Wednesday, November 27, 2024

"महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची त्सुनामी,राज्याच्या विधानसभा निकालावरून 'फार मोठी काहीतरी गडबड..ईव्हीएम मशीन घोटाळ्याची' राज्यभर चर्चा; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ईव्हीएम घोटाळ्याचा गंभीर आरोप, पुणे जिल्ह्याच्या राजकारणात 'राष्ट्रवादी काँग्रेसच' दादा"...

पुणे,दि.२७ : महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत "लाडकी बहीण योजनेची त्सुनामी" आल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीने विक्रमी बहुमत मिळूवुन महाविकास आघाडीचा दारुण पराभव केलेला  आहे. राज्याच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर "निकालात काहीतरी मोठी गडबड झालेली दिसतेय, ईव्हीएम घोटाळा केल्यामुळेच हे पाशवी बहुमत मिळाले" अशी चर्चा राज्यातील नागरिकांमध्ये तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा संपूर्ण राज्यभर चालू आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागांपैकी 235 जागांवरती महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवलेला निकालांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. भाजपने 132, शिवसेना शिंदेगट 57,  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 41 जागा जिंकलेल्या आहेत. महायुतीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या दोन जागा, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष एक जागा, राष्ट्रीय शाहू आघाडी एक जागा व रासपाच्या एका जागेचा देखील समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसने 16 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 20 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 10 जागा जिंकलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फार मोठा विजय मिळवलेला असून देखील विधानसभा निवडणुकीत झालेल्या या दारुण पराभवामुळे अनेक जणांना धक्का बसलेला आहे.

लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत अवघ्या 50 जागाही जिंकता आल्या नसल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला दिसून येत आहे. 

काँग्रेसचे राज्यातील मातब्बर नेते या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रवींद्र धंगेकर, संग्राम थोपटे असे काँग्रेसचे मातब्बर नेते पराभूत झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला दिसून येत आहे. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

महाराष्ट्रातील आदर्श आमदार अशी ओळख असलेले बच्चू कडू यांचा देखील या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. जनतेच्या हितासाठीची वेगवेगळी, आक्रमक आंदोलने करणारे बच्चू कडू महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रामाणिक कार्यामुळे प्रसिद्ध आहेत.

राज्यातील अनेकांना अविश्वसनीय व धक्कादायक निकाल वाटणाऱ्या या महायुतीच्या महाविजयामुळे राज्यातील सर्व पोलपंडितांचे, राजकीय विश्लेषकांचे, राजकीय अभ्यासकांचे विविध राजकीय पक्षांचे व नागरिकांचेही निकालाविषयीचे अंदाज खोटे ठरताना दिसून आलेले आहेत.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात वातावरण असताना देखील काही महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या महायुतीच्या महाविजयाबद्दल महाविकास आघाडीतील अनेक नेते तसेच राज्यातील अनेक नागरिक संशय व्यक्त करताना दिसून येत आहेत.

महायुतीने,सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करून, हॅक करून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा आरोप महाविकास आघाडीतील अनेक राजकीय नेते, विरोधक सातत्याने करताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ईव्हीएम घोटाळ्याविषयी महायुतीवर गंभीर आरोप केलेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सातत्याने यासंबंधी आकडेवारी सादर करत प्रश्न विचारले जात आहेत. राज्यात आणि देशभरात ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत असतानाच आता जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक दावा केला आहे.निवडणुक निकाल आणि उमेदवारांना मिळालेल्या मतांबद्दल माहिती देणारे निवडणूक आयोगाचे ‘वोटर टर्नआऊट’ (Voter turnout) हे अ‍ॅप बंद झाल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. 

समाज माध्यमांवरती भावना व्यक्त करताना जितेंद्र आवड म्हणाले की “सगळा नग्न झालेला निवडणूक आयोग आता अ‍ॅप्लिकेशन बंद करुन नग्नपणा झाकायचा प्रयत्न करत आहे. काल परवापर्यंत लोकसभेचा डाटा अ‍ॅक्सेस करता येत होता. मग विधानसभेच्या वेळेला का बरं बंद केला?”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. “गोलमाल है भाई सब गोलमाल… इलेक्शनची मतदानाची टक्केवारी बदलते कशी”, असेही आव्हाडांनी म्हटले आहे.

