर त्यांना नर्सिंगचे शिक्षण घेण्याची इच्छा होती. बारावीची परीक्षा झाल्यानंतर त्या सातारा जिल्ह्यातील, कोरेगाव या ठिकाणी त्यांच्या वडिलांना भेटायला गेल्या. दोन-तीन दिवस आई-वडिलांच्या घरी राहिल्यानंतर जयश्री फडतरे यांना त्यांच्या घरातील गंभीर परिस्थिती लक्षात आली.
जयश्री फडतरे यांच्या वडिलांना पॅरालीसीस अटॅक आल्यामुळे त्यांचा या गंभीर आजाराची संघर्ष चालूच होता. कुटुंब चालवणारी कमावती व्यक्ती गंभीर आजारामुळे घरी बसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
"कोरेगावच्या घरी दोन-तीन दिवस राहिल्यानंतर घरातील गंभीर परिस्थिती माझ्या लक्षात आली. आजी व मावशी बरोबर पुन्हा येणेरे गावी जाण्यापेक्षा मी वडिलांची काळजी घेण्यासाठी कोरेगावला राहण्याचा निर्णय घेतला. तो काळ आमच्या कुटुंबासाठी खूपच खडतर होता. घरातील कमावती व्यक्ती गंभीर आजाराची संघर्ष करत होती. माझा भाऊ प्रवीण ही त्याकाळी कुटुंबाला आधार देण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. भावाचे टेलरिंगचे काम त्या काळी तात्पुरत्या स्वरूपाचा असल्यामुळे आमच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचणींचे आव्हान खूप मोठे होते. त्यामुळे त्यावेळी मी माझ्या कुटुंबाला हातभार लावून, खंबीरपणे आधार देण्याचे ठरवले." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
जयश्री फडतरे यांच्या वडिलांनी त्यांच्या छोटासा व्यवसायाच्या माध्यमातून जी काही शिल्लक रक्कम कुटुंबासाठी ठेवली होती त्यातून जयश्री फडतरे यांच्या पुढच्या शिक्षणासाठी खर्च करू असे त्यांनी नियोजन केले होते. परंतु जयश्री फडतरे यांनी कुटुंबाच्या त्या संकट काळामध्ये कुटुंबाला हातभार लावण्यासाठी, आपल्या परिवाराला आधार देण्यासाठी नोकरी करण्याचे ठरवले. जयश्री फडतरे यांच्या मोठ्या बहिणीला पोलिओ असल्यामुळे, त्या अपंग असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्यांची काळजी घ्यावी लागायची तसेच जयश्री फडतरे यांची दोन नंबरची मोठी बहीण सुजाता यांचे लग्न झाल्यामुळे त्या त्यांच्या सासरी राहत होत्या. त्यामुळे त्याकाळी आई-वडील व भाऊ-बहीण हे चार जणांचे कुटुंब खडतर परिस्थितीशी संघर्ष करत होते. वयाच्या 18 व्या वर्षी जयश्री फडतरे यांनी दाताच्या दवाखान्यामध्ये एक सर्वसामान्य कर्मचारी म्हणून चारशे रुपयांच्या पगारावरती काम करण्यास त्याकाळी सुरुवात केली.
उच्च शिक्षण घेण्याच्या वयात गंभीर आजाराशी संघर्ष करणाऱ्या आपल्या वडिलांना साथ देण्यासाठी, आपल्या कुटुंबाला छोटासा हातभार लावण्यासाठी, जयश्री फडतरे यांनी हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्याचा घेतलेला निर्णय कमी वयामध्ये जबाबदारीचे भान देऊन जाणारा होता. आपली मुलगी उच्च शिक्षण घेण्याच्या वयामध्ये आपल्या कुटुंबासाठी हॉस्पिटलमध्ये नोकरी करते याची खंत जयश्री फडतरे यांच्या वडिलांना होती तरी देखील मुलीच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देऊन, तिची व्यवस्थित काळजी घेऊन, तिच्या प्रगतशील वाटचालीसाठी नेहमीच त्यांनी खंबीर पाठिंबा दिला. जयश्री फडतरे यांनी सहा महिने दीक्षित हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केले. दातांच्या दवाखान्याची स्वच्छता करण्यापासून, साफसफाई करण्यापासून ते रुग्णांची नोंद करण्यापासून ते रुग्णांना डॉक्टरकडे पाठवण्यापर्यंत ते दातांच्या उपचारांची सर्व पूर्वतयारी करण्यामध्ये जयश्री फडतरे यांचा हातखंड झालेला होता. हॉस्पिटलची एक सामान्य कर्मचारी असताना देखील रुग्णांना खूप चांगल्या प्रकारे सेवा दिल्यामुळे कमी कालावधीमध्ये जयश्री फडतरे यांनी डॉक्टरांचा विश्वास संपादन केला.
कोरेगावमध्ये जयश्री फडतरे यांचे कुटुंब पत्र्याच्या शेडच्या घरामध्ये वास्तव्य करत होते. आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक आधार कसा देता येईल? आपले उत्पन्न कसे वाढवता येईल? यासाठी त्याकाळी जयश्री फडतरे खूप चिकाटीने प्रयत्न करायच्या. 2004 ला जयश्री फडतरे यांनी कोरेगावमध्ये एका कपड्याच्या दुकानात सातशे रुपये पगारावरती काम सुरू केले. सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ असे बारा तास त्यांना त्या कपड्याच्या दुकानात काम करावे लागायचे. महिलांचे मॅचिंग सेंटर असल्यामुळे महिलांचे ड्रेस, ब्लाउज, साड्या व विविध प्रकारची महिलांची कपडे असल्यामुळे त्या दुकानात खूप गर्दी असायची. जयश्री फडतरे त्या कपड्याच्या दुकानात महिला ग्राहकांना उत्तम सेवा देऊन ते दुकान व्यवस्थितपणे सांभाळायच्या.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
कपड्याच्या दुकानातील नोकरीबरोबरच संध्याकाळच्या वेळेस जयश्री फडतरे साड्यांच्या पिको फॉलची कामे करूनही त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत होत्या तसेच अजून काही करता येईल का उत्पन्न वाढवण्यासाठी यासाठी त्यांचा शोध चालू होता. त्याकाळी कोरेगावमध्ये महिला वर्गाचे व्यवस्थापन असलेली "सईबाई पतसंस्था" चालू झाली होती. त्या पतसंस्थेमध्ये जयश्री फडतरे यांनी पिग्मी एजंट म्हणून काम चालू केले. दिवसाचे बारा तास कपड्याच्या दुकानात काम करत असताना देखील दिवसभरातील चार ते साडेपाच या वेळेमध्ये कपड्याच्या दुकानाच्या मालकांची परवानगी घेऊन जयश्री फडतरे कोरेगावमध्ये पाच - सात किलोमीटरचा पायी प्रवास करून सईबाई पतसंस्थेसाठी कलेक्शनचे काम खूप जिद्दीन व चिकाटीने करत होत्या.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आयुष्यात पुढे जाण्याचा, काहीतरी नवीन करण्याचा, विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करण्याचा जयश्री फडतरे यांचा ध्यास त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. कपड्याच्या दुकानात बारा तास काम करत असतानाच जयश्री फडतरे यांनी बॅचलर ऑफ आर्ट या डिग्रीसाठी शिवाजी विद्यापीठात बहिस्थ (एक्स्टर्नल) प्रवेश घेतला व अभ्यास चालू केला. त्याकाळी नामांकित पतसंस्थेसाठी काम करण्यासाठी महिला पिग्मी एजंट ग्रामीण भागामध्ये फार दुर्मिळ होत्या. त्याकाळी जयश्री फडतरे सईबाई पतसंस्थेसाठी कलेक्शन करत असताना दहा रुपयाची पावती असो, वीस रुपयांची, पन्नास रुपयांची असो किंवा शंभर रुपयांची असो संपूर्ण कोरेगावच्या परिसरात सात ते आठ किलोमीटरचा प्रवास पायी करून त्यांचे काम त्या प्रामाणिकपणे करत होत्या. सईबाई पतसंस्थेच्या ग्राहकांना उत्तम सेवा देऊन, पतसंस्थेचे केलेले सर्व रोजचे कलेक्शन वेळच्या वेळेत पतसंस्थेमध्ये भरून, ग्राहकांना कर्जासाठी देखील सर्व प्रकारचे सहकार्य करून, प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केल्यामुळे अल्पावधीतच जयश्री फडतरे यांनी सईबाई पतसंस्थेच्या व्यवस्थापकांची मने जिंकली.
काही महिन्यांनी जयश्री यांचे वडील सुभाष वर्पे यांनी एक जुनी सायकल घेऊन दिल्यामुळे जयश्री फडतरे सईबाई पतसंस्थेच्या कलेक्शनचे काम त्या सायकलवरूनच करत असे. सईबई पतसंस्थेच्या एका लांब अंतरावरती राहणाऱ्या ग्राहकाला सेवा देण्यासाठी कुठलाच कर्मचारी तयार होत नव्हता त्यावेळेस जयश्री फडतरे सकाळी सहा वाजता घरातून सायकल घेऊन बाहेर पडत व चार किलोमीटर जाण्याचा व चार किलोमीटर येण्याचा प्रवास करून दहा रुपयाची पावती घेऊन, पुन्हा कपड्याच्या दुकानांमध्ये दिवसभराचे बारा तासाचे काम त्या खूप निष्ठेने करत होत्या.
"कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेऊन, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन खेळण्या - बागडण्याच्या वयामध्ये जयश्री फडतरे आपल्या कुटुंबासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत 14 - 14 तास काम करत होत्या ही ऊर्जा त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळत होती. जयश्री फडतरे रोज चार ते साडेपाचच्या दरम्यान सईबाई पतसंस्थेसाठी कलेक्शन करत होत्या ते कलेक्शन केलेले सर्व पैसे व पावत्या घरी वडिलांच्याकडे देत. त्यानंतर पुन्हा त्या कपड्याच्या दुकानात कामाला जात. परंतु त्या वेळेमध्ये जयश्री यांचे वडील पतसंस्थेचे कलेक्शन केलेल्या सर्व पावत्या व पैसे यांचा हिशोब व्यवस्थित करून, सर्व त्याचे रिपोर्ट व्यवस्थित बनवून आपल्या मुलीला तिच्या कामांमध्ये चांगल्या प्रकारे मदत करत. जयश्री फडतरे यांच्या आई सुभद्रा वर्पे या देखील जयश्री यांची खूप काळजी घेत होत्या. कलेक्शन करून आल्यानंतर जयश्री फडतरे कितीही गडबडीत असल्या तरी त्यांची आई त्यांना गरम गरम चहा पिल्याशिवाय कपड्याच्या दुकानात कामाला सोडत नसे."
जयश्री फडतरे यांचे आई-वडील व भाऊ, बहीण,कुटुंबातील सर्व सदस्य कुटुंबाच्या हितासाठी त्यांचे योगदान प्रामाणिकपणे देत होते. जयश्री फडतरे कपड्याच्या दुकानात काम करत असतानाच सईबई पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होत्या तसेच कोरेगाव मध्ये नव्याने सुरू झालेल्या कराड अर्बन पतसंस्थेच्या देखील पिग्मी एजंट म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढले पाहिजे, आपल्याला प्रगतीच्या नव नवीन संधी मिळाल्या पाहिजेत या उद्देशानेच त्या काळात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील कामे करण्यास सुरुवात केली होती.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
जयश्री फडतरे यांच्या वडिलांच्या मित्राची मुलगी रूपाली पवार या त्याकाळी टायपिंगमध्ये खूप पारंगत होत्या. रूपाली पवार यांचे टायपिंगचे स्पीड पाहून जयश्री फडतरे यांनाही त्यावेळी टायपिंग तसेच कम्प्युटर कोर्स करण्याची, नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा झाली. रूपाली पवार यांच्या सहकार्याने व कोरेगाव मधील जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री फडतरे यांचा टायपिंग व कम्प्युटरचा एम. एस. ऑफिस कोर्स चालू झाला. जयश्री फडतरे यांच्या दिवसभराच्या 14 तासाच्या कामाच्या वेळा पत्रकात क्लासच्या एका तासाची पुन्हा एकदा भर पडली होती. जयश्री फडतरे पहाटे पाच वाजता उठून पावणे सहा वाजता घरातून बाहेर पडत सहा वाजताच पतसंस्थेच्या कलेक्शन साठी जात असत आणि तिकडून येताना सात वाजता थेट जाधव सरांचा क्लास स्वतः उघडून सात ते आठ प्रॅक्टिस करत व आठ ते नऊ या वेळेमध्ये जाधव सरांकडून टायपिंग व एम. एस. ऑफिसचे शिक्षण घेत होत्या. त्यानंतर नऊ ते नऊ पुन्हा कपड्याच्या दुकानातील नोकरी व दोन पतसंस्थांमधील कलेक्शनचे काम असा धकाधकीचा व कष्टाचा प्रवास त्यांचा त्याकाळी चालू होता.
"पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत या सोळा तासांच्या व्यस्त वेळापत्रकात सकाळच्या पतसंस्थेच्या कलेक्शन पासून झालेली सुरुवात, कॉम्प्युटर क्लास साठी दिलेले 2 तासाचा वेळ त्यानंतर बारा तासांची कपड्याच्या दुकानातले ड्युटी, दोन पतसंस्थांमधील कलेक्शन हे पंधरा-सोळा तास दिवसभर काम करण्याचे बळ येते कुठून? हा प्रश्न पडावा असा हा त्या काळातला जयश्री फडतरे यांचा विलक्षण, अद्भुत प्रवास होता. सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगी आपल्या कुटुंबाच्या अडचणीच्या काळात, प्रतिकूल परिस्थिती असताना काय करू शकते? कुटुंबाला कसा आधार देऊ शकते? कुटुंबाला कसा हातभार लावू शकते? याचे जिवंत उदाहरण जयश्री फडतरे यांनी त्याकाळी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिलेले आहे."
कोरेगावमधील दिवसभरातील व्यस्त वेळापत्रकामुळे जयश्री फडतरे यांना कम्प्युटर क्लास व टायपिंगचे प्रॅक्टिस साठी पुरेसा वेळ मिळायचा नाही. त्यामुळे जाधव सर एकदा त्यांच्यावरती चिडले त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटले परंतु या प्रसंगाला त्यांनी सकारात्मक घेऊन सुट्टीच्या दिवशी टायपिंगचे व कम्प्युटरचे भरपूर प्रॅक्टिस केले व त्यानंतर टायपिंगची परीक्षा पास होईल का नाही अशी शंका वाटणारी व्यक्ती असणाऱ्या जयश्री फडतरे यांनी मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषेच्या टायपिंगच्या परीक्षेमध्ये उत्तुंग व मोठे यश मिळवले.
कम्प्युटरच्या एम.एस. ऑफिस कोर्सच्या परीक्षेतही खूप चांगले यश मिळवले. जाधव सरांना जयश्री फडतरे यांच्या या उत्तुंग कामगिरीचा खूप अभिमान वाटला. दिवसभर पंधरा - सोळा तास काम करून, कम्प्युटर, टायपिंगच्या परीक्षेचा अभ्यास करून, प्रॅक्टिस करून मिळालेले हे उत्तुंग यश सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी होते. जयश्री फडतरे यांची त्यावेळी कम्प्युटरची फी देणे बाकी होते त्यामुळे जाधव सरांनी त्यांना त्यांच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी सात ते आठ या वेळेत कंप्यूटर कोर्ससाठीच्या एका बॅचला शिकवण्याचा प्रस्ताव दिला.
जयश्री फडतरे यांनी जाधव सरांच्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये सकाळच्या सात ते आठच्या बॅचमधील विद्यार्थ्यांना एम. एस. सी. आय. टी. व एम. एस. ऑफिस शिकवायला सुरुवात केली. यानंतरच्या काळामध्ये जयश्री फडतरे यांना कोरेगावमध्येच ॲड.शितल बर्गे यांच्याकडे टायपिंगची कामे करण्याची संधी मिळाली परंतु त्यासाठी त्यांना कपड्याच्या दुकानातील काम उरकल्यानंतर रात्री साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत ते काम करावे लागायचे. वकिलांची मोठी पुस्तके, नोट्स यामधील एका पानाच्या टायपिंग साठी त्यांना चार रुपये मिळायचे त्यामुळे जास्तीत जास्त पानांचे टायपिंग करून कसे आपले उत्पन्न वाढेल यासाठी जयश्री फडतरे त्याकाळी प्रयत्न करत होत्या.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"पहाटे पाच वाजता उठून सकाळी सहा वाजता पतसंस्थेच्या कलेक्शन साठी जाणे. त्यानंतर सात वाजता आल्यानंतर सात ते आठ जाधव सरांच्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांचा क्लास घेणे. त्यानंतर सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत बारा तास कपड्याच्या दुकानांमध्ये काम करणे. दोन पतसंस्थांमध्ये कलेक्शन करणे व कपड्याच्या दुकानातील काम संपल्यानंतर पुन्हा ॲड. शितल बर्गे यांच्याकडे साडेनऊ ते साडेअकरा - बारा पर्यंत पुन्हा टायपिंगचे काम करणे हा जयश्री फडतरे यांचा 16 - 18 तासांचा रोजचा कामाचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. खूप कठीण आणि प्रत्येकालाच अचंबित करणारा होता. एक महिला रणरागिणी आपल्या कुटुंबासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये, संकटांच्या परिस्थितीमध्ये काय करू शकते? कुटुंबाच्या प्रगतशील वाटचालीसाठी किती जिद्दीने, चिकटीने लढू शकते हे उदाहरण जयश्री फडतरे यांनी त्याकाळी त्यांच्या कर्तुत्वातून सर्वांना दाखवले आहे आणि त्यांचे हे उदाहरण महाराष्ट्रातील सर्व मुलींसाठी, महिला वर्गासाठी खूपच प्रेरणादायी आहे."
कोरेगावमधील कपड्याच्या दुकानात जयश्री फडतरे यांनी दीड वर्ष काम केल्यानंतर कुठेतरी आता भविष्यासाठी नवीन वाटचाल सुरू करायला हवी त्यामुळे कोरेगावमध्ये नव्याने सुरू झालेल्या कराड मर्चंट पतसंस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरीस सुरुवात केली. त्यावेळेस त्यांना पगार खूप कमी होता. चारशे रुपये पगारावरती त्यांनी त्या बँकेमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर या पदावरती नोकरी सुरू केली. परंतु नेहमीच त्यांना नवनवीन क्षेत्रामधील ज्ञान घेणे, नवीन कौशल्य आत्मसात करणे व नवीन क्षेत्रातील अनुभव घेणे आवडत असल्यामुळे त्यांनी बँकेतील कामाची नव्याने कारकीर्द सुरू केली.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
त्यावेळी कोरेगाव मधील दोन पतसंस्थांच्या कलेक्शनचे काम, रात्रीचे टायपिंगचे काम देखील त्यांचे चालू होते. याच दरम्यान "ग्रामसॉफ्ट" या महाराष्ट्रातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीची टीम कोरेगावमध्ये कोरेगाव ग्रामपंचायतीला त्या सॉफ्टवेअरची सेवा देण्यासाठी आली होती आणि त्यांना त्या सॉफ्टवेअरसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर काम करणाऱ्या हुशार व्यक्तीची आवश्यकता होती. जाधव सरांच्या शिफारशीनुसार त्यावेळी जयश्री फडतरे यांनी या सॉफ्टवेअरसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करण्याच्या ही संधी घेण्याचे ठरवले. कराड मर्चंट बँकेत त्यावेळेस जयश्री फडतरे यांना खूपच कमी पगार असल्यामुळे चार महिन्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून त्यांनी कोरेगाव ग्रामपंचायत सरकारी कार्यालयात त्या ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअरसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.
"कोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयमध्ये ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअरसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या जयश्री फडतरे यांना त्यावेळेस पुसटशी कल्पनाही नसेल की भविष्यात याच ग्रामसॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनीसाठी पुणे शहरात या कंपनीसाठी सामान्य कर्मचारी ते मार्केटिंग व सेवा क्षेत्रात चांगल्या पदावरती काम करण्याची संधी मिळेल आणि काही वर्षांनी याच कंपनीच्या त्या संचालिका व मालकीन होतील असे स्वप्नातही त्यांना वाटले नसेल. एका रणरागिनीची जिद्द, चिकाटी, मेहनत त्यांना भविष्यात कोणत्या मोठ्या पदावरती घेऊन जाईल? कोणती मोठी स्वप्न पूर्ण करतील? हे त्याकाळी समजत नसले तरी तुमचा प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, निष्ठा, मेहनत तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात खूप मोठे उत्तुंग यश मिळवून देते."
