"सांगली जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन, मराठी माध्यमातून शिकणारा मुलगा ते पुण्यात उच्च शिक्षण घेऊन 12 हजार रुपयांची नोकरी करणारा तरुण ते वयाच्या 23 व्या वर्षी लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या "येरळा ॲग्रोटेक" कंपनीचा मालक ते टेलिकॉम क्षेत्रात कमी पगारावरती काम करणारा तरुण ते टेलिकॉम क्षेत्रात लाखो - करोड रुपयांची उलढाल करणाऱ्या "स्कायलाईन टेलिकॉम" कंपनीचा मालक ते भारतातल्या जिओ, एअरटेल, वोडाफोन या ब्रँडला सेवा देणाऱ्या कंपनीचा यशस्वी उद्योजक, युवा शिलेदार आकाश मोरे"
आयुष्यात कितीही संकटे, अडचणी आल्या तरी त्यावरती तुम्ही मात करून, पुढे जाऊ शकता, चांगली प्रगती करू शकता. याची ध्येयवादी तरुण पिढीला समज असल्यामुळे, मोठी ध्येय व स्वप्ने उराशी बागळून जिद्दीने, चिकाटीने त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात तरुणाई काम करत आहे. पुणे शहरात उच्च शिक्षण घेतल्यानंतर 12 हजार रुपये पगाराच्या नोकरी पासून सुरू झालेला प्रवास ते लाखो - करोडो रुपयांच्या उलाढालीच्या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीचा मालक असणारे युवा उद्योजक आकाश मोरे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शिवणी या गावी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला.
बालपणी आकाश मोरे यांना टीबी झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी खूप काळजी घेतली. त्यानंतरच्या काळात आकाश मोरे यांच्या आजोळी आजी व आजोबा यांनीही चांगले संस्कार करून, त्यांचे बालपण घडवले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"माझा जन्म सांगली जिल्ह्यातील, कडेगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबात झालेला असला तरी माझ्या बालपणी माझ्या आजी-आजोबांच्या गावी मला मिळालेले संस्कार व जडणघडण खूप महत्त्वाची होती. बालपणी मला टीबी झाल्यानंतर माझ्या आई-वडिलांनी माझी खूप काळजी घेतली. त्याचबरोबरच माझ्या आजी-आजोबांनी लहानपणी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊन, खूप चांगले संस्कार केले. माझे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण माझ्या आजोबांच्या गावी सांगली जिल्ह्यातील, कडेगाव तालुक्यातील शिवणी या ठिकाणी झाले. माझ्या आजी व आजोबांचा माझ्यावरती खूप जीव होता. माझी आजी अशिक्षित होती परंतु तिचे व्यवस्थापन कौशल्य खूप उत्कृष्ट होते. ति कडक शिस्तीची होती परंतु तिने घेतलेले निर्णय सर्वांच्याच हिताचे होते. माझ्या आजीचे संस्कार व शिकवण मला माझ्या जीवन प्रवासात खूप उपयोगी पडले." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
लहानपणी आकाश मोरे यांना टीबी झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी जशी काळजी घेतली त्याच प्रकारे त्यांच्या आजी-आजोबांनी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊन, शिवणी या गावात बालपण खूप चांगले संस्कार करून घडवले. आकाश मोरे यांच्यासाठी त्यांचे आजी व आजोबा हे "आई आणि आप्पा" होते. आजी, आजोबा व नातू यांचे नाते खूपच सुंदर व हृदयस्पर्शी असते. आकाश मोरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणी या गावी झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण श्री म्हाळसाकांत विद्यालय शिवणी या ठिकाणी पूर्ण केले. आकाश मोरे हे लहानपणी आजी-आजोबांचे खूप लाडके पण अभ्यासात हुशार होते.
महाराष्ट्रात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा व ऊर्जा करोडो विद्यार्थ्यांना इयत्ता चौथी पासूनच मिळत असते. आकाश मोरे यांच्या शालेय जीवनातील इतिहासाचे शिक्षक सयाजीराव पवार यांच्या इतिहास शिकवण्याच्या उत्कृष्ट व प्रभावशाली पद्धतीमुळे आकाश मोरे इतिहास विषयाच्या प्रेमात पडले. इतिहासाची गोडी लागली. इतिहास फक्त वाचायचा नसतो तर इतिहासातून प्रेरणा घेऊन, चांगले कार्य करायचे असते ही शिकवण युवा उद्योजक आकाश मोरे यांनी लाखो - करोडो रुपयांची उलाढाल करणारी कंपनी प्रामाणिकपणे काम करून, यशस्वीपणे उभी करून त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेली आहे.
शालेय जीवनात आकाश मोरे अभ्यासात हुशार असले तरी खेळकर, खोडकर व मस्ती करणारे होते. इयत्ता दहावीमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आकाश मोरे यांनी दहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग करण्याचा निर्णय घेतला. भारती विद्यापीठ मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विषयात डिप्लोमा इंजिनिअरिंग ही पदविका पूर्ण केली.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलाने उच्च शिक्षण घेतल्यानंतर, चांगली नोकरी करण्याचे स्वप्न असते. 2015 ला आकाश मोरे यांनी भारती विद्यापीठ पुणे येथे इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन विषयात इंजीनियरिंग डिग्री फर्स्ट क्लास मिळवून, पूर्ण केली. परंतु इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतानाच पुढे काहीतरी व्यवसाय करायचा हे त्यांनी ठरवले होते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"पुण्यातील भारती विद्यापीठ येथे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतानाच मी ठरवले होते भविष्यामध्ये मला व्यवसाय करायचा आहे. सुरुवातीला अनुभवासाठी नोकरी केली तरी पुढे जाऊन, मला चांगल्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे हे तेव्हाच ठरवले होते. इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण झाल्यानंतर मी नेटवर्किंग क्षेत्रातला सीसीएनए कोर्स केला. त्यानंतर पुढील काही महिने नेटवर्किंग व टेलिकॉम क्षेत्रात नोकरी केली. या काळात मला कंपन्यांचे व्यवस्थापन शिकायला मिळाले." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात व्यवसाय करण्याचं ठरवलेलं असले तरी काही काळ नोकरीचा अनुभव घेण्यासाठी आकाश मोरे यांनी नेटवर्किंगचा कोर्स केल्यानंतर पहिली नोकरी "युव ब्रॉडबँड इंडिया लिमिटेड" कंपनीत नेटवर्क इंजिनिअर या पदावर आठ महिने केली. पहिल्या कंपनीतील सुरुवातीचा मासिक पगार 12 हजार रुपये होता. यानंतर "रिकॉम टेलीसर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड" या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीमध्ये एक वर्ष आरएफ इंजिनिअर या पदावरती आकाश मोरे यांनी नोकरी केली. यावेळी त्यांना 22 हजार पगार होता. यानंतर आकाश मोरे यांनी टेलिकॉम क्षेत्रातील जिओ कंपनीचा प्रोजेक्ट, वोडाफोन कंपनीच्या प्रोजेक्टवरती टेक्निकल इंजिनिअर म्हणून काही काळ नोकरी केली.
"पुणे शहरात इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पहिली नोकरी "युव ब्रॉडबँड इंडिया लिमिटेड" कंपनीमध्ये केली. आयुष्यातील पहिल्या नोकरीचा पहिला पगार हातात आल्यानंतर आपण स्वावलंबी झालेल्याची जाणीव होते आणि तो एक आनंद वेगळाच असतो. यानंतर टेलिकॉम क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये काही काळ नोकरी केली. या अनुभवामुळे मला कंपन्यांचे वर्क कल्चर, कंपन्यांना प्रोजेक्ट कसे मिळतात? बिलिंग कसे असते? कर्मचारी व्यवस्थापन, पीपल मॅनेजमेंट या महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. याचा मला व्यावसायिक जीवनात खूप फायदा झाला." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
पुणे शहरात इंजिनिअरिंग करत असताना शेवटच्या वर्षामध्येच असताना भविष्यात आपल्याला व्यवसाय करायचा आहे असे आकाश मोरे यांनी ठरवलेले होते. त्यामुळेच त्यांनी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी असल्यापासूनच गांडूळ खताच्या प्रकल्पावरती काम करायला सुरुवात केली होती. डिग्री पूर्ण झाल्यानंतरच्या दोन वर्षात या गांडूळ खताच्या व्यवसायासाठी संशोधन व गांडूळ खत निर्मिती यावरती नोकरी करत असतानाच त्यांनी लक्ष दिले होते.
"पुणे शहरात टेलिकॉम क्षेत्रात नोकरी करत असलो तरी व्यवसायाचा किडा मला स्वस्थ बसून देत नव्हता. त्यामुळेच इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात जे ठरवले होते त्याप्रमाणे मी गांडूळ खत प्रकल्पावर काम करायला सुरुवात केली होती. नोकरी करत असताना दोन वर्षे या व्यवसायासाठी मी खूप प्रामाणिकपणे काम केले. गांडूळ खत प्रकल्पासाठी संशोधन, मार्केटिंग, गांडूळ खत निर्मिती यासाठी नामांकित संस्थेकडून गांडूळ खताच्या बॅगा मागवून, संशोधन करून, उत्तम सेंद्रिय खत बनवण्याची प्रक्रिया शिकून, आम्ही स्वतः उच्च दर्जाची गांडूळ खत निर्मिती केली.मार्केटचा सर्व्हे केला व ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊन, सेवा दिली" असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
इंजिनिअरिंग पूर्ण झालेले अनेक तरुण चांगला कंपनीमध्ये नोकरी मिळाल्यानंतर सहसा व्यवसायाचा विचार करत नाहीत. आकाश मोरे यांना गांडूळ खताचा प्रकल्प चालू करत असताना अनेक संकटांना, अडचणींना तोंड द्यावे लागले. नोकरी करत असतानाच हा गांडूळ खताचा व्यवसाय चालवणे आव्हानात्मक होते. इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असतानाच त्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली होती दिवसभर कॉलेज झाल्यानंतर 5 नंतर या व्यवसायासाठी संशोधन व मार्केट सर्व्हे त्यांचे चालू होते.
"येरळा ॲग्रोटेक" या कंपनीच्या माध्यमातून अगदी कमी वयात आकाश मोरे यांनी गांडूळ खताचा प्रकल्प यशस्वी पूर्ण केला. 200 नर्सरीला भेट दिल्यानंतर, दीड वर्षे या व्यवसायासाठी मेहनत केल्यानंतर दोन वर्षात या गांडूळ खत व्यवसायाची उलाढाल 25 ते 30 लाखापर्यंत पोहोचली. नोकरी करत असताना वयाच्या 23 व्या वर्षी एका छोट्या कंपनीच्या माध्यमातून व्यवसायाची लाखो रुपयांची उलाढाल करणे ही सोपी गोष्ट नव्हती.
