पुरंदर, वीर, दि.२१ : महाराष्ट्रातील महान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे डोळ्यांचे पारणे फेडणारा, ऐतिहासिक 'शाही दसरा' सोहळा पारंपारिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात मंत्रमुग्ध होऊन, मंगळवारी उत्साहात संपन्न झाला.
श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक विजयादशमीनिमित्त, श्रीनाथ म्हस्कोबा देवाची पालखी व वस्त्र परिधान केलेल्या व फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठया, छबिन्यासह निशाण, छत्री, अब्दागिरी या लवाजम्यासह सायंकाळी पाच वाजता भक्तिमय वातावरणात सीमोल्लंघनासाठी निघाल्या.
या ऐतिहासिक दसरा सोहळ्यावेळी देवाचे सालकरी, मानकरी, दागिनदार, वीर देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त, ग्रामस्थ, हजारो भक्त उपस्थित होते.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र वीर येथील शाही दसरा सोहळा भक्तिमय वातावरणात, पारंपरिक पद्धतीने, उत्साहात संपन्न झाला. श्री क्षेत्र वीर गावच्या ऐतिहासिक यात्रा काळात व नवरात्रोत्सवात हजारो भाविक भक्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात. वीर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने, आम्ही भक्तांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो." अशी माहिती श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहनराव धुमाळ यांनी दिली.
श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने तुकाई देवीची भेट घेऊन पारंपारिक पद्धतीने शाही दसऱ्याचे सीमोल्लंघन करून, गावाच्या वेशीवर विधिवत आपटा पूजन केले.
"श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी ऐतिहासिक वीर गावातील महिला वर्ग भक्ती भावाने व श्रद्धेने मोठ्या प्रमाणावर या सोहळ्यामध्ये सामील होतात. हा शाही दसरा सोहळा पाहण्यासाठी भाविक - भक्तांची प्रचंड गर्दी झालेली असते."
श्री क्षेत्र वीर गावचा ऐतिहासिक दसरा सोहळा पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक - भक्त शाही दसरा पाहण्यासाठी येत असतात.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने पारंपारिक पद्धतीने गाव प्रदिक्षणा पूर्ण करून रात्री मंदिरात आल्यानंतर, भक्तिमय वातावरणात छबीना संपन्न झाला. या ऐतिहासिक शाही दसऱ्याच्या सोहळ्यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तवर्ग खूप आतुरतेने व आनंदाने या उत्सवात सहभागी होत असतो."
श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीला फुलांची केलेली आकर्षक सजावट तसेच आकर्षक विद्युत रोषणाई, आनंदमय वातावरणात फटाक्यांची केलेली आतिषबाजी, सुशोभीकरण केलेला पालखी मार्ग, फुलांची उधळण व "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात संपूर्ण भक्तवर्ग आनंदमय व भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध झाला.
पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्र उत्सव व शाही दसरा, ऐतिहासिक वीर गावच्या भक्तिमय संस्कृतीचे दर्शन घडवतो.
"प्रत्येक वर्षी सर्व भक्तगण महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याची भक्तिभावाने वाट पाहत असतो. यावर्षी पारंपारिक पद्धतीने, उत्साहाच्या वातावरणात,खुप आनंदाने शाही दसरा सोहळा पार पडला. तरुण वर्ग या शाही दसरा सोहळ्यात एकमेकांना शुभेच्छा देऊन भक्ती - भावाने या सोहळ्यात मंत्रमुग्ध होतो.
"श्री क्षेत्र वीर येथील शाही दसरा म्हणजे समस्त नाथभक्तांसाठी आनंदाची एक पर्वणीच असते. घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवात विविध धार्मिक, समाजमान्य प्रथा परंपरा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पाडल्या जातात. आजच्या विज्ञान युगात चमत्काराशिवाय नमस्कार न घालणाऱ्या तरुण पिढीला ही वीरच्या श्रीनाथ म्हस्कोबांचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भक्तीची शक्ती प्राप्त करण्यासाठी अनेक जण येथे येत असतात व आपल्या मनोकामना पूर्ण करून घेत असतात. ज्याला देवत्वाची प्रचिती अनुभवायची आहे त्यांनी एकदा तरी पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबांच्या दर्शनाला यावे. आणि आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्यावा." अशी प्रतिक्रिया दैनिक पुढारीचे वरिष्ठ,निर्भीड पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील "ऐतिहासिक शाही दसरा सोहळा" अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकत्र जोडणारा व ऐतिहासिक वीर गावच्या महान संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसऱ्याची वैभवशाली परंपरा सर्व भक्तगण अभिमानाने व भक्तिभावाने जोपासत असतात."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा प्रत्येक वर्षी भक्तांसाठी आनंदमय वातावरणात, मनाचा ठाव घेऊन, भक्तिमय संस्कृतीने समृद्ध करणारा असतो.
पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, ऐतिहासिक वीर गावाला खूप मोठी आध्यात्मिक संस्कृती लाभलेली आहे. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा कृपाआशीर्वाद सदैव भावीक - भक्तांच्या पाठीशी असतो. अशी लाखो भाविक भक्तांची श्रद्धा आहे.















No comments:
Post a Comment