Thursday, April 8, 2021

"पुणे शहरात 'कोरोनाचा महाउद्रेक' आज 'एका दिवसात' कोरोनाबाधितांचा आकडा '७०००' पार;" कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याने चिंता वाढली, ४३ जणांचा मृत्यू...

 

पुणे, दि. 08 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात  कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उद्रेक  झालेला दिसून येत आहे. आज गुरुवारी पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने चिंता वाढवणारा नवा उच्चांक गाठला.  आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 7,010 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.





पुणे शहरात 48,939 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 4,099 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 43 लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.




पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत.  कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध लागू केलेले आहेत. 




1) संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी (अत्यावश्यक सेवा वगळून) तर दिवसा जमावबंदी.


२) ७ दिवस हॉटेल, मॉल्स, बार, सिनेमा हॉल, प्रार्थनास्थळे, आठवडी बाजार, जिम, नाट्यगृह बंद.


3) पार्सल सेवा सुरू राहणार.


4) पीएमपीएल बस सेवा पुर्णतः बंद.


5) लग्न आणि अंत्यविधी सोडून इतर कार्यक्रमावर पूर्णतः बंदी.


6)मंडई, मार्केट यार्ड, सोशल डिस्टंसिंग राखून सुरू.


7) बागा सकाळच्या वेळेत सुरू राहणार.


8) शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद.


9) दहावी बारावीच्या परीक्षा वेळेत होणार.


10) एमपीएससी 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही.


शुक्रवारी या निर्बंधांचा फेरआढावा घेतला जाणार आहे.


महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची धडकी भरवणारी संख्या पाहून महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर दिसत आहे.



पुणे शहरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.





'पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळणे खूप गरजेचे आहे.'






No comments:

Post a Comment