Wednesday, February 26, 2025

"राजगड - वरसगावच्या निसर्गरम्य, ऐतिहासिक भूमीत पर्यटन व्यावसायिकांतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; छत्रपती शिवाजी महाराजांना शिवकालीन मर्दानी खेळाच्या माध्यमातून मानवंदना; 'वरसगाव - पानशेत परिसरात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मूलभूत सुविधांवर भर, गड संवर्धनावर विशेष भर तसेच राजगड - पर्यटन महोत्सव आयोजित करणार - आमदार शंकर मांडेकर"

राजगड, वरसगाव, दि.२६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने व महान पराक्रमाने पावन झालेली राजगडची महान भूमी. पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील पर्यटकांसाठी आवडते असे पर्यटन स्थळ म्हणजे प्रसिद्ध निसर्गरम्य परिसर  असलेले वरसगाव धरण व पानशेत धरण  परिसर होय. 

ऐतिहासिक राजगड तालुक्यातील वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यावसायिकांतर्फे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन करून, भोर - राजगड - मुळशीचे लोकप्रिय आमदार शंकर मांडेकर  यांनी शिवकालीन  शस्त्रास्त्रे पूजन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन, शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

बुधवारी 19 फेब्रुवारीला राजगड-पानशेत येथील पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने वरसगांव गोरडवाडी येथे आमदार  शंकर  मांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले.

पर्यटन व्यावसायिक व वरसगांव गोरडवाडी येथील ग्रामस्थांतर्फे आमदार शंकर मांडेकर यांचा शौर्य व पराक्रमाचे प्रतीक असलेली, रणमर्द मराठा मावळ्यांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन  सत्कार करण्यात आला.

या शिवजयंती कार्यक्रमावेळी वरसगाव ग्रामपंचायत उपसरपंच विलास दसवडकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार गोरड, ज्ञानोबा गोरड, शरद पवार, दिलीप दसवडकर, यशवंत कटके, विनोद गोरड, दत्ता गोरड, अंशुमन गोरड तसेच पर्यटन व्यावसायिक नितीन गुंड, योगेश सपकाळ, विकी लोहकरे, मिलिंद भिडे, माने, भोसले, आनंद गोरड, रवी घाडगे, रोनक जैन, सचीन गोरड, जागडे, अमित पासलकर, राहुल कोंडेकर, भालेराव, कोठावळे, तेजस साळुंखे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी किरण राऊत, विलास कोंढाळकर, निर्मलाताई जागडे व कीर्तिताई देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

वरसगांव गोरडवाडी येथे शिवशंभु मर्दानी आखाडाच्या वतीने प्रतीक साष्टे यांच्या २५ कलाकारांनी शिवकालीन शस्त्रांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

आमदार शंकर मांडेकर यांनी शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या सर्व कलाकारांचा गौरवपत्र देऊन, सत्कार केला.

ही शिवकालीन युद्धकला जोपासण्यासाठी, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी भोर, राजगड, पानशेत, मुळशी या परिसरामधील निसर्गरम्य परिसरासोबतच रायरेश्वर, राजगड, तोरणा, रोहिडेश्वर व इतर ऐतिहासिक स्थळांची, तेथील ज्वलंत इतिहासासह माहिती देऊन, पर्यटनाच्या दृष्टीने या भागामध्ये असलेल्या फार मोठ्या  संधीचा विचार करता, या परिसराची तुलना शेजारच्या तालुक्यासोबत किंवा इतर राज्यांसोबत न होता काही देशांमधील पर्यटनासारख्या संधी व क्षमता येथे असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी यावेळी नमूद केले. 

लवकरच हा संपुर्ण परिसर पर्यटन विश्वाच्या नकाशावर प्रसिद्ध होण्यासाठी येथे अत्यंत भव्य - दिव्य राजगड पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची महिती त्यांनी दिली. 

"वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यावसायिकांनी शिवजयंती उत्सव खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मूलभूत सुविधांवरती भर दिला जातोय तसेच गड संवर्धनाच्या  कामावरती आमचा विशेष भर आहे. वरसगाव - पानशेत परिसरात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा देत असून,या भागात लोकांना चांगले मोबाईल नेटवर्क मिळण्यासाठी, मोबाईल कंपन्यांचे टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी  पाठपुरावा चालू आहे. वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राजगड पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे." अशी प्रतिक्रिया भोर - राजगड - मुळशीचे लोकप्रिय आमदार शंकर मांडेकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यवसायिकांच्या वतीने वरसगाव येथे शिवजयंती महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिवशंभू मर्दानी आखाडा या  संस्थेच्या कलाकारांनी शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी या कलाकारांचा गौरव करून, शिवजयंती महोत्सवात आम्हाला मार्गदर्शन केले. पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी आमदार शंकरभाऊ मांडेकर साहेबांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली 'राजगड पर्यटन महोत्सव' आयोजित करण्यात येणार आहे. याचे आम्हाला खूप समाधान आहे." अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

या भव्य - दिव्य शिवजयंती कार्यक्रमासाठी सर्वांसाठी भोजन व्यवस्था प्रसिद्ध हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांनी केली. सिंहगड रोड, वरसगाव - पानशेत परिसरातील नामांकित असे हॉटेल वरसगाव चौपाटी शेकडो ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ओळखले जाते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणराव हाडके यांनी तर आभार प्रदर्शन आनंद गोरड यांनी केले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

वरसगाव धरणाच्या निसर्गरम्य परिसरात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आल्यामुळे या भागातील शिवप्रेमींनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, शिवजयंती उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली.

Monday, February 24, 2025

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर नगरीत लाखो भाविक - भक्तांचा जनसागर, 'सवाई सर्जाचं चांगभलं'च्या गजरात, महाराष्ट्रातील ऐतिहासिक वीर यात्रा सोहळ्याची लाल रंगाचे शिंपण करून; भक्तिमय वातावरणात, पारंपारिक मारामारी सोहळ्याने सांगता"

पुरंदर,वीर, दि. २४ :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक  मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपारिक पद्धतीने, "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात, मानकरी, सालकरी,दागिनदार, लाखो भाविकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक परंपरा जोपासत, रविवारी उत्साहात पार पडला. मारामारीच्या  पारंपरिक सोहळ्याने 13 दिवस चालणाऱ्या वीरच्या यात्रेची सांगता झाली.

रविवार पारंपारिक मारामारीचा( रंगाचे शिंपण)  उत्सव काळातील महत्त्वाचा दिवस. पहाटे पाच वाजता देवाची पुजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक केल्यानंतर साडेदहा वाजता देवाला दहीभाताची पुजा बांधण्यात आली.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

दुपारी १२ वाजता कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई आणि सोनवडीच्या श्रीनाथ म्हस्कोबांच्या पालख्या व सर्व काठ्या देऊळवाड्यात आल्या. देवाची आरती होऊन छबिन्याला सुरुवात झाली. 

छबिन्यासह सर्व पालख्या व काठ्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर भाविकांनी "श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं" असा गजर केला आणि गुलाल, खोबरे उधळले.  मंदिराला दोन प्रदक्षिणा होऊन श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची अमृतवाणी(भाकनुक) झाली.

तिसऱ्या प्रदिक्षिणेवेळी जमदाडे मंडळीकडून दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी  रंगाचे शिंपण करण्यात आले. अशा पद्धतीने पारंपारिक मारामारी (रंगाचे शिंपण) सोहळ्याने  वीर यात्रेची, पारंपारिक उत्सवाची सांगता झाली.

या पारंपारिक सोहळ्यात लाखो लोकांनी "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात मंत्रमुग्ध होऊन, आपल्या अंगावर रंग पडण्यासाठी भाविक - भक्तांनी गर्दी केली.

या पारंपारिक सोहळ्यात दुपारी दीड वाजल्यानंतर श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीवर रंगाचे शिंपण करण्यात आले. त्यानंतर मानाच्या काठीवर रंगाचे शिंपण झाले आणि नंतर भाविकांच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आले. रंगाचे शिंपण होऊन, पारंपारीक मारामारी उत्सवाने ऐतिहासिक वीर यात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला, भक्तीची ओढ लावणारा, भक्तिमय वातावरणात ऊर्जा देणारा  महाउत्सव असतो.

