Wednesday, February 26, 2025

"राजगड - वरसगावच्या निसर्गरम्य, ऐतिहासिक भूमीत पर्यटन व्यावसायिकांतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी; छत्रपती शिवाजी महाराजांना शिवकालीन मर्दानी खेळाच्या माध्यमातून मानवंदना; 'वरसगाव - पानशेत परिसरात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मूलभूत सुविधांवर भर, गड संवर्धनावर विशेष भर तसेच राजगड - पर्यटन महोत्सव आयोजित करणार - आमदार शंकर मांडेकर"

राजगड, वरसगाव, दि.२६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने व महान पराक्रमाने पावन झालेली राजगडची महान भूमी. पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील पर्यटकांसाठी आवडते असे पर्यटन स्थळ म्हणजे प्रसिद्ध निसर्गरम्य परिसर  असलेले वरसगाव धरण व पानशेत धरण  परिसर होय. 

ऐतिहासिक राजगड तालुक्यातील वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यावसायिकांतर्फे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन करून, भोर - राजगड - मुळशीचे लोकप्रिय आमदार शंकर मांडेकर  यांनी शिवकालीन  शस्त्रास्त्रे पूजन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन, शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

बुधवारी 19 फेब्रुवारीला राजगड-पानशेत येथील पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने वरसगांव गोरडवाडी येथे आमदार  शंकर  मांडेकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले.

पर्यटन व्यावसायिक व वरसगांव गोरडवाडी येथील ग्रामस्थांतर्फे आमदार शंकर मांडेकर यांचा शौर्य व पराक्रमाचे प्रतीक असलेली, रणमर्द मराठा मावळ्यांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन  सत्कार करण्यात आला.

या शिवजयंती कार्यक्रमावेळी वरसगाव ग्रामपंचायत उपसरपंच विलास दसवडकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार गोरड, ज्ञानोबा गोरड, शरद पवार, दिलीप दसवडकर, यशवंत कटके, विनोद गोरड, दत्ता गोरड, अंशुमन गोरड तसेच पर्यटन व्यावसायिक नितीन गुंड, योगेश सपकाळ, विकी लोहकरे, मिलिंद भिडे, माने, भोसले, आनंद गोरड, रवी घाडगे, रोनक जैन, सचीन गोरड, जागडे, अमित पासलकर, राहुल कोंडेकर, भालेराव, कोठावळे, तेजस साळुंखे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी किरण राऊत, विलास कोंढाळकर, निर्मलाताई जागडे व कीर्तिताई देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

वरसगांव गोरडवाडी येथे शिवशंभु मर्दानी आखाडाच्या वतीने प्रतीक साष्टे यांच्या २५ कलाकारांनी शिवकालीन शस्त्रांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

आमदार शंकर मांडेकर यांनी शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके दाखवणाऱ्या सर्व कलाकारांचा गौरवपत्र देऊन, सत्कार केला.

ही शिवकालीन युद्धकला जोपासण्यासाठी, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी भोर, राजगड, पानशेत, मुळशी या परिसरामधील निसर्गरम्य परिसरासोबतच रायरेश्वर, राजगड, तोरणा, रोहिडेश्वर व इतर ऐतिहासिक स्थळांची, तेथील ज्वलंत इतिहासासह माहिती देऊन, पर्यटनाच्या दृष्टीने या भागामध्ये असलेल्या फार मोठ्या  संधीचा विचार करता, या परिसराची तुलना शेजारच्या तालुक्यासोबत किंवा इतर राज्यांसोबत न होता काही देशांमधील पर्यटनासारख्या संधी व क्षमता येथे असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी यावेळी नमूद केले. 

लवकरच हा संपुर्ण परिसर पर्यटन विश्वाच्या नकाशावर प्रसिद्ध होण्यासाठी येथे अत्यंत भव्य - दिव्य राजगड पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची महिती त्यांनी दिली. 

"वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यावसायिकांनी शिवजयंती उत्सव खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला प्रेरणा देणारा आहे. वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मूलभूत सुविधांवरती भर दिला जातोय तसेच गड संवर्धनाच्या  कामावरती आमचा विशेष भर आहे. वरसगाव - पानशेत परिसरात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा देत असून,या भागात लोकांना चांगले मोबाईल नेटवर्क मिळण्यासाठी, मोबाईल कंपन्यांचे टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी  पाठपुरावा चालू आहे. वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राजगड पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे." अशी प्रतिक्रिया भोर - राजगड - मुळशीचे लोकप्रिय आमदार शंकर मांडेकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"वरसगाव - पानशेत परिसरातील पर्यटन व्यवसायिकांच्या वतीने वरसगाव येथे शिवजयंती महोत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिवशंभू मर्दानी आखाडा या  संस्थेच्या कलाकारांनी शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी या कलाकारांचा गौरव करून, शिवजयंती महोत्सवात आम्हाला मार्गदर्शन केले. पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी आमदार शंकरभाऊ मांडेकर साहेबांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली 'राजगड पर्यटन महोत्सव' आयोजित करण्यात येणार आहे. याचे आम्हाला खूप समाधान आहे." अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

या भव्य - दिव्य शिवजयंती कार्यक्रमासाठी सर्वांसाठी भोजन व्यवस्था प्रसिद्ध हॉटेल वरसगाव चौपाटीचे सर्वेसर्वा सचिन गोरड यांनी केली. सिंहगड रोड, वरसगाव - पानशेत परिसरातील नामांकित असे हॉटेल वरसगाव चौपाटी शेकडो ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ओळखले जाते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणराव हाडके यांनी तर आभार प्रदर्शन आनंद गोरड यांनी केले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

वरसगाव धरणाच्या निसर्गरम्य परिसरात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आल्यामुळे या भागातील शिवप्रेमींनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, शिवजयंती उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली.

No comments:

Post a Comment