मुंब्रा-कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी देत निवडणुक प्रक्रियेवर शंका व्यक्त केली होती. या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार ३९६ आहेत आणि गावात ३१२ जणांनी मतदान केले होते. मात्र उमेदवारांना पडलेली मते दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रियेतील आक्षेप, ईव्हीएम घोटाळा या संदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

लोकनेते शरद पवार यांनी तशी तयारी करण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही याबाबत विचार केला जात आहे. ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभारण्याच्या हालचाली विरोधकांकडून सुरू आहेत. काँग्रेस पक्ष ईव्हीएम मशीन घोटाळ्याचा विरोधात तसेच बॅलेट पेपरवरती निवडणूक होण्यासाठी देशभर मोठी यात्रा काढणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलेले आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड, असे बहुमत मिळाले आहे. या निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून 'ईव्हीएम'बाबत शंका, मोठा संशय उपस्थित करण्यात येत आहे.

"ईव्हीएम'मध्ये घोटाळा झाल्यानेच महायुतीचे इतके आमदार निवडणूक जिंकले" असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध आकडेवारी देखील देण्यात येत आहे. अशाच प्रकारची आकडेवारी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

"महाराष्ट्रातील एकूण विधानसभा निवडणुकीचे चित्र पाहिले, तर ज्या उमेदवारांनी आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली. ते दिग्गज नेते 70 हजार ते दीड लाखाच्या मताने निवडणूक हरले. त्यामुळे निश्चित ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे, हे सिद्ध करणार आहे. विधानसभा निवडणुकीत 15 टक्के मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला ईव्हीएममध्ये सेट करून देण्यात आलं होतं. हा रडीचा डाव सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला असून या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत."असे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप म्हणाले.

"नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा  निकाल हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आणि धोकादायक निकाल आहे. या निकालामुळे देशातील लोकशाही संपते की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.हडपसर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढलो. त्या निवडणुकी दरम्यान 25 दिवसांमध्ये जो निवडणुकीचा टेम्पो होता. तसेच नागरिकांच्या मनातली असलेली नाराजी, संताप पाहता विद्यमान आमदार तीस ते चाळीस हजार मताच्या फरकाने पडतील, असं चित्र होतं. त्याबाबत विविध एजन्सीज-ने , सर्वे करणाऱ्या संस्थांनी आणि माध्यमांनी केलेल्या सर्वेमध्ये देखील माझा विजयाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या सगळ्या गोष्टी बाजूला सारून माझा तब्बल 7 हजार मतांनी पराभव झाला. हे संशयास्पद आहे." असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार  पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी सांगितले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून आता ईव्हीएम घोटाळा झाल्याचे आरोप विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून  केले जात आहे. मनसेच्या दहिसरच्या उमेदवाराने देखील याबाबत सवाल उपस्थित केले आहे. मनसेचे दहिसरचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी देखील आता ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे.

"माझ्या घरात मी, माझी पत्नी, मुलगी आणि आई अशी चार मतं आहेत. तरीही मला दोनच मतं कशी मिळाली?" असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर फॉर्म नंबर 17सी आणि ईव्हीएम मशीनचा नंबर देखील जुळत नसल्याचं येरुणकर यांनी म्हंटलं आहे. दोन-दोन दिवस झाल्यानंतर ईव्हीएम मशिनचे चार्जिंग 99 टक्के कसं राहातं, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

महाराष्ट्रातील युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील ईव्हीएम घोटाळ्याविषयी त्यांच्या भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत.

"राज्यातील जनतेमध्ये ईव्हीएम संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आवाज उठवत आहोत.मतदानात अचानक झालेली वाढ, पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम मधील फरक, फॉर्म 20 अद्याप दिलेले नसणे, असे अनेक प्रश्न आज सामान्य मतदारांच्या मनात आहेत. याचाच भाग म्हणून आम्ही निवडणूक आयोगाचा डेटा नीट अभ्यासला असता काही महत्त्वाच्या नोंदी लक्षात आल्या, ज्यामधून लोकशाहीवर विश्वास असलेल्यांची चिंता वाढल्याशिवाय रहात नाही. आम्हाला लक्षात आलेली आकडेवारी जनतेसमोर ठेवत आहोत. निवडणूक आयोग यावर उत्तर देईल का? की नेहमीप्रमाणे जनभावनेला डावलण्यात येईल ते पाहू. विधानसभा निकालात आता बदल नाही होणार हे मान्य, पण येणाऱ्या निवडणुकांसाठी  आमच्या मनातल्या सर्व शंकांचे निरसन होईल, ही अपेक्षा!" असे रोहित पवार यांनी सांगितले.

"महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिकांना अविश्वासनीय, धक्कादायक व न पटणारा असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. महाराष्ट्रात दररोज ईव्हीएम घोटाळ्याविषयी नवनवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांच्या मनात अजूनच संशय वाढताना दिसत आहे. विधानसभेच्या निकालावरती जे जे आक्षेप घेतले गेले आहे त्याचे निवडणूक आयोगाकडून व्यवस्थित स्पष्टीकरण मिळणे गरजेचे आहे. तसेच सर्व नागरिकांच्या मनातील शंका दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या इतिहासात कधीच असा धक्कादायक निकाल लागला नाही, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महायुतीच्या विरोधात वातावरण असताना तसेच राज्यात महागाई, बेरोजगारी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळणे गंभीर प्रकरण, शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, महिला अत्याचार अश्या गंभीर समस्या असताना देखील एवढा मोठा विक्रमी महाविजय "महायुतीला" मिळाल्यामुळे व महाविकास आघाडीचा एवढा मोठा दारुण पराभव झाल्यामुळे राज्यात अनेक नागरिकांच्या, राजकीय नेत्यांच्या मनात निकालाविषयी, ईव्हीएम मशीन विषयी  शंका निर्माण झालेल्या आहेत."

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालात पुणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने वर्चस्व मिळवल्याचे निकालावरून दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुणे जिल्ह्यात आठ जागा जिंकलेल्या आहेत. पुणे शहरात भाजपने जरी बाजी मारलेली असली तरी पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जास्त जागा जिंकल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात आपणच "दादा" असल्याचे निकालावरून सिद्ध केलेले आहे.

पुणे जिल्ह्याच्या राजकारणावरती नेहमीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व राहिलेले दिसून आलेले आहे. राज्यात भाजप हा पक्ष कितीही ताकदवान असला तरी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे.


पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचे चित्र : -


1)कसबा

हेमंत रासने - भाजप- विजयी

रवींद्र धंगेकर - काँगेस - पराभूत

गणेश भोकरे - मनसे - पराभूत


2)कोथरूड

चंद्रकांत पाटील - भाजप - विजयी

चंद्रकांत मोकाटे - शिवसेना उद्धव ठाकरे गट - पराभुत

किशोर शिंदे - मनसे - पराभूत


3)पर्वती

माधुरी मिसाळ - भाजप - विजयी

अश्विनी कदम - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

4)पुणे कॅन्टोन्मेंट

सुनील कांबळे - भाजप - विजयी

रमेश बागवे - काँगेस - पराभूत


5)वडगाव शेरी

बापू पठारे - राष्ट्रवादी  काँग्रेस शरद पवार गट - विजयी

सुनील टिंगरे - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - पराभुत


6)खडकवासला

भीमराव तापकीर - भाजप - विजयी

सचिन दोडके - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत

मयुरेश वांजळे - मनसे- पराभूत


7)शिवाजीनगर

सिद्धार्थ शिरोळे - भाजप - विजयी

दत्ता बहिरट - काँग्रेस - पराभूत


8)हडपसर

चेतन तुपे - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - विजयी

प्रशांत जगताप - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत

साईनाथ बाबर - मनसे - पराभूत


9)बारामती

अजित पवार - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट  - विजयी

युगेंद्र पवार - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत


10)इंदापूर

दत्तात्रय भरणे - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट  - विजयी

हर्षवर्धन पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत


11)आंबेगाव

दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - विजयी

देवदत्त निकम - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत


12)जुन्नर

शरद सोनवणे - अपक्ष - विजयी

अतुल बेनके - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - पराभूत

सत्यशील शेरकर - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत


13)शिरुर

माउली कटके - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - विजयी

अशोक पवार - राष्ट्रवादी शरद पवार गट - पराभूत


14)दौंड 

राहुल कुल - भाजप - विजयी

रमेश थोरात - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

15)पुरंदर

विजय शिवतारे - शिवसेना -विजयी

संजय जगताप - काँग्रेस - पराभूत


16)भोर

शंकर मांडेकर - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - विजयी.