"येरळा ॲग्रोटेक या आमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार ते पंधरा हजार गांडूळ खत पॅकेट विक्री करत होतो. सुरुवातीचा काळ आमच्यासाठी खूप संघर्षाचा होता कारण प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकायची होती. शिक्षण चालू असताना, नोकरी करत असताना संशोधन करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणे आव्हानात्मक होते. मी शेकडो नर्सरीना भेट दिली. चांगल्या दर्जाच्या सेंद्रिय खतासाठी खूप संशोधन केले, अभ्यास केला, प्रात्यक्षिके केली. पुणे शहरातील मार्केटचा संपूर्ण सर्व्हे केला. त्याकाळी गांडूळ खताचे मार्केटमध्ये एक किलो, दोन किलोची पॅकेटस मिळत होते परंतु पाचशे ग्रॅमची पॅकेटस मिळत नव्हते. मग मला मार्केट मधील ग्राहकांची गरज लक्षात आली. आम्ही गांडूळ खताची 500 ग्रॅमची पॅकेटस बनवून विक्री करण्यास सुरुवात केल्यानंतर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. फ्लॅटमध्ये राहणारा रोपट्यांच्या चार कुंड्यावाला ग्राहक आमच्यासाठी खूप मोठी बाजारपेठ होती." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
गांडूळ खत हे मातीचा आत्मा जपणारे आणि शेताला 'काळे सोने' बनवणारे सर्वोत्तम सेंद्रिय खत आहे. जमिनीची सुपीकता वाढवणारे व पिकांच्या,रोपांच्या जलद व निरोगी वाढीसाठी आवश्यक असणारे गांडूळ खत नर्सरीच्या माध्यमातून पुणे शहरातील हजारो ग्राहकांपर्यंत कसे पोहचेल यासाठी आकाश मोरे यांनी त्याकाळी खूप मेहनत घेतली.
"येरळा ॲग्रोटेक"च्यामाध्यमातून आकाश मोरे यांनी महिन्याला दहा ते पंधरा हजार गांडूळ खत पॅकेटस विक्री केली. कुठल्याही नवीन व्यवसायातील सुरवातीचा अनुभव पुढील प्रगतशील वाटचालीसाठी खूप उपयुक्त असतो.
"पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील वारणा ब्रँड व कृष्णा ब्रँड यांच्या कार्याचा युवा उद्योजक आकाश मोरे यांच्यावरती खूप चांगला प्रभाव आहे. दुग्ध व्यवसायातील वारणा ब्रँड व कृष्णा ब्रँड जसा आहे तसा येरळा ब्रँड व्हावा यासाठी त्याकाळी आकाश मोरे यांनी प्रयत्न केले हे खरंच कौतुकास्पद आहे.
वारणा नदीकाठचा वारणा ब्रँड, कृष्णा नदी काठचा कृष्णा ब्रँड तर माझ्या गावच्या येरळा नदी काठचा "येरळा ब्रँड" ही व्हावा यासाठी त्यांनी त्याकाळी प्रयत्न केले हे प्रयत्न नक्कीच तरुणाईसाठी प्रेरणादायी आहेत.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात अनेक कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांनी खूप मोठे काम केलेले आहे. कुठलेही संस्थात्मक काम व रचनात्मक काम हे अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरते. आमच्या वारणा नदीच्या काठी वारणा दूध सहकारी ब्रँड निर्माण झाला .कृष्णा नदीच्या काठी कृष्णा दूध सहकारी ब्रँड निर्माण झाला. हा वारसा खूप वैभवशाली आहे. मी नोकरी करत होतो तरी मला भविष्यामध्ये काहीतरी चांगले संस्थात्मक, रचनात्मक कार्य करायचे आहे, या विचाराने ध्येयवेडा होऊनच मी "येरळा ॲग्रोटेकच्या" माध्यमातून व्यवसायिक कारकीर्द सुरू करून दोन वर्षात गांडूळ खताचे दोन लाख पॅकेट्स विक्री केली याचे समाधान वाटते. कुठलाही व्यवसाय सुरू केला तर सुरुवातीच्या काळात अडचणी येतात परंतु तुमचे ध्येय निश्चित असेल, फोकस क्लियर असेल तर रस्ता सापडत जातो व कष्ट घेण्याची तयारी व चिकाटी असेल तर नक्कीच तुम्ही अडचणींवरती मात करून तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचता." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
पुणे शहरामध्ये नोकरी करत असताना आकाश मोरे यांनी काही काळ भारती विद्यापीठमध्ये एक वर्ष टेक्निकल असिस्टंट म्हणून कामकाजाचा अनुभव घेतला. नोकरी करत असताना व्यवसाय करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विशेष लेखातील राजहंसाचे उदाहरण त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले.