कोरेगावमध्ये भाड्याच्या पत्र्याच्या शेडच्या खोलीमध्ये राहणारे जयश्री फडतरे यांचे कुटुंब त्याकाळी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत होतेच परंतु जयश्री फडतरे यांच्या वडिलांनी त्यांच्या व्यवसायिक कारकीर्दीतून शिल्लक ठेवलेले जी काही रक्कम होती. तसेच त्याकाळी कुटुंबातले जे उत्पन्न होते याच्या बळावरती त्यांनी कोरेगावात एक गुंठा जागा विकत घेऊन 2004 ला तीन रूमचे घर बांधले.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी ते घर बांधण्यासाठी त्याकाळी खूप मेहनत घेतली. माझे आई - वडील, भाऊ, बहीण या सर्वांच्या मेहनतीने, सहकार्याने ते आमचे घर उभे राहिलेले होते. आमच्या घराच्या एका - एका विटेबरोबर आमच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत कारण गवंड्याच्या हाताखालची मजुरीचे सर्व कामे आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी केलेले होती. त्यामुळे आमचे घर हा आमच्यासाठी खूप हृदयस्पर्शी प्रवास होता. त्याकाळी घर बांधण्यासाठी हजार - दोन हजार रुपयांचे जुळवणे असो, उधारी असो, पतसंस्थेचे घेतलेले लोन असो तसेच बहिणीची मदत व नातेवाईकांनी केलेली मदत असो, आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मेहनतीने, एकजुटीमुळे व सहकार्यामुळेच आम्हाला ते आमचं स्वतःचं घर कोरेगावमध्ये उभे करता आले याचे खूप समाधान आहे." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
"माझा भाऊ देखील त्याकाळी त्याच्या कामातून आमच्या कुटुंबाला हातभार लावण्याचा, आधार देण्याचा खूप प्रयत्न करत होता. माझ्या भावाला पतसंस्थेमधील कलेक्शनचे काम मी शिकवल्यामुळे तो देखील त्या कामांमध्ये चांगला पारंगत झाला व त्यानंतर शिवकृपा पतसंस्थेत त्याच्या कामाचा चांगला जम बसला व आमच्या कुटुंबाची प्रगतशील वाटचाल चालू झाली. 2005 ला माझ्या भावाचे लग्न झाले. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ असेल तर कितीही मोठी अडचण आली तरी ती नक्कीच दूर होते." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवरून प्रवास चालू असताना जयश्री यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचे लग्न. सातारा जिल्ह्यातील, कोरेगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील निर्व्यसनी व प्रेमळ स्वभावाच्या सोमनाथ फडतरे या तरुणाशी त्यांचा 2005 मध्ये विवाह झाला. शेतकरी कुटुंबातील असणारे सोमनाथ फडतरे त्यावेळी कराड अर्बन बँकेमध्ये पासिंग ऑफिसर या पदावरती कार्यरत होते. कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली या गावातील फडतरे कुटुंबात जयश्री यांचा संसार, लग्नानंतरचे नवीन आयुष्य आनंदाने सुरू झाले.
कोरेगाव ग्रामपंचायत सरकारी कार्यालयातील नोकरीसाठी जयश्री फडतरे यांचा वाठार किरोली ते कोरेगाव हा प्रवास चालू झाला. जयश्री यांच्या सासरच्या माणसांनी पाठिंबा दिल्यामुळे जयश्री फडतरे रोज एसटीने सकाळी आठ वाजता नोकरीसाठी कोरेगावला जात व सायंकाळी सात वाजेपर्यंत एसटीनेच घरी येत. जयश्री यांचे पती सोमनाथ फडतरे यांनी कराड अर्बन बँकेत कमी पगार असल्यामुळे राजीनामा दिला व त्यानंतर सांगलीतील एग्रीकल्चर कंपनीमध्ये ते नोकरी करू लागले. सांगली ते सातारा जास्त अंतर असल्यामुळे सोमनाथ फडतरे यांनी कुटुंबातील सदस्यांची चर्चा करून, कोरेगावला राहायला जाण्याचा निर्णय घेतला. जयश्री फडतरे व त्यांचे पती सोमनाथ फडतरे व त्यांची भाची हे तिघेजण कोरेगावला भाड्याच्या घरामध्ये राहायला गेले. जयश्री फडतरे यांचे कोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयातील नोकरी सुरूच होती परंतु भविष्याची चिंता असल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी अजून नवीन काय करता येईल? याचा त्यांचा शोध त्याकाळी चालूच होता. जयश्री फडतरे यांच्याबरोबर त्यांची भाची कोरेगावमध्ये भाड्याच्या खोलीत रहायला होती तसेच जयश्री यांचे पती सोमनाथ फडतरे आठवड्यातून दोन दिवस सांगलीवरून कोरेगावला येत असे.
कोरेगावमधील दहा - बाय - दहाच्या भाड्याच्या रूममध्ये जयश्री फडतरे यांचे नवीन संसारिक आयुष्य सुरू झाले असले तरी ग्रामीण भागामध्ये प्रगतीच्या मोठ्या संधी त्यांना त्याकाळी दिसत नव्हत्या. त्यामुळे मोठ्या शहरात जाऊन दोघेही चांगली नोकरी करून पुढे आपल्या कुटुंबाच्या प्रगतशील वाटचालीसाठी प्रयत्न करू असा विचार त्यावेळी त्यांच्या मनामध्ये होता. जयश्री फडतरे यांच्या पोटामध्ये पाच महिन्याचे बाळ असल्यामुळे त्या बाळाच्या भविष्याची त्यांना चिंता होती त्यामुळे त्यावेळी त्यांनी पुणे शहरामध्ये दोघांनी नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"माझे सासरचे शेतकरी कुटुंब असल्यामुळे घरची परिस्थिती जेमतेमच होती. सासरची सर्व मंडळी मनमिळाऊ व प्रेमळ होती तसेच कुटुंबाच्या प्रगतीसाठी सर्वजण झटत होते. माझ्या सासरी शेतीच्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता परंतु सासरी वाठार किरोलीत नवीन बांधलेल्या घराच्या कर्जामुळे आर्थिक ताण होताच तरी देखील आमच्या सासरच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकजुटीने आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत होते. कोरेगावला ग्रामपंचायत कार्यालयात नोकरी करत असताना माझ्या पोटात पाच महिन्याचे बाळ असल्यामुळे आमच्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याची खूप चिंता होती. त्यावेळी ग्रामीण भागात आम्हा दोघांनाही नोकरीच्या माध्यमातून प्रगतीच्या मोठ्या संधी नव्हत्या त्यामुळे विचारपूर्वक आम्ही पुणे शहरात नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
2006 सालच्या डिसेंबरमध्ये सहा महिन्याचे बाळ पोटात असताना जयश्री फडतरे व त्यांचे पती सोमनाथ फडतरे पुणे शहरात नोकरीच्या शोधात आले. सुरुवातीच्या काळात जयश्री फडतरे या त्यांच्या पुण्यात राहणाऱ्या बहिणीच्या घरी राहूनच त्यांच्या पतीसह नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होत्या. तो सुरुवातीचा पंधरा दिवसाचा काळ त्यांच्यासाठी खरच खूप कठीण होता. रोज सकाळी सातला बहिणीच्या घराबाहेर पडल्यानंतर दोघेही नोकरीच्या शोधात संपूर्ण पुणे शहरात फिरत बसने प्रवास करत, अनेक वेळा चालतही प्रवास करत.
जयश्री फडतरे त्यावेळी रोज दोन मुलाखती देत होत्या परंतु त्यांचे कुठेच मनायोग्य काम होत नव्हते. बहिणीच्या घरून सकाळचा नाश्ता करून निघाल्यानंतर जयश्री फडतरे व त्यांचे पती सोमनाथ फडतरे दिवसभर एक भेळ दोघांत खाऊन नोकरीसाठी मुलाखती देत होते. एका वडापाववरती संपूर्ण दिवस काढून दिवसभरात पुणे शहरात विविध ठिकाणी मुलाखतीसाठी जाऊन संध्याकाळी दहा वाजता ते दोघेजण घरी जायचे.
ग्रामीण भागातून पुणे शहरात येणाऱ्या कुठल्याही नवीन व्यक्तीसाठी नोकरीसाठी सुरुवातीचा काळ खूप संघर्षाचा असतोच परंतु पोटात सहा महिन्याचे बाळ असताना नोकरीसाठीचा हा पुण्यातला संघर्ष त्या दोघांसाठी खूप कठीण व परीक्षा घेणार होता.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"पुणे शहरातल्या नोकरी शोधण्याचा सुरुवातीच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या बहिणीचे व दाजींचे आम्हाला खूप सहकार्य मिळाले. त्या पंधरा दिवसांमध्ये रोज दोन मुलाखती देऊन देखील कुठेही नोकरी मिळत नव्हती. शेवटी पंधराव्या दिवशी एक शेवटची मुलाखत देऊन पुन्हा कोरेगावला जाण्याचे ठरवले. पंधराव्या दिवशी पुण्यातील के.के. मार्केटला ॲड.कदम यांच्या कार्यालयात दिलेल्या मुलाखतीमध्ये माझी टायपिंगच्या नोकरीसाठी निवड झाली. नोकरी मिळाल्यामुळे एका बाजूला आनंद होता परंतु पुढचा संघर्ष हे आमच्यासाठी काही सोपा नव्हता. माझ्या पोटातील बाळाची चिंता, आईचा लढाऊ बाणा आम्हाला आमच्या जगण्याचा संघर्षाला बळ देत होता." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
पुण्यातील सुरुवातीच्या 14 दिवसांमध्ये जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे यांचे नोकरीचे कुठेच काम झाले नसल्यामुळे सोमनाथ फडतरे 15 व्या दिवशी सकाळी कोरेगावला निघून गेले होते. परंतु जयश्री फडतरे शेवटच्या मुलाखतीसाठी पंधराव्या दिवशी पुण्यातच थांबल्या होत्या. पंधराव्या दिवशीच्या ॲड.कदम यांच्या कार्यालयातील मुलाखत दिल्यानंतर जयश्री फडतरे यांना अखेर नोकरी मिळाली. जयश्री फडतरे यांची पंधरा दिवसांमधली नोकरी मिळवण्यासाठीचे जिद्द, चिकाटी, मेहनत आणि त्यांच्या पोटातील बाळाच्या भविष्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष व त्यांच्या पतीने त्यांना दिलेली खंबीर साथ यामुळेच शेवटच्या दिवशी व शेवटच्या प्रयत्नात त्यांना पुण्यात नोकरी मिळाली.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात नोकरीसाठी येणाऱ्या मुली, महिला काही दिवसांच्या संघर्षातच अपयश आल्यानंतर पुन्हा गावी निघून जातात. परंतु जयश्री फडतरे यांनी त्यांच्या पोटात सहा महिन्याचे बाळ असताना देखील एवढा मोठा संघर्ष करून, जिद्दीने, चिकाटीने व मेहनतीने पुण्यात नोकरी मिळवली व शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडू नयेत. यश नक्कीच मिळते हे त्यांनी त्यांच्या त्यावेळेसच्या कृतीतून दाखवून दिले.