या पारंपरिक यात्रा सोहळ्यासाठी पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे, मा.जिल्हाधिकारी पुणे, मा. तहसीलदार पुरंदर, सासवड पोलीस प्रशासन, पुरंदर पंचायत समिती, सासवड आरोग्य विभाग, विद्युत वितरण कंपनी, वीर देवस्थान ट्रस्ट,वीर ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, ग्रामस्थ,भाविक,  मानकरी, स्वयंसेवक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांच्या सामूहिक नियोजनातून यात्रा उत्सव व्यवस्थित पार पडला.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

या पारंपारिक यात्रा उत्सव काळात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र धुमाळ, व्हाईस चेअरमन अमोल धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.

सकाळपासूनच भाविकांची गर्दी व दर्शनाबारी, पार्किंग, मंदिरातील सर्व विधी वेळेत पूर्ण करणे याबाबत देवस्थान ट्रस्टने पूर्व नियोजन करीत सर्व विश्वस्त मंडळ जातीने हजर राहून व्यवस्था पाहत होते. 

या सोबतच महसूल विभाग,   पोलीस प्रशासन, कमांडो स्टाफ (शिल्ड सिक्युरिटी), वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एस.टी व पीएमपीएल  बससेवा, विद्यत रोषणाई विभाग, अनिरुद्धा डिझास्टर मेनेजमेंट, होमगार्ड, पोलीसमित्र,हाउसकीपिंग विभाग, गावातील कार्यरत सर्व सेवेकरी यांनी उत्कृष्ट काम करीत आपली सेवा बजावली.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले.चालू वर्षाचा यात्रा उत्सव व्यवस्थित पार पाडण्याकरिता सहकार्य केलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, तसेच कोडीत, कन्हेरी, वाई, सोनवडी, राजेवाडी, भोंडवेवाडी, कसबा(पुणे), वीर पालखी, सर्व मानकरी, सालकरी, दागीनदार, स्वयंसेवक, वीर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सल्लागार,सहकारी,ग्रामस्थ,पत्रकार बांधव, तसेच श्रीनाथांच्या दर्शनासाठी आलेले लाखो भाविक, देणगीदार, ज्ञात-अज्ञात सर्वांनीच मोलाचे सहकार्य केल्याने यात्रा निर्विघ्नपणे, मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला लाखो भाविक - भक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली याचे आम्हाला खूप समाधान आहे." अशी प्रतिक्रिया वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


"श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी हे अत्यंत जागृत व भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे कलियुगातील दैवत आहे. याची अनेकांनी प्रचिती घेतली आहे. 'खोट्या भ्रष्ट जनावरी ...काळभैरव कोपकरी . जो जो अहंकार करी... श्रीनाथ त्याचा नाश करी.' या उक्तीप्रमाणे श्रीनाथ म्हस्कोबा ज्याचे जसे कर्म तसे त्याला फळ प्रदान करत असतात. मनुष्य देह हा काम, क्रोध, द्वेष, मोह, मत्सराने सदैव ग्रासलेला असतो परंतु याच्यावरती नामस्मरण,भक्ती हाच सर्वात मोठा उपाय आहे. म्हणून या कलियुगामध्ये काशीकंट काळभैरव श्रीनाथांचे नामस्मरण करणाऱ्या भक्ताला श्रीनाथ म्हस्कोबा महाराज सर्व संकटातून मुक्त करून, सदैव आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येत असतात. अशा या भक्तवत्सल श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांची कृपादृष्टी सदैव सर्वांवरती राहावी." अशी प्रतिक्रिया  दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना ऊर्जा देणारा व भक्तीची ओढ लावणारा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा भक्तांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करून टाकतो.

Wednesday, February 19, 2025

"युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साता समुद्रापार लंडनमध्ये बकिंगहॅम पॅलेस परिसरात ढोल - ताशांच्या गजरात उत्साहात साजरी; दिल्लीतही शिवजयंती उत्साहात साजरी, भारतीय सेनेची अनोखी विशेष मानवंदना; नाशिकच्या ढोल ताशांचा गगनभेदी गजर"


नवी दिल्ली, दि. १९ : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरातील मराठी माणसांचा फार मोठा उत्सव असतो. जगभरातील शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करत असतात. लंडन मधील बकिंगहॅम पॅलेस जवळ डबल ट्रि बाय हिल्टन मार्बल आर्ज परिसरात छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनने तिसऱ्यांदा मोठ्या उत्साहात बुधवारी शिवजयंती सोहळा साजरा केला.


‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष . . शिवप्रेमींची मोठी आणि उत्साही उपस्थिती . . ढोलताशांचा गगनभेदी गजर…  शाहिरी पोवाड्यांसह निनादणाऱ्या तुताऱ्या . . . मस्तकी विलसणारे भगवे फेटे ..भारतीय सेनेची अनोखी मानवंदना ... अशा अत्यंत उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती  देशाच्या राजधानीत दिल्लीत बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली.


दिल्लीतील शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात बुधवारी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास संभाजीराजे छत्रपती आपल्या परिवारासह उपस्थित होते. खासदार राजाभाऊ वाजे, मेजर जनरल एस. एस. पाटील (विशिष्ट सेवाचक्र) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्र सदनाच्या मुख्य  प्रवेश भागातील मध्यस्थानी  छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्यात आली होती. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

या ठिकाणी आयोजित विशेष कार्यक्रमात शिवजन्मोत्सवानिमित्त संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे  आणि परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत पाळणा पूजन करण्यात आले.  त्यानंतर पालखी पूजनही झाले.


सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. 


महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनाच्या सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार आदींसह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी तसेच  दिल्ली राजधानी क्षेत्र,  हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

या ठिकाणी भारतीय सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमच विशेष मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने महाराष्ट्र सदनाचा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.


नाशिकच्या ढोल ताशांच्या पथकानेही या कार्यक्रमात  सादरीकरण केले. या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले.  ढोल पथकातील सहभागी तरुणाईचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.


मानवंदनाच्या कार्यक्रमानंतर .सदनाच्या सभागृहात ‘द फोक’ आख्यान खड्या आवाजात सादर करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित आख्यान  भिडणारे असे होते.


संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध मान्यवरांसह शिवप्रेमींकडून अभिवादन  करण्यात आले. खासदार अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे व माजी खासदार हेमंत गोडसे आदींची यावेळी उपस्थिती होती. येथेही ढोलताशा पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली.


"छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने राज्यात साजरी करण्यात आली. साता समुद्रापार लंडनमध्ये शिवजयंती मोठ्या दिमाखात पार पडली. आता भारताबाहेरही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. लंडनमध्ये धिरजसिंह तौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनने तिसऱ्यांदा मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला."


"लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस जवळ डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्च हॉटेल मधील सभागृहात भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून अभिवादन केले. शिवाय, लंडनमधील मार्बल आर्च परिसरात शिवजयंतीनिमित्त रस्त्यावर भव्य रॅली काढण्यात आली. या सोहळ्यात मराठमोळ्या संस्कृतीचा उत्तम मिलाफ पाहायला मिळाला."


शिवजयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते आणि त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, लंडन येथील वेस्ट मिनिस्टर काउंसिलच्या मार्बल आर्च हार्ड स्टँड येथे प्रथमच ढोल-ताश्यांचा गजर दुमदुमला. ही ऐतिहासिक घटना होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त लंडनच्या हृदयस्थानी अशी परंपरा पाहायला मिळाली.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी यश सुतार, सौरभ खेड़कर, कौस्तुभ रामेकर, तुषार पाटील, स्वप्निल गावडे, तुषार मौले, यशवंत गुरव, प्रथमेश मोरे, आशुतोष ढमाले व अभिषेक देवरुखकर यांनी अतोनात मेहनत घेतली. 


या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा बहुमान लंडनमधील भारतीय नागरिकांना मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली.

जगाच्या कानाकोपऱ्यातील कुठल्याही देशात कामानिमित्त राहणाऱ्या भारतीयाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा मिळत असते. 


प्रत्येक भारतीयाने त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उच्चतम पातळीवरती पोहोचून, आपल्या देशासाठी गौरवशाली काम करून छत्रपती शिवाजी महाराजांना आगळेवेगळे अभिवादन करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान, प्रेरणादायी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास जगभरातील शिवभक्तांना नेहमीच प्रेरणा देत असतो.