"पुणे शहरात टेलिकॉम क्षेत्रात काही काळ नोकरी केल्यानंतर, महाराष्ट्रातील कार्यक्षम अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विशेष लेखातील राजहंसाचे उदाहरण मला खूप भिडले. यानंतर मी परतीचे सर्व दोर कापून टाकले व नोकरी सोडून देऊन पूर्णवेळ व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात "येरळा ॲग्रोटेकच्या" माध्यमातून उत्तम दर्जाचे गांडूळ खत नर्सरीच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली. व्यवसायाच्या सुरुवातीच्या दोन वर्षांनी मला खूप चांगले घडवले. खूप काही शिकायला मिळाले. सुरुवातीच्या काळात आमच्या गांडूळ खत व्यवसायाची महिन्याची दोन ते तीन लाख रुपयांची उलाढाल होती. त्यावेळी प्लांट या ऑनलाइन वेबसाईटच्या माध्यमातूनही आम्ही गांडूळ खत पुरवठा सेवा दिली. महिन्याला आम्ही दहा ते पंधरा हजार गांडूळ खत पॅकेटस विक्री करायचो. या नवीन व्यवसायातील प्रगतशील वाटचालीमुळे मला त्याकाळी पुणे शहरातील अनेक नर्सरीवाले कन्सल्टिंग करण्यासाठी बोलवायचे. गांडूळ खताच्या या व्यवसायासाठी त्याकाळी माझ्या मित्र परिवाराने खूप मदत केली." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
कॉलेजमधील चंगळवादी जीवनशैली, तरुणाईची चंगळवादी जीवनशैली आकाश मोरे यांनी टाळली. त्यांनी व्यवसायावरती प्रेम केले. व्यवसाय मोठा होण्यासाठी कष्ट व मेहनत घेतले. ग्राहकाला काहीतरी चांगले, नवीन, उत्तम सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. लॉकडाऊनचा, कोरोना काळ युवा उद्योजक आकाश मोरे यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. कोरोना काळात वाहतूक बंद असल्यामुळे गांडूळ खताचा पुरवठा त्या काळामध्ये बंद झाला. तरी या कठीण काळात खचून न जाता, आकाश मोरे यांनी टेलिकॉम क्षेत्रातील फ्रीलान्सिंग कामाला सुरुवात केली.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"आमच्या येरळा ॲग्रोटेकच्या माध्यमातून गांडूळ खत पुरवठ्याचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालला होता. पण कोरोनाच्या काळात, लॉकडाउनच्या काळात वाहतूक बंद असल्यामुळे आम्हाला खूप मोठा फटका बसला. नाहीतर तो व्यवसाय खूप मोठा झाला असता. टेलिकॉम क्षेत्रात काम केलेले असल्यामुळे कोरोना काळात आम्हाला टेलिकॉम क्षेत्रात फ्रीलान्सिंग काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस संपूर्ण देशभर खूप भीतीचे वातावरण होते. पुण्यात कुठलेच व्हेंडर टेलिकॉम क्षेत्रात सेवा देत नव्हते. मला कोरोना काळात टेलिकॉम क्षेत्रातील प्रोजेक्ट विषयी विचारणा झाल्यानंतर मी जोखीम पत्करून टेलिकॉम क्षेत्रातील नेटवर्कबिल्डअपच्या प्रोजेक्टसाठी होकार देऊन, ते काम यशस्वी पूर्ण केले याचा आम्हाला खूप आनंद व अभिमान आहे." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
कोरोना काळात संपूर्ण भारत देशात भयानक परिस्थिती होती. अनेक व्यवसाय त्या काळात संपले. अनेक उद्योजक कर्जबाजारी झाले. पण युवा उद्योजक आकाश मोरे यांना कोरोना काळात टेलिकॉम क्षेत्रात काम करण्याची संधी आल्यानंतर, त्यांनी जीवाची परवा न करता, पुणे शहरात तीन महिन्यांमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील नेटवर्क बिल्डपच्या 100 प्रोजेक्टवरती काम केले.
पुणे शहरातील काही नामांकित कंपन्या फॉरेनच्या कंपन्यांना सेवा देत होत्या. परंतु नेटवर्क प्रोजेक्टमध्ये अडथळा असल्यामुळे त्यांची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. अशा वेळेस आकाश मोरे यांनी त्यांच्या टीमसह नेटवर्क बिल्डपचे प्रोजेक्ट यशस्वी पूर्ण केले.
त्यामुळे फॉरेनच्या कंपन्यांना लॉकडाउनच्या, कोरोनाच्या कठीण काळातही सेवा मिळाली. कोरोना काळात लोक ज्यावेळेस घराबाहेर पडायला घाबरत होते त्यावेळेस आकाश मोरे यांनी त्यांच्या टीमसह पुणे शहरात टेलिकॉम क्षेत्रातील मोठया प्रोजेक्टसाठी खूप चांगली सेवा दिली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"कोरोना काळात, लॉकडाऊन असताना टेलिकॉम क्षेत्रातील आम्ही केलेलं काम आमच्या व्यावसायिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या नेटवर्क बिल्टअप प्रोजेक्टचे काम आमच्या टीमने यशस्वी पूर्ण केल्यामुळे, त्यांना फॉरेनच्या मोठ्या कंपनीला सेवा देता आली याचे आम्हाला समाधान आहे. महाराष्ट्रातील जिओ एंटरप्राइजेस मधील पहिली नेटवर्क लिंक आम्ही बिल्टअप केली. कोरोना काळात तीन महिन्यांमध्ये आम्ही नेटवर्किंगचे शंभर प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केले. पुणे शहरातील नामांकित बँका, नामांकित फूड चेन कंपन्या, वेअरहाऊस कंपन्या, छोट्या आयटी सेवा कंपन्यांना आम्ही नेटवर्क बिल्डपची सेवा दिली. कोरोना काळामध्ये जोखीम घेऊन आमच्या टीमने ग्राहकांना खूप चांगली सेवा दिली याचे आम्हाला खूप समाधान आहे." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
जगभरातील इंटरनेट व डेटा सर्व्हिसेसचे महत्व ओळखून आकाश मोरे यांनी दोन वर्ष टेलिकॉम क्षेत्रात फ्रीलान्सिंग काम केल्यानंतर 2019 ला टेलिकॉम क्षेत्रातील "स्कायलाईन टेलिकॉम युटिलिटी सर्विसेस" ही कंपनी पुणे शहरात सुरू केली. टेलिकॉम क्षेत्रात काही वर्षे नोकरी करणारा तरुण टेलिकॉम क्षेत्रातील स्वतःची एक चांगली कंपनी उभी करतो ही गोष्ट त्याकाळी सोपी नव्हती. ध्येय निश्चित केल्यानंतर, जिद्दीने, चिकाटीने काम केल्यानंतर कुठलेही स्वप्न तरुणाई नक्कीच पूर्ण करू शकते.