संग्राम थोपटे - काँग्रेस - पराभूत.


17)मावळ

सुनील शेळके - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट -  विजयी

बापू भेगडे - अपक्ष - पराभूत.


18)पिंपरी

अण्णा बनसोडे - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - विजयी

सुलक्षणा शिलवंत - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत


19)चिंचवड

शंकर जगताप - भाजप - विजयी

राहुल कलाटे - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत


20)भोसरी

महेश लांडगे - भाजप - विजयी

अजित गव्हाणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - पराभूत


21)खेड

बाबाजी काळे - शिवसेना उद्धव ठाकरे गट - विजयी.

दिलीप मोहिते पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - पराभूत.



पुणे जिल्हा - 2024 चे पक्षीय बलाबल : -


भाजप - 9

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - 8

शिवसेना शिंदे गट - 1

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार - 1

शिवसेना उद्धव ठाकरे गट - 1

अपक्ष - 1


पुणे शहराच्या राजकारणात भाजपने वर्चस्व राखलेले आहे. तर पुणे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने वर्चस्व राखलेले आहे.

"महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक यावेळेस खूप चुरशीची होती परंतु विधानसभेच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील नागरिकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या लवकरात लवकर दूर होणे खूप गरजेचे आहे. निवडणूक आयोगाचा कारभार, ईव्हीएम मशीन व निवडणूक यंत्रणा याविषयी जर नागरिकांच्या मनात जास्त शंका असतील तर हे कमकुवत लोकशाहीचे लक्षण आहे."

महाराष्ट्रातील जनता हुशार व सुज्ञ आहे.राज्यकर्ते पक्ष कोणीही जरी असले तरी पारदर्शक कारभाराची नेहमीच जनता अपेक्षा करत असते.

Sunday, November 24, 2024

"पुरंदर - हवेलीच्या जनतेने मा.राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिली तिसऱ्यांदा संधी, अटीतटीच्या तिरंगी लढतीत विजय शिवतारे यांनी पुरंदरवर फडकवला शिवसेनेचा भगवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गेमचेंजर सभेचा करिष्मा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या "या" राजकीय खेळीची मतदारसंघात जोरदार चर्चा"

पुरंदर, सासवड,दि.२४ : संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पुरंदर - हवेलीच्या चुरशीच्या, तिरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांचा 24 हजार 188 मतांनी पराभव केला.

ऐतिहासिक पुरंदरच्या सासवड येथे लोकनेते शरद पवार यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी घेतलेली सभा जशी गाजली तशीच मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली सभा देखील चांगलीच गाजली. पुरंदर - हवेलीच्या जनतेने विजय शिवतारे यांना तिसऱ्यांदा संधी देऊन आमदार बनवले आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

राज्यात महायुतीमधील मैत्रीपूर्ण लढती ज्या गाजल्या त्यात पुरंदर - हवेलीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या पुरंदर - हवेलीमधील उमेदवारीमुळे विजय शिवतारे यांचा विजय सुकर झाल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

राज्यातील हायव्होल्टेज आणि पुणे जिल्ह्यामधील चर्चेत राहिलेल्या पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत झाली. शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी २४१८८ मतांनी विजय मिळवत पुरंदरवर शिवसेनेचा भगवा फडकवला. विजय शिवतारेंना 1,25,819 मते मिळाली. काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांना 1,01,651 मते मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संभाजी झेंडे यांना 47,196 मते मिळाली आहेत. 

पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघात झालेल्या या चुरशीच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना 47 हजार 196 मते मिळाल्यामुळे या मतविभाजनाचा  सरळसरळ फायदा विजय शिवतारे यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरलेला दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या प्रचारासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित दोन सभा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे पुरंदर - हवेलीमधील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.

"काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांचा मतविभाजनाच्या माध्यमातून पराभव करण्यासाठीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये संभाजी झेंडे यांना उमेदवारी देऊन,एक वेगळी राजकीय खेळी खेळल्याची जोरदार चर्चा पुरंदर - हवेलीच्या मतदारसंघांमध्ये सुरू झाली आहे."

