नाशिक, दि.१९ : महाराष्ट्रात रंगपंचमी हा सण विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नाशिकची जगप्रसिद्ध "रहाड रंगपंचमी" अठरापगड जातीतील लोकांना तसेच विविध धर्मातील लोकांना माणुसकीच्या धाग्याने एकत्र आणणारी महान संस्कृती आहे.
जगभरातील लोकांना भुरळ घालणारी नाशिकची रहाड रंगपंचमी प्रेम, सद्भावना आणि माणुसकी या भावनांनी सर्वांना एकत्र आणून रंगोत्सव साजरा केला जातो.
पूर्वीच्या काळात, रहाड हे कुस्तीगीरांसाठी त्यांची ताकद दाखविण्याचे ठिकाण मानले जात असे. येथे कुस्ती स्पर्धा होत असत आणि त्याच दरम्यान झालेल्या मारामारीमुळे राडा हा शब्द लोकप्रिय झाला असावा. म्हणूनच रहाड हा शब्द नाशिककरांच्या हृदयात कायमचा राहिला.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
विशेष म्हणजे रहाड संस्कृती अजूनही फक्त नाशिकमध्येच जिवंत आहे. नाशिकचे रहाडिया रंगपंचमीसाठी नेहमीच सज्ज असतात. नाशिकची ही अनोखी रंगपंचमी केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित नाही, तर परदेशातही प्रसिद्ध आहे. म्हणूनच दरवर्षी अनेक परदेशी लोक या रंगपंचमीचा आनंद घेण्यासाठी येतात.
नाशिकमध्ये रंगपंचमी अनोख्या पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जाते. शहरात मोजक्या ठिकाणी असलेल्या पेशवेकालीन रहाडींमध्ये रंग कालवण्यात येतो आणि त्यामध्ये नाशिककर मनसोक्त उड्या घेतात. या रहाडींना फुलांची आणि रंगांची सजावट करण्यात येते. रंग अधिक घट्ट आणि पक्का करण्यासाठी रंग उकळवून रहाडीमध्ये टाकला जातो. दुपारी ऐतिहासिक रहाडीची पूजा करून या उत्सवाला सुरुवात होते.
दिवाळी व्यतिरिक्त, संपूर्ण भारतात सर्वात जास्त उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते.
देशभरात, होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला रंग उधळले जातात. पण संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात, असे एक शहर आहे जिथे होळीच्या पाच दिवसांनी म्हणजेच रंगपंचमीला रंग उधळले जातात.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
नाशिकमध्ये रंगपंचमी एका अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. याला रहाड रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. सर्व नाशिकवासी याची आतुरतेने वाट पाहतात, पण या अनोख्या उत्सवाचा इतिहास मोठा आहे.
नाशिकचा जगप्रसिद्ध "रहाड रंगपंचमी" उत्सव : -
नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. या परंपरेनुसार, नाशिकमधील पेशवेकालीन रहाड उघडले जातात. रहाडया म्हणजे जमिनीखाली बांधलेले छोटी टाकी. ही टाकी सुमारे 10-12 फूट रुंद आणि 10-15 फूट खोल असलेली ही टाकी दगड आणि चुना वापरून बांधण्यात आली होती.
रंगपंचमीच्या दिवशी लोक या रहाड्यांमध्ये उड्या मारतात, ज्यामुळे व्यक्ती पूर्णपणे भिजते. याला धप्पा मारणे म्हणतात. रहाडमध्ये आंघोळ करणे याला धप्पा असेही म्हणतात. एकदा धप्पा मारला की बाजूच्या वीस - पंचवीस लोकांवरती पाणी उडते.
ही रहाड रंगपंचमी परंपरा सुमारे 300 वर्षांपासून सुरू आहे. रंगपंचमी व्यतिरिक्त, या रहाड्या उर्वरित वेळेत बंद ठेवल्या जातात आणि रंगपंचमीच्या काही दिवस आधी उघडल्या जातात.
या रहाड्यांमधील रंग नैसर्गिक पानांपासून आणि फुलांपासून बनवले जातात. त्यामुळे या रंगांपासून कोणतेही नुकसान होत नाही. शहरात अनेक रहाडया असूनही, फक्त तीनच उघडे आहेत. आणि प्रत्येक रहाडीचा रंग निश्चित असतो. शनी चौकातील रहाड गडद गुलाबी रंगाची, दिल्ली गेट परिसरातील रहाड भगवी रंगाची आणि तिवंधाची राहाड पिवळ्या रंगांची आहे. यामुळे नाशिकच्या रंगपंचमीचा एक अनोखा आणि वेगळा रंगीत अनुभव मिळतो.