"कोरोना काळामध्ये वाहतूक बंद असल्यामुळे, गांडूळ खताचा व्यवसाय आमचा ठप्प झाला तरी टेलिकॉम क्षेत्रातील फ्रीलान्सिंगचे काम आमचे चालू होते. इंटरनेट, डेटा सर्व्हिस ही काळाची गरज आहे हे आम्ही ओळखले होते. त्यामुळेच 2019 ला आम्ही टेलीकॉम क्षेत्रातील "स्कायलाईन टेलिकॉम युटिलिटी सर्व्हिसेस" या कंपनीची पुणे शहरात स्थापना केली. खरंतर आम्हाला "स्काय बल्ब" या नावाची कंपनी चालू करायची होती परंतु टेलिकॉम क्षेत्रातील अनुभवामुळे स्कायलाईन टेलिकॉम ही कंपनी चालू केली. कंपनीचे जीएसटी नंबर, सर्व कॉर्पोरेट डॉक्युमेंट बनवल्यानंतर, ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आमच्या टीमने प्रामाणिकपणे काम केले." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
"पुणे शहरात टेलिकॉम क्षेत्रातील स्कायलाईन टेलिकॉम ही कंपनी आकाश मोरे यांनी चालू केल्यानंतर सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी खडतर होता. टेलिकॉम क्षेत्रात काही काळ कमी पगारावरती नोकरी करणारा तरुण नवी ध्येय डोळ्यासमोर ठेवून, टेलिकॉम क्षेत्रातील नवीन कंपनी चालू करून, ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवनवीन प्रोजेक्टसाठी काम करतो.
सुरुवातीच्या काळात येणाऱ्या अनेक अडचणीवरती, संकटांवरती मात करून, कंपनीची प्रगतशील वाटचाल करतो. हा प्रवास प्रत्येक युवा उद्योजकाच्या जडणघडणीचा असतो. सुरुवातीच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान होऊनही आकाश मोरे खचले नाहीत. जिद्दीन व प्रामाणिकपणे काम करून सर्व अडचणीवरती मात करून नवीन कंपनी यशस्वीपणे चालवली. हा प्रवास तरुण उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे."
"पुणे शहरात आम्ही टेलिकॉम क्षेत्रातील स्कायलाईन टेलिकॉम युटिलिटी सर्विसेस ही कंपनी चालू केल्यानंतर सुरुवातीचा काळ आमच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. एकट्याला बऱ्याचशा गोष्टींसाठी झगडावे लागत होते. परंतु टीम बिल्डिंग केली. कामाची योग्य सिस्टीम बसवली. त्यामुळे आम्हाला मोठ्या कंपन्यांना चांगली सेवा देता आली. आमच्या स्कायलाईन टेलिकॉम कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात आम्ही सूर्यकमल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, स्टीलमॅन टेलिकॉम लिमिटेड, HNG Telesolution, VM Telesolution, यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना चांगली सेवा दिली याचे आम्हाला खूप समाधान आहे." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
"कुठलाही व्यवसाय करत असताना अडचणी, संकटे येत असतात. व्यवसायामध्ये छोट्या-मोठ्या नुकसानीच्या अनुभवाला सामोरे जावे लागते. आमच्या कंपनीला ही सुरुवातीच्या काळात टेलिकॉम क्षेत्रात काम करत असताना एका व्हेंडर सोबत काम करताना लाखो रुपयांचे नुकसान झाले. तरीही आम्ही खचून न जाता, काही लाख रुपयांचे नुकसान झाले याचा जास्त विचार न करता, निराशेत जाण्यापेक्षा, नुकसानीच्या रकमेच्या दहापट उत्पन्न कसे कमवता येईल याकडे आम्ही विशेष लक्ष दिले. कुठल्याही व्यवसायात तुमचे पाच लाखाचे नुकसान झाले तर, खचून न जाता, निराश न होता,त्याचा जास्त विचार न करता, 50 लाख रुपये कसे कमावता येईल याचा प्रयत्न तुम्ही प्रामाणिकपणे केला पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला रस्ता मिळत जातो. त्यावरती योग्य दिशेने तुम्ही चालत राहिले पाहिजे" असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
पुणे शहरातील स्कायलाईन टेलिकॉम ही युवा उद्योजक आकाश मोरे यांची कंपनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली. महाराष्ट्रात स्कायलाईन टेलिकॉमच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात टेलिकॉम क्षेत्रातील प्रोजेक्ट या कंपनीने यशस्वीपणे पूर्ण केले.