पंधराव्या दिवशी शनिवारी झालेल्या मुलाखतीमध्ये ॲड. कदम यांनी जयश्री फडतरे यांची निवड केल्यानंतर लगेच सोमवारी कामावरती रुजू व्हायला सांगितले. त्याच दिवशी जयश्री फडतरे कोरेगावला गेल्या. कोरेगावला घेतलेली भाड्याची रूम सर्व हिशोब पूर्ण करून सोडली व सोमवारी सकाळी त्यांचे पती सोमनाथ फडतरे यांच्यासह त्या पुण्यात ॲड.कदम यांच्या कार्यालयात कामासाठी रुजू झाल्या. 2500 रुपये पगारावरती जयश्री फडतरे यांनी पुण्यातील या पहिल्या नोकरीला सुरुवात केली. सुरुवातीचा एक महिना त्यांच्यासाठी खूपच अडचणींचा व संघर्षाचा ठरला. नातेवाईकांच्या घरी अगोदरच पंधरा दिवस राहिल्यामुळे नवीन रूम शोधण्यासाठी जयश्री फडतरे व त्यांचे पती सोमनाथ फडतरे यांचे प्रयत्न त्यावेळेस चालूच होते.
दांडेकर पूल ते स्वारगेट जयश्री फडतरे व त्यांचे पती सोमनाथ फडतरे चालत जात. तिथून जयश्री या रिक्षातून केके. मार्केटला त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जात परंतु त्यावेळी सोमनाथ फडतरे पुन्हा स्वारगेट ते के.के. मार्केट व के.के. मार्केट ते धनकवडी पर्यंत चालत जात. तो काळ त्या दोघांसाठी खूप आर्थिक अडचणींचा होता. सोमनाथ फडतरे त्यावेळी नोकरी शोधण्यासाठी तसेच नवीन रूम शोधण्यासाठी त्यांच्या मित्राबरोबर खूप प्रयत्न करत होते. जयश्री फडतरे कामावरती असताना दुपारच्या वेळी ब्रेकमध्ये के.के.मार्केट वरून धनकवडी येथे चालत त्यांच्या पतीला भेटण्यासाठी येत व त्या ठिकाणी त्यांच्या मित्राच्या दुकानावरती दोघेजण एकत्र जेवण करत व त्यानंतर जयश्री फडतरे त्यांच्या कार्यालयात जात. आर्थिक परिस्थितीशी संघर्ष चालू असणाऱ्या अशा कठीण काळात त्या दोघांनी एकमेकांना खूप खंबीर साथ दिली.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
दहा-बारा दिवसानंतर सोमनाथ फडतरे यांना धनकवडीमध्ये एक भाड्याची रूम राहण्यासाठी मिळाली. पहिल्या दिवशी भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी गेल्यानंतर जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे यांच्याकडे काहीच साहित्य नव्हते. अंगावरच्या कपड्यानिशी ते भाड्याच्या खोलीत राहायला आले होते. त्या दिवशी सोमनाथ फडतरे यांच्या मित्राच्या दुकानातील जुन्या गाद्यांचे कापडे घेऊन ती गाद्यांची जुनी कापडे खोलीमध्ये अंथरूनच त्यावरतीच ते दोघेजण झोपले.
"पुण्यातली नोकरी मिळाल्यानंतर एका बाजूला आनंद तर होताच परंतु खूप मोठी संकटांची मालिका आमच्या समोर उभी होती. त्यावेळेस आर्थिक अडचणी खूप मोठया होत्या. नवीन भाड्याच्या रूममध्ये राहायला गेल्यानंतरचे चार-पाच दिवस आमच्यासाठी खूप भयानक होते. जुन्या गादीच्या फाटक्या कापडांवरती आम्ही दोघे झोपायचो. सकाळी कामाला बाहेर पडल्यानंतर एक वडापाव घेतल्यानंतर त्यावेळेस त्याबरोबर जे सॅम्पल मिळायचे तेच सॅम्पल आम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पार्सल करायचो आणि घेऊन जायचो आणि संध्याकाळी त्याच सॅम्पल बरोबर पाव खाऊन आम्ही तो दिवस कसाबसा काढायचो. वेळेप्रसंगी पाण्याबरोबर पाव खाऊन देखील आम्ही आमची भूख भागवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आर्थिक अडचण असल्यामुळे लगेच साहित्य आणण्यासाठी गावी जाऊ शकत नव्हतो त्यामुळे त्या कठीण प्रसंगांना आम्हा दोघांनाही तोंड द्यावे लागले." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
चार-पाच दिवसांनी सोमनाथ फडतरे यांच्या गावावरून त्यांचे साहित्य, भांडी, वस्तू घेऊन एक गाडी पुण्याला आली. यासाठी सोमनाथ फडतरे यांचे पुतणे, कुटुंबीय तसेच जयश्री फडतरे यांचा भाऊ यांनी खूप सहकार्य केले असल्याचे जयश्री फडतरे सांगतात.
पुण्यातील भाड्याच्या खोलीत जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे यांचा संसार चालू झालेला असला तरी पुढचा संघर्षमय काळ त्यांच्यासाठी परीक्षा घेणारच होता. सोमनाथ फडतरे यांना पुण्यातील इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये नोकरी मिळाली परंतु त्यांचा पगार दोन महिन्यांनी होणार असल्यामुळे त्या काळात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. धनकवडी ते बिबेवाडी सोमनाथ फडतरे नोकरीसाठी चालत जात व येतानाही चालतच येत. पुण्यासारख्या मोठया शहरात नोकरी शोधायला आलेल्या विवाहित जोडप्याला सुरुवातीच्या काळात मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागतेच.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"माझ्या पोटात नऊ महिन्याचे बाळ असताना देखील मी नोकरी करत होते. यावेळी माझ्या पतीने,सासूने खूप काळजी घेतली. माझ्या बहिणीने देखील या कठीण काळात आम्हाला खूप साथ दिली. माझी खूप काळजी घेतली. नवव्या महिन्यातील सोनोग्राफी करण्यापासून ते कॅल्शियमच्या गोळ्या देण्यापासून ते सर्व प्रकारची काळजी माझ्या बहिणीने घेतली. आईची ताकद या जगात खूप मोठी असते. कितीही मोठे संकट आले तरी त्या विरोधात लढण्याचे बळ आईची अंतरिक ऊर्जा देत असते." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
जयश्री फडतरे यांच्या पोटातील बाळ नऊ महिन्याचे असताना त्यांच्या सासूने पुण्यात राहून देखील त्याकाळी त्यांची खूप काळजी घेतली. जयश्री फडतरे यांच्या वडिलांनी जयश्री यांना प्रसूतीसाठी नवव्या महिन्यांमध्ये कोरेगावला घेऊन गेले. कोरेगावला जयश्री फडतरे यांच्या आई, वडील, आजी,भाऊ व मावशी यांनी त्यांच्या प्रसूतीच्या वेळी खूप काळजी घेतली. 2007 मध्ये जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे यांनी सोमवारच्या दिवशी एका सुंदर मुलाला जन्म दिला. फडतरे कुटुंबातील सदस्यांना आणि वर्पे कुटुंबातील सदस्यांना यामुळे खूप आनंद झाला. जयश्री फडतरे यांच्या आयुष्यातील हा खूप आनंदाचा क्षण होता. सुंदर, देखण्या व राजबिंड्या असणाऱ्या या मुलाचे नाव स्वयंम ठेवण्यात आले.
"जयश्री फडतरे यांनी आपल्या पोटातल्या ज्या बाळासाठी संघर्ष केलेला होता त्या सुंदर बाळाचा जन्म झाल्यामुळे पुढच्या त्यांच्या जगण्याला आणखीन बळ मिळाले होते. प्रत्येकाला आपल्या बाळाच्या भविष्याची चिंता असतेच. आपल्या बाळाच्या प्रगतशील वाटचालीसाठी प्रत्येक आई संघर्ष करते, लढते, आपल्या मुलाला चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करत असते."
जयश्री फडतरे यांच्या कुटुंबात स्वयंमचा जन्म झाल्यामुळे त्यांना आनंद होताच परंतु जयश्री फडतरे यांना पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या पतीची सोमनाथ फडतरे यांची काळजी होती तसेच त्या कालावधीमध्ये त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक अडचणींचा सामना चालूच होता. जयश्री फडतरे यांच्या मुलाचे बाराव्या दिवशी बारसे झाल्यानंतर तेराव्या दिवशीच जयश्री फडतरे त्यांच्या पतीला घेऊन, कुटुंबीयांसह पुण्याला रेल्वेने आल्या.
"कुठल्याही स्त्रीला मुलाला जन्म दिल्यानंतर काही महिने विश्रांतीची खूप गरज असते. परंतु जयश्री फडतरे तेराव्या दिवशीच आपल्या मुलाला घेऊन रेल्वेने पुण्याला आल्या. शरीरामध्ये अशक्तपणा असताना देखील त्यांच्या पतीची काळजी, कुटुंबाचा आर्थिक अडचणींशी सामना तसेच जन्म झालेल्या बाळाच्या भविष्याची चिंता यामुळे त्यांनी त्यावेळी खूप मोठा साहसी निर्णय घेतला."
