पुरंदर, दि. 2 : पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध ढोलकीवादक वीर गावचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ, अंध बहिणीची गंभीर दुखापत, विकलांग बहिणीची वेदनादायी अवस्था या संवेदनशील विषयावरील स्पेशल रिपोर्ट, व्हिडीओ महाराष्ट्र गर्जना न्यूज चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर अनेक लोकांच्या मनाला हा गंभीर विषय भिडला. महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेली छावा स्वराज्य सेना यांनीही पुरंदरचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांच्या कुटुंबाच्या गंभीर समस्येची दखल घेत जीवनावश्यक विविध वस्तूंचे किट मदत म्हणून कुडाळकर कुटुंबाला देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा विशेष प्रयत्न केला.
पुरंदरचे अंध कलाकार पिंटू बाबा कुडाळकर यांचे कुटुंब उपासमारीशी आणि घरातील गंभीर आजाराशी संघर्ष करत होते. महाराष्ट्र गर्जना न्यूजने कुडाळकर यांच्या कुटुंबातील गंभीर परिस्थितीवर, गंभीर समस्येवरती स्पेशल रिपोर्ट बनवून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्यानंतर या गंभीर विषयाची लोकप्रतिनिधींनी जशी चांगली दखल घेतली, तसी छावा स्वराज्य सेने सारख्या प्रामाणिक सामाजिक संघटनांनीही चांगली दखल घेतली.
कुडाळकरांच्या कुटुंबाची गंभीर,वेदनादायी परिस्थिती पाहून आमच्या डोळ्यात पाणी आले, माणुसकीच्या नात्याने आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आमच्या संघटनेच्या माध्यमातून नक्की करू असे छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राम घायतिडक पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.
छावा स्वराज्य सेनेच्या टीमने थेट पुरंदर तालुक्यातील वीर गावातील कुडाळकरांच्या कुटुंबाची भेट घेऊन सर्व सत्य परिस्थिती जाणून घेऊन कुडाळकर कुटुंबाला जीवनावश्यक विविध वस्तूंचे किट माणुसकीच्या नात्याने मदत म्हणून दिले. या जीवनावश्यक विविध वस्तूंच्या किटमध्ये 80 किलो तांदूळ, 10 किलो तेल, 2 किलो मीठ, साबनांचा मोठा बॉक्स आणि बिस्किटांचा मोठा बॉक्स कुडाळकर कुटुंबाला मदत म्हणून छावा स्वराज्य सेनेकडून देण्यात आला.
यावेळी छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष श्री राम घायतिडक पाटील, प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्र पडवळ, पिंपरी चिंचवड शहर(विद्यार्थी विभाग)अध्यक्ष श्री अनिकेत बेळगावकर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश चांदणे, श्री नितिन पवार उपस्थित होते.
महाराष्ट्र गर्जना न्यूजने आमच्या कुटुंबातील गंभीर समस्येला वाचा फोडल्यानंतर अनेक लोकांनी मदतीसाठी फोन केले. लोकप्रतिनिधी तसेच अनेकांनी मदतही केली त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे. छावा स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेने आमच्या कुटुंबाच्या गंभीर समस्येची दखल घेत माणुसकीच्या नात्याने आमच्या कुटुंबाला जीवनावश्यक विविध वस्तूंचे किट देऊन मदत केली याबद्दल मनापासून आभारी आहे असे पिंटू बाबा कुडाळकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना सांगितले.
छावा स्वराज्य सेना ही सामाजिक संघटना नेहमीच समाजातील दुर्लक्षित,पीडित,समस्यांग्रस्त घटकांना मदत करण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असते. कुडाळकर कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने मदत करून चांगली सामाजिक बांधिलकी जोपासली असे वक्तव्य महाराष्ट्र गर्जना न्यूज चे संपादक श्री अजित जगताप यांनी केले.
No comments:
Post a Comment