"आमच्या टेलिकॉम क्षेत्रातील स्कायलाईन टेलिकॉम युटिलिटी सर्विसेस या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. मराठवाड्यामध्ये टेलिकॉम क्षेत्रातील प्रोजेक्ट करण्याचा आमचा अनुभव खूप चांगला आहे. त्या ठिकाणी आम्हाला खूप चांगली टीम मिळाली. प्रामाणिक काम करणारी लोकं मिळाली. कोकणामध्ये भौगोलिकदृष्ट्या अडचणी आल्या तरी आम्ही त्याठिकाणी प्रोजेक्ट यशस्वी पूर्ण केले. पश्चिम महाराष्ट्रातील टेलिकॉम क्षेत्रातील प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आमचा अनुभव चांगला होता. आमच्या "स्कायलाईन टेलिकॉम" कंपनीने पहिल्या वर्षी टेलिकॉम क्षेत्रातील व्यवसायात साडेचार - पाच लाखांची उलाढाल केली. दुसऱ्या वर्षी साडेबारा लाख, तिसऱ्या वर्षी ग्राहकांना चांगली सेवा देऊन 25 लाखापर्यंतची व्यावसायिक उलाढाल आम्हाला करता आली. याचे आम्हाला समाधान आहे." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
"पुणे शहरात बारा हजार रुपये मासिक पगार असणारी नोकरी करणारा तरुण "येरळा ॲग्रोटेकच्या" माध्यमातून कमी वयात लाखो रुपयांची उलाढाल करणारा गांडूळ खत पुरवठ्याचा यशस्वी व्यवसाय करतो व कोरोना काळात गांडूळ खताचा व्यवसाय ठप्प झाला तरी निराश न होता, खचून न जाता, टेलिकॉम क्षेत्रातील नवीन कंपनी "स्कायलाईन टेलिकॉम" 2019 ला उभी करतो व पहिल्या वर्षी साडेचार - पाच लाखांची वार्षिक उलाढाल करणारी कंपनी काही वर्षातच कष्ट, मेहनत, जिद्दीन व चिकाटीने ग्राहकांना चांगली सेवा देऊन, करोडो रुपयांची उलाढाल करते. हा युवा उद्योजक आकाश मोरे यांचा प्रवास महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूपच प्रेरणादायी आहे."
"आमच्या टेलिकॉम क्षेत्रातील स्कायलाईन टेलिकॉम कंपनीची पहिल्या वर्षी साडेचार ते पाच लाख रुपये व्यावसायिक उलाढाल होती यापासून सुरू झालेला प्रवास दुसऱ्या वर्षी साडेबारा लाख रुपये वार्षिक उलाढाल, तिसऱ्या वर्षी 25 लाख रुपये वार्षिक उलाढाल ते करोड रुपये पर्यंतच्या वार्षिक उलाढालीचा प्रवास आम्हाला टेलिकॉम क्षेत्रातील ग्राहकांना दिलेल्या उत्तम सेवेमुळे तसेच आमच्या टीमवर्कमुळे करता आला याचा आम्हाला अभिमान आहे. कुठलाही व्यवसाय तुमचा प्रामाणिकपणा, ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा, पीपल मॅनेजमेंट, कॅशफ्लो मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे असते. टेलिकॉम क्षेत्रातील आमची इसेन्शिअल सर्विस, तातडीची सेवा असल्यामुळे, आम्हाला मोठमोठ्या कंपन्यांना, जिओ, एअरटेल, वोडाफोन यासारख्या ब्रँडला वेळेत सेवा देणे खूप महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक मोठमोठ्या कंपन्यांसाठी आम्हाला टेलिकॉम क्षेत्रातील चांगले प्रोजेक्ट करता आले, यामुळे आम्हाला आमचा बिझनेस स्केलप करता आला, वाढवता आला याचे खूप समाधान आहे." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
पुणे शहरातील टेलिकॉम क्षेत्रातील स्कायलाईन टेलिकॉम या युवा उद्योजक आकाश मोरे यांच्या कंपनीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळाला. महाराष्ट्रातील तसेच विविध राज्यातील तरुणांना या कंपनीच्या माध्यमातून आकाश मोरे यांनी रोजगार दिला. एकेकाळी पुणे शहरात छोट्या - मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करणारा तरुण स्वतःची टेलिकॉम क्षेत्रातील लाखो - करोडो रुपयांची उलढाल करणारी कंपनी उभी करून, महाराष्ट्रातल्या तसेच विविध राज्यातील तरुणांना नोकरी देतो ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्रात सहकार व शिक्षण क्षेत्रात स्वर्गीय मा. मंत्री पतंगराव कदम यांचे खूप मोठे योगदान आहे. स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या विचारांचा वारसा युवा उद्योजक आकाश मोरे जपताना दिसत आहेत.
"महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रामध्ये स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांचे खूप मोठे योगदान आहे. आमच्या सांगली जिल्ह्याला साहेबांच्या रूपाने समृद्ध वारसा लाभलेला आहे. साहेबांच्या शिक्षण क्षेत्रातील थोर कार्यामुळे आमच्या भागातील हजारो तरुण उच्चशिक्षित झाले. शेकडो तरुणांना रोजगार मिळाला. सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील विद्यार्थी भारती विद्यापीठमध्ये मोफत उच्च शिक्षण घेऊन इंजिनिअर, पदवीधर झाले. आर आर आबांचे एक सुंदर वाक्य आहे 'एखाद्या गावात रस्ता झाला नाही तरी चालेल, पाण्याची टाकी झाली नाही तर चालेल, परंतु एक शाळा होणे गरजेचे आहे तीच शाळा संपूर्ण पिढी घडवत असते.' शिक्षणामुळेच त्या गावाची, जिल्ह्याची,राज्याची, देशाची प्रगती होते. या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे घेऊन जाणे ही आमच्या तरुण पिढीवरची जबाबदारी आहे." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासातून प्रेरणा घेऊन युवा उद्योजक आकाश मोरे यांचा प्रवास सुरू आहे.
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून शिकण्यासारख्या तरुणांसाठी खूप गोष्टी आहेत. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील मोठे ध्येय ठेवा. ध्येयपूर्तीसाठी जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न करा. नक्कीच तुमचे ध्येय पूर्ण होईल. नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार साता समुद्रापार केला. त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही आमचा व्यवसाय मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत उत्तम सेवा देऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. व्यवसायात कितीही मोठी संकटे, अडचणी आल्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवला तरी, त्यातून प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन नक्कीच तुम्ही तुमच्या व्यवसायातील संकटांवरती, अडचणीवरती मात करून, मोठे यश मिळवू शकता." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
पुणे शहरात टेलिकॉम क्षेत्रातील स्कायलाइन टेलिकॉम या कंपनीच्या माध्यमातून आकाश मोरे यांनी कंपनीचा व्यवसाय साडेचार लाखापासून ते अल्पावधीतच लाखो - करोडो रुपयांपर्यंत घेऊन गेले. प्रामाणिक काम, मेहनत, उत्तम टीमवर्क आणि जिद्द व चिकटी असेल तर कुठलाच महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करणे अशक्य नाही.
"आम्ही टेलिकॉम क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर आमच्या स्कायलाईन टेलिकॉम या कंपनीची पहिल्या वर्षीची व्यवसायिक उलाढाल साडेचार लाखापासून सुरू झाल्यानंतर लाखो - करोड रुपयापर्यंतचा टप्पा कधी घाटला हे आम्हाला समजलेच नाही. आमच्या कंपनीची वार्षिक उलाढाल साडेचार लाख ते करोड रुपयापर्यंतचा टप्प्यामध्ये आमच्या टीमचे प्रामाणिक काम, ग्राहकांना उत्तम सेवा देणे, कंपनीच्या टीमचे उत्तम व्यवस्थापन करणे. मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत गेलो, रस्ता मिळत गेला. सर्व सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली यामुळेच हा टप्पा आम्हाला गाठता आला. टेलिकॉम क्षेत्रातील वेदांता टेक्नॉलॉजी व स्टीलमॅन टेलिकॉम या मोठ्या ब्रँड बरोबर आम्हाला काम करता आले याचे खूप समाधान आहे." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
व्यवसायिक वाटचाल करत असताना आरामदायी आयुष्यात कधीच गुरुफटून राहिले नाही पाहिजे. युवा उद्योजक आकाश मोरे टेलिकॉम क्षेत्रात काम करत असताना नेटवर्किंग प्रोजेक्टसाठी टॉवर उभारत असताना सोलर सिस्टिमची गरज पडायची. सोलर सिस्टिम उभारण्याचे काम हे आकाश मोरे यांच्या कंपनीच्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. व्यावसायिक वाटचाल करत असताना आकाश मोरे एकाच गोष्टीवर कधी थांबून राहिले नाही. नवनवीन आयडिया, लोकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा ध्यास, नवनवीन क्षेत्रातले ज्ञान, संशोधन करून काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. जगभरातील व भारतातील सोलर एनर्जीचे महत्त्व ओळखून युवा उद्योजक आकाश मोरे यांनी "स्कायलाईन सोलर एनर्जी" या नवीन कंपनीची 2026 ला स्थापना केली.
"आम्ही टेलिकॉम क्षेत्रात काम करत असताना नेटवर्किंग प्रोजेक्टच्या टॉवरसाठी सोलर सिस्टिम उभारण्याचे काम आमची टीम उत्तम रित्या करत असायची. त्यामुळे सोलर एनर्जी क्षेत्र आमच्यासाठी नवीन नव्हते. सोलर एनर्जी ही काळाची गरज आहे. भारतामध्ये, महाराष्ट्रात ग्राहकांना वीज बिल खूप जास्त येत आहे. ज्या लोकांना महिन्याचे तीन - साडेतीन हजार रुपये लाईट बिल येते त्यांनी सोलर सिस्टिम बसविले तर तीन वर्षातच तुम्हाला मोफत वीज, सोलर सिस्टिमच्या माध्यमातून वापरता येऊ शकते. सरकारची खूप मोठी सबसिडी यासाठी आहे. सोलर सिस्टिमसाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून लोन ही लवकर मंजूर होते. सोलर सिस्टिममुळे तीन वर्षानंतर तुम्ही स्वतःची वीज स्वतः निर्मिती करून, विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन, तुमचे पैसे वाचून ते असेट क्रिएशन होणार. सोलर एनर्जी सिस्टीमसाठी पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठा स्कोप आहे. आमच्या "स्कायलाईन सोलर एनर्जी" या कंपनीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांमध्ये दहा हजार घरांमध्ये सोलर सिस्टिम बसवण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेणार." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
पुणे शहरात टेलिकॉम क्षेत्रात युवा उद्योजक आकाश मोरे काम करत असताना त्यांनी त्यांच्या घरातील भिंतीवरती "दहा कोटीचा चेक" लावलेला आहे. या दहा कोटीच्या चेकचे नक्की रहस्य काय आहे? याविषयी युवा उद्योजक आकाश मोरे यांनी मनमोकळा संवाद साधला.
