😜🤔 दोस्तमंडळी 😍😂😀
एक आगळावेगळा,रोमहर्षक,नादखूळा प्रवास...नक्कीच वाचा....
भारत महासत्ता होईल तवा होईल पण आमचं पुणे जगात नेहमीच महासत्ता असतंय..आमच्या पुण्याच्या रुबाबाचा नादच नाय करायचा.. पुणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाने पावन झालेली महान भूमि ,विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी,आयटी हब, ऑटोमोबाईल हब अश्या एकसे बढ़कर एक गोष्टी आमच्या पुण्यात रुबाबात झळकत्यात. मी अभिजीत पाटील पुण्याच्या नादखुळ्या मातीतला अस्सल पुणेकर....पुण्याचा अभिमान, स्वाभिमान रक्तारक्तात भिनलेला मराठा....आता तुमी जातीच्या चष्म्यातून बघा, धर्माच्या चष्म्यातून बघा की प्रांताच्या चष्म्यातून बघा...मला काय बी फरक नाय पडत...
आमच्या पुण्याबद्दल बरेच गैरसमज काही मतलबी लोकं पसरवत असत्यात. म्हणे पुणेकर लोक टीका करतात, अपमान करतात, अहो हे ठराविक जणच हायेत म्हणून काय सगळे पुणेकर तसेच हायेत का ? कौतुक करणारे, प्रोत्साहन देणारे आणी मनापासून भरभरून प्रेम देणारे लाखो पुणेकर हायेत की आमच्या पुण्यात...अनेकांचा अजून एक मोठ्ठा गैरसमज हाय की नारायण पेठ, सदाशिव पेठ म्हणजेच.. पुणेरी संस्कृती...
हा कुठल्या मूर्ख विद्वानाने शोध लावला कुणास ठावूक...हडपसर,कात्रज,स्वारगेट,कोथरूड,रास्ता पेठ,नाना पेठ,शिवाजी नगर हेज्यासारखं अनेक महत्वाचे भाग काय पुण्याच्या बाहेर हायेत काय? यांची संस्कृती काय पुण्याच्या बाहेरची संस्कृती हाय काय? हडपसर,कात्रज,स्वारगेट,कोथरूड,पुणे स्टेशन,रास्ता पेठ,नाना पेठ, सोमवार पेठ, शिवाजीनगर यांच्यासारख्या पुणे शहरातील सर्वच उपनगरातल्या,सर्वच भागातल्या लाखो पुणेकर लोकांनी वाढावलीया,सम्रुदध केलीया, विकसित केलीया.. ही पुणेरी संस्कृती....
पुणेरी पगडी जेवढी महत्वाची हाय तेवढाच पुणेरी नादखुळा फेटा ही खूप महत्वाचा हाय, पुणेरी व्याख्यानमाला जेवढ्या महत्वाच्या हायेत तेवढेच गणेशउत्सव,दुर्गाउत्सव यातील सांस्कृतिक कार्यक्रम पण महत्वाचे हाय....अशे खूप विषय हायेत पण समजने वाले को इशारा काफी है....
पुण्याचा विषय निघाला की हा अभिजीत पाटील असाच बोलतो भरभरून...आमच्या पुण्याच्या सर्वांगीण पैलूंवर जोरदार प्रकाश टाकतच असतोया...ते कुणाला पटू अगर नाय.. आमा पुणेकरांना काय फरक पडत नाय...
आमचं मित्र सातारकर, कोल्हापूरकर,सांगलीकर,सोलापूरकर,अमरावतीकर सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले हायेत पण पुण्यात आले की ते सगळे अस्सल, नादखुळे पुणेकरच होत्यात....हे तर आमच्या पुण्याचे खास वैशिष्ट हाय...
दोस्तांनो.. आमचा किश्या भाऊ म्हणतो दिल्लीच्या शीमेवर.. एवढं मोठं शेतकरी आंदोलन चालूया...पेट्रोलचं भाव गगनाला भिडल्यात...जनता महागाईने होरपाळतीया..कोरोना महामारीनं सगळ्याच सामान्य माणसाचं कंबरडं मोडलयां..पुण्यातल्या खासगी हॉस्पिटल वाल्यांनी निबार लूटलाय गोरगरीबाला.. सामान्याला... तरीबी तुमचा पुणेकर शांतच व्हय...जीवघेण्या ट्रॅफिममधून, खड्डे पडलेले रस्ते तुडवत पुण्यात प्रवास करून, प्रदूषणाचा काळा धूर आमच्या फुफुसात घालून आमी तुमच्याकडे आलं की तुम्ही म्हणणार.. पाणी कमी वापरा.. 2 दिवस झालं पाणी आल नाय...आरं तुमच्या पेक्षा आमचा गावं भारी... आणि म्हणे नादखुळे पुणेकर...
किश्या भाऊचा धारदार बाणानं आमचं टकूरं गरम झालं खरं...मग त्याला बी आमचा पुणेरी हिसका, बाणा दाखवून म्या उत्तर दिलं जोरदार....
पुढच्या लेखात... नक्की वाचा....
आता पुढचा नादखूळा प्रवास.... पुढच्या भागात सांगतो ,तोपर्यंत ह्या अभिजीत पाटीलचा रामराम 🙏🙏🙏🙏🤔😍😜 दोस्तमंडळी 😜😍😂
लेखक : - पत्रकार अजित श्रीरंग जगताप, पुणे. संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.
अस्सल पुणेरी लेख...
ReplyDeleteएकदम खरा खुरा....