Thursday, April 29, 2021

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान 'श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर' यांनी जपली सामाजिक बांधिलकी; वीर येथील 'शंभर बेडचे सुसज्ज कोविड सेंटरचे' खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन, पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत लोकार्पण ...



वीर, दि. 28 : - कोरोना महामारीने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवलेला आहे. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला असताना  पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा  देवस्थान ट्रस्ट वीर यांनी सामाजिक बांधिलकी जपत, होप फाउंडेशन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वीर येथे 100 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर चालू करून कोरोनाकाळात पुरंदरकर नागरिकांसाठी चांगली आरोग्य सुविधा निर्माण केली.




पुरंदर तालुक्यातील वीर येथील  भक्तनिवास मध्ये श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट, आरोग्य विभाग व होप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कोवीड सेंटरचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. 



यावेळी पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंतकुमार माहूरकर, माजी सभापती अर्चना जाधव, राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर धुमाळ, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, पुष्कराज जाधव, सोमेश्वर कारखान्याच्या संचालिका ऋतुजा धुमाळ, प्रसिद्ध उद्योजक विठ्ठल धुमाळ,  वीर देवस्थान चेअरमन संतोष धुमाळ, वीर देवस्थानचे  विश्वस्त व सल्लागार  मान्यवर म्हणून उपस्थित होते.




व्हिडिओ कॉल वरुन संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "देवस्थानने उभारलेले भक्त निवास कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मिळाल्याचे समाधान वाटत आहे. केंद्र सरकारकडून मिळणारी मदत तोकडी असली तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या नियोजनामुळे लसीकरण व उपचारांमध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पुरंदर  वासियांनी शासनाच्या नियमांचे पालन करून चांगली शिस्त पाळली आहे.हे युद्ध आपण सगळे मिळून जिंकण्याचा विश्वास देऊन कोरोनाचे संकट गेल्यावर सर्व सहकाऱ्यांसमवेत श्रीनाथ म्हस्कोबांच्या दर्शनासाठी येणार असल्याचे सांगितले."



कार्यक्रमा दरम्यान जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती रणजीत शिवतारे यांनी सर्वांशी संवाद साधला.




यावेळी बोलताना पुरंदरचे आमदार संजय जगताप म्हणाले की, "खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीर येथे  शंभर बेडचे सुसज्ज कोवीड सेंटर सुरू करण्यात आले असून हे कोवीड सेंटर दक्षिण पुरंदर मधील नागरिकांना वरदान ठरणार आहे. दिवे, सासवड, खळद , जेजुरी येथील कोवीड सेंटरचा ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले."



  "देवस्थान ट्रस्टच्या वतीने भक्त निवासा मधील सहा मोठे हॉल , पिण्याचे शुद्ध पाणी, लाईट व रुग्णवाहिका पुरवण्यात आली असून विठ्ठलराव गणपतराव धुमाळ यांच्या वतीने पाच लाख रुपये किंमतीचे ७० बेड या कोवीड सेंटरला भेट देण्यात आले असल्याचे" वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. 





यावेळी तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नाली शिंदे , संतोष दुधाळ, मयूर जगताप,सरपंच माऊली वचकल, राजेंद्र धुमाळ, महेश राऊत,समीर जाधव,शरद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्कराज जाधव व आभार देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सचिव अभिजित धुमाळ यांनी मानले.



" कोरोना महामारीने संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक त्रस्त झालेले असताना पुरंदर मधील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी वीर देवस्थान ट्रस्टने 100 बेडचे सुसज्ज कोविड  सेंटर सुरू करण्यासाठी उचललेले पाऊल खूपच कौतुकास्पद असून सामाजिक बांधिलकी जपून समाजात एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूज चे संपादक अजित जगताप यांनी दिली.




कोरोना काळात महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी, पक्षांनी तसेच देवस्थान ट्रस्टने आरोग्य सुविधा निर्माण करून पुढाकार घेणे गरजेचे आहे.





2 comments: