Sunday, April 4, 2021

महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई' यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी "भुमाता ब्रिगेड संघटनेविषयी विचारले परखड, जाहीर प्रश्न"....

 


पुणे, दि. 4 : - महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी भुमाता ब्रिगेड या संघटनेविषयी परखडपणे जाहीर प्रश्न विचारलेले आहेत. 




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण व आक्रमकपणे विविध चॅनेलवर विकास लवांडे मांडत असतात. महाराष्ट्रातील महिला प्रश्नांसाठी लढणाऱ्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना भुमाता ब्रिगेड संघटनेविषयी विकास लवांडे यांनी विचारलेले परखड, जाहीर प्रश्न त्यांच्याच शब्दात खालील प्रमाणे...





राष्ट्रीय नेत्या सन्मानीय  तृप्ती देसाई यांना जाहीर प्रश्न :


आपली भूमाता महिला ब्रिगेड ही स्वयंसेवी संस्था आहे की संघटना? याची माहिती मिळावी.


ब्रिगेडची अधिकृत नोंदणी असेल तर त्याबाबतची रजिस्टर नंम्बर वगैरे सविस्तर माहिती मिळावी.


सदर ब्रिगेडची संस्थापक सदस्य , राष्ट्रीय  कार्यकारीणी , राज्य कार्यकारिणी ,पुणे कार्यकारिणी  ,संस्थापक सदस्य , ब्रिगेडचे मुख्य कार्यालय पत्ता , इत्यादी सर्वांचे नाव, पत्ते, संपर्क नंम्बर कुठं मिळेल ? कोण देईल ?


आपल्या जाहिरात स्वरूपाच्या वेबसाईटवर ही सर्व माहिती का दिलेली नाही ? 


सदर ब्रिगेडच्या वतीने वार्षिक अधिवेशन ,मासिक बैठका होतात किंवा कसे ? 


ब्रिगेडचा वार्षिक जमाखर्च, हिशोब वगैरे लेखापरीक्षण दरवर्षी होत असल्यास त्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला जातो किंवा कसे ? 


भूमाता महिला ब्रिगेडचा दैनंदिन ,मासिक ,वार्षिक सर्व प्रकारचा खर्च कसा भागवला जातो? त्याबाबत माहिती मिळावी.

 

आपल्याकडे महिला अत्याचार प्रकरण आल्यास त्याबाबतची कार्यपद्धती काय असते ?  आलेल्या तक्रारीबाबत खऱ्या खोट्याची वास्तवाची शहानिशा करण्याची आपल्याकडे काही विशिष्ट यंत्रणा किंवा पद्धत आहे काय ? असेल तर त्याबाबत स्पष्टीकरण मिळेल का ?


ब्रिगेडचे सदस्यत्व घेण्यासाठी नियम, अटी, फी इत्यादी काय आहेत ? 


आजपर्यंत महिला अत्याचार प्रकरणात ब्रिगेडच्या प्रयत्नामुळे किती व कोणत्या आरोपींना शिक्षा मिळाली आहे त्याची माहिती मिळेल का ? 


भूमाता महिला ब्रिगेडमध्ये कोणत्याही पत्रकार परिषदेत किंवा तुमच्या तथाकथित आंदोलनात राष्ट्रीय नेत्या तृप्ती देसाई वगळता  इतर मुख्य पदाधिकारी कुणीही कधीच दिसत नाहीत , याचे कारण काय ? 


भूमाता ब्रिगेडचे मुख्य ध्येय , धोरण, उद्दिष्ट व आपली राष्ट्रीय विचारधारा काय आहे ? आपण हिंसा मानता किंवा अहिंसा मानता ? 


आपल्या वेबसाईटवर मोघम स्वरूपाची व जाहिरात स्वरूपाची माहिती आहे ,ब्रिगेडबाबत संघटनात्मक सर्व तांत्रिक व कायदेशीर सर्व सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध का नाही ?


आपल्या ब्रिगेडला शासन यंत्रणा , पोलीस यंत्रणा , महिला आयोग , न्यायव्यवस्था यांवर विश्वास आहे किंवा कसे ? 


भूमाता महिला ब्रिगेडकडे महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या पदाधिकारी व सदस्यांचे अधिकृत प्रशिक्षण झालेले आहे किंवा कसे ? प्रशिक्षित महिला किती आहेत? 


आपल्याकडे कुणीही पीडित स्त्री पुरुष न्याय मागायला येतात तेव्हा त्यांचेकडून फी स्वरूपात किती पैसे घेतले जातात किंवा कसे ?


आपल्या ब्रिगेडचा स्त्री पुरुष  विषयक दृष्टिकोन कसा व कोणता आहे ? त्याबाबत काही स्पष्ट विचारधारा आहे काय ? 


भूमाता ब्रिगेडच्या राष्ट्रीय नेत्या सन्मानीय तृप्तीताई देसाई यांनी वरील सर्व प्रश्न व मुद्यांची सविस्तर अधिकृत माहिती विषयाला अजिबात फाटे न फोडता व कसलीही चिडचिड न करता जगजाहीर देणे त्यांची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. कृपया विषयांतर नको.


------ विकास लवांडे

  (एक सामान्य नागरिक )




भुमाता ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तृप्ती देसाई महाराष्ट्रात आणि देशभरात महिलांना न्याय मिळण्यासाठी, महिला प्रश्नांसाठी  आक्रमकपणे आंदोलन करत असतात यावेळी अनेकदा टिकेला सामोरे जावे लागते.



No comments:

Post a Comment