सुरुवातीच्या काळात पाच आठवडे जयश्री फडतरे यांच्या सासू शांताबाई फडतरे या जयश्री यांची काळजी घेण्यासाठी होत्या त्यानंतर त्या पुन्हा गावी गेल्या. जयश्री फडतरे यांच्या कुटुंबाला भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, बाळाच्या भविष्याची चिंता त्यांना घरी स्वस्थ बसून देत नव्हती. जयश्री फडतरे यांचा मुलगा स्वयंम दोन महिन्याचा झाल्यानंतर त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जयश्री फडतरे यांच्या सासू बाळाची काळजी घेण्यासाठी पुन्हा पुण्याला आल्या.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"माझ्या सासूबाईंनी माझ्या मुलाची चार-पाच वर्ष खूप चांगली काळजी घेतली. त्यामुळे पुण्यात मी नोकरी करू शकले. माझ्या बाळाच्या आजीने दिलेले प्रेम, केलेली माया, घेतलेली काळजी आमचे कुटुंबीय कधीच विसरू शकत नाही." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
जयश्री फडतरे यांचे दोन महिन्याचे बाळ असताना त्यांनी पुन्हा एकदा ॲड. कदम यांच्या कार्यालयामध्ये पार्ट टाइम नोकरी करण्यास सुरुवात केली. सकाळी आठ ते दुपारी दोन अशी त्यांची नोकरीची वेळ होती. दररोज जयश्री फडतरे यांच्या सासूबाई बाळाला घेऊन जयश्री फडतरे यांच्या नोकरीच्या ठिकाणी मधल्या ब्रेकच्या वेळेत दूध पाजण्यासाठी बाळाला जयश्री यांच्याकडे घेऊन येत असत. त्या बाळाच्या आईसाठी, आजीसाठी व त्या बाळासाठी तो काळ खूप कठीण होता. कुटुंबाच्या हितासाठी, बाळाच्या भविष्यासाठी आईला कठोर बनून संकटांचा, सामना करावा लागतो. दोन महिन्यानंतर जयश्री फडतरे यांना ॲड.कदम यांच्या कार्यालयातील नोकरी सोडावी लागली. जयश्री फडतरे यांचे पती सोमनाथ फडतरे यांनी जयश्री यांना काही महिने घरी राहूनच विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता परंतु कुटुंबातील एका व्यक्तीची धडपड, मेहनत त्यांना पाहवत नव्हती त्यामुळेच अशा कठीण परिस्थितीत देखील त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता.
काही दिवसानंतर पुन्हा एकदा जयश्री फडतरे यांनी नवीन नोकरीचा शोध चालू केला. आपल्या बाळाला कडेवरती घेऊन, घराजवळील कॉइन बॉक्स वरून विविध कंपन्यांच्या नोकरीच्या जाहिरातीतील नंबरवरती फोन करून नोकरीसाठीचे त्यांचे प्रयत्न चालू होते. एखाद्या स्त्रीने आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर विश्रांती घेण्याच्या दिवसांमध्ये जयश्री फडतरे यांचा हा संघर्ष चालू होता.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
2007 च्या ऑगस्ट महिन्यात जयश्री फडतरे यांना पुणे शहरात "ग्रामसॉफ्ट" या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळाली. जयश्री फडतरे यांच्या आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा टप्पा होता. 2500 रुपये पगारावरती जयश्री फडतरे यांनी "ग्रामसॉफ्ट" या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट या पदावरती नोकरीला सुरवात केली. आपले चार महिन्याचे बाळ असताना देखील बाळाच्या भविष्यासाठी, कुटुंबाच्या हितासाठी धडपडले पाहिजे, मेहनत केली पाहिजे हा एकच ध्यास घेऊन त्यांनी त्यावेळेस "ग्रामसॉफ्ट" या सॉफ्टवेअर कंपनीतील कामाला सुरुवात केली. जयश्री फडतरे यांच्या मुलाची काळजी घेण्यासाठी त्यांच्या सासूबाई होत्याच तसेच जयश्री यांचे पती सोमनाथ फडतरे हे देखील त्या काळामध्ये जयश्री फडतरे यांची,बाळाची व संपूर्ण कुटुंबाची खूप काळजी घेत.
जयश्री फडतरे यांना ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सुरुवातीला पगार जरी कमी असला तरी त्यांना नवनवीन क्षेत्रातील ज्ञान मिळवण्याचे व नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा त्यांचा मूळचा स्वभाव असल्यामुळे त्या त्यांचे काम त्याकाळी प्रामाणिकपणे करत होत्या. जयश्री फडतरे यांच्या सासूबाई शांताबाई फडतरे यांनी जयश्री यांच्या मुलाची चार-पाच वर्ष खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली. आजी व नातूचे नाते खूप सुंदर असते.
जयश्री फडतरे यांच्या कुटुंबीयांना काही कालावधीनंतर धनकवडी मधील भाड्याची खोली सोडावी लागली व ते कुटुंब बालाजी नगरला भाड्याच्या खोलीत राहिला आले. दोन रूमच्या भाड्याच्या खोलीला त्यावेळेस दोन हजार रुपये भाडे होते. अडचणींच्या काळामध्ये ही रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी होती.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
काही दिवसांनी जयश्री फडतरे यांच्या सासूबाईंना पुन्हा गावाकडच्या कौटुंबिक अडचणीमुळे कोरेगावला जावे लागले. जयश्री फडतरे यांच्या सासुबाई शांताबाई फडतरे यांची मुलगी गावाकडे प्रसूतीसाठी आल्यामुळे त्यांना तात्काळ गावाला जावे लागले. जयश्री फडतरे यांचे आठ महिन्याचे बाळ घरी असल्यामुळे या प्रसंगामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. घरी आता बाळाची काळजी घेण्यासाठी कोणच नसल्यामुळे त्यांना बाळाची व नोकरीची दोन्हीचीही चिंता होती. जयश्री फडतरे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना नोकरी सोडण्याचा सल्ला दिला परंतु एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मिळालेली नोकरीची संधी त्यांना त्यावेळेस गमवायची नव्हती व बाळाचेही चांगले संगोपन करायचे होते. या कठीण प्रसंगात जयश्री फडतरे यांचे पती सोमनाथ फडतरे यांनी जयश्री यांना खंबीर साथ दिली.
"माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माझ्या पतीने मला खूप चांगली साथ दिलेली आहे. आयुष्यात खूप अडचणी आल्या, खूप संकटे आले, अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले परंतु माझ्या पतीने दिलेली अनमोल साथ त्यामुळे सर्व संकटांवरती मात करून कुटुंबाच्या प्रगतीसाठी आम्हाला चांगले काम करता आले." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
जयश्री फडतरे यांच्या कुटुंबातील आर्थिक अडचणींचा डोंगर, बाळाच्या भविष्याची चिंता यामुळे पुन्हा एकदा जयश्री फडतरे यांना एक साहसी निर्णय घ्यावा लागला त्यांनी त्यांच्या आठ महिन्याच्या बाळाला पाळणाघरात ठेवण्याचा निर्णय घेतला.
"माझ्या आठ महिन्याच्या बाळाला पाळणाघरात सोडून, सॉफ्टवेअर कंपनीच्या कामावरती जाताना माझ्यातील आईचे काळीज खूप तुटत होते परंतु माझाही खूप नाईलाज होता. बाळाच्या भविष्यसाठी मला कठोर बनून त्यावेळेस संघर्ष करावाच लागणार होता. माझ्या मुलाला चांगले भविष्य द्यायचे असेल तर मला नोकरी करून माझ्या कुटुंबाला हातभार लावणे खूप गरजेचे होते. पाळणाघरातील माझ्या बाळाचा चेहरा पाहताना मला खूप वाईट वाटायचे परंतु माझ्यातील लढाऊ आई पुन्हा एकदा जागी होऊन माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते."
जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे दोघेही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तसेच कुटुंबाच्या भविष्यासाठी नोकरी करून त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत होते. जयश्री फडतरे त्याकाळी सकाळी लवकर उठून, घरच्यांचा स्वयंपाक करून, त्यांच्या बाळाची कपडे, औषधे, वस्तू यांच्या दोन बॅगा घेऊन त्यांच्या पतीसह पाळणा घरात बाळाला सोडून दोघेही त्यांच्या कामावरती एकत्र जात. कामावरून घरी येताना जयश्री त्यांच्या बाळाला पाळणा घरातून घेऊन, पुन्हा त्यांच्या घरी येऊन, त्या लहान बाळाची काळजी घेऊन पुढच्या दिवसाच्या कामाला सुरुवात होत असे.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"जयश्री फडतरे यांच्या आयुष्यात त्याकाळी एका बाजूला कुटुंबातील आर्थिक अडचणीचा संघर्ष, दुसऱ्या बाजूला आठ महिन्याच्या बाळाच्या संगोपनासाठी त्यांचा चालू असलेला संघर्ष, अशा कठीण परिस्थितीत त्या हरल्या नाहीत. त्या रडल्या नाहीत. तर कुटुंबाच्या हितासाठी, बाळाच्या भविष्यसाठी त्या लढल्या. एका आईचा हा लढाऊ बाणा, आपल्या बाळाच्या भविष्यासाठी हत्तीचं बळ अंगात आणून लढण्याची त्यांची जिद्द समाजातील महिला वर्गांसाठी व तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारी आहे."
