पुणे, दि.7 : - पुणे शहरात कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. कोरोना बाधित रुग्ण संख्येचे नवे नवे उच्चांक पाहायला मिळत आहेत. पुणे शहरातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांना व्हेंटिलेटर बेड, ऑक्सीजन बेड मिळत नाहीयेत अशा तक्रारी नागरिक करत आहेत.
पुणे शहरातील रुग्णालयांना नियमितपणे ऑक्सिजन मिळत नाहीये त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करायला अडचण येत असल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना या ऑक्सिजनच्या गंभीर समस्ये संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे, रुग्णसेवक उमेश महाडिक, प्रहार जनशक्ती पक्ष सदस्य, रुग्णसेवक नयन पुजारी, अमोल मानकर, नितीन पगार, शुभम शहा, अमोल शेरकर, संदीप नवले, सागर ननवरे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
"पुणे शहरात ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे पेशंट दगावला जात आहे. जाब विचारायचा कुणाला?ॲम्बुलन्स मध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही. हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही. मग पेशंटनी काय करायचे? महानगरपालिकेच्या गेटवर जाऊन उपचार घ्यायचे का? पुणे शहरातील अशी गंभीर स्थिती चालू राहिल्यास भरपूर पेशंट उपचाराविना दगावण्याची भीती वाढत चालली आहे. आणि त्याकरता सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल त्यामुळे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने प्रशासनाला विनंती केलेली आहे की आपण या गोष्टीवर लवकरात लवकर लक्ष घालावे जर परिस्थितीत बदल न झाल्यास राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलन करू." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक नयन पुजारी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
No comments:
Post a Comment