Thursday, October 1, 2020

पुरंदरचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर कुटुंबाची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली संपूर्ण जबाबदारी; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचेही विशेष सहकार्य; महाराष्ट्र गर्जना न्यूज इम्पॅक्ट...




पुरंदर, दि. १ : पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध ढोलकीवादक वीर गावचे  अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ, अंध बहिणीची गंभीर दुखापत, विकलांग बहिणीची वेदनादायी अवस्था या संवेदनशील,गंभीर विषयावरील स्पेशल रिपोर्ट, व्हिडीओ महाराष्ट्र गर्जना न्यूज चॅनेलच्या माध्यमातून  प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांनी तातडीने हा गंभीर विषय खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोहचवला आणि कार्यक्षम खासदार सुप्रिया सुळे यांनी कुडाळकर कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी घेतलेली असून मदतीची कार्यवाही सुरू झाली आहे. 






कोरोना महामारी,लॉकडाऊन मुळे समाजातील सर्वच घटकांना मोठा फटका बसलेला आहे. पुरंदरचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांचे कुटुंब उपासमारी आणि कुटुंबातील गंभीर आजाराशी संघर्ष करत होते. कुडाळकरांच्या कुटुंबात  वेदनादायी अवस्था असलेली एक दिव्यांग बहीण आणि एका अंध बहिणीच्या पायाला झालेली गंभीर दुखापत आणि कुटुंबावर आलेली  उपासमारीची वेळ या गंभीर समस्येला महाराष्ट्र गर्जना न्यूज ने वाचा फोडली. पिंटू बाबा कुडाळकर यांनी स्वतः ही  गंभीर परिस्थिती महाराष्ट्र गर्जना न्यूजच्या स्पेशल रिपोर्टच्या,व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे मांडली. पिंटू बाबा कुडाळकर आणि वीरचे तरुण कार्यकर्ते मयूर मोरे यांनी या गंभीर समस्येविषयी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी संपर्क साधून सर्व गंभीर परिस्थिती सांगितल्यानंतर या गंभीर  विषयावरील, समस्येवरील  स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र गर्जना न्यूजने समाजमाध्यमांवर प्रसारित केला. 




राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी हा स्पेशल रिपोर्ट पाहिल्यानंतर या गंभीर विषयाची तातडीने दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत हा गंभीर विषय पोहचवला. यानंतर सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष देऊन कुडाळकर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली असून कुडाळकर कुटुंबाचे सर्व प्रश्न आणि अडचणी सोडवणार आहेत असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्युजशी बोलताना सांगितले. पिंटू बाबा कुडाळकर यांनी सांगितले की खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयातून मला फोन आला होता, सुप्रिया ताई सुळे यांनी आमच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. सर्व अडचणी सोडवण्यात येतील असे सांगितले आहे. विकास लवांडे यांनीही मला फोन करून सांगितले की सुप्रिया ताई सुळे यांनी तुमच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतलेली असून तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यात येतील आणि तुमच्या कुटुंबाला सर्व प्रकारची मदत मिळेपर्यंत मी समन्वयक म्हणून पाठपुरावा करेन. असे पिंटू बाबा कुडाळकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजला सांगितले.



शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये पिंटू बाबा कुडाळकर यांची बहीण राणी कुडाळकर या पायाच्या गंभीर जखमेवरील उपचार घेत असून यासाठीची आर्थिक मदत खासदार सुप्रियाताई सुळे करणार आहेत असे पिंटू बाबा कुडाळकर यांनी सांगितले.




अंध कलाकार कुडाळकर यांच्या कुटुंबाला सर्व प्रकारची शासकीय मदत मिळण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सर्व जिल्हा यंत्रणा आणि तालुका यंत्रणा यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत असे विकास लवांडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजला सांगितले.




कुडाळकर कुटुंबाच्या गंभीर परिस्थितीवरचा स्पेशल रिपोर्ट,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांचे मदतीसाठी फोन आले, काही लोकांनी आर्थिक मदतही केली पण सुप्रिया ताई सुळे यांनी आमच्या संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन मदत केल्यामुळे खूप मोठा आधार मिळाला असे पिंटू बाबा कुडाळकर यांनी सांगितले.


महाराष्ट्र गर्जना न्यूजने आमच्या कुटुंबाच्या गंभीर समस्येची दखल घेऊन हा विषय जनतेपर्यंत आणि लोकोप्रतिनिधींपर्यंत पोहचवुन मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे सहकार्य केले असल्याचे पिंटू बाबा कुडाळकर यांनी सांगितले.



पिंटू बाबा कुडाळकर यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन मदत करणाऱ्या आदर्श खासदार सुप्रिया ताई सुळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते,सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे, आणि ज्या ज्या लोकांनी मदतीसाठी फोन केले, मदतही केली अश्या सर्वांची मदत कुडाळकर कुटुंबासाठी अत्यंत महत्वाची असून, समाजातील दुर्लक्षित,पीडित कुटुंबाला सर्वांनीच मदत केली पाहिजे असे आव्हान महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी केले.




No comments:

Post a Comment