2008 साली जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे यांच्या कुटुंबात एका नवीन दुचाकीचे आगमन झाले. त्यांनी 2008 ला पॅशन ही दुचाकी गाडी घेतली. दोघांचाही नोकरीसाठी जातानाचा पायी प्रवास, बसचा प्रवास, रिक्षाचा प्रवास व आता त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या दुचाकीवरून नोकरीला जाण्याचा प्रवास चालू झाला. 11 महिने जयश्री फडतरे यांच्या सासूबाई गावी असल्यामुळे त्या 11 महिन्यांमध्ये जयश्री फडतरे यांच्या कुटुंबाला त्यांच्या बाळाच्या संगोपनासाठी संघर्ष त्या काळी त्यांना करावा लागला. जयश्री फडतरे यांच्या सासूबाई गावावरून पुन्हा पुण्याला आल्यानंतर पुढील चार-पाच वर्ष त्यांना त्यांच्या बाळाच्या संगोपनासाठी कुठलीच चिंता नव्हती. जयश्री फडतरे यांच्या सासूबाईंनी जयश्री यांच्या मुलाची त्या काळात पाच - सहा वर्ष खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पुणे शहरातील "ग्रामसॉफ्ट" या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जयश्री फडतरे यांनी रिसेप्शनिस्ट म्हणून त्यांच्या कामाला सुरुवात केलेली असताना सुरुवातीच्या काळात त्या सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद ठेवणे, कंपनीमध्ये येणारे सॉफ्टवेअर संदर्भातील सर्व फोन घेणे व ते फोन संबंधित सॉफ्टवेअर सेवा विभागाला, मार्केटिंग विभागाला ट्रान्सफर करणे, कंपनीचे फायलिंग तसेच कंपनीच्या कामांचे सर्व मस्टरमेंटेन ठेवणे ही सारी कामे त्या प्रामाणिकपणे करत होत्या.
"ग्रामसॉफ्ट ही सॉफ्टवेअर कंपनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर प्रणाली पुरवणारी त्या काळातली महाराष्ट्रातील पहिली कंपनी होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामसॉफ्ट ही सॉफ्टवेअर कंपनी त्यांची सॉफ्टवेअर सेवा यशस्वीपणे देते." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जयश्री फडतरे रिसेप्शनिस्ट म्हणून जरी काम करत असल्या तरी ग्रामसॉफ्ट सॉफ्टवेअरच्या सेवा संदर्भातले अनेक फोन रोज त्या महाराष्ट्राचे कानाकोपरातून घेत होत्या. त्यामुळे त्या सॉफ्टवेअरच्या सेवा संदर्भातील विविध विषय त्यांना समजून घेता आले. ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेकडो - हजारो ग्राहकांशी संवाद साधल्यामुळे जयश्री फडतरे यांना ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर सेवा विषयी संपूर्ण माहिती समजायला लागली. ग्रामसॉफ्टच्या अनेक ग्राहकांच्या समस्या जयश्री फडतरे सेवा विभागात फोन ट्रान्सफर न करता स्वतःच फोनवरून संवाद साधूनच सोडवायला लागल्या.
ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे त्यावेळेसचे सेवा व मार्केटिंग विभाग प्रमुख महेश चिपळूणकर यांनी जयश्री फडतरे यांच्यातील जिद्द, चिकाटी व गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करून कंपनीच्या सेवा विभागामध्ये काम करायची संधी दिली.
"ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जयश्री फडतरे यांनी नवीन कौशल्य शिकण्याचा ध्यास घेऊन, जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने, निष्ठेने, प्रामाणिकपणे उत्तम कामगिरी करून अल्पावधीतच कंपनीच्या व्यवस्थापकांचे व मालकाचे मन जिंकून प्रगतशील वाटचालीला सुरुवात केली. ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीच्या महाराष्ट्रातील हजारो ग्राहकांच्या अडचणी समजून घेणे त्यांना उत्तम सेवा देणे यामुळे जयश्री फडतरे यांच्या सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कारकीर्दीचा आलेख त्याकाळी नेहमी उंचावतच राहिला."
काही कालावधीनंतर ग्रामसॉफ्ट कंपनीचे व्यवस्थापक महेश चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री फडतरे यांनी ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर प्रणालीचे डेव्हलपमेंट व टेस्टिंगचेही प्रशिक्षण त्याच कंपनीमध्ये घेतले. एचटीएमएल, डेटाबेस, फॉर्मस, डेटा डिझाईन व सॉफ्टवेअर टेस्टिंग व सेवा विषयी सर्व गोष्टी त्या प्रशिक्षणामध्ये त्या शिकल्या.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील काळेवाडी या आदर्श ग्रामपंचायतसाठी ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग देण्याची संधी जयश्री फडतरे यांना महेश चिपळूणकर यांच्यामुळे मिळाली.
"ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत असताना ग्रामीण भागामध्ये फिल्ड वरती जाऊन ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग देणे, प्रामाणिकपणे सेवा देण्याची संधी मला आमचे मार्गदर्शक महेश चिपळूणकर सर यांच्यामुळे मिळाली. तो अनुभव माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरला. ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून आदर्श ग्रामपंचायत काळेवाडीला संपूर्ण पेपरलेस ग्रामपंचायत तसेच ग्रामपंचायतीचे एक ते 33 नमुने, कॅशबुकसहित पेपरलेस करण्याची संधी मला आमच्या कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळाली. काळेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची संवाद साधून मला ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा कारभार आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसा चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो? हे मार्गदर्शन करण्याचे मला त्यावेळेस संधी मिळाली." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत काळेवाडी येथे ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर प्रणालीचे ट्रेनिंग, मार्गदर्शन दिल्यानंतर जयश्री फडतरे यांनी त्यांच्या कंपनीतील कारकीर्दीत कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच राहिला. ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीच्या व्यवस्थापकांनी जयश्री फडतरे यांना मार्केटिंग व सर्व्हिस डिपार्टमेंटच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर काम करण्याची संधी दिली व वेळोवेळी योग्य मार्गदर्शनही केले.
"आमच्या ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक राजेश बुकट्टे सर व आमच्या कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेश चिपळूणकर सर यांनी आम्हाला आमच्या सॉफ्टवेअरच्या मार्केटिंग व सेवा क्षेत्रात काम करत असताना खूप चांगले मार्गदर्शन केले, वेळोवेळी योग्य दिशा दाखवून, आमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच आम्हाला आमच्या ग्रामसॉफ्टच्या हजारो ग्राहकांना उत्तम सेवा देता आली." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
ग्रामसॉफ्ट या कंपनीमध्ये काम करत असताना जयश्री फडतरे यांनी प्रामाणिकपणे व समर्पण वृत्तीने काम करून, कंपनीच्या ग्राहकांना ग्रामसॉफ्ट सॉफ्टवेअर प्रणाली वापरत असताना एका रिपोर्टमध्ये पंधरा वेळा जरी बदल करून हवा असला तरी, ग्राहकांचे समाधान होईपर्यंत त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीमकडून रिपोर्टमध्ये बदल करून घेऊन, ग्राहकांना अपेक्षित रिपोर्ट मिळेपर्यंत कंपनीत रात्री उशीरापर्यंत थांबून ग्राहकांना उत्तम सेवा दिलेली आहे.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
2008 मध्ये ग्रामसॉफ्टचे सॉफ्टवेअर हे डॉटनेट या त्यावेळेसच्या अत्याधुनिक प्रणालीमध्ये बनवले गेले तसेच त्यासाठी एसक्यूएल डेटाबेस वापरण्यात आला. सॉफ्टवेअर क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार ग्रामसॉफ्ट ही सॉफ्टवेअर कंपनी वेळोवेळी बदलत गेली.
ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जयश्री फडतरे यांना पहिल्या चार वर्षांमध्ये खूप काही शिकायला मिळाले. जयश्री फडतरे यांचा सुरुवातीचा पगार अडीच हजारावरून चार वर्षानंतर फक्त चार हजार रुपयापर्यंत गेला होता. परंतु ग्रामसॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनीतील मार्केटिंग विभाग, सेवा विभागात काम करताना आलेला अनुभव, महाराष्ट्रातील हजारो ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा ही जी त्यांची व्यावसायिक जडणघडण चालू होती त्यामुळे या शिक्षणाच्या प्रवासात त्या खूप समाधानी होत्या.
2009 ला जयश्री फडतरे यांनी प्लेझर ही नवीन दुचाकी विकत घेतली. आपल्या कष्टातून, मेहनतीतून घेतलेल्या नवीन दुचाकी गाडीवरून आपल्या कंपनीच्या कामावरती जाण्याचा आनंद एक वेगळाच असतो. जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे पुणे शहरात भाड्याच्या खोलीत राहत असल्यामुळे घरमालकाने रूम सोडायला लावली की नवीन भाड्याची खोली शोधावी लागायची या त्रासाला कंटाळून जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे यांनी 2010 मध्ये नवीन फ्लॅट पुणे शहरात विकत घेण्याचे ठरवले. सोमनाथ फडतरे यांना त्यावेळी इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये 9000 पगार होता तर जयश्री फडतरे यांना ग्रामसॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनीमध्ये साडेचार हजार रुपये पगार होता तरी देखील त्या दोघांनी फ्लॅट विकत घेण्याचे त्यावेळी साहस दाखवले.
जयश्री फडतरे यांच्या मामांनी व बहिणीने तसेच सासरे जगन्नाथ फडतरे यांनी या फ्लॅट खरेदीच्या वेळेस खूप मदत केल्याचे जयश्री फडतरे सांगतात. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी त्यावेळेस कुठल्याही मोठ्या बँकेचं लोन होत नव्हते त्यावेळेस सोमनाथ फडतरे यांच्या मित्राने सहकार्य केल्यामुळे, शिवकृपा पतसंस्थेमध्ये त्यावेळेस नऊ लाखाचे लोन झाले. जयश्री फडतरे यांचे मामा शरद ढोले यांनी या फ्लॅटच्या खरेदीसाठी डाऊन पेमेंट देण्यासाठी खूप मोलाची मदत केल्याचे त्या सांगतात. सोमनाथ फडतरे यांचे वडील जगन्नाथ फडतरे या ग्रहकर्जासाठी सहकर्जदार झाल्यामुळे पुढचा मार्ग मोकळा झाला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"पुण्यात अनेक वर्ष भाड्याच्या खोलीत राहिल्यामुळे अनेक अडचणींचा सामना आम्हाला करावा लागत होता. आम्हाला आमचा स्वतःचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी आमचे मामा, बहीण, सासरे तसेच शिवकृपा पतसंस्थेने खूप सहकार्य केले. आम्हाला पगार कमी असताना देखील नवीन घर पुण्यासारख्या शहरात विकत घेण्याचे स्वप्न पाहणे देखील त्यावेळी खूप अवघड होते. पण आपल्या माणसांनी साथ दिली तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
"माझ्या आयुष्यात माझी मोठी बहीण सुजाता सांडभोर माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणास्थान आहे. खूप मोठा आधारस्तंभ आहे. माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात ज्या ज्या वेळेस मला अनेक अडचणी, संकटे आली त्यावेळेस माझ्या पाठीशी खंबीरपणे माझी बहीण उभी राहिली याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्यासाठी माझी ताई मोठी बहीण, आई, मैत्रीण,गुरू अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडणारी माझी मार्गदर्शक आहे." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
2010 ला जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे यांनी पुणे शहरात विकत घेतलेल्या फ्लॅटच्या गृहकर्जाचा मासिक हप्ता नऊ हजार रुपये होता त्यामुळे एकाचा पगार गृहकर्जाच्या हप्त्यासाठीच जात होता. दुसऱ्याचा पगार कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लागत होता. त्याकाळी काटकसर करून, बचत करून कुटुंबाचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करून जयश्री फडतरे यांच्या कुटुंबाचा संघर्षमय प्रवास चालूच होता.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"पुणे शहरामध्ये कमी पगार असताना स्वताच्या मालकीचे लाखो रुपयांचे घर विकत घेण्याचे धाडस करणे व गृहकर्जाचे सर्व हप्ते वेळेवर भरणे ही खूप कठीण गोष्ट होती पण जयश्री फडतरे या रणरागिनेने हे आव्हान त्यांच्या पतीच्या सहकार्याने त्याकाळी लिलया पेलले.