"आम्ही व्यावसायिक वाटचाल करत असताना नेहमीच मोठे ध्येय ठेवलेले आहे. आमच्या स्कायलाईन टेलिकॉम कंपनीची सुरुवात साडेचार - पाच लाख रुपये वार्षिक उलाढालीपासून झालेली असली तरी माझ्या डोळ्यासमोर नेहमीच आमच्या कंपनीची वार्षिक उलाढाल दहा कोटी लवकरात लवकर झाली पाहिजे. त्यासाठी माझ्या घरातील भिंतीवरती मी दहा कोटीचा चेक लावून ठेवलेला आहे. माझ्या रूम मधील तो दहा कोटीचा चेक रोज मला माझ्या ध्येयाची, स्वप्नाची आठवण करून देत असतो. माझ्या जबाबदारीची आठवण करून देत असतो. कितीही अडचणी, संकटे आली तरी मला तो दहा कोटीचा चेक नेहमीच प्रगतशील वाटचालीसाठी ऊर्जा व प्रेरणा देतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यवसाय करा पण तुमच्या ध्येय मोठेच असले पाहिजे. तुमचे ध्येय, स्वप्न ऐकून लोकांनी हसलं पाहिजे.चेष्टा केली पाहिजे. टीका केली पाहिजे. तुमच्या हृदयातील, मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रचंड कष्ट व मेहनत योग्य दिशेने घेतली तर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यावाचून तुम्हाला जगातील कुठलीही शक्ती रोखू शकत नाही." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
"आजच्या काळामध्ये एनर्जी, नेटवर्क, डेटा सेंटर, एआय या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा स्कोप आहे. आजच्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीने या क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्य विकसित केली तर, तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील प्रगतीची शिखरे गाठल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही लढलं पाहिजे आणि जिंकलं पाहिजे असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
"आजच्या तरुण पिढीने कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून काम केलं पाहिजे. तुम्ही व्यवसाय करा किंवा नोकरी करा पण रिस्की घेतली पाहिजे. मोठी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. मोठी संकटे, मोठ्या अडचणी तुम्हाला घडवतात. कुठल्याही व्यक्तीला आयती गोष्ट मिळाली तर त्याची किंमत नसते. संघर्ष, त्याग व मेहनत करून ज्यावेळेस तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करता तो प्रवास नेहमीच तुम्हाला ऊर्जा व दिशा देणार असतो." असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"आमच्या स्कायलाईन सोलर एनर्जी या कंपनीचे सोलर एनर्जी क्षेत्रात काम चालू आहेच परंतु भविष्यामध्ये इलेक्ट्रिक वेहिकल सेवा, इन्फ्रा बिझनेस यामध्ये देखील आम्ही काम करणार आहोत. भविष्यामध्ये आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सामाजिक उपक्रम राबवायचा आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा पण ते काम करत असताना समाधान मिळणे खूप महत्त्वाचे आहे" असे युवा उद्योजक आकाश मोरे यांनी सांगितले.
"सांगली जिल्ह्यात सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्म झालेला मुलगा ते पुण्यात उच्च शिक्षण घेऊन बारा हजार रुपयाची नोकरी करणारा तरुण ते स्वर्गीय माजी मंत्री पतंगराव कदमांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा तरुण शिलेदार ते वयाच्या 23 व्या वर्षी लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या "येरळा ॲग्रोटेक" कंपनीचा मालक ते टेलिकॉम क्षेत्रात कमी पगारावरती नोकरी करणारा तरुण ते टेलिकॉम क्षेत्रातील लाखो - करोडो रुपयांची वार्षिक उलढाल करणाऱ्या "स्कायलाईन टेलिकॉम" कंपनीचा मालक ते भारतातल्या जिओ, एअरटेल, वोडाफोन या मोठ्या ब्रँडला सेवा देणाऱ्या कंपनीचा यशस्वी उद्योजक ते घरातील भिंतीवरती दहा कोटीचा चेक लावून, कंपनीची वार्षिक उलाढाल दहा कोटी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारा युवा शिलेदार आकाश मोरे यांचा संघर्षमय, प्रेरणादायी, असामान्य प्रवास हा महाराष्ट्रातील तरुणांसाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे."
महाराष्ट्राचे युवा उद्योजक, युवा शिलेदार आकाश मोरे यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा.
लेखक : अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.





















































No comments:
Post a Comment