मला भेटलेले देवदुत
(धन्वंतरी )
आज मला माझा अनुभव शेअर करावासा वाटतोय. कारण फेसबुकवरील सर्व गृप म्हणजे एक आपले कुटुंबच आहे असे मी मानते .त्यामुळे कुटुंबातल्या व्यक्तीं जवळ आपल्या मनीचे हितगुज सांगायला काहीच हरकत नसते. गेले दोन महिने मी किडनी स्टोनच्या त्रासाने खूपच आजारी होते. मला ११ एम. एम. चा किडनी स्टोन होता.
परवा पुण्यातील एका नामांकित हाॅस्पिटलमधे एका अलोपॅथी डॉक्टरांची (यूरोलॉजिस्ट) वेळ घेऊन त्यांना दाखवून आले. त्यांनी मला सांगितले ११ एम .एम. चा स्टोन आहे. लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल .ऑपरेशनच्या वेळी एक स्टेंट टाकणार होते. ती स्टेंट परत तीन आठवड्यांनी लोकल अनेस्थेशिया देऊन परत काढणार होते. मला अत्यंत टेंन्शन आले .दोन दोन वेळा या प्रक्रियेतून जाणे मला खूप त्रासदायक वाटत होते.
मागच्या शुक्रवारी मी ऑपरेशन चे पैसे भरायला पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यादिवशी नेमकी गुरूपौर्णिमा होती. तेथे मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक गुरुच भेटले म्हणायचे.त्यांनी मला एक सल्ला दिला.ते म्हणाले मॅडम टेंन्शन नका घेऊ. मी सांगतो तेवढे ऐका डॉक्टर दीपक जगताप हे किडनी स्टोन मास्टर आहेत. आपण अगोदर त्यांची ट्रीटमेंट घेऊन बघा. मी थोडी गोंधळून गेले होते. कशावर विश्वास ठेवावा तेच कळत नव्हते. उद्या तर ऑपरेशन आहे आणि आता इथून पुढे होमिओपॅथी ट्रीटमेंट कशी काय घेणार? घरचे लोक काय म्हणतील? एवढा त्रास होतोय आणि ऑपरेशन कॅन्सल करून होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यायचा डिसीजन कसा काय मनानेच घेतला. कारण या आधी मी कधीच होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली नव्हती. परंतु आॅपरेशन च्या भीतीने मी डॉक्टर दीपक जगताप यांचे टिळक रोडवरील क्लिनिक गाठले. भरपावसात अगदी झपाटल्यासारखे मी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पाय ठेवला. सोनोग्राफीचा रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले. डॉक्टरांनी रिपोर्ट बघून इतक्या आत्मविश्वासाने मला सांगितले आपले ऑपरेशन करावे लागणार नाही. माझ्या औषधाने आपला स्टोन नक्की पडेल. मला तो एक चमत्कारच वाटत होता. कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नव्हते. कारण उद्या ऑपरेशन. एकदा नाही दोनदा तीच प्रकिया. साधारण खर्च एक ते दीड लाख रुपये सांगितलेला आणि हे डॉक्टर तर म्हणतात माझ्या औषधांनी चार ते पाच दिवसात स्टोन पडून जाईल. मी खूप आनंदी झाले.
त्यादिवशी मला साक्षात डॉक्टर म्हणजे एक देवदूतच आहेत असेच वाटले.
ते डॉक्टर म्हणजे साधेसुधे कोणी नसून गोदाजीराव जगताप यांचे थेट आठवे वंशज व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सुनबाई इंदुमती राणीसाहेब यांचे ते वंशज.ईंदुमती राणीसाहेब म्हणजे सासवडच्या शंकरराव पांडुरंगराव जगताप यांच्या कन्या. छत्रपती शाहू महाराजांनी निरखून पारखून घेतलेलं ते शंभर नंबरी सोनं होतं. त्यांचेच वंशज म्हणजे डॉक्टर दीपक जगताप सर . चेहऱ्यावरचे तेज आणि बोलतानाचा आत्मविश्वास हिच त्यांच्या खानदानाची ओळख होती.