जयश्री फडतरे यांचा मुलगा स्वयंम फडतरे याला भारती विद्यापीठमधील प्राथमिक विद्यालयात प्रवेश घेतला होता. सोमनाथ फडतरे यांची भाची देखील जयश्री फडतरे यांच्या कुटुंबीयासमवेत त्याकाळी पुण्यात एकत्र राहत होती. 2011 ला सोमनाथ फडतरे यांनी अप्पे, छोटा हत्ती ही चारचाकी गाडी व्यवसायाच्या दृष्टीने विकत घेतली. सोमनाथ फडतरे ज्या इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये नोकरीला होते त्यांच्या कंपनीतीलच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी या गाडीचा उपयोग होईल व त्यातून आपल्याला एक चांगले उत्पन्न मिळेल या उद्देशानेच ही चारचाकी गाडी त्यांनी विकत घेतली होती. पण काही काळच त्यांना या गाडीच्या व्यवसायात चांगले उत्पन्न मिळाले.
काही दिवसानंतर सोमनाथ फडतरे यांनी या चारचाकी गाडीतून भाजी विकायला सुरुवात केली या कामांमध्ये देखील जयश्री फडतरे यांनी त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला. जयश्री फडतरे देखील दिवसभरातील कामाच्या मधल्या वेळेत, ब्रेकच्या वेळेस तसेच कंपनीचे काम संपल्यानंतर त्यांच्या पतीला त्यांच्या कंपनीच्या परिसरात मोठ्या सोसायटीच्या बाहेर गाडी लावून भाजी विकण्यासाठी मदत करत होत्या. चार महिने जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे यांनी त्या चारचाकीतून भाजी विकण्याचे काम केले. त्या चारचाकी गाडीचा महिन्याचा पाच हजाराचा कर्जाचा हप्ता होता.
पुण्यासारख्या शहरात राहत असताना एवढी महागाई असते, तसेच ग्रहकर्जाचा हप्ता, गाडीच्या कर्जाचा हप्ता असल्यामुळे जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे हे दोघेही आपापल्या परीने कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्याचा त्याकाळी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते.
2014 ला जयश्री फडतरे यांनी पुणे शहरात किराणा मालाचे दुकान चालू करण्याचा निर्णय घेतला. जयश्री फडतरे यांची मावशी रंजना ढोले व मामाची मुले व जयश्री यांचे पती सोमनाथ फडतरे मदतीला असल्यामुळे 2014 ला अक्षयतृतीयाला पुणे शहरात आंबेगाव पठार परिसरात त्यांनी "स्वयंम सुपर मार्केट" हे किराणा मालाचे दुकान चालू केले. अडीच हजार रुपये भाडे असलेल्या दुकानांमध्ये जयश्री फडतरे यांनी किराणा मालाचे दुकान चालू केले होते. जयश्री फडतरे यांच्या मामाची मुले तसेच जयश्री फडतरे यांचे पती सोमनाथ फडतरे व स्वतः जयश्री फडतरे हे सर्वजण आळीपाळीने दुकानांमध्ये थांबून ते किराणा मालाचे दुकान व्यवस्थितपणे चालवत होते.
जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे हे दोघेजण त्यांची नोकरी करत असताना स्वयंम सुपर मार्केट किराणा मालाचे दुकान चालवण्याचे काम करत होते. सुरुवातीच्या काळातच या किराणामालाच्या दुकानाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एका नवीन व्यवसायामध्ये त्याकाळी जयश्री फडतरे यांच्या कुटुंबियांचा चांगला जम बसायला लागला होता. हे किराणा मालाचे दुकान ज्या मालकाकडून भाड्याने घेतले होते त्या मालकाने हे दुकान फडतरे कुटुंबीयांना विकण्याचा प्रस्ताव मांडला.
फडतरे कुटुंबावर अगोदरच पुण्यात घेतलेल्या फ्लॅटच्या कर्जाचे ओझे होते पण तरी देखील जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे यांनी यावेळेसही हार मानली नाही. हे साडेसोळा लाखाचे किराणा मालाचे दुकान विकत घेण्यासाठी जयश्री फडतरे यांनी बीसी, बचत गट या माध्यमातून चार लाख रुपये डाऊन पेमेंट भरण्याचे नियोजन केले. पुन्हा एकदा शिवकृपा पतसंस्थेने फडतरे कुटुंबावरती विश्वास ठेवून या दुकानाच्या खरेदीसाठी सोळा लाख रुपयांचे कर्ज दिले. हे किराणा मालाचे दुकान विकत घेण्यासाठी जयश्री फडतरे यांच्या बहीण व भाऊ तसेच सोमनाथ फडतरे यांच्या मित्राने देखील खूप सहकार्य केल्याचे जयश्री फडतरे सांगतात.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"पुणे शहरामध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक दुकान विकत घेणे आमच्यासाठी त्याकाळी खूप आव्हानात्मक होते. परंतु माझे पती सोमनाथ फडतरे यांची मला खंबीर साथ होती. पुन्हा एकदा कष्टाने व मेहनतीने नवीन स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा ध्यास होता त्यासाठी आपल्या माणसांचे मोलाचे सहकार्य लाभले." असे जयश्री फडतरे सांगतात.
"पुणे शहरात विकत घेतलेल्या किराणामालाच्या दुकानाच्या कर्जाचा हप्ता मासिक 30 हजार रुपये होता पण तरी देखील जयश्री फडतरे व सोमनाथ फडतरे डगमगले नाहीत, बिथरले नाहीत. नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी जयश्री फडतरे यांच्या पंखांमध्ये बळ घालण्याचे काम त्या काळातली प्रतिकूल परिस्थिती करत होती. आपल्या बाळाच्या भविष्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी एक रणरागिनी तिच्या पतीच्या सहकार्याने लढत होती."
2015 ला जयश्री फडतरे यांना ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे मार्केटिंग संपूर्ण राज्यभरात करण्याची संधी मिळाली त्या संधीचे त्यांनी सोने केले. संगमनेर तालुक्यातील ग्रामसेवकांची जयश्री फडतरे यांनी ग्रामसॉफ्टच्या मार्केटिंगसाठी घेतलेली मीटिंग, महाराष्ट्राचे विविध जिल्ह्यातील, विविध तालुक्यातील ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांच्या जयश्री फडतरे यांनी ग्रामसॉफ्टच्या मार्केटिंग साठी घेतलेल्या मीटिंग त्याकाळी खूप गाजल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, तळागाळात, विविध जिल्ह्यांमध्ये तसेच विविध तालुक्यांमध्ये ग्रामसॉफ्ट हे सॉफ्टवेअर पोहोचवण्यासाठी जयश्री फडतरे यांनी जीव ओतून त्याकाळी मेहनत घेतली. सातारा, कराड, संभाजीनगर, सांगली, पुणे यासारख्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जयश्री फडतरे यांनी अनेक अधिकाऱ्यांना ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर प्रणाली विषयी दिलेले प्रेझेंटेशन त्याकाळी खूप गाजले.
"संभाजीनगर जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ, (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) सोळंके साहेबांनी मला ग्रामसॉफ्ट या आमच्या सॉफ्टवेअर प्रणालीचे प्रेझेंटेशन देण्यासाठी संभाजीनगरमध्ये विविध तालुक्यांमधून आलेल्या विस्तार अधिकाऱ्यांसमोर प्रेझेंटेशन देण्याची जी संधी दिली. त्या संधीचे मी प्रामाणिकपणे काम करून सोने केले. संभाजीनगरमधील अनेक तालुक्यांमध्ये आम्हाला आमच्या ग्रामसॉफ्टचा व्यवसाय यशस्वीपणे वाढवता आला याचे मला खूप समाधान वाटते." असे जयश्री फडतरे सांगतात.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
2015 ते 2017 या वर्षांमध्ये जयश्री फडतरे यांनी ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रभर जिद्दीने, चिकाटीने काम करून वाढवला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदर्श ग्रामपंचायत पाटोदा ग्रामपंचायतीलाही जयश्री फडतरे यांनीच ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर प्रणालीची सेवा दिलेली आहे. मंत्रालयामध्येदेखील कुठल्याही खात्याच्या सॉफ्टवेअर विषयी तज्ञ मंडळींमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये चर्चा चालू असेल तर जयश्री मॅडमच्या "ग्रामसॉफ्ट" सॉफ्टवेअरचे नाव अनेक अधिकारी घेतात. ही खरी त्यांच्या कामाची पोहचपावती आहे. ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रभर वाढवण्यासाठी जयश्री फडतरे यांना त्याकाळी खूप प्रवास करावा लागायचा. पुण्यातून पहाटे चार वाजता लक्झरी बसमध्ये बसून छत्रपती संभाजी नगरला जाऊन तिथल्या मीटिंग करून, संगमनेरच्या मीटिंग करून पुन्हा रात्री एक पर्यंत त्या पुण्यात पोहोचायच्या. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे चारला संभाजीनगरच्या बसमध्ये बसून पुढील विविध तालुक्यांच्या मीटिंगसाठी त्या जायच्या. अशाप्रकारे संपूर्ण आठवडाभर त्यांचा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये, विविध तालुक्यांमध्ये ग्रामसॉफ्ट हा ब्रँड सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्या जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न करत होत्या.