नाशिकमधील प्रसिद्ध रहाडी आणि त्यांचे विशेष असे रंग : -
दंडे हनुमान चौकातील रहाड - रंग पिवळा : -
नाशिकमधील काजीपुरा पोलीस चौक परिसरात तीनशे वर्षांपूर्वीची पेशवेकालीन दंडे हनुमान रहाड आहे. नाशिक मधील रहाड रंगपंचमी ही नाशिकच्या संस्कृतीचा अविभाज्य असा घटक आहे. पूर्वी येथे बैलगाडीवर मोठमोठे टीप, पाण्याच्या टाक्यातून रंगपंचमी साजरी केली जात असे. मात्र कालांतराने ही परंपरा बंद पडली त्यानंतर रहाड खोदण्यात येऊन रंगपंचमी साजरी केली जाते. रहाडीत पिवळा रंग तयार केला जातो. त्याकाळी जवळपास 200 किलो होऊन अधिक फुलांना एकत्रित करून रंग तयार केले जात होते.
शनि चौकातील रहाड - रंग गुलाबी : -
पंचवटी परिसरातील शनी चौकातील रहाड पेशवे काळापासून प्रसिद्ध आहे. या परिसरात पेशव्यांचे सरदार वास्तव्यास होते त्याकाळी ही रहाड कुस्त्या खेळण्याचा हौद होती. रास्ते सरदार या रहाडीची देखभाल करत असत असे बोलले जाते. शनी चौकातील, शनी चौक मित्र मंडळाने सरदार रस्ते आखाडा परंपरेने या रहाडीची आजतागायत जपणूक केलेली आहे. या रहाडीचा रंग गुलाबी आहे रहाड झाकण्यासाठी सागाच्या लाकडाच्या मोठ्या ओंडक्याचा वापर केला जातो.
तांबट लेन मधील रहाड - रंग केसरी : -
पेशवेकालीन पाषाणातील दगडाच्या बांधकामात तयार केलेली ही रहाड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही रहाड दुर्लक्षित होती. तांबटलेनमधील युवकांनी एकत्र येत ही रहाड खुली केली आहे. या रहाडीचा रंग केशरी असतो.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
रंगपंचमीच्या दिवशी येथील पाच कुटुंबीयांना पूजेचा मान दिला जातो. पूर्वी रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले, तुळस, चंदनाचा वापर केला जात असे. फुले कडईमध्ये उकळवली जात होती त्यानंतर पाण्याने भरलेल्या रहाडीत एकजीव केल्यानंतर रंग तयार करून रहाड भरला जात असे.
तिवंधा चौकातील रहाड - रंग पिवळा : -
तिवंधा चौकात बुधा हलवाईच्या दुकानासमोर ही पेशवेकालीन रहाड आहे. या रहाडीचा रंग पिवळा आहे. हा रंग फुलांपासून बनवला जातो. या रहाडीत महिलांना प्रवेश दिला जातो.
दिल्ली दरवाजा चौकातील रहाड - रंग केसरी : -
गोदा काठावरच्या गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा चौकात ही प्रसिद्ध रहाड आहे. पळसाच्या फुलांपासून बनवला जाणारा रंग हे या रहाडीचे वैशिष्ट्य आहे. या रहाडीचा रंग केशरी आहे.
या रहाडीची देखभाल आणि मान तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. या रहाडीचे परंपरा सुरू ठेवण्यासाठी आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळाची स्थापना करण्यात आली होती.
नाशिकची रहाड रंगपंचमीची ही संस्कृती अठरा पगड जातीतील लोकांना, विविध धर्मातील लोकांना रंगोत्सवाच्या माध्यमातून एकत्र आणून, हिंदू - मुस्लिम बांधवांचे ऐक्य साधून माणुसकीचे दर्शन घडवते.
महाराष्ट्राची महान संस्कृती ही विविध सण, उत्सव, परंपरा, महान इतिहास यामुळे जगभरातील मनुष्य जातीवरती प्रभाव टाकणारी आहे.
महाराष्ट्राची महान संस्कृती व महान इतिहास राज्यातील अठरापगड जातीतील लोकांना एकत्र आणणारा व माणुसकी समृद्धी करणारा असा ऐतिहासिक वारसा आहे.
No comments:
Post a Comment