Wednesday, February 19, 2025

"युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साता समुद्रापार लंडनमध्ये बकिंगहॅम पॅलेस परिसरात ढोल - ताशांच्या गजरात उत्साहात साजरी; दिल्लीतही शिवजयंती उत्साहात साजरी, भारतीय सेनेची अनोखी विशेष मानवंदना; नाशिकच्या ढोल ताशांचा गगनभेदी गजर"


नवी दिल्ली, दि. १९ : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरातील मराठी माणसांचा फार मोठा उत्सव असतो. जगभरातील शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करत असतात. लंडन मधील बकिंगहॅम पॅलेस जवळ डबल ट्रि बाय हिल्टन मार्बल आर्ज परिसरात छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनने तिसऱ्यांदा मोठ्या उत्साहात बुधवारी शिवजयंती सोहळा साजरा केला.


‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष . . शिवप्रेमींची मोठी आणि उत्साही उपस्थिती . . ढोलताशांचा गगनभेदी गजर…  शाहिरी पोवाड्यांसह निनादणाऱ्या तुताऱ्या . . . मस्तकी विलसणारे भगवे फेटे ..भारतीय सेनेची अनोखी मानवंदना ... अशा अत्यंत उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती  देशाच्या राजधानीत दिल्लीत बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली.


दिल्लीतील शिवजयंती राष्ट्रोत्सव समितीतर्फे येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात बुधवारी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास संभाजीराजे छत्रपती आपल्या परिवारासह उपस्थित होते. खासदार राजाभाऊ वाजे, मेजर जनरल एस. एस. पाटील (विशिष्ट सेवाचक्र) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्र सदनाच्या मुख्य  प्रवेश भागातील मध्यस्थानी  छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्यात आली होती. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

या ठिकाणी आयोजित विशेष कार्यक्रमात शिवजन्मोत्सवानिमित्त संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे  आणि परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत पाळणा पूजन करण्यात आले.  त्यानंतर पालखी पूजनही झाले.


सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. 


महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनाच्या सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार आदींसह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी तसेच  दिल्ली राजधानी क्षेत्र,  हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

या ठिकाणी भारतीय सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमच विशेष मानवंदना देण्यात आली. यानिमित्ताने महाराष्ट्र सदनाचा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता. दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.


नाशिकच्या ढोल ताशांच्या पथकानेही या कार्यक्रमात  सादरीकरण केले. या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले.  ढोल पथकातील सहभागी तरुणाईचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.


मानवंदनाच्या कार्यक्रमानंतर .सदनाच्या सभागृहात ‘द फोक’ आख्यान खड्या आवाजात सादर करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित आख्यान  भिडणारे असे होते.


संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध मान्यवरांसह शिवप्रेमींकडून अभिवादन  करण्यात आले. खासदार अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे व माजी खासदार हेमंत गोडसे आदींची यावेळी उपस्थिती होती. येथेही ढोलताशा पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली.


"छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने राज्यात साजरी करण्यात आली. साता समुद्रापार लंडनमध्ये शिवजयंती मोठ्या दिमाखात पार पडली. आता भारताबाहेरही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. लंडनमध्ये धिरजसिंह तौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनने तिसऱ्यांदा मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला."


"लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस जवळ डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्च हॉटेल मधील सभागृहात भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून अभिवादन केले. शिवाय, लंडनमधील मार्बल आर्च परिसरात शिवजयंतीनिमित्त रस्त्यावर भव्य रॅली काढण्यात आली. या सोहळ्यात मराठमोळ्या संस्कृतीचा उत्तम मिलाफ पाहायला मिळाला."


शिवजयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते आणि त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, लंडन येथील वेस्ट मिनिस्टर काउंसिलच्या मार्बल आर्च हार्ड स्टँड येथे प्रथमच ढोल-ताश्यांचा गजर दुमदुमला. ही ऐतिहासिक घटना होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त लंडनच्या हृदयस्थानी अशी परंपरा पाहायला मिळाली.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी यश सुतार, सौरभ खेड़कर, कौस्तुभ रामेकर, तुषार पाटील, स्वप्निल गावडे, तुषार मौले, यशवंत गुरव, प्रथमेश मोरे, आशुतोष ढमाले व अभिषेक देवरुखकर यांनी अतोनात मेहनत घेतली. 


या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा बहुमान लंडनमधील भारतीय नागरिकांना मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली.

जगाच्या कानाकोपऱ्यातील कुठल्याही देशात कामानिमित्त राहणाऱ्या भारतीयाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा मिळत असते. 


प्रत्येक भारतीयाने त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उच्चतम पातळीवरती पोहोचून, आपल्या देशासाठी गौरवशाली काम करून छत्रपती शिवाजी महाराजांना आगळेवेगळे अभिवादन करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान, प्रेरणादायी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास जगभरातील शिवभक्तांना नेहमीच प्रेरणा देत असतो.

No comments:

Post a Comment