महाराष्ट्रात गाजलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सासवड येथील गाजलेली सभा, मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांची दहा वर्षातील विकास कामे, शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रभावशाली प्रचार, महायुतीतील घटक पक्षांची प्रचार यंत्रणा, संभाजी झेंडे यांच्या उमेदवारीने झालेले मतविभाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्या कामावर  दाखवलेले विश्वास या कारणांमुळेच विजय शिवतारे यांचा विजय सुकर झाल्याचे दिसून येत आहे.

विजय शिवतारे हे खासदारकीसाठी इच्छुक होते पण त्यांना विधानसभेला उमेदवारी देण्यात आली. पुरंदर विधानसभा निवडणुकीमध्ये २००९ आणि २०१४ मध्ये विजय शिवतारे यांनी विजय मिळवला होता. मात्र २०१९ ला संजय जगताप यांनी विजय मिळवत विजय शिवतारेंचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा विजय शिवतारे यांनी पुरंदरमध्ये आमदारकी मिळवली आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांची पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड होती. तालुक्यात काँग्रेसचे तरुणांचे संघटन खूप मजबूत आहे. संजय जगताप यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे प्रचारामध्ये त्यांनी खूप मोठी आघाडी घेतली होती.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची  सासवड येथे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमुळे काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. 

या सभेमुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी वातावरण निर्मिती तालुक्यामध्ये निर्माण झाली होती. परंतु शेवटच्या दोन दिवसात शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेने जोरदार प्रचार केला व संपूर्ण तालुक्यात वातावरण फिरले आणि शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी या निवडणुकीत बाजी मारली.

पुरंदरचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या उमेदवारीमुळे या पुरंदर - हवेलीच्या विधानसभा निवडणुकीत खरी चुरस निर्माण झालेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संभाजी झेंडे यांनीही तालुक्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रचार केला. संभाजी झेंडे यांची प्रचार यंत्रणाही भक्कम होती. माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी पुरंदर - हवेलीच्या जनतेला दिलेल्या परिवर्तनाच्या हाकेला निवडणुकीच्या निकालातून जनतेने साथ दिलेली दिसत नाही.

पुरंदर - हवेलीची निवडणूक गुंजवणीचे पाणी, विमानतळ या प्रमुख मुद्द्यांवरून मागील काही निवडणुकांमध्ये आणि याही निवडणुकीत खूप गाजलेली आहे. पुरंदरचा शेतकरीराजा गुंजवणीच्या पाण्याची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहे. पुरंदर तालुक्याचा दुष्काळ संपण्यासाठी गुंजवणी प्रकल्प लवकरात लवकर यशस्वीपणे पूर्ण होऊन, पुरंदरच्या शेतकऱ्याच्या बांधावर लवकरात लवकर पाणी येणे खूप गरजेचे आहे. याही निवडणुकीत गुंजवणीच्या पाण्याचा विषय खूप गाजला.

शनिवारी सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदान मोजणीला सुरुवात झाली. टपाली मतदानातच काँग्रेसचे संजय जगताप यांना १६१ मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर ईव्हीएम मतदान मोजणीत विजय शिवतारे यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेण्यास जी सुरुवात केली. ती शेवटपर्यंत आघाडी त्यांनी  ठेवली.

पुरंदर विधानसभा निवडणुकीत यावर्षी विक्रमी 61.02 टक्के मतदान झाले होते. 16 उमेदवार आपले आमदारकीचे नशीब आजमावत असले तरी, महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महायुतीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यातच खरी चुरशीची लढत होताना दिसून आली. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी 2 लाख 40 हजार 538 पुरुष मतदार, 2 लाख 23 हजार 446 महिला मतदार तर 33 अन्य असे एकुण 4 लाख 62 हजार 17 मतदारांची नोंद होती. त्यापैकी 1 लाख 49 हजार 071 पुरुषांनी, 1 लाख 33 हजार 299 महिला, तर 6 अन्य असे एकुण 2 लाख 82 हजार 376 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे विक्रमी 61.02 टक्के मतदान झाले होते.

मतमोजणीच्या दहाव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 44 हजार 624 मते,संजय जगताप यांना 28 हजार 117 मते, तर संभाजी झेंडे यांना 15 हजार 074 मते मिळाली. विजय शिवतारे यांनी दहाव्या फेरीत 16  हजार 507 मतांनी आघाडी घेतली.

विसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 86 हजार 465 मते,संजय जगताप यांना 63 हजार 701 मते, तर संभाजी झेंडे यांना 33 हजार 253 मते मिळाली. विजय शिवतारे यांनी विसाव्या फेरीत 22 हजार 764 मतांनी आघाडी घेतली.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

पंचवीसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 1लाख 05 हजार 819 मते, संजय जगताप यांना 83 हजार 584 मते, तर संभाजी झेंडे यांना 39 हजार 899 मते मिळाली. विजय शिवतारे यांनी पंचविसाव्या फेरीत 22 हजार 235 मतांनी आघाडी घेतली.

तिसाव्या फेरी अखेर विजय शिवतारे यांना 1 लाख 25 हजार 819 मते, संजय जगताप यांना 1 लाख, 1 हजार 651 मते, संभाजी झेंडे यांना 47 हजार 196 मते मिळाली.

शेवटच्या तिसाव्या फेरीत विजय शिवतारे यांनी या निवडणूक लढतीत 24 हजार 188 मतांनी विजय मिळवत पुरंदरवर शिवसेनेचा भगवा फडकवला. पुरंदर - हवेलीतील शिवसैनिकांनी या दमदार विजयामुळे खूप मोठा जल्लोष केला.

"पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघात माझ्या कारकिर्दीत दहा वर्षात केलेली विकास कामे, कार्यकर्त्यांची एकजूट व मेहनत, महायुतीची प्रचार यंत्रणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या कामावर दाखवलेला विश्वास व त्यांची गाजलेली सभा, पुरंदर हवेलीच्या जनतेने ही निवडणूक हातात घेऊन पुन्हा दाखवलेला मोठा विश्वास यामुळेच या निवडणुकीत आम्हाला हा मोठा विजय मिळवता आला. येणाऱ्या दीड वर्षात गुंजवणीचा प्रकल्प पूर्ण होऊन माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती गुंजवणीचे पाणी पोहोचेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच विमानतळाचा प्रकल्प पूर्ण होईल. आयटी पार्क, अत्याधुनिक महिला रुग्णालय यासारखी विविध विकास कामे येणाऱ्या काही वर्षात लवकरच पूर्ण होतील. हवेलीतील आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव पठारचा पाणी प्रश्न येणाऱ्या पाच - सहा महिन्यांमध्ये प्राधान्यक्रमाने सोडवू." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघातील आंबेगाव पठार हा परिसर नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे व विकासापासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळे या भागाकडे लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"पुरंदर - हवेली मतदारसंघाकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते  कारण येथून तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे कोण बाजी मारणार? याच्याच चर्चा चालल्या होत्या. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप, महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतारे तर महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे या तिन्ही तुल्यबळ उमेदवारांचा पुरंदर - हवेलीतील जनतेशी कमी जास्त प्रमाणात संपर्क असल्यामुळे तीनही उमेदवारांची धाकधूक वाढली होती. परंतु या अटीतटीच्या लढतीमध्ये  शिवसेनेचे विजयबापू शिवतारे यांनी बाजी मारली आहे. आणि बहुमताने विजयी झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात गुंजवणीचा प्रश्न, विमानतळाचा प्रश्न, राष्ट्रीय बाजार समिती, एमआयडीसीचे विस्तारीकरण असे अनेक विषय विजय शिवतारे यांना लवकर मार्गी  लावावे लागणार आहेत. तसेच पुरंदर - हवेलीतील सर्वसामान्य नागरिकांशी मोठया प्रमाणावर संपर्क वाढवावा लागणार आहे. कुठल्याही नेत्यांच्या भोवताली असणारी चांडाळ चौकडी आणि मलिदा गँग यांचे मनसुबे ओळखून त्यांना चार हात दूर ठेवून, पुरंदर - हवेलीच्या कोणत्याही नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यतत्पर राहिले पाहिजे, मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली पाहिजेत तरच दीर्घकाळ राजकारण करून जनतेची मोठ्या प्रमाणावर सेवा करता येईल." अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार, पुढारीचे निर्भीड पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

पुरंदर - हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी, राज्यातील एक आदर्श मतदारसंघ निर्माण होण्यासाठी, पुरंदर - हवेलीचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे प्रचंड मेहनत घेतील. अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.