मला फार काही विचार करावा लागला नाही. ही व्यक्ती नक्कीच आपल्याला चांगले मार्गदर्शन करणारी आहे, याची तिथेच मला खात्री पटली होती. डॉक्टरांच्या बोलण्यावरून मला अत्यंत विश्वास वाटत होता.फक्त औषध च नव्हे तर डॉक्टरांनी माझ्याबरोबर इंदुमती राणीसाहेबांच्या इतिहासा बद्दल बरीच चर्चा केली. मला दोन गोष्टीचा आनंद झाला होता एक तर मला भेटलेले देवदुत आणि दुसरे म्हणजे गोदाजीराव जगताप आणि इंदुमती राणी साहेबांचे ते वंशज होते.
डॉक्टरांच्या क्लिनिक मधून घरी परतत असताना माझ्या मनामध्ये खूप मोठा आत्मविश्वास आला होता. घरी आल्यानंतर आठ दिवस व्यवस्थितपणे औषध घ्यायला सुरुवात केली. दर दोन दिवसांनी डॉ. वृषाली मॅडम ना व्हाट्सअप वर मेसेज करायचे. मॅडम खूप त्रास होतो आहे, पण अजून काही स्टोन पडत नाही .डाॅ.वृषाली मॅडमचे माहेर कोल्हापूर येथील खानदानी मोरे कुटुंबातील. त्यांच्या आजीं चे बालपण जुन्या राजवाड्यात राजेशाही थाटात गेलेले.अशा राजेशाही थाटातल्या आजीचा सहवास डॉक्टर वैशाली मॅडमना लाभला होता. त्यामुळे मॅडमच्या बोलण्यात मार्दव आणि आश्वासकता पुरेपूर भरली होती. मॅडम मला इतक्या आत्मविश्वासाने सांगायच्या काळजी करू नका नक्की स्टोन पडेल. त्यांच्या त्या आश्वासक दोन शब्दावर मी पुढचे दिवस ढकलत जायचे.दोन दिवस खुप त्रास झाला. आज दुपारी अचानक माझा किडनी स्टोन पडून गेला. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस आहे .कारण दोन महिने मी काय त्रास सहन केला आहे तो फक्त माझे मलाच माहिती.
हा माझा अनुभव मला माझ्या सर्व फेसबुकवरील फ्रेंडसबरोबर शेअर करावासा वाटला. डॉक्टर दीपक जगताप म्हणजे मला भेटलेले देवदूतच आहेत. डॉक्टर दीपक जगताप आणि डॉक्टर वृषाली जगताप मला वेळोवेळी धीर देत होत्या. काळजी करू नका स्टोन पडणार तुम्हाला ऑपरेशन नाही करावे लागणार आणि ते त्यांचे बोल आज खरे ठरले. खूप खूप धन्यवाद डॉक्टर दीपक जगताप आणि डॉक्टर वृषाली जगताप. आता किडनी स्टोन ला घाबरायचे नाही. कारण स्टोन मास्टर आपल्या जवळच हजर आहेत .परत एकदा खूप खूप धन्यवाद डाॅ.जगताप सर आणि डाॅ.वृषाली मॅडम.
कोणीतरी कधीतरी आपल्याला हात देतं. कोणीतरी कधीतरी आपल्या मार्गावर सावली होतं. कोणीतरी कधीतरी आपल्या जगण्याचा मार्ग सुखकर करतं. ती मदत तो मदतीचा हात त्यांच्या दृष्टीने छोटा असतो कदाचित .पण आपल्या दृष्टीने त्यावेळी तो खूप मौल्यवान असतो.
लेखिका : - इतिहास अभ्यासक डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
No comments:
Post a Comment