2017 नंतर खऱ्या अर्थाने जयश्री फडतरे यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले आर्थिक स्थैर्य आले. 4000 पगारावरून ग्रामसॉफ्टमध्ये नोकरीला सुरुवात करणाऱ्या जयश्री फडतरे कधी पंचवीस - तीस हजाराच्या पगारापर्यंत पोहोचल्या हे त्यांना त्या कालावधीमध्ये कळले सुद्धा नाही. जयश्री फडतरे यांनी 2015 ते 2017 दरम्यान ग्रामसॉफ्टचा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रभर खूप चांगल्या प्रकारे, यशस्वीपणे वाढवला त्यामुळे त्यांची देखील त्या कालावधीमध्ये खूप चांगली आर्थिक प्रगती झाली. जयश्री फडतरे यांनी त्याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती ग्रामसॉफ्टची उत्तम सेवा देण्यासाठी एक चांगले व्यवस्थापन बसवून दिले. विविध जिल्ह्यांमध्ये तसेच विविध तालुक्यांमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन टीम, मार्केटिंग टीम उत्तमरीत्या तयार करून, स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
"2017 ला जयश्री फडतरे यांनी त्यांचे पती सोमनाथ फडतरे यांना त्यांच्या वाढदिवसाला नवीन हुंडाई कंपनीची फोरविलर लक्झरीयस कार गिफ्ट दिली. ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जयश्री फडतरे काम करत असताना नवनवीन यशाची शिखरे गाठल्यानंतर त्यांनी 2017 लाच जनरल इन्शुरन्सच्या व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केली. बजाज अलायन्स, टाटा एआयजी यासारख्या मोठ्या कंपनीसोबत त्यांनी जनरल इन्शुरन्सचा व्यवसाय करायला, त्यांच्या उत्तम टीमसह सुरुवात केली. या जनरल इन्शुरन्सच्या क्षेत्रातही जयश्री फडतरे यांनी एक चांगली टीम तयार केल्यामुळे या क्षेत्रातही त्यांना खूप चांगले यश मिळाले."
कोरोना काळामध्ये भारतातील अनेक उद्योगांना, व्यवसायांना फार मोठा फटका बसला परंतु ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीने कोरोना काळात 2020, 2021 ला देखील त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांना ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला. ग्रामसॉफ्टच्या संपूर्ण टीमने वर्क फ्रॉम होम कल्चरच्या माध्यमातून त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांना त्याकाळी उत्तम सेवा दिली त्यामुळे ग्रामसॉफ्टच्या व्यवसायावरती कोरोना काळात विशेष असा परिणाम झाला नाही.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
कोरोना काळानंतर ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक राजेश बुकट्टे यांनी त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक व्यवसाय असल्यामुळे, ग्रामसॉफ्ट ही कंपनी विकून, चांगल्या लोकांच्या हाती देण्याचे ठरवले. ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रगतशील वाटचालीमध्ये महेश चिपळूणकर व जयश्री फडतरे या दोघांचे अनमोल योगदान असल्यामुळे राजेश बुकट्टे यांनी त्या दोघांना हा प्रस्ताव दिला. महेश चिपळूणकर व जयश्री फडतरे यांनी या प्रस्तावावरती सविस्तर चर्चा करून, ग्रामसॉफ्ट ही सॉफ्टवेअर कंपनी विकत घेऊन, पुन्हा ती यशस्वीपणे चालवण्याचा 2022 ला निर्णय घेतला. ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक राजेश बुकट्टे यांना ही कंपनी अशा चांगल्या लोकांच्या हातात सोपवायचे होती की ज्या लोकांनी जिद्दीने, चिकाटीने, कष्टाने या कंपनीचा व्यवसाय मोठा केला होता.
"2007 ला पुणे शहरात छोटीसी नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या जयश्री फडतरे यांनी ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 2500 पगारावर रिसेप्शनिस्ट या पदावरती कामाला सुरवात केली. यानंतरच्या पंधरा वर्षात जयश्री फडतरे यांना अनेक अडचणींचा, अनेक संकटांचा सामना करावा लागला. ग्रामसॉफ्टसाठी जीव ओतून काम करून, प्रचंड कष्ट, मेहनत करून ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वीपणे वाढवला आणि 2022 ला त्याच ग्रामसॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनीच्या यशस्वी संचालिका झाल्या, कंपनीच्या मालकीन झाल्या. हा प्रवास खरच त्यांच्यासाठी खूप कठीण होता. महाराष्ट्राच्या या रणरागिनीने स्वप्न कशी पूर्ण करतात? आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे? हे त्यांच्या कर्तुत्वातून दाखवून दिले हा अद्भुत, विलक्षण प्रवास महाराष्ट्रातील सर्व महिला वर्गासाठी, तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे."
"ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीची वार्षिक उलाढाल 50 ते 60 लाखांपर्यंत आहे. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये आम्ही आमच्या कंपनीच्या सॉफ्टवेअरची सेवा देत आहोत. आतापर्यंत आमच्या ग्रामसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील हजारो ग्रामपंचायतींना सॉफ्टवेअर प्रणाली दिलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये हजारो ग्रामपंचायतीला आम्ही आमच्या ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर प्रणालीची सेवा सलगपणे व चांगल्या प्रकारे देत आहोत. आमच्या ग्रामसॉफ्टचे 2008 चे प्रॉडक्ट व 2021 चे प्रॉडक्ट आमच्या ग्राहकांना खूप आवडले व त्या दोन्ही सॉफ्टवेअर प्रोडक्टला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे." असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
"महाराष्ट्रात ग्रामपंचायतींना सॉफ्टवेअर प्रणाली देणारी "ग्रामसॉफ्ट" ही महाराष्ट्रातली पहिली कंपनी आहे. तसेच अनेक वर्ष मार्केटमध्ये टिकून राहून, हजारो ग्रामपंचायतींना उत्तम सेवा देणारी ग्रामसॉफ्ट ही महाराष्ट्रातील आघाडीचे सॉफ्टवेअर कंपनी आहे. आमच्या ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर मधील तालुका पातळीवरचे, जिल्हा पातळीवरचे व राज्य पातळीवरचे ग्रामपंचायतींचे रिपोर्टस खूप प्रभावशाली आहेत" असे जयश्री फडतरे सांगतात.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"पुढील पाच वर्षांमध्ये जयश्री फडतरे यांना ग्रामसॉफ्ट ही सॉफ्टवेअर कंपनी संपूर्ण भारतभर यशस्वीपणे पोहोचवायची आहे. भारतातील विविध राज्यांमधील, ग्रामपंचायतींना त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांना उत्तम सेवा द्यायची आहे. भविष्यामध्ये एक चांगला शॉपिंग मॉल टाकून, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायांमध्ये देखील यशस्वीपणे पदार्पण करण्याचे ध्येय असल्याचे जयश्री फडतरे यांनी सांगितले."
"तरुण पिढीने चांगले शिक्षण घेतले पाहिजे. व्यवहारिक शिक्षणावरती खूप जोर दिला पाहिजे. व्यवसायातील स्पर्धेची चिंता न करता नाविन्याचा ध्यास धरा व नवीन कौशल्ये आत्मसात करा तुम्हाला व्यवसायात नक्कीच यश मिळेल." असे जयश्री फडतरे सांगतात.
"महिलांनी स्वतःमधील शक्ती, ताकद ओळखली पाहिजे. शिकण्याची जिद्द असेल तर आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठलीही महिला व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकते. छोट्या भांडवलाने व्यवसायाला सुरुवात करा. एक आई मुलाचे संगोपन चांगल्या पद्धतीने करू शकतो तर व्यवसायही नक्कीच मोठा करू शकते." असे जयश्री फडतरे सांगतात.
"माझ्या आयुष्याच्या प्रगतशील वाटचालीमध्ये माझ्या आई-वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन, माझ्या पतीची खंबीर साथ, माझी बहीण, भाऊ,गुरूजन, सासू, सासरे, नातेवाईक, कंपनीतील सहकारी, मार्गदर्शक, मैत्रिणी या सर्वांचीच मोलाची साथ लाभलेली आहे. आमच्या फडतरे कुटुंबातील सर्व मुलांनी चांगले शिक्षण घेऊन, चांगली कौशल्ये आत्मसात करून खूप चांगली प्रगती करावी. हेच माझे स्वप्न आहे असे जयश्री फडतरे यांनी सांगितले.
"आयुष्यात रिटायरमेंट कधीच नसते. जो थांबला तो संपला. शिक्षण व व्यवसायाला वयाची अट कधीच नसते. यश मिळेपर्यंत प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आयुष्यात मोठे धोके पत्करल्याशिवाय मोठे यश मिळत नसते." असे ग्रामसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालिका जयश्री फडतरे सांगतात.
"एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेणारी सामान्य मुलगी ते वयाच्या 18 व्या वर्षी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हॉस्पिटलमध्ये चारशे रुपयावरती काम करणारी सामान्य मुलगी ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दिवसभरात 14 - 14 तास काम करणारी लढाऊ कन्या ते सहा महिन्याचे पोटात बाळ असताना कुटुंबासाठी अडीच हजार पगारावरती काम करणारी रणरागिणी ते सॉफ्टवेअर कंपनीत अडीच हजार पगारावरती काम करणारी सामान्य कर्मचारी ते त्याच सॉफ्टवेअर कंपनीची यशस्वी संचालिका ते महाराष्ट्रातील लाखो - करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीची मालकीण, रणरागिनी, प्रेरणादायी शिलेदार जयश्री फडतरे यांचा असामान्य जीवन प्रवास महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी, महिला वर्गासाठी तसेच समाजातील सर्व घटकांसाठी खूपच प्रेरणादायी आहे."
महाराष्ट्रातील प्रसिद्ध "ग्रामसॉफ्ट" या सॉफ्टवेअर कंपनीच्या यशस्वी संचालिका, यशस्वी उद्योजिका जयश्री फडतरे यांच्या भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा....
लेखक : अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.
No comments:
Post a Comment