Friday, September 5, 2025

मराठा



मुंबई,दि.४ : महाराष्ट्रातील लाखो - करोडो गरजवंत, गरीब मराठा समाजाची एकजूट, ऊर्जा आणि आरक्षणाची वेदना मुंबईतील आझाद मैदानावरील ऐतिहासिक आंदोलनात मराठा समाजाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक उपोषणाच्या निमित्ताने, मराठा समाजाच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या निमित्ताने फक्त मुंबईकरांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने, देशाने आणि जगाने पाहिली. जगाने आदर्श घ्यावा असे लोकशाहीच्या शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने 58 मोर्चे काढले. मराठा समाजाने अनेक आंदोलने व उपोषणे केली तरी महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज आरक्षणापासून अजूनही वंचित आहे व मराठा आरक्षणाचा लढा अजूनही चालूच आहे.

No comments:

Post a Comment