पुणे, दि.२९ : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या, रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी आपल्या प्रामाणिक भावना व्यक्त करून, आगळ्या,वेगळ्या, हृदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या. रोहित पवार यांनी आमदारकीच्या शपथ विधीच्या वेळी "मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार म्हणून केलेला माझा गौरव माझ्या मातृत्वाला सार्थ करतो" अश्या शब्दात सुनंदा पवार यांनी खास शुभेच्छांच्या भावना व्यक्त केल्या. सुनंदा पवार यांनी फेसबुकच्या अधिकृत पेजवर रोहित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन रोहित पवार यांच्याविषयी खास, हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या.
"प्रिय रोहित,
थँकू, आज मला माझी स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही ओळखीची गरज पडत नाही, आज मला लोकं रोहित दादांची आई म्हणून ओळखतात. प्रत्येक, आई-वडिलांना त्याची मुलं मोठी व्हावी, मुलांच्या नावाने आई-वडिलांची ओळख व्हावी असे वाटते, तू ते आम्ही न सांगता पूर्ण करून दाखवलं.! शपथ विधीच्या वेळी 'मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार' म्हणून केलेला माझा गौरव माझ्या मातृत्वाला सार्थ करतो. लहानपणी गड्या माणसात खेळता खेळता आज तू कधी एवढा मोठा माणूस झाला हे मला कळलंच नाही.मात्र, पदानेचं नाही तर इतकाचं तू मनाने ही मोठा आहे हे मी नाही संपूर्ण महाराष्ट्र सांगतो. रोहित, खरं सांगू तू माझा मुलगा असल्याचा सार्थ अभिमान आहे. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा. तू उत्तरोत्तर प्रगती करत राहा हीच देवाकडे प्रार्थना.!"
या हृदयस्पर्शी भावनांमधून सुनंदा पवार यांनी रोहित पवार यांना प्रगतशील वाटचालीसाठी खास शुभेच्छा दिल्या. सुनंदा पवार यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सामाजिक भान राखून वाढदिवस साधेपणाने, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून, सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा करावा असे आव्हान केलेले आहे.
No comments:
Post a Comment