Thursday, October 17, 2024

"कोरोना काळात हजारो रुग्णांना प्रामाणिक सेवा देणाऱ्या पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनच्यावतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मधुमेही रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न; अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, लोकप्रिय नेते जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात "या" तारखेला होणार 75 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा"


सासवड,दि.१७ : कोरोना काळात हजारो - लाखो रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या केमिस्ट बांधवांचे योगदान समाज कधीच विसरू शकणार नाही. पुरंदर तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी कोरोना काळामध्ये सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून तालुक्यातील हजारो रुग्णांना प्रामाणिकपणे सेवा दिलेली आहे.

अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे  लोकप्रिय नेते मा. आमदार  जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्ताने रविवारी १३ ऑक्टबर २०२४ रोजी पुरंदर तालुक्यातील मधुमेही रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी, मोफत मधुमेह तपासणी भव्य शिबिर पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सासवड येथे संपन्न झाले.

व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव, बदललेली जीवनशैली, अनियंत्रित आहार आदी कारणामुळे मधुमेही रुग्णांची संख्या वाढते आहे. एरव्ही साठीत मधुमेह जडायचा. आता मात्र युवकांनाही तो जडतो आहे आणि प्रारंभीचे काही वर्ष याची जाणीव होत नाही. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

त्यामुळे उपचार होत नाहीत. परिणामी गुंतागुंत निर्माण होते. वेळीच निदान झाल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. ही बाब विचारात घेता ग्रामीण भागात मधुमेह निदान शिबिरे घेण्याची गरज आहे. ही गरज ओळखून पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने हे मधुमेह तपासणी शिबिर संपन्न झाले.

पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या संघटनेच्यावतीने पुरंदर तालुक्यात नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांची सेवा करण्याचा नेहमीच या संघटनेचा प्रयत्न राहिलेला आहे.

या मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे (CAPD) अध्यक्ष  संदीप पारेख व महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे पश्चिम विभागाचे सचिव  दत्तप्रसाद टोपे  यांच्या हस्ते झाले. 

याप्रसंगी पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा कार्यकारी सदस्य  धैर्यशील शिंदे,  बाळासाहेब भिंताडे , पुणे जिल्हा महिला कार्यकारी सदस्य शुभांगी जगताप, भूषण ताकवले, पुरंदर तालुका अध्यक्ष  सुकुमार नाझीरकर, उपाध्यक्ष नंदकुमार जगताप, सासवड शहर सचिव  विराज सस्ते, सासवडचे उपाध्यक्ष  संदीप घारे तसेच

खजिनदार  प्रितम जगताप, सासवड झोनल अधिकारी  सुमित जगताप, वीर - परिंचे गटाच्या झोनल अधिकारी सुवर्णा रणवरे, जेजुरी शहर अध्यक्ष नितीन नाझीरकर, अधिकारी विक्रम खामकर, ओंकार कदम,  विलास बलकवडे, प्रीतम खोमणे, वृषाली खामकर, उर्मिला नंदकुमार जगताप, तनुजा पाटिल, निकिता धैर्यशील शिंदे, माया शाह, पूजा सुमित जगताप, प्रियांका सागर सस्ते, तृप्ती चाविर, तृप्ती गायकवाड, अरुणा क्षीरसागर,श्रीकांत आंग्रे, सागर सस्ते, निलेश डाकले, अरुण खेनट, अतुल साळुंखे, स्वप्नील पवार, सर्व मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात मधुमेही रुग्णांची तपासणी, जेवणाच्या अगोदरची साखर, नियमित साखर व कोलेस्ट्रॉल मोफत तपासणी केली. या शिबिरास सासवड मधील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. 

या शिबिरासाठी पुरंदर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व झोनल अधिकारी यांनी  प्रचंड मेहनत घेतली. सासवड मधील सर्व मेडिकल दुकानदारांनी रुग्णांची नोंद करून घेतली होती.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

या शिबिरात  225 रुग्णांची मोफत मधुमेह तपासणी केली गेली.या मोफत रक्त तपासणी शिबिराचा लाभ पुरंदर तालुक्यातील जास्तीत जास्त मधुमेही रुग्णांनी घेतला. 

या शिबिराच्या वेळी अध्यक्ष संदीप पारेख यांनी पुरंदर तालुक्यातील केमिस्ट बांधवांच्या हिताच्या विविध योजना सांगितल्या तसेच केमिस्ट हृदय सम्राट, अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा आमदार  जगन्नाथअप्पा शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त २२ जानेवारी २०२५ रोजी पुण्यामध्ये मोफत 75 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे असे पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदिप पारेख यांनी यावेळी जाहिर केले.

हा मोफत भव्य सामुदायिक विवाह सोहळा पुणे येथील महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कार्यालय तसेच त्यांचे पदाधिकारी व सदस्य यांच्याकडे या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

"या सोहळ्यास पुरंदर तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. येणाऱ्या काळात सर्व केमिस्ट आणि मेडीकल दुकानाची इन्शुरन्स पॉलिसी ही योजना जिल्हा कार्यकारणी कडून करण्यात येणार आहे असे जिल्हा कार्यकारणी सदस्य  धैर्यशील शिंदे यांनी सांगितले."

"ऑनलाइन फार्मसी ,चैन मेडिकल शॉपी, मेड प्लस, वेलनेस फार्मसी या जागतिक भांडवलदार कंपन्यांच्या मेडिकल व्यवसायाच्या स्पर्धेत स्थानिक फार्मसी टिकून राहिली पाहिजे. त्यासाठी पुरंदर तालुक्यात वेळोवेळी मोफत रक्त तपासणी शिबिरे घेण्यात येतील. जेणेकरून रुग्ण आणि स्थानिक फार्मासिस्ट यांचं नातं दृढ होईल. त्याचबरोबर रुग्णांचे कौन्सिलिंग करून, रुग्णांना औषधाबाबत सर्व माहिती पुरवली जाईल. रुग्णसेवेचे हे व्रतच आम्हाला आमच्या कामासाठी खूप ऊर्जा देते." अशी प्रतिक्रिया  पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष व मा. नगरसेवक  नंदकुमार विठ्ठलराव जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

या मोफत मधुमेह, रक्त तपासणी शिबिराचे खूप सुंदर नियोजन करण्यात  आले.यासाठी ज्या पदाधिकारी आणि केमिस्ट बांधवानी कष्ट घेतले त्यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले गेले. विशेष करुन महिला केमिस्ट भगिनींनी जास्त संख्येने सहभागी होऊन  चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व महीला फार्मासिस्टचे यावेळी आभार मानले. 

पुणे जिल्हा महिला कार्यकारणी सदस्या सौ शुभांगी  जगताप यांनी पुढाकार घेवून सर्व महिला केमिस्ट भगिनींना कार्यक्रमात सहभागी करून घेतले त्याबद्दल त्यांचेही संघटनेच्या वतीने आभार मानले गेले. पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनचे EC Member  धैर्यशील शिंदे आणि  बाळासाहेब भिंताडे तसेच  सासवड शहर असोसिएशन यांनी केलेल्या सुंदर नियोजनाबद्दल शुभांगी  जगताप (EC Member) यांनी सर्वांचे आभार मानले.

पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल पुरंदर तालुक्यातील लोकांकडून कौतुक करण्यात आले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

आजच्या काळातील बदललेली जीवनशैली, फास्टफूड व ताण - तणाव यामुळे अशा मोफत आरोग्य तपासणी शिबिराची अत्यंत आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment